Friday, 13 May 2016

जानिए भारतीय संविधान में धाराओ का मतलब .....

धारा 307 = हत्या की कोशिश
धारा 302 =हत्या का दंड
धारा 376 = बलात्कार
धारा 395 = डकैती
धारा 377= अप्राकृतिक कृत्य
धारा 396= डकैती के दौरान हत्या
धारा 120= षडयंत्र रचना
धारा 365= अपहरण
धारा 201= सबूत मिटाना
धारा 34= सामान आशय
धारा 412= छीनाझपटी
धारा 378= चोरी
धारा 141=विधिविरुद्ध जमाव
धारा 191= मिथ्यासाक्ष्य देना
धारा 300= हत्या करना
धारा 309= आत्महत्या की कोशिश
धारा 310= ठगी करना
धारा 312= गर्भपात करना
धारा 351= हमला करना
धारा 354= स्त्री लज्जाभंग
धारा 362= अपहरण
धारा 415= छल करना
धारा 445= गृहभेदंन
धारा 494= पति/पत्नी के जीवनकाल में पुनःविवाह
धारा 499= मानहानि
धारा 511= आजीवन कारावास से दंडनीय अपराधों को करने के
प्रयत्न के लिए दंड।
शेयर जरूर करें ताकि और लोग भी ये जानकारी जान सक                             🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा...
      🌹🌹शुभप्रभात🌹 🌹
  🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
       🌺🌾🍁🌹🍁🌾🌺

नक्की वाचा फक्त १ मिनिट लागेल..plzz🙏🏼

बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल..
म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..
एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली..
.
त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल..
अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला..
घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती..
बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येत नव्हते..
आपली ओढणी संभाळत..
"भैया जल्दी दो"..
या पलिकडे ती काहीच बोलत नव्हती..
घाबरलेली तिची नजर फक्त खाली पाहत होती..
.
तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन तेथे थांबला..
.
आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक ती पुर्ण भेदरुन गेली..
.
तेवढ्यात तो युवक बोलला..
" आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुन पाणी पुरी खातीयेस काय?"
.
संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचे मुले चालते झाले..
आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास घेतला..
.
न राहुन तिने त्या युवकाला विचारल..
"माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे"
.
तो युवक हसत बोलला "काय फरक पडतो.. तु आहेस तर कुणाची तरी बहिणच ना"?
.
आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुन तेथुन निघुन गेला..
.
त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या मुलिची मान आभिमानाने उंचावली...
.
कारण त्याच्या टी शर्टावर लिहिले होते..........
💐💐आम्ही भिमाचे भक्त 💐💐
.
रोज जोक शेअर करतात पण आज ही पोस्ट पण शेअर करा...

!! उलटा प्रवाह !!

लोक गोळा करता आले
पण लोकांना घडवता आले नाही
विहारात बोलावता आले
पण मंदिराच्या दारी अडवता आले नाही

विहारं बांधता आली
पण माणसं बांधता आली नाही
देणगी मागता आली
पण विचार मांगता आले नाही

त्रिशरण पंचशील पाठ झाली
पण आचरण पाठ झाली नाही
बाबासाहेबांशी गाठ झाली
पण पुस्तकांशी गाठ झाली नाही

बाबांना डोक्यावर घेऊन नाचले
पण डोक्यात मात्र घेता आले नाही
रचले बाबासाहेब हजारो पुस्तकात
पण वाक्यात एकाही घेता आले नाही

भिंतीवरच्या फोटोत लटकुन
आता भीम ही थकला असेल
म्हणे "जळमाटं लागण्या आधी उतरव,
नाहीतर मीच उद्या तुझ्या घरात नसेल"
म्हणे "जळमाटं लागण्या आधी उतरव,
नाहीतर मीच उद्या तुझ्या घरात नसेल"

🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻

प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण  भाग - ६

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷

☀ ९) उपादान

प्रतित्यसमुत्पादाची नववी कडी म्हणजे उपादान. तृष्णेमुळे उपादान उत्पन्न होते. उपादान म्हणजे घट्ट पकडून ठेवणे. जरी एखाद्या घट्ट पकडून ठेवलेल्या गोष्टीपासून त्रास, कष्ट, दु:ख होत असले तरी ती गोष्ट न सोडणे.

तृष्णेचा हळूहळू आपल्या मनात संचय वाढत जातो. त्यामुळे त्याची मनावर घट्ट पकड बसते. तृष्णेच्या याच संचयाला उपादान म्हणतात.

तृष्णेच्या संग्रहाने अर्थात उपादानाने प्रभावित होऊन मनुष्य पुढिल कर्म करीत असतो. उपादान चार प्रकाराचे आहेत.

🔹पहिले कामउपादान म्हणजे सर्व प्रकारच्या आनंद देणार्या, सुख देणार्या, आवडणाऱ्या आणि लैंगिक समाधान देणार्या गोष्टीसंबंधी अत्यंत पराकोटीचे आकर्षण असणारी विचारसरणी.

🔹दुसरे दृष्टीउपादन म्हणजे असा विश्वास की, ‘हे एकच बरोबर आहे व बाकीचे चुकीचे आहे’ असा एकांगीपणाची विचारसरणी.

🔹तिसरे उपादान म्हणजे कर्मकांडाने मनुष्य पवित्र होतो, त्याच्यावर कोणतेही संकट येणार नाहीत किंवा आलेल्या संकटाचे निवारण होईल, त्याला भौतिक लाभ होईल, त्याला सुख मिळेल अशा प्रकारची विचारसरणी.

🔹चवथे सत्कायदृष्टी उपादान म्हणजे ‘मी’, ‘माझे’, ‘माझा आत्मा’ अशी आत्मभावाचे दृष्टी व नेहमी बदलत असणऱ्या जगाला न बदलणारे आहे, आत्मा कायम टिकणारा आहे अशी धारणा बाळगणारी विचारसरणी.

🔅तृष्णेचा निरोध केला असता उपादानाचा निरोध होतो.

क्रमश:

📋
     🔸बुध्द धम्म अनुसरण संघ ®🔸vijay sonkamble
          86 52 33 00 11
          MUMBAI
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷

😇कोण आहेत आंबेडकर अन काय केलंय आंबेडकरांनी???

😇कोण आहेत आंबेडकर अन काय केलंय आंबेडकरांनी???

👥मित्रा,
तू कोणत्या जातीचा धर्माचा याच्याशी काही देणे घेणे नाही,
पण तू ज्या कुठल्या ठिकाणी काम करतोयेस ना त्या ठिकाणी तू आज '१४' तासांच्या ऐवजी '८' तासांची ड्यूटी करतोयेस ते '१४' चे '८' तास ज्यांनी केले ते आहेत "आंबेडकर"

👭तुझी बहिण, बायको ज्या ठिकाणी काम करतायेत त्यांना स्त्री म्हणून मिळणाऱ्या सोयी किंवा मुभा असतात,
त्या गरोदर असताना मिळणाऱ्या सुट्ट्या देऊ करणारे कायदे निर्माण केलेत ते आहेत "आंबेडकर"

👩 त्यांना सर्वात जास्ती सक्षम बनवण्यासाठी आरक्षणात महिलांना अधिक प्राधान्य दिले ते आहेत आंबेडकर...

🏦ज्यांच्या आराखड्यावर मजबूत आणि ज्यांच्या कल्पनेतून 'The Reserve Bank Of India' आधारली आहे ते आहेत आंबेडकर...

💸तूला, मला अन आपल्या प्रेत्येकाला जो 'P. F.' मिळतो ना,
ते आहेत "आंबेडकर"....

🇮🇳आंबेडकर तर तुझे माझे नंतर आहेत, ते सर्वात आधी या 'देशाचे' आहेत.

💪संपूर्ण स्वातंत्र्यची मागणी करणारे पहिले 'देशभक्त' ते आहेत…आंबेडकर

💺 सर्वात महत्वाचे म्हणजे या देशाची सूत्र कोणच्या हातात देयचे हे ठरवण्याचा हक्क "मतदान" हे ज्यांनी तुला मिळवून दिले ते आहेत आंबेडकर...

😡अजून एक...
ज्या मनुवादी विचारांनी शिवपुत्र 'संभाजी महाराजांना' अनायत यातना देऊन मारलं त्या शंभूराजांच्या खुनाचा बदला म्हणून "मनुस्मृती" रायगडाच्या पायथ्याला नेऊन ज्यांनी जाळली ते आहेत "आंबेडकर "...

🌞आंबेडकर महान आहेत, कित्येक गोष्टींचे निर्माते आहेत...

😇 ज्या तुला माहितही असतील पण त्या कोणामुळे आहेत हे तुला माहित नसेल,

 आंबेडकर मोठे अन महान आहेतच पण जातीयवाद्यांनी अन बिकावू मिडिया ने अजनुही आंबेडकर पुरेपूर आपल्या पर्यंत पोहोचू दिले नाही .

"साहेबांचे साहेब बाबासाहेब ". 👉
हा मेसेज अशा सर्व लोकांपर्यंत पोहचवा जे विचारतात काय केले बाबासाहेबांनी....

Thursday, 24 September 2015

बाबासाहेबाचा फोटु

👤 बाबासाहेबाचा फोटु 👤


अखेरीस तो दिवस उजाडला ज्याची पांडबा व्याकुळतेने वाट पाहत होता कारण आज पांडबा आपल्या 14 वर्षाच्या जन्मठेपेतुन मुक्त होणार होता. सवर्णांच्या अत्याचाराला वैतागुन पांडबाच्या हातून नकळत एका जुलूमी पाटलाचा खून झाला होता, ज्याचा पश्चाताप पांडबा गेली 14 वर्षे जेलमधे करत होता.

पांडबा येरवडा जेलच्या गेटमधुन बाहेर आला तर पाहतो काय त्याचा तरुण मुलगा हातात हार घेऊन भली मोठी BMW कार घेऊन आपल्या बापाचे स्वागत करायला उभा होता.. मग मुलगा म्हणाला की "या बाबा बसा गाडीत" हे सर्व पाहुन पांडबाचा आनंद गगनात मावेना, पण अचानक पांडबाचं लक्ष गेल ते त्या BMW गाडीच्या काचेवर तिथे लिहिले होते "ॐ साई राम" ... पांडबाच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो म्हणाला की या गाडीवर बाबासाहेबांचे नाव नाही पण हे "ॐ साई राम" कुठून आलं?
मुलाने कशी बशी समजूत काढली मग पुढे बापलेकांचा प्रवास मुम्बईच्या दिशेने सुरु झाला...

मुंबईजवळ आल्यावर पांडबाला त्याचे बालपण जिथे गेले ते "भीम नगर" दिसले

पांडबा : (मुलाला) अशोक गाडी थांबव

अशोक : बाबा आता आपण इथे राहत नाही आता आपण हीरानंदानी मधे राहतो हां झोपड़पट्टी एरिया आहे काय करायचे तिथे जाऊन... सर्व ब्लडी डर्टी जयभिमवाले लोक राहतात तिथे

पांडबा आश्चर्याने अशोककड़े पाहू लागला ...

गाडी शेवटी हीरानंदानी काम्प्लेक्स मधे शिरली, मग 17व्या माळ्यावर लिफ्टने गेल्यावर दारावर "अशोक पांडबा कांबळे" च्या ऐवजी "Ashok P.K." एवढेच होते.

आत शिरल्यावर पांडबा घरात बुद्ध बाबासाहेब यांचे फ़ोटो शोधत होता पण त्याला काही काही सापड़ेना आणी समोरच त्याला भला मोठा गजानन महाराजाचा गांजा ओढ़तानाचा फ़ोटो सोन्याच्या फ्रेम मधे सजवलेला दिसून आला..

आता तर पांडबाला राग अनावर झाला

पांडबा : आरं लेका! हे समदं काय पाहतोय मी, तुझ्या दारावर गाडीवर कुठच बाबासाहेब नाही आन इथ घरातपण ह्या लंगोटीवाल्या चिल्लमतोंडयाचा फोटु तू लावलायस तुला मह्या सूटबूट वाल्या बाबासाहिबाचा फोटु लावाय कसली लाज वाटत व्हती रं?

अशोक : बाबा just try to understand my feelings इथे सर्व पॉश लोक राहतात इथे हे जयभिम वगैरे चालत नाही...

पांडबा : आरं मग ह्यो लंगोटवाला चिल्लमतोंडया चालतोय व्हय?
आरं नालायक अवलाद ... ज्या मह्या भीमामूळं तुला हे समदं वैभव मिळालं त्या आपल्या बापाला तू इसरलास यापेक्षा काय वाइट बघायचं व्हतं जीवनात? आरं कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट गत होती आपली त्या बाबासाहेबानं आपल्याला हे मिळवून दिलं त्या बाबासाहेबा सोबत मी स्वतः महाड़च्या आंदोलनात व्हतो, नागपुरच्या दीक्षाभूमित व्हतो आम्ही कधी कुठल्या देवाला भिक नाय घातली कष्टाचा घाम गाळून तुला तुह्या मायनं मोठा केला आन तू त्या बाबासहेबाला इसरलास?


अशोक : अहो बाबा आपण असे किती दिवस जयभिम जयभिम घेऊन बसायचे? मला जे काही मिळाले ते तुमच्यामुळे मिळाले आईमुळे मिळाले जर तुम्ही कष्ट नसते केले तर मी आज डॉक्टर झालो नसतो त्यात मी मग बाबासाहेबांना का मानु?

पांडबा : आरं कष्ट तर मह्या आईबापानं पण मह्यासाठी लइ केलत पण म्या का नाही तुह्यासारखा डॉक्टर बनलो? कारण तूमच्या टाइमाला बाबासाहेबानं तुमच्या साठी समदं करून ठिवलं व्हतं ... आरं त्या माउलीन तुह्या मायेनं तुला शिकता यावं म्हणून लोकांच्या घरात धूनी भांडीची कामं केली पण कधी तिनं भीम आणी बुद्ध सोडून कुणा देवापुढं हात जोड़लं नाही...

अशोक : बस बाबा enough is enough मला तीच तीच तुमची जुनि कैसेट ऐकवू नका ... लक्षात ठेवा माझ्या पत्नीला आणी मुलांना देखील हे जयभिम जयभिम आवडत नाही (तितक्यात अशोकचा मुलगा जिम्मी शाळेतून येतो)

जिम्मी : हाय ग्रँडपा! How are You? तुम्ही का भांडत आहात?

पांडबा : आरं तुह्या बापानं बाबासाहेबाचा फोटु घरात लावला न्हाई,

जिम्मी : Who is this बाबासाहेब? Ohhh I am extremely sorry, I am not sure but I think त्यांनी काही संविधान वगैरे लिहिले असे ऐकले आहे पण त्यामुळे त्यांचा फ़ोटो इथे का लावायचा?


पांडबाच्या शरीराचे तर आता रक्तच आटले होते त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहु लागल्या होत्या त्याचाच मुलगा बाबासाहेबाना विसरला होता या विचाराने तो कोलमडून गेला होता.. आपलं गाठोडं घेऊन पांडबा एक एक जड़ पाऊल दाराकडे टाकू लागला...


अशोक : (चिडून) कुठे चाललात? वृद्धश्रमात? मला माहीत होतं की तुम्ही या घरात बाबासाहेबांच्या फ़ोटोवरुन तमाशा करुन इथून रागाने निघुन जाल!

पांडबा : वृद्धाश्रम हे तुह्यासाठी उपयोगी आहेत मह्यासाठी नाही, म्या चळवळीतला भीमसैनिक हाय, म्या मह्य आयुष्य मह्या भिमाच्या चळवळीत समर्पित करेन पण जिथं तू बाबासाहेबाला इसरलास तिथं तुझा लेक पण तुला इसरल्याबगीर राहणार नाही...

पण एक लक्षात ठीव जवा तुझा पोरगा तुला घरातनं हाकलल तेव्हा तू जा त्या वृद्धाश्रमात... तुला नक्की गरज पडेल...

🙏🏻

धन्यवाद

लेखक:
जगदीश संदानशिव
कल्याण.

सादर:
प्रशांत जाधव
कल्याण.