Monday, 16 May 2016

*बा...,*

*बा...,*

लोक म्हणायचीत
बा ला दारुडा
सडला लिव्हर अन् मेला
पर त्याच त्यालाच
दुःख माहीत
का पीत होता तो एवढा

बा च
कामच होतं असं
गटारातलं मैल काढायचं
तुम्हीच सांगा
माझ्या बा नं
कसं
न पिता काम करायचं

पोटाच्या त्या
खळगी पाई
दिसरात
कामात जुपायचा
शरीराचं दुःखनं
घालवाया
त्यो कायम
नशेत आसायचा

पण
खरं सांगतो तुम्हाला
माझा बा
लय मोठ्या दिलाचा
कितीबी रोज पिला
तरी
न विसरता
खायला आणायचा

लोक म्हणायचीत
जरी बा दारुडा
तरी कष्टानं घर
त्यानं उभारलं
पर
आमचं सुख बघायला
त्याला आयुष्य कमी पुरलं
पर
आमचं सुख बघायला
त्याला आयुष्य कमी पुरलं.!

*✍रवींद्र कांबळे 9112143360*

Friday, 13 May 2016

"सैराटच्या तर्राट प्रतिक्रियांबद्दल.." --- ✍🏼संजय गगे खरीडकर

"सैराटच्या तर्राट प्रतिक्रियांबद्दल.."
                         ✍🏼संजय गगे खरीडकर
                           मु.पो.खरीड (ठाणे)
                               ७०८३९३७९६८

      काल "सैराट" पाहिला आणि मन सुन्न झालं.....
      चित्रपट पाहण्याअगोदरच अवघ्या "मानव जातीला" ( एकवेळ दगडाच्या काळजाची ठिक आहेत, पण प्रिंन्सच्या काळजाची माणसं सोडून ) विचार करायला लावणार्‍या "सैराट"मध्ये ना कुणाच्या अंगावर कमी कपडे, ना प्रेमाचा उघडा-नागडा रोमान्स, ना अश्लीलता, ना कुठली फालतुगिरी, प्रेक्षकांना उगाचंच खुश करावं म्हणून ना कुठल्याच सीनमध्ये अतिशयोक्ती..... अख्ख्या चित्रपटात पहायला मिळाला तो गावाकडचा बाज अस्सल गावरानपणा (गावढंळपणा नाही), ज्यात कुठेही खोटेपणाचा थोडासुद्धा लवलेश नाही.....
     नागराज मंजुळेंने अलगद अन् हळूवारपणे मांडल्या त्या "कुमारावस्थेतील प्रत्येकाच्याच भावना" अन् दाखवला विशिष्ट वर्गाचा मुजोरपणा.....
चित्रपटात कुठल्याही सीनवर आॅब्जेक्शन घ्यावा, असं काहीच नाही..... काहीच नाही.....
    नाही म्हणायला, अजूनही डोकं बधीर करुन ठेवलंय त्या चित्रपटाच्या तीस सेकंदांच्या शेवटानं,
"ना कुठला संवाद, ना कुठलं संगीत.....
फक्त पहायला मिळाली ती रक्तानं माखलेली निरागस पावले, जी जातीयतेच्या नावाने बळी पडली होती.....
विचार करुनही सांगता येत नाही की, "बळी पडलेल्या त्या निरागस पावलांची जात कोणती होती...?? आणि बळी घेणाऱ्या त्या जातीची व्यवस्था कोणती होती..???"
       मी चित्रपटाविषयी मांडलेल्या कुणाच्याही प्रतिक्रियेवर काही टिप्पणी देण्याअगोदरच या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून लक्षात आणून देऊ इच्छितो की "रिंकू जरी रियल लाईफमध्ये इयत्ता ९ वीत शिकत असली तरी चित्रपटात कथानकाच्या आवश्यकतेनुसार आर्ची, परशा अन् इतर पात्रे सिनियर काँलेजमध्ये F.Y. च्या वर्गात शिकत आहेत. की ज्या वयात कुणालाही प्रेम होणे स्वाभाविकच काय नैसर्गिक आहे. अन् महत्त्वाचं म्हणजे "चित्रपट हे संस्कारांचे घर नाही."
          आता किव कराविशी वाटते, ती चित्रपट न पाहताच अन् पाहूनदेखील "बाल-संस्काराच्या अन् समाजातील संस्कृतीच्या नावानं चित्रपटावर ताशेरे ओढणाऱ्यांची आणि त्यांची बुद्धीची..!!!"
    मला तर वाटतंय "अशा लोकांची एकतर "फँड्री अन सैराट"सारखे चित्रपट पाहण्याची लायकीच नाही" किंवा "देवानं यांना घडवतांना सैराटमधील "प्रिंन्सपेक्षा कठीण काळजाचं" बनवलं असणारं..!"
"काय तर म्हणे आई-बापानं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आर्चीला पळून जाऊन प्रेम करायला शोभलं का..? सैराट पाहून म्हणे समाजातील मुलींनी असेच धंदे करावेत का..?? चित्रपटातून कोणते संस्कार घ्यावेत.??"
              नाही म्हणायला, प्रत्येक गोष्टीवर आपापलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. पण "कुणी जर प्रिंससारखं दगडाचं काळीज घेऊन समाजात वावरत असेल, तर त्यांनी मग स्वतःच्या कुमारावस्थेतील "परशा"ला  वाव देतांना एकदा नाही, तर हजारदा विचार करावा..... आणि ज्यांना चित्रपट पाहून आपल्या पोटी "आर्ची" जन्माला येण्याच्या भितीपोटी सैराटमधील काही खटकत असेल, तर त्यांनी आपलं स्वताचं काॅलेज जीवन तपासून पहावं..... अन् ज्यांच्या आयुष्यात काॅलेज जीवनच आले नसेल तर त्यांनी आपली स्वतःची कुमारावस्था तपासून पहावी..... की त्यावेळी आपल्या मनात कुणी आर्ची किंवा परशा तर डोकावत नव्हती..? किंवा त्यावेळी आपण कोणासाठी लंगडा अन् सलीम तर झालो नव्हतो??"
         सरतेशेवटी मी एवढंच म्हणेन की, सनी लियोन अन् शाहरुखसारख्या फडतूस कलाकारांचे फडतूस चित्रपट दाखवण्यापेक्षा आपल्या मुलांना "सैराट" दाखवा, एकतर "प्रिंसच्या भीतीपोटी आर्ची अन् परशा जन्माला येणार नाही" किंवा "रक्तात माखलेल्या निरागस पावलांना पाहून प्रिंस तरी जन्माला येणार नाही..!!!"

( लेखकदेखील एका मुलीचा बाप आहे. )
( संवेदना, ९१३०३३७९६८ )

जानिए भारतीय संविधान में धाराओ का मतलब .....

धारा 307 = हत्या की कोशिश
धारा 302 =हत्या का दंड
धारा 376 = बलात्कार
धारा 395 = डकैती
धारा 377= अप्राकृतिक कृत्य
धारा 396= डकैती के दौरान हत्या
धारा 120= षडयंत्र रचना
धारा 365= अपहरण
धारा 201= सबूत मिटाना
धारा 34= सामान आशय
धारा 412= छीनाझपटी
धारा 378= चोरी
धारा 141=विधिविरुद्ध जमाव
धारा 191= मिथ्यासाक्ष्य देना
धारा 300= हत्या करना
धारा 309= आत्महत्या की कोशिश
धारा 310= ठगी करना
धारा 312= गर्भपात करना
धारा 351= हमला करना
धारा 354= स्त्री लज्जाभंग
धारा 362= अपहरण
धारा 415= छल करना
धारा 445= गृहभेदंन
धारा 494= पति/पत्नी के जीवनकाल में पुनःविवाह
धारा 499= मानहानि
धारा 511= आजीवन कारावास से दंडनीय अपराधों को करने के
प्रयत्न के लिए दंड।
शेयर जरूर करें ताकि और लोग भी ये जानकारी जान सक                             🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा...
      🌹🌹शुभप्रभात🌹 🌹
  🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
       🌺🌾🍁🌹🍁🌾🌺

नक्की वाचा फक्त १ मिनिट लागेल..plzz🙏🏼

बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल..
म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..
एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली..
.
त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल..
अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला..
घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती..
बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येत नव्हते..
आपली ओढणी संभाळत..
"भैया जल्दी दो"..
या पलिकडे ती काहीच बोलत नव्हती..
घाबरलेली तिची नजर फक्त खाली पाहत होती..
.
तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन तेथे थांबला..
.
आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक ती पुर्ण भेदरुन गेली..
.
तेवढ्यात तो युवक बोलला..
" आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुन पाणी पुरी खातीयेस काय?"
.
संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचे मुले चालते झाले..
आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास घेतला..
.
न राहुन तिने त्या युवकाला विचारल..
"माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे"
.
तो युवक हसत बोलला "काय फरक पडतो.. तु आहेस तर कुणाची तरी बहिणच ना"?
.
आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुन तेथुन निघुन गेला..
.
त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या मुलिची मान आभिमानाने उंचावली...
.
कारण त्याच्या टी शर्टावर लिहिले होते..........
💐💐आम्ही भिमाचे भक्त 💐💐
.
रोज जोक शेअर करतात पण आज ही पोस्ट पण शेअर करा...

!! उलटा प्रवाह !!

लोक गोळा करता आले
पण लोकांना घडवता आले नाही
विहारात बोलावता आले
पण मंदिराच्या दारी अडवता आले नाही

विहारं बांधता आली
पण माणसं बांधता आली नाही
देणगी मागता आली
पण विचार मांगता आले नाही

त्रिशरण पंचशील पाठ झाली
पण आचरण पाठ झाली नाही
बाबासाहेबांशी गाठ झाली
पण पुस्तकांशी गाठ झाली नाही

बाबांना डोक्यावर घेऊन नाचले
पण डोक्यात मात्र घेता आले नाही
रचले बाबासाहेब हजारो पुस्तकात
पण वाक्यात एकाही घेता आले नाही

भिंतीवरच्या फोटोत लटकुन
आता भीम ही थकला असेल
म्हणे "जळमाटं लागण्या आधी उतरव,
नाहीतर मीच उद्या तुझ्या घरात नसेल"
म्हणे "जळमाटं लागण्या आधी उतरव,
नाहीतर मीच उद्या तुझ्या घरात नसेल"

🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻

प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण  भाग - ६

🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷

☀ ९) उपादान

प्रतित्यसमुत्पादाची नववी कडी म्हणजे उपादान. तृष्णेमुळे उपादान उत्पन्न होते. उपादान म्हणजे घट्ट पकडून ठेवणे. जरी एखाद्या घट्ट पकडून ठेवलेल्या गोष्टीपासून त्रास, कष्ट, दु:ख होत असले तरी ती गोष्ट न सोडणे.

तृष्णेचा हळूहळू आपल्या मनात संचय वाढत जातो. त्यामुळे त्याची मनावर घट्ट पकड बसते. तृष्णेच्या याच संचयाला उपादान म्हणतात.

तृष्णेच्या संग्रहाने अर्थात उपादानाने प्रभावित होऊन मनुष्य पुढिल कर्म करीत असतो. उपादान चार प्रकाराचे आहेत.

🔹पहिले कामउपादान म्हणजे सर्व प्रकारच्या आनंद देणार्या, सुख देणार्या, आवडणाऱ्या आणि लैंगिक समाधान देणार्या गोष्टीसंबंधी अत्यंत पराकोटीचे आकर्षण असणारी विचारसरणी.

🔹दुसरे दृष्टीउपादन म्हणजे असा विश्वास की, ‘हे एकच बरोबर आहे व बाकीचे चुकीचे आहे’ असा एकांगीपणाची विचारसरणी.

🔹तिसरे उपादान म्हणजे कर्मकांडाने मनुष्य पवित्र होतो, त्याच्यावर कोणतेही संकट येणार नाहीत किंवा आलेल्या संकटाचे निवारण होईल, त्याला भौतिक लाभ होईल, त्याला सुख मिळेल अशा प्रकारची विचारसरणी.

🔹चवथे सत्कायदृष्टी उपादान म्हणजे ‘मी’, ‘माझे’, ‘माझा आत्मा’ अशी आत्मभावाचे दृष्टी व नेहमी बदलत असणऱ्या जगाला न बदलणारे आहे, आत्मा कायम टिकणारा आहे अशी धारणा बाळगणारी विचारसरणी.

🔅तृष्णेचा निरोध केला असता उपादानाचा निरोध होतो.

क्रमश:

📋
     🔸बुध्द धम्म अनुसरण संघ ®🔸vijay sonkamble
          86 52 33 00 11
          MUMBAI
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷