Monday, 6 June 2016

👉 मी बौध्द असल्याचा मला अभिमान आहे......


👉   मी बौध्द असल्याचा मला अभिमान आहे......

बुद्धधम्म - मानवाचा धम्म...

बुद्धधम्म - ज्ञानाचा धम्म...

बुद्धधम्म - करुणेचा धम्म...

बुद्धधम्म - सत्याचा धम्म...

बुद्धधम्म - शीलाचा धम्म...

बुद्धधम्म - कल्याणाचा धम्म....

बुद्धधम्म - नीती धम्म...

बुद्धधम्म - बंधुत्वाचा धम्म...

बुद्धधम्म - समानतेचा धम्म...

बुद्धधम्म - स्त्री पुरुषांचा धम्म...

बुद्धधम्म - पूर्णत्वाचा धम्म...

बुद्धधम्म - मैत्रीचा धम्म...

बुद्धधम्म - जीवनाचा धम्म...

बुद्धधम्म - जाती निर्मुलन धम्म...

बुद्धधम्म - वर्ग निर्मुलनाचा धम्म...

बुद्धधम्म - गरिबी निर्मुलन धम्म...

बुद्धधम्म - दानी धम्म...

बुद्धधम्म - त्यागी धम्म...

बुद्धधम्म - सेवा धम्म...

बुद्धधम्म - विश्वरुपी धम्म...

बुद्धधम्म - न्यायाचा धम्म...

बुद्धधम्म - सदाचारी धम्म...

बुद्धधम्म - आत्मतेजाचा धम्म...

बुद्धधम्म - आत्म उन्नतेचा धम्म...

बुद्धधम्म - सम्यक धम्म...

बुद्धधम्म - उत्साही धम्म...

बुद्धधम्म - कुशल धम्म...

बुद्धधम्म - सामाजिक विषमतेचे. बुरुजं कोसंळणारा धम्म...

बुद्धधम्म - सर्वांना ज्ञानाची व्दारे उघडी ठेवणारा धम्म...

बुद्धधम्म - मानवाचा मानवासाठी व मानवाकरिता असलेला धम्म...

बुद्धधम्म - ना होमात ना हवनात लोकांच्या दु:ख निवारण्याचा धम्म...

बुद्धधम्म - ना जत्रात ना मंत्रात ना यंत्रात जो लोकसेवेत आहे तो धम्म...

बुद्धधम्म - माणसाच्या कर्तबगारीत असलेला धम्म...

बुद्धधम्म - ना उपासातापासात ना नवसात आहे...
तो आपल्या कर्तृत्वात आहे तो धम्म....

बुद्धधम्म - ना स्वर्गात ना मोक्षात आहे.
तो ह्यातील पूर्णत्वाला जाण्याचा धम्म....

बुद्धधम्म - ना अंधश्रद्धेचा ना अंधभक्तीचा आहे.
तो धम्म बुद्धीवादाचा धम्म....

बुद्धधम्म - ना हिंसेचा ना दोषाचा आहे तो मायेच्या शांततेचा धम्म....

बुद्धधम्म - ना देवाचा ना अवतारांचा आहे तो माणसांच्या तथागतांचा धम्म...

बुद्धधम्म - ना आत्म्याचा ना मोक्षाचा आहे तो अत:दीप बनण्याचा जीवनाच्या कल्याणाचा...

बुद्धधम्म - ना देवाच्या वाणीत ना देव शास्त्रात आहे तो कुशल कर्मात आहे तो सदाचारात आहे...

असा सर्वोत्तम मानवतावादी धम्म...!!!

🙏नमो बुध्दाय🙏जय भीम🙏
        मी बौध्द असल्याचा मला
अभिमान आहे...
I'm Buddhist....🙏👍🙏

एकदा एका पित्याने येरवडा जेल मध्ये बंद असणार्या आपल्या मुलाला पत्र लिहिले.📝📝

एकदा एका पित्याने येरवडा जेल मध्ये
बंद
 असणार्या आपल्या मुलाला पत्र
 लिहिले.📝📝

"बाळा मला शेतामध्ये
 बटाटे
पेरायचे आहेत.
मी आता खूप थकलोय.
 मी शेत खोदू शकत नाही.
जर तु
 असता तर किती बरं झाले असते.
आता मला एकट्यालाच शेत खोदावे
 लागणारं.."
मुलाने पत्र लिहीले 📝📝बाबा तु वेडा आहेस काय?
शेत-बित काय खोदू नको.. मी शेतात
 माझी हत्यारे लपवून ठेवली आहेत,
🔪🔫💣🔨💣💣🔫🔫
ती जर पकडली गेली तर
 माझी काही खैर नाही".








पत्र पाठवताच
 दुसर्या दिवशी पोलिसांनी त्यांचे पूर्ण शेत
खोदून काढले.
पण त्यांना काहिच सापडले
 नाही..
,








मुलाने परत पत्र पाठवले
"बाबा तुम्ही आता खुशाल बटाटे लावा..
मी जेलमधून
 तुमची एवढीच
मदत करु शकतो."
😂😂
😄😄😄😄

Compliances Calander for June'2016

Compliances  Calander for June'2016
🆒6th June- Due date for payment of excise and service tax for  the month of  May'2016
🆒7th June - Due  for payment of TDS/TCS for May'2016
🆒 10th June - Last date for excise return for the month of May'2016
🆒 15th June - last date for payment of Providend fund liability
🆒 15th June- Last date for first instt of advance tax for Assessee having tax laibility >10000 and issuance of TDS certificate for other than salary for quarter 1
🆒 20th June - Last date for payment of LBT
🆒 21st June- Last date for payment of MVAT liability and monthly return.
🆒 21st June - Last date for WCT TDS is for May'2016
🆒 21st June- Last date for payment of ESIC liability for  May 2016.
🆒 25th June- Last date for filing of PF return for the month of May
🆒29th June: Annual return for LBT (April to Mar'2016 for those whose turnover> 50cr and April to July'2015 for others)
🆒 30th June - Last date for payment and return of PTRC and last date for payment of PTEC for FY- 2016-17

🌹 To check ur liability, d detail based of Assessees' category is as below

A. For companies

➡ TDS deducted during May'2016  due for payment on 07.06.16.

➡ Advance tax for FY 16-17 First instt of 15% due on 15/06/2016

➡Issue TDS certificate for Q1 for other than salary by 15/06/16 and TCS certificate by 30/05/16

B. For firm and individual covered under tax audits

➡ TDS deducted in May' 2016  payment due on- 07.06.2016.
➡Advance tax to be paid 15% ( first instt) of tax liabilty till 15/06/2016
➡Issue TDS certificate for q1 for other than salary by 15/06/16 and TCS certificate by 30/05/2016
➡ Annual information statment due date 31/05/2016

C. Excise registered units

➡ for SSI - No payment and no return due this month
➡ for Non SSI units - Last date for payment for the month of May is 06.06.2016 and for return 10.06.2016

D. Service tax registered units

➡ for Ltd. Co. - Last date for payment for the month of May is 06/06/2016
➡ for others  -
No return no payment due

E. Maharashtra VAT registered

➡ for dealers covered on montly return - payment and return due on 21.06.2016
➡ for dealers requiring quarterly return - No payment and return due


➡ PTRC where annual liability above Rs. 50000 - payment and return due for salary of May'2016 -
 30.06.2016

➡PTEC liability F.Y. 16-17 Rs. 2500 to be  paid till 30/06/16

➡ Work Contract TDS payment for May'16 due on 21/06/2016

F. Maharashtra LBT

➡Payment for Month of May 2016 due on 20.06.2016, Annual return from April to Mar'16 for Assessee having turnover > 50cr and from April to July'15 for others due on 30/06/16


G. PF and ESIC registered units

➡ Payment of PF due on 15.06.2016 and monthly return due On 25.06.16
➡ payment of ESIC due on 21.06.2016

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कानून मंत्री (Law Minister) पदाचा राजीनामा का दिला?

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कानून मंत्री (Law Minister) पदाचा राजीनामा का दिला?

मुख्य 4 कारणे....

Note: कृपया नक्की वाचा आणि सर्व SC/ST/OBC पर्यंत पोहचवा.

*"बाबासाहेबांनी घटनेमधे 340 कलम ओ. बी. सी . च्या आरक्षणा विषयी लिहिले त्याची वस्तुस्थिती आणि कर्मकहाणी"*

(1) कलम क्र. 341 नुसार
शेड्युल्ड कास्ट ( SC ) ना 15% प्रतिनिधित्व दिले.

(2) कलम क्र. 342 नुसार शेड्युल्ड ट्रायब्जना (ST) 7.5 % प्रतिनिधित्व दिले.

आणि या वर्गवारीतील लोकांचा विचार करण्या अगोदर बाबासाहेबांनी प्रथम OBC म्हणजेच इतर मागासवर्गीय यांचा विचार केला.

म्हणुन बाबासाहेबांनी 340 या कलमानुसार OBC ना प्रथम प्रतिनिधित्व दिले

(3) कलम 340 नुसार OBC ना 52% प्रतिनिधित्व देण्याचे कलम घटनेत टाकले, तेव्हा त्यावेळचे लोहपुरुष सरदार पटेल या कलमाला विरोध करताना म्हणाले हे OBC कोण आहेत?" असा प्रश्न सरदार पटेलांनी स्वत:
OBC असुनहि विचारला.

कारण त्यावेळी SC आणि ST यांची वर्गवारी निश्चित झाली होती आणि OBC नेमके कोण हे identified झाले नव्हते.

कोणतेही कलम लिहिल्या नंतर बाबासाहेबांना ते कलम प्रथम तीन लोकांना दाखवावे लागत असे.

1) पंडीत नेहरू
2) राजेंद्र प्रसाद आणि
3) पसरदार पटेल

हे तिघे 'मंजुर' म्हणाले की बाकीचे त्याला विरोध करण्याचे धाडस करत नव्हते.

त्यावेळी संविधान सभेत एकूण 308 सदस्य होते व त्यापैकी 212 Congress चे होते .

340 कलम 341 आणि 342 च्या अगोदर आहे हे सर्व OBC बांधवानी लक्षात घेतले पाहिजे.

340 वे कलम हे नेमके काय आहे:

ज्यावेळी बाबासाहेबांनी 340 व्या कलमाचे प्रावधान केले व सरदार पटेलान्ना दाखवले त्यावर सरदार पटेल बाबासाहेबांना प्रश्न विचारतात "ये OBC कौन है?"

हम तो SC और ST कोही  backward मानते है ये OBC आपने कहा से लाये? सरदार पटेल हे पण बॅरिस्टर होते आणि ते स्वत: OBC असतानाही त्यांनी या कलमाला विरोध केला.


परंतु या मागील मेंदु मात्र गांधी नेहरुंचा होता.

यावेळी बाबासाहेब सरदार पटेलांना म्हणाले…

"It's all right Mr. Patel मै आपकी बात संविधान मे डाल देता हू…

की संविधानातील 340 कलम हे सरदार पटेलांच्या तोंडचे वाक्य असुन 340 व्या कलमानुसार या देशाचे राष्ट्रपती यांना OBC कोण आहेत हे माहीत नाही आणि हे ओळखण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा आदेश देत आहे."

गांधी.. नेहरू.. पटेल.. प्रसाद आणि त्यांची Congress OBC ओ. बी. सी. ला प्रतीनीधीत्व देऊ ईच्छित नाही हे बाबासाहेबांना दाखवुन द्यायचे होते.

परंतु 340 व्या कलमानुसार राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी OBC कोण आहेत हे ओळखण्या साठी आयोग नेमला नाही म्हणून दि. 27 सप्टेंबर 1951  बाबासाहेबांनी केंद्रीय  कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

म्हणजे OBC च्या कल्याणासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणारी पहिली आणि शेवटची व्यक्ति म्हणजे बाबासाहेब.

परंतु अजुनही ही घटना इथल्या OBC ना माहिती नसावी ही खेदाची गोष्ट आहे.

सर्वांत महत्वाचे म्हणजे बाबासाहेबांना तो राजीनामा पंडीत नेहरूनी संसदेत वाचु दिला नाही.

शेवटी 10 OCT 1951 रोजी बाबासाहेबांनी तो संसदेच्या बाहेर प्रसार माध्यमांपुढे मांडला.

जर संसदेत राजीनामा वाचला असता तर भविष्यात OBC ना कळले असते की बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी कायदेमंत्रीपदाला लाथ मारली.

बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला ती चार कारणे अणुक्रमाने खालीलप्रमाणे.

१) 340 कलमानुसार OBC साठी आयोग नियुक्त केला नाही म्हणुन.

२) नेहरुंचे परराष्ट्रीय धोरण चुकीचे होते.

3) हिंदु कोड बील.

4) पंतप्रधानांनी (नेहरू) खाते वाटपात बाबासाहेबां बरोबर केलेला दुजाभाव.

पण बाबासाहेबांनी हिंदु कोड बीलासाठी राजीनामा दिला याचा मात्र जाणिवपणे प्रचार केला जातो.

राजीनामाचा वरील क्रम पाहीला तर बाबासाहेबांनी कुणाला जास्त महत्व दिले होते हे आपल्या लक्षात येत.

आंबेडकरमय भारत!

आंबेडकरमय भारत!

भारतात आजघडीला भांडवली हुकूमशाही आहे हे कुणी अमान्य करणार नाही पण या भांडवली हुकूमशाहीचा पाया सांस्कृतिक ब्राम्हणशाही आहे हे विसरता कामा नये. उदारीकरणाने सर्व प्रश्न केवळ आर्थिक झालेत का? उलट उदारीकरणानंतर सामाजिक सांस्कृतिक प्रश्न आणखी चिघळलेत. जातीअंत म्हणजे केवळ आंतरजातीय विवाह समजणे साफ चुकीचे आहे. तो जातीअंताचा एक भाग होऊ शकतो पण  AoC मध्ये डॉ आंबेडकर हिंदू धर्मातील जातीप्रथेच्या मुळावर आघात करायला सांगतात आणि वीस वर्षे अभ्यासपूर्ण विचारांती बुद्ध धम्म स्वीकारतात. जाती अंताच्या परिषदा होतात एकदोन परिषदांना मीही गेलो आहे. ज्यात आंतरजातीय विवाहांचा आग्रह धरला जातो अत्याचारांना न्यायालयीन लढाईचा आग्रह धरला जातो. पण एवढ्याने जातीअंत होत नसतो. आंतरजातीय विवाहांना जातीजातीतले अंतर कमी नक्कीच होते, जे झाले पाहिजेच. पण जातीअंताला हिंदू धर्माचा त्याग हाच एकमेव आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद मिटवण्याचा मार्ग आहे. खाजगीत घरी मित्रमंडळीत सणवारात उत्सवांत सांस्कृतिक ब्राम्हणशाही इमानाने पाळत, गोविंदाला नाचत बाहेर सत्यशोधक स्टेजवरून बोलताना आम्हाला भांडवली हुकूमशाहीचा बागुलबुवा दाखवातात तर मग उपयोग काय?

सांस्कृतिक वर्चस्ववाद हा मुळाशी आहे आणि त्याला उत्तर बाबासाहेब धर्मांतराने देतात तर मग धर्मांतर हे अंतिम ध्येय असू शकते का? बाबासाहेब मी भारत बौद्धमय करेन म्हणतात, भारत बौद्धमय करणे आपले ध्येय आहे का? आहे तर आपण भारत कसा बौद्धमय करणार आहोत याची आपल्याकडे काही यंत्रणा आहे का? बर मग लोक विचारतात धर्मांतराने सर्व प्रश्न सुटलेत का? कुणी नाही म्हणेल कुणी हो म्हणेल. मी तर होच म्हणेल. मग मी भावनिक आहे का? धर्मांतराने आम्हाला पैसा अडका दागदागिने जमिनी नोकऱ्या मिळवून दिल्या नाहीत आणि या भौतिक सुखात आम्ही धर्मांतर मोजणारही नाही पण धर्मांतराने आम्हाला माणूस म्हणून ओळख दिली. डॉ आंबेडकरांनी धर्मांतर केले नसते तर तुमचे प्रश्न सुटले असते का? धर्मांतराने सर्व प्रश्न सुटावे असा आग्रह धरणारेही मला बालिश वाटतात. तुम्ही किती काही करा तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच लढावे लागते, कुठला धर्म तुमचे प्रश्न सोडवत नसतो. तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचा मार्ग दाखवत असतो. धर्मांतराने तुम्हाला काय दिलं? असा प्रश्न करणाऱ्यांना मी हेच उत्तर देतो की धर्मांतराने आम्हाला आमचे प्रश्न सोडवायचा मार्ग दिला. आणि त्यावर आम्ही स्वतःही चालतो आहोत आणि समप्रश्न असणाऱ्यांनाही सोबत घेतो आहोत. आज आमचे प्रश्न पूर्ण सुटलेले नसले तरी आमची सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि मानसिक वृद्धी ही आम्हाला काही कमी वाटत नाही. हिंदू धर्मात राहून आम्हाला ही हरप्रकारची वृद्धी साध्य करता आली असती काय? धर्मांतराने जाती मिटल्या का हा एक प्रश्न विचारला जातो. मी यालाही हो उत्तर देईन. पुन्हा मी भावनिक आहे का? हे पहा अडीचशे दशकांची गुलामी, रूढी परंपरा तुम्ही पाच दशकात मिटली पाहिजे असा आग्रह धराल तर अडीचशे दशकांच्या तुलनेत पाच दशकात झालेला बदल कमी आहे काय? आणि एकूण जातीअंत ही काय फक्त धर्मांतरीत बौद्धांचीच जबाबदारी आहे काय?

आज भारताच्या परिप्रेक्षात मी बोलणार नाही पण महाराष्ट्रात जेवढे सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनवादी लढे लढले जात आहेत त्यात ९०% बौद्ध समाज आहे. डॉ दाभोलकर डॉ पानसरे डॉ कलबुर्गी डॉ रोहिथ वेमूला आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल असेल किंवा कुठेही कुणावर झालेला कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार असेल त्यात सर्वप्रथम रस्त्यावर उतरणारा ९०% बौद्ध समाजच असतो. लोकं म्हणतात तुम्ही आमच्या प्रतिकांना धर्मरुढींना नावं ठेवता किंवा आणखी काही, पण ज्यांनी हा बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारलाय ते आज कितीतरी बौद्धेतर बुद्ध फुले शाहू आंबेडकरांशी मनाने जोडले गेलेले आहेत. आणि आज ओबीसी एस्सी एसटी मायनॉरिटी यांना फुले शाहू आंबेडकरी चळवळ सांगण्यात आणि सोबत घेण्यातही ९०% बौद्ध समाजच आहे. बौद्ध समाजाची स्वतःची एक राजकीय ताकदही आहे पण ती विखुरली गेली असल्याने ती कधी एकवटणारच नाही असे आपलेच मनोमन ठरवून का मोकळे व्हा? कुठल्याही राजकीय नेतृत्वाला कालमर्यादा असते. ही साधारण ४० ते ५० वर्षांची असते. ६० च्या दशकातील नेतृत्व २००० साली तसेच राहिले नाही. आज जे नेतृत्व आहे ते ८० च्या दशकात निर्माण झालेले आहे. त्यामुळे २०२० पासून पुढे आजच्या पिढीच्या तरुणांची भूमिका निर्णायक राहणार आहे. आणि आजची पिढी ही डॉ रोहिथ वेमूलाची पिढी आहे. ती शांत बसणारी नाही.

लोकं नेहमी विचारतात की भारत बौद्धमय करणार तर कसा करणार? भारत बौद्धमय करणार म्हणजे नेमका काय करणार? सर्वांना दीक्षा देणार का? काय करणार काय नेमके? तेव्हा आम्ही निरुत्तर असतो का? मुळीच नाही. भारत बौद्धमय करणे म्हणजे भारत आंबेडकरमय करणे. भारतातील प्रत्येक नागरिकाला आंबेडकर माहिती करून देणे. त्यांच्यापर्यंत आंबेडकरांचा हरेक पैलू पोहोचवणे. हे वाक्य मस्तिष्कात कोरून ठेवले पाहिजे, "भारत आंबेडकरमय झाला की भारत वेगळा बौद्धमय करायची आवश्यकता नाही."

आम्ही पंचवीशीतील तरुण आहोत. आम्हाला साठीतली माणसं भेटतात आणि आम्ही हे केले आम्ही ते केले तुम्ही काय केले विचारतात तेव्हा मला अजब वाटतं. आज आम्हाला जे जमतंय ते आम्ही करतोय. ज्याला जे जमतं त्याने ते द्यावे. कुणाला बुद्धी देता येते त्याने ती द्या, कुणाला पैसे देता येतील त्याने ते द्या, कुणाला वेळ देता येईल त्याने तो द्या, ज्याला तिन्ही देता येतय त्याने ते द्या. आज आमची मुलं शिक्षण, घर, नोकरी सांभाळून चळवळीत काम करत असतात. आमची बापजाद्यांची दौलत नाही, एकरात जमिनी नाहीत, आमचा संघर्ष आमच्या पाठीशी आहे पण आम्ही या लढाईत पाय रोवून उभे आहोत. तुम्ही काय काय केलेय याचा तुम्हालाच पाढा वाचावा लागत असेल तर तुम्ही काहीच केलं नाही असं समजा. आज धर्मांतरीत बौद्धांनी आपल्या पूर्वास्पृश्यतेचा पुरावा दिल्याशिवाय त्यांना आरक्षण मिळणार नाहीये. म्हणजे ही व्यवस्था तुम्हाला पुन्हा चातुर्वर्ण्य स्वीकारा अथवा आरक्षण नाकारा असा इशारा देते आहे. आजवर इतरांच्या आरक्षणासाठी टाचा झिजवलेल्यांसोबत किती जातीअंताचा लढा उभारणारे उभे राहतात हे लक्षणीय ठरणार आहे. आरक्षण ही काही मदत किंवा भीक नाही आरक्षण ही संधीच्या समानतेसाठी केलेली तरतूद आहे. आरक्षण हा खूप मोठा विषय आहे. त्याच्या आजवरच्या अंमलबजावणीतील कमतरता मी अनेकदा वाचून दाखवली आहे. ८ लाख मुलं शिष्यवृत्ती पासून वंचित आहेत, सरकारी नोकऱ्यांत लाखोंचा बॅकलॉग आहे. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण झालेय आणि खाजगी नोकऱ्यांत सवर्णांना अघोषित आरक्षण आहे. शिष्यवृत्ती मध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार आहे. कुणी लढो वा न लढो त्यासाठी लढायला आमच्या आंबेडकरी पिढीने सज्ज राहिले पाहिजे.

प्रत्येक आंबेडकरी तरुणाने आंबेडकर वाचून समजून घेऊन एकमेकांना आणि भारतीयांना सांगितले पाहिजेत. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट हेच असले पाहिजे,

"मी भारत आंबेडकरमय करेन!"

जयभीम!

-- डॉ आशिष तांबे
मुंबई
०५.०६.१६

प्रस्थापीत पक्षातील बहुजन नेतृत्व व कालसापेक्ष भूमिका : राज गवई

एकीकडे अच्छे दिन व भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चारमुंड्याचीत करुन भाजपीय महायुतीचे सरकार सत्तेवर आले. शिवाय पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही भाजपाने यश प्राप्त करत शिवसेनेच्या सोबतीने  महाराष्ट्रात देखील सत्ता स्थापन केली आहे. सरकार स्थापन होताच “ना खाऊँगा और ना खाने दुंगा” असा नारा देत ‘बारा ते अठरा घंटे’ काम करणार्‍या मोदी व  त्यांच्या सरकारने काही काळ जनतेच्या नजरेत धुळफेक करण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वीही झाले. पण घोटाळे उघडकीस आले नाहीत याचा अर्थ घोटाळे झालेच नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही.
हरियाणातील खट्टर सरकार सत्तेवर येताच सहा महिन्यात दोन हजार कोटीचा घोटाळा झाला होता. पण मोदीच्या मर्जीतील खट्टर असल्या कारणास्तव त्यांचे काहीही बालबाका झालेले नाही.
परंतू..

महाराष्ट्रात भाजपा सरकार सत्तेवर येताच दिवंगत भाजप नेते व केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व महाराष्ट्र राज्य  महिला व बालकल्याण मंत्री तसेच वंजारी समाजाचे व बीड जिल्ह्य़ातील बहुजनांचे नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे यांचा “चिक्की घोटाळा” उघडकीस आला होता. त्यापाठोपाठच शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा डिग्रीचा घोळ उघडकीस आला. आणि आज महाराष्ट्रातील आत्ताच्या भाजप प्रणित सरकार मधील महत्वाच्या महसूल मंत्रीपदावर असलेले एकनाथ खडसे यांच्यावर मंत्रीपदाचा राजीनामा द्यायची वेळ येऊन ठेपली आहे. एकनाथ खडसे यांच्यावर वेगवेगळे आरोप लावलेले आहेत; त्यात प्रामुख्याने दाऊदशी संबंध, पुणे भोसरीतील एमआयडीसी जमिन खरेदी असो वा जावयाची लिमोझिन गाडी असे आरोप असतील. गेल्या आठवड्यापासून एकनाथ खडसे व आरोपांच्या मालिकेनी प्रसारमाध्यमे ढवळून निघाले आहेत. अखेरीस आज खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

शिवाय गिरीश महाजन यांचा घोटाळा याशिवाय कालपरवाला किरीट सोमय्यांचा देखील एक घोटाळा उघडकीस आला आहे, परंतु त्याची वाच्यता कोणत्याच प्रसारमाध्यमांमध्ये नाही. असे का ?
या प्रस्थापित पक्षामध्ये बहुजन नेतृत्व का टिकू शकत नाही ? याशिवाय भ्रष्टाचार असो वा इतर आरोपांच्या कात्रीत बहुजनच कसे सापडतात..?
इतिहासाचे पाने उलघडली तर दिसेल की, बंगारु लक्ष्मण सारख्या दलित माणसाला पोस्टरबाॅय म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तर केले होते, पण “ऑपरेशन धृतराष्ट्रा”च्या नावाखाली एक लाखाच्या लाचखोरी प्रकरणात कशी खेळी भाजपाने खेळली होती हे आपण भारतवासी जाणून आहोत. त्यानंतर आत्ताच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे कट्टर दावेदार असलेले व महाराष्ट्रातील भाजपात असुनही बहुजन नेता म्हणून ओळखले जाणारे गोपीनाथ मुंडे यांची आपबीती जाणकारांना विशेष म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.
भाजपा सोडले तर काँग्रेसने पण यापेक्षा काही वेगळे केलेले नाही. दिल्लीचे तख्त राखणाऱ्या मराठी माणसाला तसेच हिमालयाला धावून जाणाऱ्या व प्रधानमंत्री होण्याची आस लावून बसणाऱ्या सह्याद्रीच्या पदरी काय पडले होते, हे देखील आपण जाणून आहोत.
भुतकाळातील हुतात्मा स्मारकाचा चबुतरा गोमुत्राने शुध्द करणारे शिवसैनिक व आजचे राष्ट्रवादी काँग्रेस मधील नावाला बहुजन (नकली) नेतृत्व व मफलरमॅन छगन भुजबळ हे देखील त्यातलेच एक उदाहरण…!
माझा सवाल आहे या नामधारी बहुजन नेत्यांना त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत, दगडाखाली हात अडकेपर्यंत बहुजन असल्याची जाणीवच कशी होत नाही ? या तथाकथित बहुजन नेत्यांवर कारवाई झाली. होऊद्या..आरोपी असल्याचे निष्पन्न झाले तर कारवाई झालीच पाहीजे.

पण महत्वाचा मुद्दा हा आहे की, घोटाळे फक्त बहुजन नेतेच करतात का ? बहुजनेत्तर देखील घोटाळे करत असतीलच नाहीतर हे बाकीचे समाजकार्य करायले बसले तर नाहीतच. मग दाऊदशी फक्त एकनाथ खडसेंचेच सबंध आहेत का ? जे की अजून निष्पन्न झालेले नाहीत. सत्तर हजार कोटीचा जलसिंचन घोटाळा करणारे, पुर्ती घोटाळा करणारे खुशाल बाहेर फिरतात. दाऊदचा व्याही जावेद मियाँदाद खुशाल मातोश्रीवर पाहुनचार करतो. दाऊदला साखळी बाँबस्फोटातुन अडकण्या अगोदरच सुखरुप भारताबाहेर पाठवणारे व जे की आजही बिझनेस पार्टनर म्हणून काम करतात. आयपीएलचा गोंधळ काय आहे व कोण पैसा लावतो कोण कमावतो, कोणाचा किती हिस्सा हे काय आहे लोक जाणून आहेत. यातील कोण दोषी आहेत यांचाही शोध घ्यावा अस सरकारला सांगू इच्छितो. एकनाथ खडसेचा काॅल ट्रेस करुन, हॅक करुन दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांनो सनातनच्या रुद्र पाटलाचा काॅल ट्रेस करुन काय न्याय दिला दाभोळकरांना..?

नवल वाटते हे नेते कोणत्या तोंडाने स्वतःला बहुजन म्हणवून घेतात. छगन भुजबळ सेनेत असतांनाचे प्रताप महाराष्ट्राला माहिती आहेत. काल तर बहुजन म्हणवुन घेणार्‍या खडसेला अक्षरशः त्यांचेच लोक सरळसरळ फाशी द्या असे प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते. यांनी खरच बहुजन समाजाचा विकास केला का ? यांनी कोणत्या आधारावर स्वतःला बहुजन म्हणून घ्यावे ? यांना वाईट काळातच जात-समाज का आठवते, आणि हे तथाकथित बहुजन तरीही चूकलेली वाट सोडायला तयार नाहीत अस का ?

वास्तव पाहता आज मुठभरांच्या हातात बहुजनरुपी कठपुतल्यांची दोरी दिसत आहे. बहुजन समाज इष्ट त्या मुद्द्यापासून भरकटवून धार्मिक मुद्यांवर भडकवला जात आहे. रस्त्यावर उतरून आयुष्याची राखरांगोळी करुन घेणारा हा बहुजन समाजातीलच तरुण आहे. माझे ओबीसी मित्र मैत्रित टिच्चून मला सांगतात तुम्हाला ओबीसी पंतप्रधान चांगला वाटत नसला तरी आम्हाला अभिमान आहे. पण त्यांना जेव्हा ओबीसी शिष्यवृत्ती याच ओबीसी पंतप्रधानाच्या काळात बंद केल्या गेली असे सांगितले तर मेंढरासारखे खाली मान घालतात.
शोकांतिका आहे की जे नेते स्वतःला बहुजनांचे नेते म्हणवून घेतात त्यांनी बहुजन समाजाच्या हिताचे एकतरी ठोस कार्य दाखवाव.

एकनाथ खडसे प्रकरणावर आठवडाभर चाललेल्या तथाकथित आरोप प्रत्यारोपाच्या मालिकेवर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीप्रमानेच सर्वांना विचारात टाकणारी गुगली टाकलेली दिसते आहे.
बाळासाहेबांची भूमिका पाहता कोणालाही प्रथमतः हेच वाटणार की ते खडसेंचे समर्थन करत आहेत. पण वास्तव अस आहे की त्यांच्या मते खडसेंवर फक्त आरोप आहेत जे की खोटे देखील असु शकतात.
असेच आरोप करत अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्या “पुर्ती घोटाळ्याच्या” वेळी देखील ट्रकभरुन पुरावे असल्याचा दावा केला होता; परंतु नंतर काय झाले ? त्यांच्या मते या आरोपात काय तथ्य आहेत, ते समोर यायला पाहिजेत.

खडसेंच्या पुण्यातील जमिनीच्या खरेदी व्यवहार घोटाळ्यावर बोलायचे झाले तर मुळात पुणे शहरातील, पिंपरी चिंचवड, भोसरी, वाकड सारख्या भागातील जमिनी ह्या वतनाच्या, रामोशींच्या, ब्रिटिशांच्या आहेत हे खरे मालक या जमीनीचे आहेत. शिवाय ह्या जमिनी बिना “लँड अॅक्विजिशन”च्या (भूसंपादन) घेतल्या  गेलेल्या आहेत.
दुसरा जो आरोप खडसेंवर लावला जातोय दाऊद संभाषणाचा त्यावर बाळासाहेब आंबेडकर सांगतात;
मी राज्यसभेत 1990-96 च्या काळात असे बरेच राजकीय नेते संपवताना पाहीले आहे. मी स्वतः राजीव शुक्लाबद्दलचे सबळ पुरावे दिले होते पण कारवाई झाली नाही. पुढे ते म्हणतात जर प्रिती मेनन व हॅकर्स यांनी गोळा केलल्या पुराव्यात असे म्हटल्या गेले की पाच विविध फोनकाॅल्स केले गेलेत तर त्यातील ते पाच क्रमांक कोणाचे आहेत ? ते क्रमांक फक्त बाहेर आणले जावे त्याबरोबर फोनवरील संभाषण देखील “पब्लिक डोमेन” मध्ये आणावे. न्युज चॅनेल्सवर ते पुरावे दाखवावे व संभाषण जनतेला ऐकवायला पाहिजे.
राहीला प्रश् बहुजन नेतृत्वाचा. यावर बाळासाहेब पुढे बोलताना म्हटले खडसेंनी जातीचा आधार घेऊ नये. तसा आधार घेतल्यास त्यांचा छगन भुजबळ व्हायला वेळ लागणार नाही. शिवाय भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची भूमिका ही छुपी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी सवाल हाच आहे की बहुजन समाज हा कुठपर्यंत असाच शिकार होत राहणार ? मानसिक गुलामीतुन तो मुक्त होऊन प्रस्थापितांची साथ सोडून “Use And Throw” ही संकल्पना बहुजनांसाठीची कधी चूकीची ठरवतील ही प्रतिक्षा आहे..!

-राज गवई

rajsaru91@gmail.com

आज छत्रपती राजे शिवरायांचा राज्याभिषक दिवस.....



6 जून 2016 !
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन; तर पवित्र रमझान मासारंभ ! असा संगम यापूर्वी कधी झाला होता का, हे शोधावे लागेल; पण यंदा समस्त भारत याची देही याची डोळा याचा अनुभव घेताहे !!
धर्मनिरपेक्षतेचा सुंदर समन्वय साधणा-या काळाला सलाम !!!

मनःपूर्वक शुभेच्छा !
दिल से मुबारक !



आज छत्रपती राजे शिवरायांचा राज्याभिषक दिवस.....
राजे शिवरायांना प्रथम आमचा मानाचा मुजरा.... व आपना सर्व शिवप्रेमींना राज्याभिषक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
जय जिजाऊ.... जय शिवराय....