Thursday, 16 June 2016

किळसवाण्या कित्येक नजरा....

किळसवाण्या कित्येक नजरा....

“अरे बघ ना....! टमाटर आहेत” ऐन मिसरूड फुटलेल्या जेमतेम विशीतल्या पोरांच्या घोळक्यातुन हे वाक्य आल होत....
ठिकाण सिटी बस,आताच २६–२७ वर्षाची,खांद्याला पत्रकारीता पद्धतीच दप्तर अडकवलेली उंच,गोऱ्या रंगाची आणि धिप्पाड बांध्याची मुलगी घाई घाईतच स्वतःला आणि स्वतःच्या ओढनीला सावरत सिटी बसच्या दरवाज्यातून आत बसमध्ये आली होती पण गाडीतल्या गर्दीमुळे ती मधेच घुटमळली असावी,मात्र तिच्याकडे पाहून उद्गारल्या गेलेल्या या वाक्यानंतर त्या घोळक्यातल एक डुकरी खिल्लड हसू संपूर्ण बसला ऐकायला मिळालं.बाकीच्यांना कदाचित काय झाल तेही कळाल नसेल मात्र सगळ्यांचे कान जरूर त्या उन्मदाकडे टवकारले गेले होते. कंडक्टर काकांकडून तिकीट घेतल्यावर ती मुलगी क्षणार्धात त्या घोळक्याकडे वळाली...

आता पुढे काहीतरी वेगळ विपरीत होणार याची कुणकुण त्यातल्या प्रत्येकालाही लागली असेल कदाचित......
“का रे ? कुठे टमाटर दिसले तुला ? ” तिने त्या घोळक्यातल्या डुकराला बरोबर हेरल होतं, आणि म्हणून तिने त्यालाच बरोबर विचारल.....
“जिथे दिसायला पाहीजे होते तिथेच दिसले.” त्याच्याकडून मुजोर प्रतिउत्तर आलं.
त्यावरून त्या नालायकाची वागण्याची परीसीमा तिच्या पण लक्षात आली.
“अरे बाळा टमाटर नाहीत हे.....तुझा गैरसमज झाला...त्यांना “स्तन” म्हणतात.... “तुझ्या आईला आणि बहिणीला पण आहेत असे सेम”...हा कदाचित तू घरी ते तेवढे लक्ष देऊन पहिले नसशील.जेव्हा तू लहान असशील ना....तेव्हा तर तुझ्या आईने काळजीने यातूनच तुला कित्येकदा दुध पाजून तुझी भूक भागवली असेल.... आणि काही नाही रे मांसल असतात....तुझ्या हातापायांसारखे,घरी गेल्यावर आईला किंवा बहिणीला विचार सांगतील त्या,आणि हो आणि टमाटर नको म्हणूस नाहीतर त्यांना समजणार नाही....“स्तन” म्हण....स्त्रीयांना निसर्गाने दिलेली दैवी देणगी आहे ती,तुला नाही समजणार ते कारण तुझ्यावर संस्कार करायला वेळच नसेल मिळाला तुझ्या घरच्यांना नाहीतर असा घाणेरडेपणा तुझ्या जिभेवर आलाच नसता."

त्याच्या अंगाला स्पर्शही न करता, तिने त्याला मारलेल्या त्या चपाराकीचा आवाज आता पी.एम.टी. बसच्या कानाकोपऱ्यात पोहचला होता,तिच्या डोळ्यातला निखारा आणि वागण्यातला आक्रमकपणा पाहून आणि काही वेगळ घडायच्या आधीच ४५-५० वर्ष्यांच्या एक मावशी तिला शांत करायला पुढे झाल्या, “शांत हो पोरी त्याला आता त्याची चूक उमगली असेल,तू नको आणि त्रास करून घेउस” हे सगळ समजावताना पण मावशी तिच्यापासून हातभर अंतर ठेउनच बोलतच होत्या....
“ कसं काय शांत होऊ काकू ?....किळस वाटतेय या लोकांची....२० वर्षांचं नवीन मिशी फुटलेलं पोरगं असू द्यात किंवा माझ्या वडिलांच्या वयाचे काका असुदेत, संपूर्ण अंगभर कपडे घातलेले असताना पण जेव्हा समोरचा कुणी मी त्याच्यासमोर नग्न उभी आहे या नजरेने पाहतो ना....तेव्हा मेल्याहून मेळ्यासारखं  होतं.... रोज रोज तेच....तीच वासानाधीन नजर...का ? का सहन करायचं आम्ही ते रोज ? घरून दमून थकून काम करून यायचं आणि प्रवासात प्रत्येक क्षणी ओढणी आणि पदर सावरायचा......का ? तर या पिसाळलेल्या लोकांच्या नजरा चुकवायला,हे घरी आपल्या आई बहिणींकडे पण याच नजरेने पाहत असतील का हो ?"
या तिच्या  प्रश्नार्थक वाक्यानंतर क्षणार्धात बसमधल्या सर्व पुरषी माना आपापल्या पायांच्या अंगठ्याकड़े झुकल्या.... तिच्या रागाचा पारा चढलेलाच होता आणि तेवढ्यात तिच्याच वयाची एक मुलगी आपल्या जागेवरून उठली,७-८ पावलं चालून आता ती त्या मुलांच्या घोळक्याच्या आणि त्या मुलीच्या मधोमध येउन उभी राहिली.पुढच्याच क्षणी तिने त्या मुलाच्या जोरात कानाखाली वाजवली, त्याच्या थोबाडीत मारल्यानंतर तिचा वाढलेला श्वास आणि राग सहज जाणवत होता.ती तशीच मागे झाली आणि परत आपल्या जागेवर जाऊन बसली.एव्हाना चालू प्रकार बसच्या ड्राईव्हर काकांना पण समजला होता,म्हणून त्यांनीही बस बाजूला उभी केली,आणि मग ह्या प्रकाराने डोळ्यात पाणी आलेली ती मुलगी पुन्हा बोलायला लागली....

"अगदी घराच्या बाहेर पहीलं पाऊल टाकल्या टाकल्या,समोरच्या टपरीवर उभ्या असलेल्या टोळक्यातून काहीतरी अश्लील कमेंट पास होते. त्याकडे दुर्लक्ष करायचं,पुढे रिक्षासाठी उभं असताना जाणाऱ्या येणाऱ्या कित्येक वासनाधीन नजरा झेलायच्या,नंतर बसमध्ये चढताना नको ते हपापलेले स्पर्श झेलायचे,आणि त्यानंतर जिथे काम करायचं तिथेही हेच....नालायक कुत्रे सगळे!!! कधीतरी समोरच्या बाईकडे आई म्हणून ताई म्हणून पहा रे..."
तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या मनातली व्यथा सहज सांगत होते.पुढे काही वेळाने बस सुरु झाली तरी नंतर बसमध्ये एकच निरव शांतता होती,तरी त्या शांततेत एक आक्रोश हंबरडा फोडतच होता!!! खरंच सेक्सविषयीचा निकोप संस्कार आपल्या मुलांमध्ये करण्यात समाज कमी पडतोय, नाही का ?

एक लेखक म्हणून जेव्हा मी या विषयावर लिहायचं ठरवलं तेव्हा मी माझ्या जवळच्या बऱ्याच मैत्रीणींशी या अश्या किळसवाण्या नजराबद्दल चर्चा केली. मात्र बहुतांश मुलींनी “आम्ही सरळ दुर्लक्षच करतो.” या प्रकारचं उत्तर दिलं.कदाचित यामुळेच असेल की या घटनांमधल्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांची हिंमत  वाढत असेल.वेळीच जर प्रत्येकीने अश्या लोकांना आईच्या दुधाची आठवण करून दिली तर नक्कीच अश्या अपप्रवृत्तींना वेळीच जरब बसेल.शेवटी होणारा प्रकार रोजचाच झाल्यामुळे बहुतांश जणींनी तर या विषयावर लिहूच नकोस. काही फायदा नाही.अश्या प्रतिक्रिया दिल्या. असो. वाचणाऱ्या प्रत्येकाला,प्रत्येक मुलीला जर लिखाणाच गांभीर्य कळाल असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या लोकांबरोबर हे शेअर करा.ह्या गोष्टी नजरेआड करण्यासारख्या नक्कीच नाहीयेत....वेळीच या अश्या विषयांना वाचा फोडली तरच काही अंशी तरी आपण गोष्ठी बदलवण्यात य[truncated by WhatsApp]

OBC बांधवांचा स्पर्श विटाळ का मानला जात नव्हता ?

OBC बांधवांचा स्पर्श विटाळ का मानला जात नव्हता ?

कारण

मनुस्मृती ही भारताची संविधाना पुर्वीची घटना होती आणि मनुस्मृती नुसार OBC शुद्र होते.

ब्राम्हणांची सेवा करण्यासाठी त्यांना बिनपगारी चाकरांची आवश्यकता होती आणि सेवा करवुन घेण्यासाठी OBC बांधवांचा स्पर्श होणे अटळ होते.

म्हणून OBC बांधवांकडून सेवा करून घेण्यासाठी स्पर्श न करण्याची आटकळ ठेवली नाही..म्हणजे ब्राम्हणाला आरामदायी बसण्यासाठी खुर्ची पलंग सुतार बांधवांनी तयार करून द्यायची.....

न्हावी बांधवांनी ब्राम्हणांची हजामत करून द्यायची.....

कुणबी मराठा बांधवांनी शेतमाल आणि धान्य पिकवुन द्यायचे....

माळी बांधवांनी भाजीपाला पिकवुन द्यायचा..

आणिहे सर्व ब्राम्हणांसाठी विनामोबदला केले जायचे.

कारण ही सेवा होती.

आणि सेवा केलेल्या गोष्टीचा मोबदला मागायचा नसतो.

ओबीसी बांधवांचा गैरसमज- डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केले ??

उत्तर-- मनुस्मृती ने ओबीसी बांधवांना शिक्षण घेण्यास मनाई केली होती... बाबासाहेबांनी संविधानामधे(भारतीय राज्य घटनेत) शिक्षण घेण्याचा आधिकार दिला

मनुस्मृतीच्या कायद्यानुसार मुलाला वडीलांचा पिढीजात व्यवसाय करावा लागत होता...

म्हणजे

कुणब्याचा मुलगा कुणबी

सुताराचा मुलगा सुतार

न्हाव्याचा मुलगा न्हावी

कुंभाराचा मुलगा कुंभारच व्हायचा

धनगराचा मुलगा मेंढया वळवणारा

आता ओबीसी बांधवांची मुले डाॅ. बाबासाहेबांनी दिलेल्या (संविधानिक) घटनेच्या आधिकांमुळे IAS, IPS, IRS, IFS डाॅक्टर, इंजिनियर , प्राध्यापक बनु शकले

मराठा बांधवांचा नेहमीचा प्रश्न आम्ही हुशार होतो मार्क्स पाडले म्हणून शिकलो ....?

उत्तर ......अरे राजा, तु हुशार होतास हे मान्य आहे. पण तूला तुझी हुशारी दाखवण्याची संधी कोणी दिली ?

तुझे आजोबा, पंजोबा सुद्धा हुशारच होते. पण तरीही ते IAS, IPS , IRS, IFS डाॅक्टर, इंजिनियर ,प्राध्यापक बनु शकले नाहीत.

कारण त्यांना हुशारी दाखवायची संधीच मिळाली नाही, कारण तेही शुद्रच, आठव शिवाजी महाराजांचा राज्यभीशेक

तुझ्या घराण्यात काय तुच एकटा आधिकारी होण्यासाठी लायक होतास आणि तुझे आजोबा पंजोबा  होत काय होते?

मुळनिवासी लोक जेव्हा तुलना करतील की आमच्या पुर्वजांचे जीवन उकीरड्यावरच्या जनावरासारखे होते मग आमचे जीवन सोन्यासारखे कसे झाले ?

तेंव्हा लोक खरा इतिहास वाचतील आणि त्यांना समजेल की हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरामुळे शक्य झालय...!!
शिव, फुले, शाहू, आंबेडकर अशा थोर समाज सुधारकांना माझा मानाचा मुजरा…

Wednesday, 15 June 2016

🙏काळजाचा तुकडा🙏

🙏काळजाचा तुकडा🙏

लाडात वाढलेली लेक
   मांडवात उभी पाहुन
हसर्या चेहर्यानं बाप
  मुसमुसत होता राहुन राहुन // धृ//
कोपर्यात उभा बाप
   अक्षता टाकत होता
घाम पुसायच्या निमित्ताने
   डोळे पुसत होता //1//
काळजाच्या तुकड्याला पाहुन
   आतुन तुटत होता
" पोरीचं चांगलं झालं "
हसुन म्हणत होता //2//
   अश्रुंचा बांध त्यानं
अडवुन धरला होता
 डोळयासमोरुन लेकिचा चेहरा
   दुर होत नव्हता //3//
लग्न लागल्यावर सारेच
  टाळ्या वाजवत होते
एक तोच मात्र
   आसवांमध्ये भिजत होता //4//
लहानमोठ्यांना तो
  हात जोडत होत
" लेकिला जीव लावा माझ्या "
डोळे भरून सांगत होता //5//
सायंकाळी सारे पाहुणे
  खिचडीभात खात होते
बापाचा हात न वाजणार्या
  फोनकडे जात होता //6//
लेकिचा फोन येताच
  " मिरची तिखट आहे " म्हणत
तांब्यानं पाणी पित होता            अन डोळयातलं आसव मागं सारत होता....
    सुगी संपल्यावर पाखरांसारखा
एकेक पाहुणा परतत होता
शेवटच्या पाहुण्याला पोहचवुन
" मला भुक नाही "असं
   बाप म्हणत होता //8//
बेडरूममधील लेकीचं कपाट
  हळुच बाप उघडत होता
तिने ठेवलेल्या कपड्यांवरून
  थरथरता हात फिरवत होता //9//
तिथच बेडवर बसुन
  ओंजळीत तोंड धरून बाप
आवाज न करणार्या
धबधब्यासारखा फुटत होता//10//
मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको
 " आई " होत होती
वय वाढलेल्या सशाला
  छातीशी घट्ट धरून
काळजाच्या तुकड्याला आठवुन
 आसवांमध्ये भिजत होती.. //11//
      हे अस नात वडील आणि मुलगी..
म्हणून म्हणतो एक तरी लेक असावी.
डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी..
✍🏻✍🏻✍🏻 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

☀Breaking News ☀💥

☀Breaking News ☀💥आंबेडकरी जनतेच्या डोळ्यात,पोलीस प्रशासनाने फेकली धूळ 💥रोहीत वेमूला चा मारेकरी बन्डारु दत्तात्रय याच्या सभेला विरोध म्हणून पूर्वकल्पना देऊन निषेध करणाऱ्या भारीप बहुजन महासंघा च्या कार्यकर्त्यांना नांदेड पोलिसांनी तात्काळ अटक करून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत,सम्राट प्रतिनिधीनी या सभेची माहिती पोलीस प्रशासनास विचारले असता आंबेडकरी जनतेची दिशाभुल करत सभा रद्द झाल्याची खोटी माहिती दिली होती,अशी खोटी माहिती देऊन आंबेडकरी रक्ताशी गद्दारी करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्या वर गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कार्यवाही करा व कायदेशीर रित्या निवेदन देऊन बन्डारु ला विरोध करणाऱ्या भारीप च्या कार्यकर्त्याना त्वरित मोकळे करून त्यांच्यावरिल गुन्हे तात्काळ मागे घ्या  आणि एका तासाच्या आत त्यांची सुटका करा  अन्यथा वारणेचा वाघ मित्रमंडळ तीव्र आंदोलन छेडेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी     💥-संविधान दुगाने (प्रदेश महासचिव वारणेचा वाघ मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य )🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

निषेध मोर्चे कुठवर....?

निषेध मोर्चे  कुठवर....?
-------------------------
कोणत्याही  समाजाला स्वजाती उत्कर्ष करुन घ्यावयाचा  तर राजकीय  सत्ता हे त्यांचे साधन आणि एकखांबी नेतृत्व  हा सर्वोत्तम  निर्णयआणि उपाय आहे .तेही  जमले नाही तर प्रखर बुद्धीच्या  जोरावर व्यवस्था बदलविणारे आंबेडकरी रक्त पाहीजे. निषेध,मोर्चे ,हा आंबेडकरी रक्ताचा  गुणधर्मच नाही. गेली साठ वर्ष आंबेडकरी चळवळीची   मिळकत काय..?नामांतर पँथरचा अपवाद वगळता हातात काय तर निषेधाचे  पोस्टर. तरुणानो , तुम्ही श्रेयासाठी रस्त्यावर उतरुन वेळ गमवता त्याच वेळेत बाकी बहूजन लोक विधानसभा लोकसभा गाठतात .कारण तेथेच सर्वहीत सामावले आहे हे त्यानी वाचलय.आपणही हाच वेळ आणि सळसळणारी उर्जा संघटीत करुन सत्ता प्राप्ती केलात तर तुमच्याकडे लोकांच्या निवेदनाचे ढिगारे पडतील. जसे भारतपिता डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर असंख्य देशविदेशी दिग्गजाचे पडायचे ..
मिञहो माझ्या  ह्या विचाराना
नकारात्मक प्रतिसाद मिळेल तसा निषेधही होईल कारण आपली चळवळ मनोरंजनी सामना आणि निषेध शब्दाच्या अहारी गेल्याने हा उपजत् गुणधर्म बनला आहे  . याची मला जाणीव आहे. तरीही ज्यांच्या  बापापुढे हिमालय झूकला,त्या बापाला सुर्याने  माझ्या हून तूम्ही प्रखर तेजस्वी अहात हे बिनशर्त मान्य केले . त्या बापाची लेकर केवळ श्रेयासाठी, नाहीतर आपल्याला  पैशे मिळतात म्हणून ज्यावेळी दुसऱ्यांचा झेंडा खांद्यावर घेऊन  जयजयकार करीत फिरतात त्यावेळी एक तूमचाच भाऊ म्हणून मन अस्वस्थ होते. त्या अस्वस्थ भावाची ही वेदना होय. प्रा. सुनिलचंद्र सोनकांबळे

मी अनेक ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या व्याख्यानासाठी जातो.

मी अनेक ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या व्याख्यानासाठी जातो. काही ठिकाणी सभेत विचारतो की, बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो कुणाकुणाच्या घरात आहेत हात वर करा. बहुतेक सर्वजन हात वर करतात. मग मी विचारतो कि बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक किंवा ग्रंथ कोणाकोणाच्या घरात आहेत ते हात वर करा. फार तर थोडे हात वर होतात. न थांबता मी विचारतो, बाबासाहेब आंबेडकरांचे एकतरी पुस्तक संपूर्णपणे ज्यांनी वाचले असेल अशांनी हात वर करा. संख्या आणखी कमी होते. माझ्या आजूबाजूला बसलेल्या व्यासपीठावरील नेत्यांकडे व संयोजकांकडे मी पाहतो त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसते. मुद्दा स्पष्ट होतो. प्रतिमांवर प्रेम करणे ठिक आहे. परंतु विचारांकडे दुर्लक्ष करणे घातक आहे.

आपण सर्वजन उत्सव प्रिय आहोत. आपल्याला मिरवणुका काढायला, गुलाल उधळायला, घोषणा द्यायला आवडते, नाचायला आवडते हे स्वभाविक आहे. उपयुक्त ही आहे. परंतु तेवढेच करून थांबणे बरोबर नाही. उत्सवाच्या गदारोळात विचारांची घुसमट होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. अशी दक्षता घेतली नाही तर 'बनेल' श्रीमंत आणि 'फसवणारे' आपणास गुलाल उधळायच्या कामात अडकवून ठेवतील आणि त्यांचे विचार पुढे रेटतील त्यांचे विचार हेच बहुजनांच्या पूजनिय व्यक्तींचे विचार आहेत असे सांगत सुटतील. आपणास आपल्या पूजनिय व्यक्तींचे विचार माहित नसतील तर मग आपण सहजच फसविले जाऊ. आपण फसवले जाऊ नये असे वाटत असेल तर आपल्या पूजनिय व्यक्तींच्या प्रतिमांबरोबरच त्यांच्या विचारांची ओळख व पारख आपणास पाहिजे.

विचार- कॉ.गोविंद पानसरे

#‎दाभोळकर_हत्या_प्रकरण‬

‪#‎दाभोळकर_हत्या_प्रकरण‬
सनातन्यांना कोणी अभय दिले व देत आहेत ?
विरेंद्र तावडे हा कटाचा सुत्रधार.. सारंग अकोलकर ने झाडल्या गोळ्या..!!
आज समजले की गोगलगाय सारखी भूमिका घेत काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने व महत्वाचे सुशील कुमार शिंदे व आर.आर. पाटील यांनी कुचकामी प्रयत्न करत या प्रकरणावर दुर्लक्ष केले होते.
भाजपा सरकार आज आले आहे पण गेल्या इतक्या वर्षात सनातन्यांचे हात इतके बळकट कसे काय झालेत ? एकीकडे 'सिमी' या संघटनेवर दहशतवादी संघटना म्हणत बंदी आणली गेली परंतु तिच वेळ 'सनातन' वर का नाही आली ? याचा अर्थ सनातन्यांना अप्रत्यक्षच अभय दिले गेले का ?
सनातन प्रभात या त्यांच्या मुखपत्रातुन सरळसरळ आग ओतली जात होती परंतु यावर पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. असे का ?
'सत्य मेव जयते' ऐवजी 'शस्त्र मेव जयते..'
धर्मासाठी धर्माच्या लढाईत जो मध्ये येणार त्याला संपवले जाणार..
पोलिस देखील अडथळा आल्यास त्यांनाही संपवण्यात येईल व त्यांच्या विरोधात लढायला हिंदू तरुणांना तयार करण्यात येत होते, शिवाय ही भुमिका ते लोक उघडपणे मांडत होते.
यासाठी साधकांकडून शस्त्र चालवायच्या कवायती करुन घेतल्या गेल्या.
विशेषतः 'रायफल' बंदूकी चालवायला मोजक्याच साधकांना प्रशिक्षित करण्यात आले होते, हेच ते मोजके प्रशिक्षणार्थी जे दाभोळकर, पाणसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचे सुत्रधार व मारेकरी असल्याचा दाट संशय केला जात आहे.
या सर्वासाठी सनातनच्या जयंत आठवले यांनी फोटोसहित सनातन प्रभात मध्ये ही उघड उघड भूमिका मांडलेली होती.
ज्यांना ज्यांना संपवायच आहे त्या लोकांचे फोटो त्यांनी मुखपत्रात छापुन फोटोवर फुल्या मारलेल्या होत्या यापासुन आपण सर्व ज्ञात आहोत.
भयानक तर ही बातमी आहे की, सनातन्यांनी साधकांना हिंदू धार्मिक दहशतवादी होण्यास प्रोत्साहन दिलेले आहे, व तसे धार्मिक दहशतवादी होण्यासाठी तरुणांना भडकावण्याचे काम सनातनी लोक नेहमीच करत आलेत,जे की सर्व उघडपणे चालू आहे . धार्मिक दहशतवादी याच शब्दात त्यांनी मुखपत्रातुन मत मांडले आहे. तरीही सरकार कडून यासारख्या धार्मिक दहशतवाद्यांना का पाठीशी घातले गेले व आजही का पाठीशी घातले जात आहे ? जे की उघड व सर्वश्रुत आहे.
खरच ही खुप भयानक व धक्कादायक बाब आहे की अशा धर्मांध प्रवृत्तींना काही लोक देशाच्या ऐक्य व शांततेच्या विरोधात वातावरण निर्माण करुन भारतासारख्या विविधतेत एकता असलेल्या देशाला आखाती राष्ट्रासारखेच मरणाच्या खाईत ढकलण्याचे देशविघातक काम सुरु असताना लोकांच्या मनात भितीदायक व अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असतांना जनता सरकारच्या ठोस निर्णयाच्या व कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत.
"काँग्रेस-राष्ट्रवादी; सेना-भाजपा हे सर्व एकाच माळेचे मणी" असे बोलले जाते हे वाक्य सरकारने न्यायालयीन कारवाईने जनतेला चूकीच ठरवण्याची माझ्यासारखा तरुण वाट पाहतोय...!
‪#‎सत्य_मेव्_जयते‬ 
‪#‎Ban_Sanatan‬#Ban_RSS
‪#‎Raj_Gawai‬