Friday, 2 September 2016

पोस्ट नः 144 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग पहिला धम्मामध्ये बुध्दांचे स्थान

पोस्ट नः 144

बुध्द आणि त्यांचा धम्म
 तिसरा खंडः भाग पहिला

धम्मामध्ये बुध्दांचे स्थान

तथागत बुध्दांनी  आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही

1) ख्रिस्त स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानत असे

2) शिवाय तो आपणाला देवपुत्र मानत असे

3) माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यत मानले नाही तोपर्यत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची अट होती.

4) अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबुन ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले

5) इस्लाम धर्माचा प्रणेता महमंद हा स्वतःला परमेश्वराला पैंगबर (प्रेषित ) मानीत असे,

6) याशिवाय तो असे मानीत असे कि माणसाने दोन अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात ( मुक्ती ) नाही

7) इस्लाम धर्मातील मुमुक्षुने प्रथम महंमदास देवाचा ( प्रेषित ) मानले पाहिजे

8) इस्लाम धर्मातील मुमुक्षुने नंतर   महंमद हा परमेश्वराचा शेवटचा पैंगबर आहे असे मानले पाहिजे.

9) इस्लाम धर्मात वरील दोन अटी मानणारयानांच मोक्षाचा मार्ग खुला आहे

10) मुसलमानांच्या मोक्ष हा महमंदाला देवप्रेषित समजण्यावर अवलंबुन ठेवल्यामुळे महंमदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे

11) तथागत बुध्दाने अशी कधीही अट घातली नाही

12) शुध्दोदन आणि माहामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत ह्यापलीकडे स्वतःसंबधी तो अधिक काही म्हणत नाही.

13) येशु ख्रिस्त आणि महंमद यांनी आपापल्या धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली मोक्षाच्या मार्गात आपले महत्व सांगितले तसे तथागत बुध्दांनी केलेले नाही

14) ह्यामुळेच त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबधी विपुल माहीती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यत येऊन पोहोचली नाही

15) पहिली बुध्दसंगिती ही बुध्दांच्या निर्वाणानंतर लवकरच भरविली गेली हे सर्वश्रुतच आहे

16) या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुध्दांच्या कपिलवस्तुचेच रहिवाशी आणि ज्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या निर्वाणकाळापर्यत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगतीला उपस्थित होते

17) परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले

18) त्यांने आनंदाला धम्माचे पठन करायला सांगुन संगीतीला प्रश्न केला हे बरोबर आहे काय ? ज्या ज्या वेळी संगीती होकारत्मक उत्तर देईल त्या त्या वेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी

रोज वाचा
    " बुध्द आणि त्यांचा धम्म "

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे"

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो "
*******
     
       विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर  

   INDIA THAT IS BHARAT
      9922047333

Thursday, 1 September 2016

पोस्ट नः 143 बुध्द आणि त्यांचा धम्म दुसरा खंडः भाग आठवा 4) धम्मदीक्षेची जोखीम

पोस्ट नः 143

बुध्द आणि त्यांचा धम्म
 दुसरा खंडः भाग आठवा

4)  धम्मदीक्षेची जोखीम
-----------------*
1) पुर्वो तथागत बुध्द राजगृहापासुन 500 योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची एक टोळी राहत होती. हे लोक शिकार करुन मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत,

2) तथागत बुध्द त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्या वेळी ते पुढीलप्रमाणे उपदेश करतात.

3) जो दयाळु आहे तो प्राण्याची हत्या करीत नाही, ( किंवा प्राण्याची हत्या न करणे हा दयाळु माणसाचा धर्म होय ) तो प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो,

4) धर्म अमर आहे या धर्माचे पालन करणारयावर कधीही संकट कोसळणार नाही.

5) विनयशीलता ऐहिक भोगाविषयीची उपेक्षा कोणाला कष्ट न देणे कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्राम्हलोकाचे लक्षण आहे

6) दुर्बलाविषयी कणव बुध्दांच्या शिकवणुकीनुसार शुध्द जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यकता ते मिळाल्यावर थांबणे जन्ममरणाच्या फेरयातुन सुटण्याचे हे साधन आहे. हे शब्द ऐकताच त्या स्त्रिंयांचे परिवर्तन झाले. आणि पुरुष परत आल्यानंतर तथागतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती . तरी त्यांच्या स्त्रिंयांनी त्यांना आवरुन धरले आणि हे मैत्रीचे सुक्त ऐकताच त्यांचेही परिवर्तन झाले

7) आणि तथागतांनी पुढील उदगार काढले.

8) जो प्राणीमात्रांशी  मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अनेक गोष्टींचा लाभ होतो.

9) त्यांचे शरीर नेहमी ( सुखी ) असते त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो त्या वेळीही त्याला एकाग्रता लाभते

10) त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत  आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात . विषारी वस्तुंचा त्याला त्रास होत नाही . आणि युध्दातील नाशापासुन त्याचा बचाव होतो, अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही

11) तो जिथे जिथे राहतो तिथे यशस्वी , हेच ते लाभ होत.

12) हा उपदेश ऐकल्यावर तथागतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली.


रोज वाचा
    बुध्द आणि त्यांचा धम्म "

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो  "
*******
         विश्वरत्न
    डाँ.बाबासाहेब आंबेडकर

Wednesday, 31 August 2016

‘दलित’ शब्दाला बंदी करा - हायकोर्ट

http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=14420864
‘दलित’ शब्दाला बंदी करा - हायकोर्ट
First Published :30-August-2016 : 06:42:48
नागपूर : अनुसूचित जातींविषयी सररासपणे वापरला जाणारा ‘दलित’ हा शब्द असंवैधानिक असल्याने शासकीय व्यवहार आणि व प्रसारमाध्यमांसह सर्वांना हा शब्द वापरण्यास मनाई करावी, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात करण्यात आली असून, न्यायालयाने त्यावर केंद्र व राज्य सरकारला नोटीस काढली आहे.
सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी केलेल्या या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर न्या. भूषण गवई व न्या. अतुल चांदुरकर यांच्या खंडपीठाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव, प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे सचिव, राज्याचे मुख्य सचिव व नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. शासकीय अभिलेख, परिपत्रके, अधिसूचना, योजना इत्यादी दस्तावेजांतून ‘दलित’ शब्द काढून टाकण्यास शासनाला निवेदने सादर केली, पण त्यावर काहीच निर्णय न झाल्याने ही याचिका करण्यात आली आहे. ‘दलित’ शब्दाऐवजी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध या शब्दाचा वापर करण्यात यावा, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे. (प्रतिनिधी)
याचिकेत म्हटले की, सुप्रीम कोर्टाने ‘एस. पी. गुप्ता वि. राष्ट्रपती’ या प्रकरणात शासकीय अभिलेखातून ‘दलित’ शब्द काढण्याचे निर्देश दिले होते. लता सिंग वि. उत्तर प्रदेश शासन व अरुमुगम सेरवाई वि. तामिळनाडू शासन प्रकरणामध्ये ‘दलित’ शब्द असंविधानिक असल्याचे म्हटले आहे. अनुसूचित जाती आयोगाचे हेच मत आहे.
‘दलित’ शब्द भेदभावजनक, आक्षेपार्ह व जातीवाचकही आहे. या शब्दामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद १४, १५, १६, १७, १९, २१ व ३४१चे उल्लंघन होते. राज्यघटनेत कुठेही ‘दलित’ शब्द न वापरता अनुसूचित जाती असा शब्द वापरण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही या शब्दाला विरोध होता, असे याचिकाकर्त्याते वकील अ‍ॅड. शैलेश ननावरे यांनी निदर्शनास आणले.
‘दलित’ शब्दाला बंदी करा - हायकोर्ट
for more info.
http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=14420864⁠⁠⁠⁠

मी तुमचा बाप बोलतोय

मी तुमचा बाप बोलतोय


अजून किती दिवस मी पुतळ्यात बंद राहू
एरवी एकटाच असतो कार्यक्रमाला हारांचे ढीग किती पाहू
उघड्या डोळ्यांनी समाज नांगवा करताना पाहतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। धृ ।।
शासनकर्ते व्हा या शब्दाचा अर्थ तुम्ही चुकीचा घेतला
सत्तेसाठी लेकरानो  लाचारीचा मार्ग तुम्ही पत्करला
मी स्वाभिमानाचा मार्ग तुम्हा दिला
राजकारणात तुम्ही माझ्या विचारांचा खून केला
राजकारणापरिस अर्थकारण तुमचे मजबूत करा हेच सांगत आलोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय  ।। १ ।।
वंचितांसाठी लढा माझा होता रे तुम्ही त्याला विसरून गेलात
आरक्षणाचा फायदा घेण्यात तुम्ही देखील चुकलात
संधीचे सोने करून बांधवाना बरोबरीने नेण्यात कमी पडलात
स्वार्थाने तुमच्या लेकरानो तुम्हीच तुमचा घात केलात
का आजला माझा स्वाभिमानी समाज लाचारीत धन्यता मानतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। २ ।।
जयंती आली कि माझ्या  नावाचा जयघोष होतो
का रे माझ्या विचारांचा खून करून  खुशाल जयभीम करतो
आंबेडकरी चळवळीची नुसतीच चर्चा पाहतो
माझ्या समता रथाला का मागे तू खेचतो
अरे जिंदगी माझी जाळून मी त्याला इथवर घेवून आलोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ३ ।।
शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध लेकरा मीच तुम्हा सांगितले
पण शिक्षण घेवून तुम्ही मात्र गुलामीकडे का चालले
परिवर्तन होईल समाजात पण समाजाची लाचारीकडे पाऊले
माझ्या कर्तुत्वाचा खून करून तुम्ही का निघाले
तरी देखील आज हि तुम्ही स्वाभिमानी व्हाल हीच आस धरतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ४।।
५६ ला मी गुलाम धर्माचा त्याग करून तुम्हाला समतेचा धम्म दिला
काय गुन्हा होता माझा म्हणून तुम्ही माझ्या विचारांचा घात केला
गुलामीतून मुक्त होण्यासाठी २२ प्रतिज्ञांचा विचार दिला
त्याच प्रतिज्ञा पाळण्याचा लेकरानो तुम्हाला त्रास झाला
अरे स्वातंत्र्यासाठीच मी तुम्हाला त्या २२ प्रतिज्ञा देतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ५ ।।
अंधरुढीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी मला अनेक दशके लढावी लागली
समाज माझा सुज्ञ व्हावा म्हणून अनेक संकटे मी स्वतःवर ओढवून घेतली
हिंदुत्ववाद्यांचा मी कट्टर शत्रू झालो पण मी काळजी माझ्या समाजाची केली
तरी पण अजून तुमची देवांची हौश कशी नाही भागली
बुद्ध हाच तुमच्या मुक्तीचा मार्ग आहे हे मी किती दशके सांगतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ६ ।।
माझ्या मरणाला आज ६ दशके झाली पण तुम्ही नाही बदलले
तुमच्यातून एखादा आंबेडकर होताना अजून नाही पाहिले
जे जे लोक पुढे आले सगळे मला गद्दार निघाले
पण मला मात्र तुम्ही जातीवाद्यांच्या दावणीला बांधले
आता मी मुक्त होण्याची वात बघतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ७ ।।
भीमसैनिक म्हणवता ना स्वतःला मग पुढे कधी येणार
माझ्या समता रथाला  तुम्ही पुढे कधी नेणार
माझ्या वंचित लेकरांना न्याय कधी देणार
बापाच्या ध्येयाची सांगा पूर्तता कधी करणार
आता मी तुमच्यातील स्वाभिमानी भीमसैनिक शोधतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ८ ।।
आज माझा समाज काही पहिल्या सारखा अडाणी नाही
पहिल्यासारखे आता सर्वच काही गरीब राहिले नाहीत
रहायला माडी दारात गाडी आता काही नवीन नाही
सुखसोयी मध्ये लेकरानो आता चळवळीला हि वेळ नाही
माझ्या त्या अडाणी जनतेचा स्वाभिमान आणि इमान आज मला आठवतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ९ ।।
वचन द्या लेकरानो मला माझे कार्य पुढे घेवून जाण्याचे
या समाजालाच नव्हे तर वंचित मानवाला न्याय मिळवून देण्याचे
जातीधर्माच्या पलीकडे असणारे नाते जपण्याचे
पालन करा त्या सम्यक बुद्धाच्या मार्गाचे
लेकरानो शेवटचे माझे ऐका आज हातात हात घ्या इतकेच सांगतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। १० ।।
मानवतेची कास धरा बुद्धाचा मार्ग स्वीकारून
आपलाच नाही तर वंचितास त्या रे न्याय द्या मिळवून
माझ्या जयघोषापरिस माझ्या विचारांचे मोल घ्या जाणून
घराघरात क्रांतीसाठी एक भीमसैनिक घ्या तयार करून
रविकिरणांची साथ आहे रे क्रांतीची मशाल घेण्यासाठीच बोलवतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ११ ।।
🙏🙏🙏

काय कमाल आहे.... अॅट्रासिटी अॅक्ट चा विरोध एकच समाज करतोय.... आणि या विरोधाचा विरोध पण एकच समाज करतोय...

काय कमाल आहे....
अॅट्रासिटी अॅक्ट चा विरोध एकच समाज करतोय....
आणि या विरोधाचा विरोध पण एकच समाज करतोय....
.
.
.
फक्त बौद्ध समाजाचेच नेते व कायॅकतेॅ अॅट्रासिटी अॅक्टच्या बाजुने बोलत आहेत,विरोध करण्यारयाचा निषेध करीत आहे,मोचेॅ काढत आहेत....
याचा अर्थ काय समजायचा....
अनुसुचीत जाती जमातील इतर जातीतील झोपलेत कि झोपेचे सोंग घेतायत हेच कळत नाही...
फक्त आणि फक्त बौद्ध समाजातीलच
.
.
 मा.प्रकाश आंबेडकर
मा.रामदास आठवले
मा.जोगेद्र कवाडे
मा.अजुॅन डागंळे
मा.अविनाश महातेकर
मा.विवेक चव्हाण

यांनीच फक्त या विषयावर प्रतिक्रिया नोंदवुन शरद पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे बाकीचे....त शेपुट घालुन कोणत्या बिळात बसेलत कोणास ठाऊक...


.कुठे गेले लक्षमण ढोबळे
.कुठे गेले जनादॅन चादुंरकर
.कुठे गेले सुशीलकुमार शिंदे
.कुठे गेले बाळा नादंगावकर
.कुठे गेले बबनराव घोलप
.कुठे गेले मधुकरराव पिचड
.कुठे गेले विष्णू सावरा
.कुठे गेले विजयकुमार गावित
.कुठे गेले सगळ्या पक्षातील एससी-एसटी चे नेते व कायॅकतेॅ
.
.या अॅक्टची गरज काय फक्त बौद्ध समाजालाच आहे का.....

शेगावकर सराची पोस्ट Whatsapp वरुन ☀सम्राट अशोका संबंधी प्रचलित गैरसमज आणि त्याचे निरसन☀ 📕📕📕📕📕📕📕📕📕

शेगावकर सराची पोस्ट Whatsapp वरुन ☀सम्राट अशोका संबंधी प्रचलित गैरसमज आणि  त्याचे निरसन☀
📕📕📕📕📕📕📕📕📕
🚫सम्राट अशोकाने प्रजेला बळजबरी बौद्ध बनवले.

✏सम्राट अशोकाने बळजबरीने प्रजेला बौद्ध बनविले..हा धादांत खोटा आरोप आहे.... प्रजा सुध्दा होणार्या हिंसेला कंटाळली होती.... अशोकाने हिंसेचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारल्याने प्रजा आश्वस्त झालेली होती ,आणि अशोकाच्या धर्माज्ञांमुळे प्रजेला सुरक्षिततेची खात्री पटली, व त्यामुळे प्रजेनेच स्वतः उत्स्फूर्तपणे बौद्ध धम्माचा स्वीकार केला.... अशोकानेच काय ,तर जगातील कुठल्याही राजाने बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार आणि स्वीकार हा कुठल्याही प्रकारच्या बळजबरीने, अथवा लालुच दाखवून केला नाही, असा हा एकमेव धम्म आहे.......!!!


🚫सम्राट अशोकाच्या अहिंसेच्या धोरणामुळे देश परकीयांचा गुलाम बनला
✏सर्व मौर्यकाळात एकही पराकिय आक्रमण झाले नाही . ज्यावेळी परकिय आक्रमणे झाली त्या वेळी बौध्द राजे नव्हते .

🚫सम्राट अशोकाने  सारा राज कोष धर्मप्रसारासाठी रिकामा करून देशाला
✏90 करोड रुपयाचे बांधकामे आशोकांनी केली ( 84 हजार स्तुपाची बाँघकामे ) ती लोकांनी लग्न , इतर संमारंभावार होणारा खर्च वाचवून उस्फुर्त दानातून केली , राजकोषातून नव्हे .
मौर्याच्या राजकोषात पाटलीपुत्र राजवाड्यात 36 करोड नाणी होती ती कनिंघमनी शोधून काढली .
84 हजार स्तुप पुजेसाठी नव्हते , तर तिथे जनतेचे व पशुसाठीचे ते विनामुल्य दवाखिने होते . व तिथेच शिक्षणाचे कार्यही चालत असे हे कार्य राजकोश आणी दानावर चालत असे .

🚫सम्राट अशोकाने सत्तेच्या हव्यासापोटी आपल्या 99 भावांचा  खुन केला.
✏मुळात त्याला 99 भाऊ होते हेच चूक आहे .
जेव्हा त्यांच्या शिलालेखाची भाषा सामजत नव्हती तेंव्हा तसे म्हमत त्या सर्व दंतकथा निघाला .
एका स्तँभलेखावर अशोक म्हणतो की मी लिहिलेले नियम माझ्या मुलांना व भावांनाही बंधनकारक राहतील .
भावा बहिणी सोबत त्याचे संबध स्नेहाचेच होते .
फक्त युध्दाचे वेळी सुशिम आग लागलेल्या खंदकातपडून मरण पावला .

 🚫सम्राट अशोक दीसायला अतिशय कुरूप होता
कथा कांदब-यातील मजकुर हा इतिहास नसतो .....
काळा व कुरुप हा दुसरी धम्म संगितीला धन देणारा कालाशोक होता .
सम्राट अशोकांनी तिसरी धम्म संगिती घेतलेले आहे . या दोघामध्ये अनेक वार्षाचे अंतर आहे .कालाशोक व सम्राट आशोकांचे चरित्र एकमेकात जाणुनबुजून मिक्स करण्यात आले आहे .

अशोक हा दिसायला कुरूप नसून त्याचे व्यक्तीमत्व हे प्रभावशाली होते....सातवाहनांनी बांधलेल्या अमरावती स्तूपावर त्याचे जे शिल्प कोरलेले आहे, त्यावरनच त्याच्या व्यक्तीमत्वाची कल्पना येते...आणि भारत सरकारने त्याच्या प्रति आदर व्यक्त करून, त्याच्या सन्मानासाठी जे पोस्ट तिकीट जारी केले आहे... त्या तिकीटावरील असलेले अशोकाचे चित्र हे अमरावती स्तूपावर असलेल्या अशोकाच्या शिल्पावरूनच घेतलेले आहे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

थोडे डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्वा विषयी

थोडे डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्वा विषयी

डॉ. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक महत्त्वपूर्ण
पैलूंपैकी त्यांचं फॅशन स्टेटमेंट हे एक महत्त्वाचं अंग आहे. ते
अशासाठी की त्या काळात अप टू डेट राहणारी केवळ तीनच
माणसं भारतीय समाजकारणात अग्रेसर होती. पं. जवाहरलाल
नेहरू, बॅ. मोहम्मद अली जिन्ना आणि तिसरे डॉ. बाबासाहेब
आंबेडकर.
या तिघांपैकी बाबासाहेब सोडले तर बाकी दोघे हे सधन
कुटूंबातील. बालपण आणि तारुण्य सर्व सुख सोयी आणि
संसाधनांनी भरलेल्या वातावरणात गेलं. याउलट
बाबासाहेबांच्या घरी कमालीचं दारिद्र्य होतं. जातीव्यवस्थेचे,
अस्पृश्यतेचे चटके अलग. तरी वकिली व्यवसायातून
कमावलेल्या संपत्तीतून त्यांनी स्वतःचं एक फॅशन स्टेटमेंट
तयार केलं होतं. तसे ते स्वभावाने पूर्णतः युरोपीयनच होते.
पोटाला खायला मिळालं नाही तरी चालेल पण अंगावर चांगलं
कापड हवं हा त्यांचा आग्रह असे. बाबासाहेबांना सिडनहम
कॉलेजमध्ये असताना पहिला पगार मिळाला. त्यांनी रमाईला
सांगितलं की घरातल्या सर्वांना कपड्यांची मनसोक्त खरेदी
करून घे. रमाई सुद्धा जिंदादील माणसाचीच सोबती. बैलगाडी
भरून कपड्यांची खरेदी केली. हा भाग वेगळा की त्या वेळी
बाबासाहेबांना नऊशे रुपये पगार झाला होता. तर
बाबासाहेबांकडे उंची सुट होते. प्रत्येक मोसमात घालता
येतील अशा पद्धतीने त्यांनी कापडांची निवड सुट साठी केलेली
होती. प्रत्येक सुटची शिलाई वेगळ्या ढंगाने केलेली होती.
प्रत्येक सुट हा थ्री पीस असे. सुटच्या आत पेनांसाठी वेगळा
खिसा, अचानकपणे टिपणे काढल्यानंतर कागद सुरक्षित
रहावा म्हणून असलेला वेगळा खिसा अशी ठेवण असायची.
त्यातल्या त्यात त्यांच्या जोधपुरी सुटची मिजास ही भारीच
असायची. पंजाबात असताना त्यांनी परिधान केलेला काळा
जोधपुरी सुट हा मला त्यांनी आजवर परिधान केलेला सर्वात
बेस्ट सुट वाटतो. अन् दुसरा सुट हा तत्कालीन राष्ट्रपती
राजेंद्रप्रसाद यांच्यासोबत असताना घातलेला पांढऱ्या रंगाचा
जोधपुरी सुट. त्यांची पँट मस्त ढगाळ, लांबीला भरपूर अन्
पोटापर्यंत ओढलेली असायची. त्यांचे वापरायचे बेल्ट हे साधे
असले तर उच्च दर्जाचे होते. त्यांना हॅट आवडत. त्याचं एक
वेगळं कलेक्शन होतं त्यांच्याकडे. बाबासाहेबांच्या चष्म्याच्या आकर्षक फ्रेम ह्या त्यांनी अनेकदा
युरोपात असताना बनवून घेतल्या होत्या. बाबासाहेबांचं
कपाळ भव्य होतं. डोळे मोठे होते. कान सुद्धा मोठे होते.
त्यांचे हात आणि हातांची बोटं सुद्धा साधारण लांबीपेक्षा
मोठी होती. ही सारी गुणवैशिष्ट्ये बुद्धाच्या शरिरातही होती.
खरे तर ही लक्षणे एका महान प्रकांड पांडित्याची असतात.
त्यामुळे गोलाकार... थोडक्यात अंडाकृती फ्रेमचा चष्मा
त्यांना परफेक्ट शोभायचा. बाबासाहेब शर्टवर तसे फारच
कमी असायचे. फावल्या वेळेत ते लेहंगा किंवा लुंगी नेसत.
त्यांचा फक्त शर्टवरचा एकमात्र फोटो आहे तो मिलिंद
कॉलेज, औरंगाबदमधला.
आता थोडंसं पुढे येऊयात... बाबासाहेबांच्या खिशाला एकाच
वेळेस सहा पेन असत. त्यातील कित्येक पेन महागडे असायचे.
तब्बल दोनशे रुपयांचे पेन असायचे ते. त्यांना इन्क पेन
आवडायचे. त्यांची पेन पकडण्याची पद्धत सुद्धा अफाट
होती. कित्येक पेनवरची कव्हर कलर अजूनही शाबूत आहेत.
इतक्या लेवीश पेनचं कलेक्शन अजूनतरी कोणा इतरांकडे असेल
असे वाटत नाही.
बाबासाहेब युरोपीयन स्टाईलवालं चैनीचं घड्याळ वापरायचे.
तसंच त्यांच्या हातातील घड्यांळ्यांचं कलेक्शन सुद्धा फार
सुंदर होतं.
बाबासाहेब सुट परिधान करताना आतला शर्ट हा कोटांच्या
पुढे कसा असेल आणि शर्टाला असलेली बटणं आणि पुढचं
घड्याळ शिस्तीत कसं असेल याकडे खुप बारकाईने लक्ष
ठेवायचे. तीच गत त्यांच्या बुटांच्या बाबतीत. त्यांनी
वापरलेले बुट हे त्या काळातले सर्वोत्तम बुटांपैकी एक होते.
आज अनेक ठिकाणी त्यांनी वापरलेल्या बुटांचे जोडे
आपल्याला पहायला मिळतात. मी मघाशीच म्हटलं की त्यांना
हॅटचा शौक होता. त्यांनी विविध प्रकारच्या हॅट वापरल्या,
काही वेळा कॅप वापरल्या. राऊंड कॅप सुद्धा घातली. तसेच
काळ्या चष्म्यांच्या बाबतीतही तीच गत होती. त्यांच्याकडे
निरनिराळ्या रंगाच्या टाय होत्या. कोणत्या रंगाच्या
सुटसोबत कोणत्या टाय असाव्यात याबाबतचा त्यांचा
चॉईससुद्धा भन्नाट होता. डायबिटीसचा त्रास झाल्यानंतर
त्यांनी काठीचा आधार घ्यायला सुरूवात केली. पण त्यांच्या
काठीवर नक्षीकाम आणि काठ्यांचं कलेक्शनही तसंच
स्टाईलिश होतं.
बाबासाहेबांनी अनेकदा भावूक होऊन सांगितलं होतं की, न्हावी
पैसे घेऊन सुद्धा त्यांचे केस कापत नसे. त्यांची बहिणच त्यांचे
केस कापून देई. परंतू बाबासाहेबांनी कधी वाढलेले केस, दाढी
असा अवतार ठेवला नाही. क्लिन शेव्ह्ड असायचे ते.
बाबासाहेबांचं राजबिंड रुप खुलून दिसायचं. त्यांना
उद्धारकर्ता, बाप या भावनेतून पाहील्यानं त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाचं असं आकलन करण्याला आपण वावच ऊरू
दिला नाही.

तर दोस्तहो थोडक्यात काय तर... कुणीही कधी तुम्हाला
म्हटलं की एवढं लॅविश का राहता? हे असं सोनं नाणं का
घालता? हे असलं उंची का जेवता ? तर एवढंच सांगा..
आमच्यात हे असंच करतात.. असंच खातात.. असेच कपडे
घालतात. आपल्या शेकडो पिढ्या बिनकपड्यांच्या हिंडल्यात.
एक सितारा जन्माला आला अन् त्यानं सारं काही पालटून
टाकलं. जे घालाल ते चांगलंच घाला. भारीच घाला. आपलं
सौंदर्यशास्त्र ठासून सांगा, दाखवा अन् मिरवा ही. याला भले
ते निर्लज्ज प्रदर्शन म्हणोत तर म्हणूदे.. मेहनतीच्या
कमाईने आलेल्या वस्तूला निर्लज्जपणा म्हणत नाहीत.
स्वाभिमान म्हणतात.

आज मोठ्या अभिमानाने सांगतो की, होता तो भिम माझा कोहिनूर भारताचा

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतात जन्माला आले नसते तर आज *मी* देखिल शिकुन मोठि झाले नसते

अशा युगपुरुषास कोटी-कोटी प्रणाम..... जयभिम
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻