Friday, 9 September 2016

🎞अनुसूचित जाति मधे 125 जाती येतात.

🎞अनुसूचित जाति मधे 125 जाती येतात.

🎞यात बौद्ध समाज सोडून इतर जाती फुकट 13% आरक्षण चा लाभ घेत आहेत.

🎞लोक फक्त बौद्ध समाजाला टारगेट का करताता

✴मला प्रश्न पडला आहे कि, मागासवर्गीय अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा काय फक्त बौद्ध समाजालाच लागु होतो का ?

✴मागासवर्गीय / दलित म्हणजे बौद्धचं आहेत का ?

➡अक्षेर
➡अनमुक
➡आरेमाला
➡आरवा माला
➡बहना

➡बहाणा
➡भाकड
➡बंट
➡बलाही
➡बलाई

➡बंसोर
➡बुरुड
➡बांसोर
➡बासोंडी
➡बेंडाजंगम

➡बुडगाजंगम
➡बेडर
➡भांबी
➡भांभी
➡असादुरु

➡असोदि
➡चामडीया
➡चमार
➡चमारी
➡चांभार

➡चमगार
➡हरळ्या
➡हराळी
➡खालपा
➡माचीगार

➡मोचींगार
➡मादर
➡मादिग
➡मोची
➡तेलंगू मोची

➡कामाची मोची
➡राणीगार
➡रोहिदास
➡नोना
➡रामनामी

➡रोहित
➡समगार
➡सतनामी
➡सुरजबंशी
➡सलगारा

➡चर्मकार
➡परदेशी चर्मकार
➡भंगी
➡मेहतर
➡ओलगाना

➡रुखी
➡मलकाना
➡हलालखोर
➡लालबेगी
➡सुराज्यरामनाम

➡बाल्मीकी
➡करोर
➡झाड़गल्ली
➡कोरार
➡झाडमल्ली

➡हेल्ला
➡बिंदला
➡ब्यागरा
➡चलवादी
➡चन्नया

➡चेन्नदासर
➡होलया दासर
➡होलेया दसारी
➡डक्कल
➡डोकल्लवार

➡ढोर
➡कक्कया
➡कंक्कया
➡डेहोर
➡डोम

➡डुमार
➡येल्लमलवार
➡येल्लमलेवडलू
➡गंडा
➡गंडी

➡गरोडा
➡गारो
➡घासी
➡घासिया
➡हल्लीर

➡हलसार
➡हसलार
➡हुलसवार
➡हुसलवार
➡होलार

➡व्हला
➡होलय
➡होलेर
➡होलिया
➡होलेया

➡कैकाडी
➡कटिया
➡पथरिया
➡खंगार
➡कनेरा

➡मिरधा
➡खाटिक
➡चिकवा
➡चिकवी
➡कोलपुल वँडाळू

➡कोरी
➡लिंगडेर
➡मादगी
➡मेहरा
➡तराळ

➡धेगु-मेगू
➡माह्यावंशी
➡धेड
➡महार
➡वनकर

➡माला
➡माला दासरी
➡माल हन्नाई
➡माला जंगम
➡माला मस्ती

➡माला साले
➡नेटकानी
➡मालासन्यासी
➡मांग
➡मातंग

➡मिनीमादिग
➡दखनी मांग
➡मांग म्हशी
➡मदारी
➡गारुडी

➡राधेमांग
➡मांग गारोडी
➡मांग गारुडी
➡मत्रे
➡मस्ती

➡मेघवाल
➡मेंधवार
➡मिठा
➡अयलवार
➡मुक्री,

➡नाडीया
➡हादी
➡पासी
➡सांसी
➡शेणवा
➡चेनवा

➡सेडमा
➡रावत
➡चिंडोल्लू
➡सिंधोल्लू
➡तिरगार

➡तिरबंदा
➡तुरी

🎞इत्यादी जाती काय  सवर्ण आहेत का ?

🍀समजत जरी असले तर त्यांनी आरक्षण किंवा अन्य सवलती नाकाराव्यात.

🍀ही वरील मंडळी स्वतः जयभीम वाले किंवा आम्ही बौद्ध नाहीत हे मात्र छाती ठोक सांगतात

🍀जयभीम वाले ते नसून बौद्धचं फक्त जयभीम वाले आहेत हे मात्र इतरांना न चुकता ते सांगतात

🍀प्रत्येकवेळी आपणच का पेटून उठायचे ?

🛢रस्त्याची लढाई आपण रस्त्यावर उतरून करतो.

🛢आणि दुश्मनी फक्त बौद्ध घेतो व फायदे सर्व मागासवर्गीय / दलित फुकट फायदा घेतो

🍀समाजतील वरील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती १३% आरक्षणाचा फायदा घेतात.
----------------------------------------
याला एकच कारण आहे. ते म्हणजे या देशातला बौध्दच फक्त ब्राम्हणवादाला विरोध करतो.बाकी सर्व आजून त्यांच्या गुलामगिरीतच आहेत.त्यांना आजून आंबेडकरवाद आणि ब्राम्हणवाद समजलेला दिसत नाही.

जात नष्ट होत नाही तोवर ॲअट्रॉसिटी कायदा रहाणारच- राजकुमार बडोले

जात नष्ट होत नाही तोवर ॲअट्रॉसिटी कायदा रहाणारच- राजकुमार बडोले

सातारा दि. २६ (प्रतिनिधी) ः समाजातून जोवर जात नष्ट होत नाही तोवर  देशातून ॲऑट्रॉसिटीचा कायदा रद्द होणार नाही, हे माझेच म्हणणे नाही तर देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचेही तेच म्हणणे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर हा कायदा अधिक बळकट करून, पिडीताला नुकसान भरपाईची रक्कम साडे आठ लाख करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन आपण अनुसूचित जातींच्या मागे भक्कमपणे असल्याचे सिध्द केले, असे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

आज सातारा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ऐतिहासिक श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल आणि भिमाई स्मारकाला  बडोले  यांनी भेट दिली. त्यानंतर येथील सर्किट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती निमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित पन्नास स्थाळांचे संवर्धन आणि विकास करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला असून यात या शाळेचा समावेश करण्यात आला  आहे. मात्र  ही इमारत हेरिटेजमध्ये समाविष्ट असल्याने वेगळे काही करता येणार नाही.  शाळेने किंवा जिल्हापरिषदेने कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, तरीही येथे सुसज्ज ग्रंथालय देणार असे त्यांनी सांगितले. सोबतच भिमाई स्मारकाच्या विकासाचाही समावेश करण्यात आलेला आहे, असेही बडोले म्हणाले.

आज सकाळी त्यांनी भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला भेट देऊन पाहणी केल्याचे सांगत सदरील जागेवरील अतिक्रमण लवकरच हटवले जाईल, डॉ. बाबासाहेब दरवर्षी एक जानेवारीला या विजयस्तंभाला आवर्जून उपस्थित रहात. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचाही विकास करण्यात येईल, असेही बडोले यावेळी म्हणाले.

राज्यात जात पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली असून आवश्यक पदांना मंजूरीही मिळाली आहे. त्यामुळे आजवर ३६ समित्या स्थापन करण्यात आलेल्या असून त्यातील काही पदांमुळे कार्यरत झालेल्या नाहीत.  मात्र पूर्वीच्या पंधरा समित्या कार्यरत असून काही अपवाद वळगळता प्रत्येक जिल्ह्याला समिती आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्याही बरीच कमी झालेली असल्याचे ते म्हणाले. यावेळी दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे माजी आमदार डॉ. येळगावकर आदी उपस्थित होते.

..................................

Wednesday, 7 September 2016

🏃 चलो दिल्ली 🏃 🏃 चलो दिल्ली 🏃

🏃 चलो दिल्ली 🏃     🏃 चलो दिल्ली 🏃

✍🏻 भारत के दलितों जाग जाओ ! ✍🏻

✍🏻 1) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (RPI) 2) दलित शोषीत मुक्ती मंच ३) अखिल भारतीय केथ मजदूर युनियन ४) नॅशनल कॅम्पेन कॉन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ दलित राईट्स और अन्य तकरीबन २०० संघटन मिलकर मा. अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर जी के नेतृत्व मे भारतभर मे चल रहे दलित अन्याय और अत्याचारों के विरोध मे हो रहे आंदोलनों को संघटीत करके दिल्ली मे सांझा फ्रंट (United Front) तैय्यार किया जा रहा है, जिसका मुख्यालय (Headquarter) दिल्ली रहेगा ! और वही से देशभर मे आरएसएस और बिजेपी सरकार द्वारा दलितोंपर हो रहे अन्याय अत्याचार को रोकने का संघटीत प्रयास किया जाएगा ! जिसके लिए देश के तमाम राज्यों के दलित संघटनों से वार्तालाप आयोजकोद्वारा किया जा रहा है ! और आरएसएस और बिजेपी सरकार द्वारा दलितों पर किए जाने वाले अन्याय अत्याचारों का निषेध करने के लिए

16 सप्तेंबर 2016 को संसद मार्ग, नई दिल्ली मे धरना कार्यक्रम का आयोजन किया गया है !

✍🏻 अब वक्त आ चुका है की आरएसएस और बिजेपी के सांस्कृतिक राष्ट्रवाद का पुरजोर विरोध करके देश के तमाम मानवतावादी और परिवर्तनवादी लोगों के सामने सुरक्षित पर्याय उपलब्ध करके सामाजिक परिवर्तन के द्वितीय चरण का आगाज कराया जाना जरूरी है ! जिसके लिए 16 सप्तेंबर 2016 को नई दिल्ली मे संसद मार्ग पर धरना दिया जा रहा है !

✍🏻 भारत के सभी राज्यों के सभी दलित, समाजवादी, मॉर्क्सवादी, मानवतावादी और समविचारी लोगोंको और संघटनों को गुजारीश की जा रही है की सभी संघटन इस *धरना प्रदर्शन में सभी कार्यकर्ताओं के साथ सामिल हो जाए !* व्यक्तीगत स्वतंत्रता को कुचलकर लष्करशाही भाजप सरकार देश में अराजकता फैला रही है, जिसका विरोध करके देश मे असुरक्षितता महसूस करनेवाले सभी भारतीयों को सुरक्षितता प्रदान करना हमारा सभी का कर्तव्य है ! इसलिए लष्करशाही भाजप सरकार का विरोध किया जाए !

✍🏻 हम सभी संघटन, उनके प्रमुख, और कार्यकर्ताओंको गूजारीश करते है की आप सभी 16 सप्तेंबर २०१६ के धरना कार्यक्रम मे बडी संख्या मे शामिल हो जाए !

धरना कार्यक्रम स्थल :- संसद मार्ग, नई दिल्ली.

दिनांक :- 16 September 2016

प्रमुख उपस्थिती :- मा. अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर

🗣 धरना कार्यक्रम मे सामिल हो कर एक आवाज मे सब मिलकर कहे...

🗣 अब हम नही सहेंगे भाजप और आरएसएस की लष्करशाही सरकार की तानाशाही...
🗣 अब हम नही सहेंगे सांस्कृतिक राष्ट्रवाद के नाम पर चल रही तानाशाही...
🗣 अब हम नही सहेंगे देश में दलित और अल्पसंख्यक लोगों के उपर हो रहे अन्याय और अत्याचारों को...
🗣 अब हम देश के दलित हमारे उपर किसी तरह का अन्याय, अत्याचार होने नही देंगे, और न ही सहेंगे...
🗣 अब हम देश मे चल रहे दलित, अल्पसंख्यक वर्ग के उत्पीडन को मान्यता नही देंगे...
🗣 अब हम देश के दलित साथ में मिलकर एक आवाज मे कहेंगे...
     "भारत में भारतीयों को सुरक्षित करो, वरना दिल्ली का तख्त खाली करो..."

___समन्वयक___
अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर
#prakashambedkar
#support_to_protest_against_atrocity_at_delhi
___शब्दांकन____
_अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

" पैलवान जिवाजी महार "

" पैलवान जिवाजी महार "

उमरठ हे गाव तसं ३५० वर्षापूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तान्हाजीरावांचा.


आज गावाची यात्रा भरली होती.गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.


राजांची आणि तान्हाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची.मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.

आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची ,त्यांचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.


आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे..हा हिरडस मावळातला ..वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.

वास्तविक सर्वजन शिवाजी राजाना पाहायला जमणार होते, आणि का नाही जमणार.??
लेकीसुना, संत सज्जन ,गाइवसरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे .स्वराज्य आणले होते ..!

मैदान खचाखच भरले होते.लहान मोठ्या कुस्त्याला प्रारंभ झाला.

आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
राजीयानी पांढरा अंगरखा घातला होता..

कृष्णा घोडीवर स्वार होते,आणि कमरेला  तलवार बांधली होती..जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते.


राजे खाली उतरले ..

तान्हाजीराव आपल्या फौजेसह राजाना भेटायला वाटेतच थांबले होते.रजानी तान्हाजीरावना मिठी मारली.

तितक्यात खबर आली कि ,बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता .त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .

वाघाने त्यांच्या पायाला जबर दुखापत केली.
मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने .


हे ऐकून मैदान शांत झाले.खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन मैल आले होते.

आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते

'' मंडळी,लखू बेराडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.म्हणून तो आज लढू शकत नाही.


या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल.असेल तर समोर या.''


हि घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चीमेकडे कुजबुज सुरु झाली.


एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता.सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
राजे सर्व पाहत होते.


तितक्यात कोणतरी किंचाळला


''आरं आला रं जीवामहार आला ''
राजांनी चौकशी केली तान्हाजीरावान्पाशी ..
तान्हाजी म्हणाल..''राज ,ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय,कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा.दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होत..



निजामशाहीचा दंगा झाला तव ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला..तेनच याला तयार केलाय.""
राजांच्या चेहर्य्यावर एक तेज आले होते.


कुस्तीची सलामी झडली .


भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जीवाला नमवण्याचा प्रयत्न केला ,पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता.डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.

भिकाजी ने उसन्या अवसानान पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जीवा ने फिरवून बाहेरची टांग लावली...भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.


सगळ प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले.जीवाला अक्षरश डोक्यावर घेवून नाचू लागले
तितक्यात शिंगे -करणे गरजू लागली ..खुद्द राजे येत होते,


पटापटा सर्व बाजूला झाले.
राजीयानी हासत हासत जीवाला मिठीच मारली..मनात काय राजकारण होते माहित नव्हते मात्र राजे जाम खुश झाले होते..
राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जीवाला बक्षीस दिले..आणि विचारले..


जीव काय करतोस ??
जीव उद्गारला ,'' काय नाय वरातीत पट्टा फिरवतो..दंगलीत कुस्त्या खेळतो''



राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ...!!
पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमान्च्यासोबत..!!
आहे कबुल ..??

जीवा हासला...होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला.


आणि हाच तो जीवाजीराजे महार ज्याने अफजलखानाच्या अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
  आज जिवाजी महार यांची  ३०६ वी  पुण्यतीथी. जिवाजी महार यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा ...!!!  

म्हणतात ना होता जीवा,
 म्हणून वाचला शिवा....                                                                    
🙏 जय जिवाजी जय शिवाजी asha aahe maza shivaji aani tyach mavale....

माजी न्यायमूर्तींचे भाषण रोखणाऱ्या दीडदमडीच्या मनुवादी विचारसरणीच्या गुंडांचा जाहीर निषेद!!

माजी न्यायमूर्तींचे  भाषण रोखणाऱ्या दीडदमडीच्या मनुवादी विचारसरणीच्या गुंडांचा जाहीर निषेद!!
-------------------------
आदरणीय कोळसे पाटील यांनी एबीपी माझा वरून मराठ्यातील दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या विरोधात प्रखर भूमिका मांडली होती. बी. जी. कोळसे पाटील हे एकमेव बहुजनवादी मराठा आहेत कि ज्यांनी आपली भूमिका आंबेडकरवादी असल्याचे दाखवून दिले आहे. आज पुण्यात मराठा मोर्चा संदर्भातील बैठकीत त्यांचे भाषण रोखण्यात आले. हे भाषण रोखणारे मनुवादी आरएसएस वादी व शरद पवारांचे चमचे आहेत. शरद पवार आणि मोहन भागवतचे सुपारी घेतलेले गुंड आहेत.
आदरणीय कोळसे पाटील यांच्या सारखे भरपूर पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते आहेत ज्यांची भूमिका ऍट्रॉसिटी विरोधात नाही. त्यांची भूमिका कित्येक वर्ष सरकारमध्ये राहून महाराष्ट्र लुटून खणाराच्या विरोधात आहे. पण त्यांनाही या मनुवादी आतंकवादाची भीती वाटत आहे. त्यामुळे उघड-उघड भूमिका मांडायला कोणी तयार नाही.
अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी हजारो कोटी रुपये भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला या संदर्भात कोणी बोलले तर त्यांचे भाषण रोखण्यात येते, सहकरसम्राट, कारखानदार, जिल्हा बँक लुटणारे चोर, शैक्षणिक संस्था चालवणारे भामटे कोण आहेत याबद्दल कोणी बोलले तर त्यांना वेगळे करण्यात येते. "चोर आणि वरून शिरजोर" अशी अवस्था झाली आहे. त्याच्याच विरोधात बी. जी. कोळसे पाटील बोलत आहेत. काही विचारसरणी जाणीवपूर्वक दलित - मराठा अशा वाद निर्माण करून महाराष्ट्रात दंगली घडून आणण्याचे काम करत आहे.
हा डाव हणून पाडण्यासाठी बी. जी. कोळसे पाटील यांच्या सारख्या तमाम पुरोगामी बहुजन विचारसरणीच्या नेत्यांमागे, तरुणांमागे आंबेडकरवादी जनता उभी आहे.
आदरणीय न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आम्ही आपल्या पाठीशी आहोत आपण प्रखरपणे आपली भूमिका मांडली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सगळेच मराठे एकसारखे नसतात हे आपण दाखून दिले. खरा  गुंड ओळखुन त्याला झोडून काढणारा मराठा तरुण निर्माण होऊन त्यांनी बहुजनाच्या मूलभूत प्रश्नावर लढा आपण सगळ्याने मिळून लढावं हीच अपेक्षा...!!!

- दीपक केदार
पॅन्थर सेना महाराष्ट्र प्रमुख
९९२३२४५०१०

न्या . बि . जी . कोळसे पाटिल.⚡⚡⚡⚡ "माझ्या मराठा बहिणी-भावांनो,कृपया काळजीपूर्वक वाचा व पटलं तर सर्वाधिक शेअर करा"

न्या . बि . जी . कोळसे पाटिल.⚡⚡⚡⚡
"माझ्या मराठा बहिणी-भावांनो,कृपया काळजीपूर्वक वाचा व पटलं तर सर्वाधिक शेअर करा"
सर्वसमावेशक आपली मराठा जात संघटित होत आहे,ही फारच चांगली गोष्ट आहे.प्रत्येंक जातीनें, जातीयता अस्तित्वांत असें पर्यंत,आपापल्या जातीच्या विकासासाठी संघटन करण्यांत कांहीच ग़ैर नाही.मुठभर मराठा नेत्यांनीच, त्यांच्याच घरांत कायम सत्ता असावी या लोभानें,आपणां सर्वांना संघटित होऊ दिलं नाही.आणि ते आपली दररोज मान कांपतांत हे माहिती असून देखील आपण त्यांचाच वर्षानुवर्षें जयजयकार करण्यांत धन्यता मानली.याचे आज आम्ही पूर्ण व कायम भान ठेवूंन व पुन्हां फसवणूक होऊं देणार नाही,अशी खबरदारी घेतलीच पाहिजें.मात्र आम्ही संघटित होतांना दुसरी कुठलीही जात सुध्दां शत्रु करून घेतां कामा नये.आपल्या मागण्यां देखील संविधानाच्याच चौकटींतच असाव्यांत, नाहीतर आंदोलनें फ़ेल होतांत व समाज नाराज़ होतो.आम्ही,न्या सावंत पी.बी. यांच्या मार्गदर्शनाखालीच,आपल्या या मागण्यावरही वेळो वेळी राज्यसरकारला सल्ले दिलेले आहेंत.प्रश्न सुटण्यासारखेच आहेंत.पण आम्हाला नेहमी आमचे नेतेच मोठ्ठे वाटले व आम्ही त्यांच्याच मागे लागून समाजाचे अपरिमित नुक़सान करून घेतलेले आहे. उदा: हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी,पण संविधान विरोधी आंदोलनासारखें, देशांत भयानक अराजक माजवूंन चालणार नाही,ती संघाची खेळी होती.हे कदाचित अण्णांला देखील माहिती नसेल.अण्णा स्वत:प्रधानमंत्री झाले तरी ते मांगत होते तसा"जनलोकपाल"अस्तित्वांत आणणें शक्य नव्हतें कारण ती त्यांची मागणी देशाला लोकशाही कडून हुकूमशाहीकडे नेणारी व संविधानविरोधीच होती.आम्हा सर्व भारतीयांचा प्रमुख शत्रु,संघाला नेमकं श्रमिकांत विभागणी हवी असते व तीच खरी संघाची ताक़त असतें.देशभर ज्या ज्या जाती संख्येंनें जास्त आहेत,त्या डोईजड होऊंच नयेंत म्हणून संघ त्या त्या अल्पसंख्यांक जातींना हाताशी धरून,ती जात संपविण्यांत संघ यशस्वी होत आहे.सर्व श्रमिक संघटित होऊच नयेंत हेच संघाचे कायम ध्येय राहिलेले आहे. सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचा देखील अभ्यास करा म्हणजें काय दिसते?तर ते कसें मराठा विरोधी आहे.आमच्या दैवतांची,छ.शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजामातेची बदनामी करणारा त्या हरामखोर,नीच,कपटी,क्रुर पुरंदरेल मुद्दाम,केवळ मराठ्यांना डिवचण्यासाठीच,महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणारे आमचे उद्दाम,माजलेले मुख्यमंत्री बघा.त्यांची दररोजची आम्हांला संपविणारी कपटी, धोरणात्मक वाटचाल बघा.तशी या ब्राम्हण्यवादी व्यवस्थेनें आमची अनेंक वर्षें, मराठा म्हणजें  खलनायक,रांगडा,मागासलेल्या विचारांचा,अडाणी, अशिक्षित, सत्तालोलूप नीतीहीन,शीलहिन, बलत्कारी इ.इ.अनेंक विशेषणें लावून बदनाम केलं.अन्न, वस्र, निवारा,आरोग्य व शिक्षणांपासून वंचित ठेवलं.आमचा सर्वांर्थानें कोंडमाराच केला व रात्रंदिवस अवहेलनाही केली."बलत्काराचा गुन्हां कुठल्याही जाती-धर्मांतील आरोपींनी, कुठल्याही जाती-धर्मांतील स्रीवर केला तर त्याविरुध्द देखील सर्व जाती-धर्मांतील समाजानें सर्व ताकतिनिशी उठलंच पाहिजें व त्याचा निषेधही केलाच पाहिजें.याबद्दल कुणाचंही दुमत असूंच शकत नाही."हा सर्व उद्रेक आतां या शिस्तबध्द,शांतता,संयमपूर्व आंदोलनानें बाहेर पड़त आहे.ही देखील फार अभिमानाची गोष्ट आहें.
मराठा बहिणी-भावांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षांत ठेवा की,भारत देशांत एकाच जातीची एवढी मोठ्ठी संख्या असणारी आपलीच मराठा ही एकमेव जात आहें,या संख्येंचा आपण सदुपयोग करूं या.छ.शिवाजी,संभाजी,शाहू,सयाजीराव यांचा आदर्श समोर ठेऊन सर्वजाती धर्मांच्या बहिणी-भावांना बरोबर घेऊन, अगदी आईच्या मायेनें किंवा थोरल्या भावांच्या भूमिकेंतूनच व आपण सत्ताधारी म्हणून,सर्वांचे एकसंघ संघटन करूं.सर्व जाती-धर्मांतील बहिण-भावांना त्यांचे  आमचे सध्याच्या व्यवस्थेचे गुलाम नेत्यांना बांजूला ठेऊन, त्यांना संघटित करूं या.एक खरे धरमनिरपेक्ष,जातीनिरपेक्ष आमचे मित्र मधु लिमये,नेहमी आम्हाला सांगत की,"कोळसेपाटील,मी सर्व देशांचा इतिहास-भूगोल जाणतो,मला मराठ्यांइतकी,सर्वसमावेशक व नेतृत्वगुण असणारी जात,भारतांत दुसरी कुठली दिसली नाही व एकाच जातीची एवढीं मोठ्ठी संख्या असणारी जात देखील दुसरी कुठली देशांत दिसली नाही.फक्त तुमच्या अप्रामाणिक व विश्वास घातकी नेतृत्वानें तुमच्या जातीला बदनाम केलेले आहे."मित्रांनो खरोखरच १९७८ सालांत ज्यादिवशी आमच्या एका नेत्यांनें वसंतदादांचा विश्वासघात करून, जनसंघासारख्या अत्यंत विषारी, कपटी विचारांच्या पक्षां बरोबर सरकार केलं,तो दिवस पुरोगामी महाराष्ट्रच्या स्वच्छ राजकारणातील काळाकुट्ट दिवस होय.केवळ त्यामुळे त्या नेत्याची व मराठ्यांची भारतीय राजकारणांतील विश्वासहर्तता संपली व ते कर्तबगार पण विश्वास घातकी नेतृत्वही संपले.हा कलंक आता आम्हां सर्वांनाच धुवून काढावाच आहे व मराठा या देशाचे सक्षमपणें नेतृत्व करूं शकतो हे सिध्द करावयाचे आहें.हे लक्षांत ठेवा.परंतु हे सर्व करतांना कुठल्याही इतर जातींचा द्वेष करूं नका,तरच ही देशपातळीवरील आमची ही उड़ी १००% शक्य होईल याची आम्हाला खात्री आहें.

जातीयवाद..आता धुरळा तर उडणारच...

जातीयवाद..आता धुरळा तर उडणारच...
आजकाल कोपर्डी प्रकरणाचे निमित्त लावून मराठा मुक मोर्चा निघताहेत. खरोखरच त्या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चे, आंदोलने झालीच पाहिजेत. त्या पिडीत मुलीच्या कुटूंबियांना न्याय मिळालाच पाहिजे पण लोकशाहीने मोर्चे आंदोलने काढण्याचा अधिकार दिला म्हणजे असे नाही की आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या खचलेल्या पिचलेल्या धनगर आणि दलित समाजाचे घटनेनं दिलेले अधिकार हिसकावून घ्यायची ही तुमची भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची नसून घरात बसून शतरंजचा (Chess) खेळ खेळणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांची ही चाल आहे. त्याचे कारण असे की कधी नव्हे इतिहासांत पहिल्यांदाच धनगर समाजातील दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर दलित समाजातील एक कॅबिनेट मंत्री झाला  शिवाय भारताच्या इतिहासांत पहिल्यांदाच धनगर समाजाचा एक खासदार राज्यसभेवर गेला म्हणून त्या घरात बसलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागले. मग वजीरांना (बिनडोक मराठा अभ्यासक ज्याच्याशी फोनवरून माझे बोलणे झाले होते त्यांना) सांगून प्याद्यांना रस्त्यावर उतरवून दलित समाजाचा अधिकार असलेल्या ॲट्राॅसिटी कायद्याचे हक्क रद्द करण्याची मागणी म्हणजेच शिवरायांच्या राज्यात केलेला जातीयवाद आहे हे विसरू नका. जर या ॲट्राॅसिटी कायद्याचा कोणी गैरवापर करत असेल तर संबंधितांना शिक्षा आणि दंड करण्याची तरतूद जरूर केली पाहिजे कारण जर कोणी या कायद्याचे उल्लंघन करत असेल तर होणाऱ्या शिक्षेस त्याला पात्र राहावे लागेल. ॲट्राॅसिटी रद्द करून सर्व आदीवाशी व दलिंतांवर टांगती तलवार ठेवू नका. शिवाय त्या मराठा अभ्यासकाबरोबर (???) माझी बाचाबाचीही झाली कारण तो म्हणत होता की धनगर समाजाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज अनुसुचित जमातीचे म्हणजेच आदीवाशींचे आरक्षण मागतोय ही त्या बिनडोकने केलेली बिनबुडाची भाषा होती. पुढे तो हे पण म्हणाला की या लढाईमद्ये आदीवाशींच्या बाजूने मराठा समाज ठामपणे उभे राहणार असून धनगर समाजाच्या आरक्षणाला आम्ही विरोध करू. पण मराठा समाजातल्या कोणत्याही नेत्यांना जाऊन विचारा की बाबांनो मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता तेव्हा धनगर समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता आणि आजही मराठा समाजाच्या पाठीशी ठाम आहे. मग आम्ही आमच्या हक्काचे मागतोय जे आम्हाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत दिले आहे. त्या अनुसुचित जमातीच्या सवलतींचा अंमल झाला नाही त्या सवलती आम्हाला लवकरात लवकर लागू केल्या तर धनगर समाजाच्या पुढच्या पीढीवर अन्याय सहन करायची वेळ येणार नाही. आम्हाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळायला पाहिजे म्हणून आम्ही आरक्षण मागतोय यातला विषय नाही. अरे तुम्ही "ख्वाडा" चित्रपट पाहिलाच असेल जातीवरून शिवीगाळ केली किंवा अन्याय केला तर आम्ही काय करू शकतो ते त्या चित्रपटाच्या माध्यमातून शिकून घ्या. एकतर आजपर्यंत मी मराठा समाजाच्या नव्हे तर कोणत्याच समाजाच्या विरोधात बोललो नव्हतो कारण माझा मित्रपरिवार हा मराठा समाजातील सुद्धा आहे त्यामुळे मी लिहलंही नव्हते पण तुमच्याच मराठा समाजातले बिनडोक अभ्यासक मला लिहायला भाग पाडताहेत. पुढे त्या मराठा समाजाचे अभ्यासक मला म्हणतात की धनगर समाजातील नेत्यांना जातीचा फायदा करून घ्यायची सवय आहे म्हणूनच धनगर समाजाच्या नेत्यांना खासदार व मंत्रीपद दिले जाते. मग मराठा समाजाचे अभ्यासक म्हणवून घेणाऱ्या बिनआकलेच्या कांद्यांनो आजपर्यंतचा इतिहास काढून बघा महाराष्ट्र राज्याचे जेवढे मुख्यमंत्री झाले त्यातील एक-दोन सोडले तर सर्वच मराठा समाजाचे होते मग बाकीच्या खात्यात मराठा समाजाचे कीती मंत्री होते याचा आकडा तुम्हीच काढा मग सांगा की महाराष्ट्र राज्यात जातीयवाद कोणी केला?? आज जरी तुमच्या (जातीयवादी) नेत्यांनी घरात बसून शतरंजचा खेळ मांडला असेल तर मांडू द्या कारण आम्ही पण शतरंजच्या खेळात माहीर आहोत. कोण कशी चाल करतोय याची खबर ना खबर आम्हाला असते. कारण जगजेत्या सिकंदराला पराभूत करणाऱ्या आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य , राजा सम्राट अशोक, थोरले मल्हारराव होळकर , राष्ट्रमाता अहिल्याई होळकर, अजिंक्यवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जमातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी आहोत आणि स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या नादाला लागू नका. नाद केला तर बाद करायला आम्हाला वेळ लागणार नाही. आज तुम्ही कोपर्डीच्या प्रकरणाचे निमित्त लावून जरूर एकत्रित या कारण लोकशाहीने तुम्हा-आम्हाला अधिकार दिला आहे पण आमच्या विरोधात जर तुम्ही आमच्या दलित बांधवाचे व धनगर समाजाचे हक्क हिसकावून घेऊ पाहू इच्छित असाल तर माझा एक धनगर समाजबांधव उद्या रस्त्यावर उतरू शकतो हे लक्षात ठेवा.
आजपर्यंत माझा धनगर समाज आणि दलित समाज मराठा समाजातील नेत्यांच्या मागे-पुढे करत होता आजही धनगर समाजाचे नेते मराठा समाजाच्या समाजातील नेत्यांची चमचेगीरी, हुजरेगीरी करत आहेत पण आता इथून पुढे ते शक्य नाही. पण बांधवांनो मराठा समाजातील नेत्यांनी प्यादे रस्त्यावर उतरवून स्वता घरात बसून वजीरांच्या साह्याने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात चाल खेळली, दलित समाजाची ॲट्राॅसिटी काढून घेण्यासाठी चाल खेळली पण ही चाल खेळून त्यांचाच म्हणजेच मराठा समाजातील नेत्यांच्याच पराभव झाला त्यामुळे तुम्ही आम्ही जिंकलो आहोत. पण आता इथून पुढे षंढ बसू नका प्रस्तापित यंत्रणा जातीयवाद करत तुमच्या आमच्या विरोधात आवाज उठवत आहेत मग डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणेच "थंड राहून षंढ बसण्यापेक्षा अन्यायाविरोधात बंड करून गुंड झालेलं बरं" या सल्ल्याप्रमाणे बंड करायला पुढे यावे नाहीतर त्या गोडबोल्या औलादी सुखाने जगू देणार नाहीत. बांधवांनो ज्याप्रमाणे मराठा समाज गट-तट, पक्षभेद, संघटना भेद बाजूला ठेवून एकत्रित येत असेल तर मग तुम्ही-आम्ही सुद्धा पक्षभेद, मनभेद, मतभेद, गट-तट बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात बंड करायला पुढे यावं हीच नम्र विनंती.
टीप:- आम्हाला पण काय काम-धाम नाही म्हणून मराठा-धनगर वाद आम्ही पेटवतोय असे काही नाहीये. तर मराठा समाजातील बिनडोक (अभ्यासक??) लोक जातीयवाद पेटवताहेत आणि  जातीयवादाला चालना देत आहेत. त्यांना अगोदर सुधारा कारण धनगर समाज ही एक आग आहे आग आणि या आगीबरोबर खेळल्यावर भडाकाच होणार आणि उडणार नुसता धुरळाच आणि पडणार ती म्हणजे राख विषय संपला.
जय मल्हार। जय अहिल्या।। जय यशवंत।।
 जय भीम।। जय ज्योती।। जय शिवराय।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com