Thursday, 18 January 2018

कोण आहेत SC/ST/OBC आणि का आहे त्याना प्रतिनिधित्व.

अत्यंत महत्वाची माहिती......
माहित करुन घ्या आणि हो , आपल्याला योग्य वाटली तरच , शक्य तितकी शेअर करा....
(अ) एस् सी.- SC (scedulde caste अर्थात अनुसुचित जाती)
निकष
......
१)सामाजिक दृष्ट्या मागास
२)शैक्षणिक द्रृस्टया मागास
३)आर्थिक दृष्ट्या मागास
४)ज्यांचा स्पर्श पुर्वि विटाळ मानला जात होता यांचा एक प्रवर्ग बनविण्यात आला आणि त्यांना SC संबोधीत केले गेले .
(ब) ST (scedulde Tribes)
अर्थात आनुसुचीत जमाती
निकष
....
१)सामाजिक दृष्ट्या मागास
२)शैक्षणिक दृष्ट्या मागास
३)आर्थिक दृष्ट्या मागास
४) ज्यांच्या मधे भटकंती चे गुण दिसतात आणि भटकंतीचे जीने जगावे लागते. यांचा एक प्रवर्ग बनविण्यात आला आणि त्यांना ST संबोधीत केले गेले .
बाबासाहेबांनी SC , ST बांधंवांना काय दिले ? जनावराचे जीने सोडून माणसाचे जीवन आणि स्वाभिमानाने जगण्याचा आधिकार.......
ज्यांच्या बापजाद्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की आमच्या येणार्या पिढ्यांमधे कोणी IAS,IPS ,IRS,IFS डाँक्टर, इंजिनियर , प्राध्यापक होईल , त्यांच्या स्वप्नाच्याही पलीकडे त्यांना बाबासाहेब देउन गेलेत....
(क) ओबीसी - OBC - (Other Backward Class )
इतर मागासवर्ग
निकष
......
१)सामाजिक दृष्ट्या मागास
२)शैक्षणिक दृष्ट्या मागास
३)आर्थिक दृष्ट्या मागास
४)ज्यांचा स्पर्श विटाळ मानला जात नव्हता
....
यांचा एक प्रवर्ग बनविण्यात आला आणि त्यांना OBC संबोधीत केले गेले .
OBC बांधवांचा स्पर्श विटाळ का मानला जात नव्हता ?
कारण मनुस्मृती ही भारताची संविधाना पुर्वीची घटना होती. आणि मनुस्मृती नुसार OBC शुद्र होते. ब्राम्हणांची सेवा करण्यासाठी त्यांना बिनपगारी चाकरांची आवश्यकता होती.
आणि सेवा करवुन घेण्यासाठी OBC बांधवांचा स्पर्श होणे अटळ होते. म्हणून OBC बांधवांकडून सेवा करून घेण्यासाठी स्पर्श न करण्याची आटकळ ठेवली नाही..
म्हणजे ब्राम्हणाला आरामदायी बसण्यासाठी खुर्ची पलंग सुतार बांधवांनी तयार करून द्यायची
.....
न्हावी बांधवांनी ब्राम्हणांची हजामत करून द्यायची
.....
कुणबी मराठा बांधवांनी शेतमाल आणि धान्य पिकवुन द्यायचे....
माळी बांधवांनी भाजीपाला पिकवुन द्यायचा..
आणि
हे सर्व ब्राम्हणांसाठी विनामोबदला केले जायचे.
कारण ही सेवा होती.
आणि सेवा केलेल्या गोष्टीचा मोबदला मागायचा नसतो.
ओबीसी बांधवांचा गैरसमज --
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केले ??
उत्तर-- मनुस्मृती ने ओबीसी बांधवांना शिक्षण घेण्यास मनाई केली होती
...
बाबासाहेबांनी संविधानामधे
(भारतीय राज्य घटनेत) शिक्षण घेण्याचा आधिकार दिला....
मनुस्मृतीच्या कायद्यानुसार मुलाला वडीलांचा पिढीजात व्यवसाय करावा लागत होता...
म्हणजे .....
कुणब्याचा मुलगा कुणबी...
सुताराचा मुलगा सुतार
....
न्हाव्याचा मुलगा न्हावी...
कुंभाराचा मुलगा कुंभारच व्हायचा..
आता ओबीसी बांधवांची मुले डाॅ. बाबासाहेबांनी दिलेल्या (संविधानिक ) घटनेच्या आधिकांमुळे IAS, IPS , IRS, IFS डाॅक्टर, इंजिनियर , प्राध्यापक बनु शकले..... .
मराठा बांधवांचा नेहमीचा प्रश्न --
आम्ही हुशार होतो मार्क्स पाडले म्हणून शिकलो ....
?
उत्तर ......
अरे राजा, तु हुशार होतास हे मान्य आहे. पण तूला तुझी हुशारी दाखवण्याची "संधी" कोणी दिली ?
तुझे आजोबा, पंजोबा सुद्धा हुशारच होते. पण तरीही ते IAS, IPS , IRS, IFS डाॅक्टर, इंजिनियर , प्राध्यापक बनु शकले नाहीत. कारण त्यांना हुशारी दाखवायची संधीच मिळाली नाही...
तुझ्या घराण्यात काय तुच एकटा आधिकारी होण्यासाठी लायक होतास आणि तुझे आजोबा पंजोबा काय नालायक होते काय ?
बहुजन लोक जेव्हा तुलना करतील की आमच्या पुर्वजांचे जीवन उकीरड्यावरच्या जनावरासारखे होते, मग आमचे जीवन सोन्यासारखे कसे झाले ?
तेंव्हा लोक खरा इतिहास वाचतील आणि त्यांना समजेल की हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरामुळे शक्य झालय...!!!!
-बोलका मूकनायक

Tuesday, 2 January 2018

शौर्य त्यांच्या रक्तातच नाही ..........

शौर्य त्यांच्या रक्तातच नाही ..........
आज तुम्ही साबीत केलं की तुम्ही गांडूची औलाद आहात. निशस्त्र जमावावर लपून दगडफेक करणं गाड्यांची जाळपोळ करणे हा तुमचा पराक्रम वाटत असेल तर तुम्ही वंश परंपरा अबाधित ठेवली ,तुम्ही खरंच शोभताय त्या 28000 चे वंशज .तोच द्वेष तुमच्यात अजून जिवंत आहे तोच निचपणा ,जातीवाद कपट कारस्थान 200 वर्ष झाली पण प्रवृत्ती तशीच राहिली तुम्ही भेकडच राहिलात साली, हा देश इतक्या सत्ताधाऱ्यांचा गुलाम का होता हे तुमच्या प्रवृत्तीत लपलय .जगाच्या मंचावर जाऊन एकीच नाटक मांडायचं आणि देशात अराजकता माजवयाची जातीच्या नावाने ,धर्माच्या नावाने,प्रांताच्या नावाने . खाण्यापिण्याच्या नावाखाली दंगली घडवता मानस मारता .गुराढोरांना मायबहिनी मानता आणि मानस कोंबड्या बकऱ्यावाणी कापता .
साधं अभिवादन करायला गेलेल्या लोकांवर दगडफेक कशासाठी? कोणाशी त्यांनी युद्ध पुकारलं होत ,पोटशूळ किती दिवस घेऊन बसणार शौर्य तुमच्यात नाही हे तुम्ही 200 वर्षांपूर्वी सिद्ध केलात आज शिक्कामोर्तब झालं की ,तेच रक्त घेऊन जन्माला आलात .सरकार आणि मीडिया बद्दल आता बोलायलाही लाज वाटते ,दंगल घडवून आणली कोणी हे सिद्ध करण्यास दुबळ्या गृहमंत्र्याची कसोटी लागेल
कारण या देशात आमच्या विरोधात गिधाडांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असतात.कचखाऊ यंत्रणेने हे खूप वेळा सिद्ध केले आहे ,भारत माणसाचा नाही जातीचा ,धर्माचा देश आहे.
या जातीयवादी हल्ल्याचा जाहीर निषेध!!!!!!शौर्य त्यांच्या रक्तातच नाही ..........
आज तुम्ही साबीत केलं की तुम्ही गांडूची औलाद आहात. निशस्त्र जमावावर लपून दगडफेक करणं गाड्यांची जाळपोळ करणे हा तुमचा पराक्रम वाटत असेल तर तुम्ही वंश परंपरा अबाधित ठेवली ,तुम्ही खरंच शोभताय त्या 28000 चे वंशज .तोच द्वेष तुमच्यात अजून जिवंत आहे तोच निचपणा ,जातीवाद कपट कारस्थान 200 वर्ष झाली पण प्रवृत्ती तशीच राहिली तुम्ही भेकडच राहिलात साली, हा देश इतक्या सत्ताधाऱ्यांचा गुलाम का होता हे तुमच्या प्रवृत्तीत लपलय .जगाच्या मंचावर जाऊन एकीच नाटक मांडायचं आणि देशात अराजकता माजवयाची जातीच्या नावाने ,धर्माच्या नावाने,प्रांताच्या नावाने . खाण्यापिण्याच्या नावाखाली दंगली घडवता मानस मारता .गुराढोरांना मायबहिनी मानता आणि मानस कोंबड्या बकऱ्यावाणी कापता .
साधं अभिवादन करायला गेलेल्या लोकांवर दगडफेक कशासाठी? कोणाशी त्यांनी युद्ध पुकारलं होत ,पोटशूळ किती दिवस घेऊन बसणार शौर्य तुमच्यात नाही हे तुम्ही 200 वर्षांपूर्वी सिद्ध केलात आज शिक्कामोर्तब झालं की ,तेच रक्त घेऊन जन्माला आलात .सरकार आणि मीडिया बद्दल आता बोलायलाही लाज वाटते ,दंगल घडवून आणली कोणी हे सिद्ध करण्यास दुबळ्या गृहमंत्र्याची कसोटी लागेल
कारण या देशात आमच्या विरोधात गिधाडांच्या झुंडीच्या झुंडी उभ्या असतात.कचखाऊ यंत्रणेने हे खूप वेळा सिद्ध केले आहे ,भारत माणसाचा नाही जातीचा ,धर्माचा देश आहे.
या जातीयवादी हल्ल्याचा जाहीर निषेध!!!!!!

Wednesday, 6 December 2017

एका महानायकाच्या निर्वाणापूर्वीचे पाच दिवस... ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले.

एका महानायकाच्या निर्वाणापूर्वीचे
पाच दिवस...
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ
शांत झाले. भारतीय राजकारणातील
आयुष्यभर उन्हात उभे राहून
तमाम
दलितांना मायेची सावली देणारी कोट्यवधी दलितांची माऊली पोरके
करून निघून गेली. पण
जाताना भारताला राज्यघटना आणि अशोकचक्राची देणगी देऊन
गेली. धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊन
गेली. आयुष्यभर संघर्ष
करून मिळवून दिलेल्या अधिकाराचे जतन
करण्यासाठी रिपब्लिकन
पक्षाची मांडणी करून गेली. ‘बुद्ध
आणि त्यांचा धम्म’
या ऐतिहासिक ग्रंथाला पूर्णत्व देऊनच
आपल्या ऐहिक
जीवनाची समाप्ती केली. गुरुवार, दि. ६
डिसेंबर १९५६
रोजी सकाळी सहा वाजता एक पाय
उशीवर, डोक्याजवळ
हस्तलिखित कागद काही महत्त्वपूर्ण
ग्रंथ,चष्मा एक इंजेक्शन
सिरिज, एक औषधाची बाटली या अवस्थेत
माईसाहेबांनी बाबासाहेबांना पाहिले.
निद्रावस्थेत बाबांचे देहावसान
झाले होते. हे कळल्यावर सात
कोटी दलितांच्या अनभिषिक्त
राजाच्या अंतिम क्षणी कुणीही नसावे
असे म्हणून जगजीवनराम
बाबासाहेबांचे पाय धरून
ओक्साबोक्सी रडले. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या शेवटच्या पाच
दिवसांचा प्रवास अतिशय व्यस्त
आणि भावनिक होता.
शेवटचे पाच दिवस- १ डिसेंबर १९५६
रोजी बाबासाहेबांनी दिल्लीतील
मथुरा रोडवरील बुद्धिष्ट आर्ट एक्झिबिशन
पाहिले त्यातील विविध
देशांतील बुद्धाचे पुतळे पाहिले, त्यानंतर परत
निघताना कॅनाट प्लेस
रोडवरील बुक डेपोत जाऊन ७ पुस्तके विकत
घेतले व
रात्री उशिरापर्यंत हेच पुस्तके चाळीत
राहिले. २ डिसेंबर १९५६
रोजी दिवसभर त्यांनी ‘बुद्ध
आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे लेखन
केले. त्यामुळे दुपारचे जेवण उशिराच घेतले.
संध्याकाळी दलाई
लामांच्या सत्कार कार्यक्रमात उपस्थित
राहिले.
यावेळी त्यांनी भारतात बुद्ध
धम्माचा प्रचार-प्रसार
कसा करता येईल याची चर्चा केली,
रात्री परत ग्रंथाचे लेखन केले.
यावेळीच ते नानकचंद रत्तुना म्हणाले की,
पुस्तके माझ्या हयातीत
प्रकाशित होतील काय? बौद्ध
धम्माचा भारतभर मी प्रचार करू शकेन
काय? त्यावर नानकचंद रत्तू ‘हाँ साहब’
एवढेच म्हणाले. पण
बाबासाहेब आज थोडे थकलेले होते म्हणून
रात्री १०.३० वाजताच
झोपले. ३ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब
आंबेडकरांनी १६ डिसेंबर
रोजी व मुंबईत बौद्ध धम्मदीक्षा समारंभ
कार्यक्रम आखला तसे
मुंबईच्या कार्यकत्र्यांना कळविले. नानकचंद
रत्तूना रेल्वेची फस्ट
क्लासची चार तिकिटे बुक करण्यास
सांगितली. पण तिकिटे बुक
झाली नाहीत तेव्हा बाबासाहेबांनी १४
डिसेंबरची विमानांची तिकिटे
बुक केली. १४ ते १८ डिसेंबरपर्यंत बाबासाहेब
मुंबईत कुमारसेन
समर्थ यांच्याकडे थांबणार होते. ४ डिसेंबर
१९५६
रोजी रात्रीच्या जागरणामुळे
बाबासाहेब उशिरा उठले. पण खूपच
थकलेले वाटत होते.११ वाजता जैन धर्मीय
अधिवेशनासंबंधी चर्चा केली. त्यानंतर
त्यांनी रिपब्लिकन
पक्षाच्या अनुषंगाने थोर समाजवादी नेते
एस.एम.जोशी व
प्र.के.अत्रे यांना पत्र
लिहिली त्याचप्रमाणे भारतात बौद्ध
धम्माचा प्रसार
करण्यासाठी आर्थिकसाह्य मिळावे म्हणून
ब्रह्मदेशाच्या सरकारला एक पत्र लिहिले.
५ डिसेंबर १९५६
रोजी बाबासाहेब मुंबईत
होणारा धर्मांतर सोहळा, भारतात
धर्माचा प्रचार या चिंतेत होते. दिवसभर
उर्वरित ग्रंथाचे लेखन केले
हे ग्रंथ आपल्या हयातीत प्रकाशित व्हावेत,
अशी त्यांची तळमळ
होती. रात्री त्यांना अस्वस्थ वाटत होते.
अशा अवस्थेतही बुद्ध
आणि धम्म ग्रंथाची प्रस्तावना लिहिली.
अत्रे,
जोशी यांना लिहिलेली पत्रे
डोळ्यांखालून घातली. झोपेचे इंजेक्शन
घेऊन झोप येत नव्हती. हे सारे जवळून नानकचंद
पाहात होते.
या अनुषंगाने ते म्हणतात
मला बाबासाहेबांचा चेहरा थकलेला दिसत
होता.
अशा अवस्थेतही त्यांनी मुंबईच्या तिकिटाची कार्यक्रमाची चौकशी केली.
तेवढ्यात स्वयंपाकी सुदाम
बाबांनी जेवणास बोलावले. डायनिंग
हॉलचा मार्ग ड्रार्इंग रूममधूनच होता.
या हॉलच्या दोन्ही बाजूंनी ग्रंथाची खचून
भरलेली कपाटे होती ते
पाहातच बाबासाहेब डायनिंग हॉलकडे गेले.
इच्छा नसतानाही दोन
खास खाल्ले. ड्रार्इंग हॉलमध्ये आल्यानंतर
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर डोळे मिटून थोडा वेळ स्तब्ध झाले.
एक दीर्घश्वास
सोडला त्यांनी त्रिशरण म्हटले त्यानंतर
नानकचंदकडून मालिश करून
घेतली. मसाज झाल्यानंतर
काठीच्या आधाराने उठले व उठतानाच
‘चल उचल कबिरा तेच भवसागर डेरा’ असे
म्हणाले नानकचंदाना बुद्ध
गीताची रेकॉर्ड लावण्यास सांगितली.
त्यांना चिंता होती.
दलितांच्या भविष्याची, रात्री ११.१५
वा. नानकचंद रत्तू
घरी जाण्यास निघाले पण परत
बाबासाहेबांनी बोलावून घेतले
त्यांनी लिहिलेली पत्र जवळ ठेवण्यास
सांगितले. ११.३५ वा.
नानकचंदांनी बाबासाहेबांची परवानगी घेतली,
रत्तूनी बाबासाहेबांचे
जवळून शेवटचे दर्शन घेतले. अखेरचा प्रवास ६
डिसेंबर १९५६
रोजी सकाळीच बाबासाहेब निघून
गेल्याची बातमी स्वयंपाकी सुदामबाबांनी दिली.
नानकचंदांनी दिल्लीच्या प्रसारमाध्यमांन
ा ही बातमी दिली. ११.५५
वा. मुंबईच्या पी.ई
सोसायटीच्या ऑफिसमध्ये फोन
केला घनशाम
तळवटकर यांना प्रथम बातमी दिली.
त्यानंतर औरंगाबादला फोन
करून बळवंतराव वराळे यांना ही दुःखद
बातमी सांगितली. त्यानंतर
वा-यासारखी ही बातमी सर्वत्र
पसरली.
दिल्लीच्या निवासस्थानी तत्कालीन
पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू
इतर मंत्री यांनी भेट
दिली.सायंकाळी ४.३० वा.
बाबासाहेबांचा पार्थिव देह ट्रकने
दिल्ली विमानतळावर आणला.
बाबासाहेबांच्या अंतिम
प्रवासाची सुरुवात झाली. रात्री ९.००
वा. हे
विमान नागपूरला उतरण्यात आले.
ज्या ठिकणी दीक्षा समारंभ
झाला, त्या ठिकाणी त्यांचा देह अंतिम
दर्शनासाठी ९ ते १२
वा.पर्यंत ठेवण्यात आला.१२ वा. हे विमान
नागपूरहून निघाले व
रात्री १.५० वा. मुंबईच्या सांताक्रुझ
विमानतळावर पोहोचले.
त्या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय
जमलेला होता. त्या ठिकाणाहून
बाबासाहेबांना राजगृहावर आणण्यात
आले. त्या ठिकाणी प्रचंड
आक्रोश सुरू होता. अन्त्यसंस्काराल
ा जागा दिला नाही बाबासाहेबांच्या
अंतिम संस्काराची व्यवस्था सुरू
करण्याची वेळ येऊन ठेपली. हिंदू
कॉलनीच्या हिंदू स्मशानभूमीत
अन्त्यसंस्कार करू न देण्याची हळूच
चर्चा सवर्णात
असल्याची जाणीव झाली.
तेव्हा कार्यकर्ते अस्वस्थ झाले पण
त्यांनी निर्णय घेतला. मी हिंदू म्हणून
मरणार नाही.
अशी प्रतिज्ञा करणा-
या बाबासाहेबांचा अंतिम संस्कार
हिंदूच्या स्मशानभूमीत कशाला? व प्रचंड
गर्दी लक्षात
घेता त्यांचा अंतिम संस्कार
शिवाजी पार्कवर करण्यावर एकमत
झाले. पण तत्कालीन म्युनिसिपल कमिशनर
पी. आर. नायक
यांनी विरोध केला व
परवानगी नाकारली. त्यानंतर सध्या मुंबईत
असलेल्या आंबेडकर महाविद्यालयाच्य
ा ठिकाणी मोकळे मैदान होते
तेथे अन्त्यसंस्कार करण्याचे ठरले. पण
ती जागादेण्यासा ठी काँग्रेसने विरोध
केला तेव्हा बाबासाहेबांच्या
जवळचे कार्यकर्ते सी. के. बोले
यांच्या मालकीची जमीन होती.
त्या जमिनीवर अन्त्यसंस्कार करण्यास
सांगितले व
त्या ठिकाणी बौद्ध धम्म विधिनुसार
भिक्खू एच धर्मानंद
यांच्या उपस्थितीत भदन्त आनंद कौशल्य
यांच्या हस्ते
हा अन्त्यसंस्कार पार पडला...जय भीम

Wednesday, 1 November 2017

राज्यातील नवबौध्द समुदायास बौद्ध समाजाप्रमाणे अल्पसंख्याक विकास विभागाच्या सर्व सुविधा / योजनांचा लाभ अनुज्ञेय असल्याबाबत.

राज्यातील नवबौध्द समुदायास बौद्ध समाजाप्रमाणे अल्पसंख्याक विकास विभागाच्या सर्व सुविधा / योजनांचा लाभ अनुज्ञेय असल्याबाबत.

official link
https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

सांकेतांक क्रमांक :: 201709281611349814


GR download link

Wednesday, 18 October 2017

*"जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे - बाबासाहेब"*

*"जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे- बाबासाहेब"*
प्रथमतः अस्पृश्य समाजात मोडणाऱ्या महार, चांभार, भंगी, मातंग वगैरे ज्या जाती आहेत त्यात एकी नाही हे आपण सर्वांचे दुर्दैव होय. ही एकी नसण्याचे खरे कारण म्हणजे
हिंदुसमाजातील जातीभेद हेच आहे. ह्या जातिभेदाला महार, मांग, चांभार किंवा भंगी हे जबाबदार नाहीत. जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे हा आपल्याकडे वाहत येणारा नरक आहे आणि त्यामुळे जातीभेदाची कटू फळे व त्याचा दुष्परिणाम आपल्याला सोसावा लागत आहे आणि खेदाची गोष्ट हि कि, हे हिंदुलोक जातीभेद तर दूर करीत नाहीतच उलट अस्पृश्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचा जातीभेद दृढ करावयास झटतात.. मातंगांना हाती धरून महाराविरुद्ध उठवावयाचे.. चांभारांना हाती धरून त्यांना महार-मांगाविरुद्ध उठवावयायचे व भेद्निती आमच्यात पसरावयाची आणि आपली एकी होऊ द्यावयाची नाही मात्र
या जातीभेदाची मूळ जबाबदारी जरी हिंदूसमाजावर असली तरी आपण आपली जबाबदारी विसरणे आत्मघाती ठरेल.. आपल्यातील जातीभेद नाहीसे करणे व आपल्यात भेद्नितीचा फैलाव न होऊ देणे हे आपले आद्यकर्तव्य आहे आणि आपण हे साधल्याशिवाय आपला उत्कर्ष कधी होणार नाही. महार-मांगातील-चांभारामधील रोटिबंदी , बेटीबंदी अजिबात नष्ट झाली पाहिजे.. प्रत्येक जात जर आपली शेखी मिरविण्याकरिता आपल्या जातीसच चिकटून राहील.. महार महारच राहील व मांग मांगच.. चांभार..भंगी च राहील तर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार आपण करू शकणार नाही. "महार किंवा मांग.. चांभार या नावात असे काय आहे कि त्यात तुम्हांला अभिमान वाटावा?? या नावाने असा कोणता उज्वल इतिहास तुमच्या डोळ्यासमोर राहतो कि जुनी परंपरा चालू ठेवण्यास तुम्ही झटावे?" सर्व समाज या नावांना तुच्छ लेखित आहे तुम्हांला आज उकिरड्यावरील कचऱ्याची देखील किंमत नाही तेव्हा या नावाचा अभिमान न बाळगता आपले दोनही समाज एका वरवंटयाखाली चिरडले जात आहेत, हे जाणले पाहिजे दोघांनी एकजुटीने राहिले पाहिजे.. आपल्याला गरीब जनतेचे म्हणजे आपले स्वतःचे जिणे सुखाचे करावायचे आहे म्हणून आपण आपलीच शक्ती वाढविली पाहिजे आहे !!
विचार- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ- पंढरपूर कुर्डूवाडी येथील बाबासाहेबांचे भाषण ३१-१२-१९३७

एससी, एसटी च्या निधीवर मुख्यमंत्र्यांचा दरोडा