Thursday, 3 January 2019

🌺 तयास मानव म्हणावे का? 🌺

🌺 तयास मानव म्हणावे का? 🌺

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेचि गोडी नाही
बुध्दी असूनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का? ॥१॥

दे रे हरी पंलगी काही
पशूही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का? ॥२॥

पोरे घरात कमी नाहीत
त्यांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का? ॥३॥

सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का? ॥४॥

जोतिष रम सामुद्रिक हो
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का? ॥५॥

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का? ॥६॥

संसारी दारिद्रय राही
पांघरून तयावर नाही
निंदिती सगळे लोकही 
तयास मानव म्हणावे का? ॥७॥

लिहिणे वाचणेही नाही
उपदेश पटायचा नाही
पशूंना कळे ते न कळेही
तयास मानव म्हणावे का? ॥८॥

पशुत्वाची लज्जा नाही
त्यालाच मानीतो सुखही
पशुजीवाची लक्षणे ही
तयास मानव म्हणावे का? ॥९॥

दुसऱ्यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सद्गुण नाही
तयास मानव म्हणावे का? ॥१०॥

गुलामगिरीचे दुःख नाही
जराही त्यास जाणवत नाही
माणुसकीही समजत नाही
तयास मानव म्हणावे का? ॥११॥

पशुपक्षी माकड माणूसही
जन्ममृत्यू सर्वांनाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का? ॥१२॥


सावित्रीबाई फुले
समग्र वाङमय

सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏💐☺📚📖✍

Wednesday, 2 January 2019

शौर्य दिन २०१९ :

शौर्य दिन २०१९ :

              नजर जाईल तिथपर्यंत निळे झेंडे, नजर जाईल तिथपर्यंत भीम सैनिक. पोलिस प्रशासन आणि पालिका प्रशासनाची दमछाक करणारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी.
याचं सगळं श्रेय जातं किडे भुर्जी आणि त्यांच्या दगडी गँगला. धन्यवाद भुर्जी तुमच्यामुळे हा शौर्य दिन भारताच्या कानाकोपऱ्यातच नाहीतर परदेशात पोहचला. तुम्हाला काय वाटलं दोन चार शेंबडी पोरं घेऊन दोन चार खडे मारले तर हे लोक भिऊन पळून जातील आणि परत इकडे येणार नाहीत, तुम्ही जेवढा जोर लावून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला त्याच्या दुप्पट ताकतीने आम्ही पुढे आलो. आणि यापुढेही येत राहू.
               गेल्या वर्षी पर्यंत आमच्यापैकी ही बऱ्याच लोकांना भीमाकोरेगाव बद्दल माहिती नव्हती. आता सर्वच समाजातल्या चील्या पिल्याला माहिती झालीय. त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला.
पुण्यापासून कोरेगाव पर्यंत, तिकडे तळेगाव पासून शिक्रापूर, कोरेगाव पर्यंत सर्वच रस्त्याने गावागावात, चौकाचौकात पोलिसांच्या तुकड्या, जीप उभ्या होत्या. कोणी पळताना दिसलं तरी पोलिस सावध होत होते. त्याला थांबवत होते नि पळू नको म्हणून सांगत होते. दोन्ही मार्गाने येणारे रस्ते ५-७ किलोमीटर मागेच अडवले होते. प्रत्येकाने आपापल्या गाड्या तिथे पार्क करून तिथून पुढे बस ने जायची सोय केली होती. मिनिटागनिक बसेस फिरत होत्या तरी देखील गर्दी संपत नव्हती. वढू गावाहून येणाऱ्या लोकांची मात्र गैरसोय झाली. त्यांना वढू गावातच गाडी थांबवून पुढे चालत यावं लागत होतं. नंतर संध्याकाळी उशिरा तिकडे पण बस सुरू केल्याचं कळलं. अगदी सकाळी १० वाजता कोरेगावहून परत घरी जाणारे लोक भेटत होते तर संध्याकाळी ६ वाजता ही कोरेगाव कडे येणारे लोक दिसत होते. कोरेगावकरांनी यापूर्वी अशी गर्दी कधीच पहिली नसावी ना भूतो ना भविष्य. म्हणुन त्यांनी नेहमीप्रमाणे कडकडीत बंद पाळला होता. कोरेगाव पासून शिक्रापूर पर्यंत सर्वच दुकानं जवळपास बंद होती. कुठे एखादं दुसरं चालू होतं.
                  पोलिस प्रशासन आणि पालिका प्रशासनाने व्यवस्थापन चोख करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. काही अंशी यशस्वी ही झाला. सर्वच गाड्या स्तंभ परिसरात नेऊ दिल्या असत्या तर आजपर्यंत ट्रॅफिक क्लिअर झालं नसतं. सगळेच जण अडकून पडले असते. जिवाचं रान करून पोलिस आणि समता सैनिक दलाचे जवान झटत होते. धुळीत, फुफाट्यात तसेच उभे होते. काहींनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यांना पाहून वाटलं की त्यांना मास्क आणून द्यावे पण अशी काहीच तयारी केली नव्हती त्यामुळे ते शक्य झालं नाही. समता सैनिक दलाचे जवळपास दोन हजरांहून जास्त जवान होते. टॉयलेट, ॲम्बुलंस, फायर ब्रिगेड, प्रथोपचार, सीसीटिव्ही कॅमेरे, ड्रोन, पाण्याचे टँकर इत्यादी सुविधा मला पहिल्यांदाच दिसल्या. ४-५ न्युज चॅनल च्या गाड्या होत्या. न्युजवाले लाईव्ह दाखवत होते. दोन - तीन ठिकाणी मोफत अन्नवाटप देखील होते. स्तंभाच्या पाठीमागे पूजा सकट आणि धर्मा डांबळे यांच्या स्मरणार्थ अन्न छत्र उभारले होते. तर रोडवर एक दोन ठिकाणी वडापाव व चहाचे स्टॉल पण दिसले.
                 तसेच आपल्या लोकांनी भीमा कोरेगावला येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी जमेल तिथे पाण्याचे आणि अन्न वाटपाचे स्टॉल मांडले होते. तळेगाव मधे एका ठिकाणी मोफत अन्न वाटपाचा स्टॉल होता तर चाकण मधे पाण्याचे स्टॉल होते. गेल्या वर्षी झालेली गैरसोय लक्षात घेता यावर्षी सर्वांनी आपापल्या परीने जमेल तशी मदत लोकांना देवू केली.
स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी होती. तरी फक्त एक भारतीय बौद्ध महासभेचा मंडप होता. आद. बाळासाहेब सकाळीच येऊन गेले होते. दुपारी ज. वी. पवार, भीमराव आंबेडकर व आनंदराजजी यांची भाषणे सुरू होती. दुपारी उशिरा चंद्रशेखर आझाद ही मानवंदना देण्यासाठी आले. नंतर महार रेजिमेंट चे जवान ही मानवंदना देण्यासाठी आले असं स्पीकर वर ऐकायला मिळालं. प्रशासनाने बांधलेल्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त गर्दी होती त्यामुळे त्यांची पुरती दमछाक झाली. शिवाय दरवर्षी प्रमाणे दुपारी संध्याकाळी निवांत जाऊ असा अंदाज बांधणाऱ्याचाही अंदाज चुकला दिवसाच्या उत्तरार्धात गर्दी जास्त वाढली. नेहमी पेक्षा पुस्तकांचे आणि इतर बाबासाहबांचे फोटो प्रतिमांचे स्टॉल ही जास्त होते. चैत्यभूमी प्रमाणे इथेही बार्टीेचा स्टॉल होता. बार्टीेने १५% दराने संविधान, बाबासाहबांचे चरीत्र बारा खंड आणि इतर महत्त्वाची पुस्तके उपलब्ध करून दिली. भरपूर लोकांनी याचा लाभ घेतला.
                   एकंदर विरोधकांच्या आणि जातीवाद्यांच्या बुडाला जास्त आग लावून कालचा शौर्यदिन पार पडला. अपेक्षा फक्त एवढीच की ही गर्दी निवडणुकीच्या वेळेला दिसावी. आंबेडकरवाद्यांनी प्रत्येक ऐतिहासिक घटनेचा इव्हेंट केलाय. शौर्यदिन, महाडचा सत्याग्रह दिन, आंबेडकर जयंती, नाशिकचा सत्याग्रह दिन, धर्मांतर दिन, महापरिनिर्वाण दिन, देहूरोडचा विहार स्थापन दिन इतर कोणताच समाज एका वर्षात इतक्या वेळा एकत्र येत नसेल तितक्या वेळा आपण येतो. पण याचा फायदा खुप कमी करून घेतो. ही सगळी शक्ती - एकी मतपेटीतून दिसली पाहिजे. १९५६ साली संसदेत काँग्रेस नंतर सर्वात जास्त लोकसंख्या शेडूल्ड कास्ट फेडरेशनची होती, त्यावेळची काँगेसची सर्वात मोठी विरोधी शक्ती होती. संसदेत आज आपले किती सदस्य आहेत.? याचा प्रत्येकाने विचार करावा.
२०१९ सुरू झाला आहे.

जयभीम 🙏

Bhima Koregaon ला येण्याचे Jitendra Awhad यांनी केले लोकांना आव्हान !

Bhima Koregaon ला येण्याचे Jitendra Awhad यांनी केले लोकांना आव्हान !

कोरेगाव भीमा | विजयस्तंभ परिसरात निळाई अवतरली! राज्यासह देशभरातून भीम बांधव धडकले -TV9

कोरेगाव भीमा | विजयस्तंभ परिसरात निळाई अवतरली! राज्यासह देशभरातून भीम बांधव धडकले -TV9

Tuesday, 1 January 2019

कोरेगाव भीमा LIVE | विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी-TV9

कोरेगाव भीमा LIVE | विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी-TV9

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना आपले रक्त आटवून, आपले आरोग्य पणास लावून रात्रंदिवस काम करावे लागले.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना आपले रक्त आटवून, आपले आरोग्य पणास लावून रात्रंदिवस काम करावे लागले. संविधान सभेचा बारा खंडात प्रसिध्द झालेला वृत्तांत त्यांच्या विद्वत्तेची, परिश्रमाची, जिद्दीची आणि अपरिमित ज्ञानाची साक्ष देण्यास पुरेसा आहे.
        अनेकदा संसदेच्या सेंट्रल हाॅलमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा स्टेनोटायपिस्ट आणि कुत्रा एवढे तीनच जीव दिसून येत. अठरा-वीस तास दररोज काम करुन त्यांनी घटना पूर्ण केली. आपल्या कार्यपूर्तीला साकार रुप देत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी 'जैसेफ स्टोरीचे' विचार उद्धृत करीत म्हटले, "उत्कृष्ट, प्रतिभाशाली आणि निष्ठावंत शिल्पकारांनी इमारत बांधून उभी केली आहे. हिचा पाया मजबूत आहे. हिचे विभाग सुंदर आणि लाभकारी आहेत. यात केलेल्या सोयी बुध्दिमत्ता आणि व्यवस्थेच्या सूचक आहेत. हिची किलेबंदी इतकी सबल आहे की, बाहेरून कुणीही आत शिरु शकत नाही. ही कायम स्वरूपात उभी राहावी म्हणून उभारली आहे. मानवी कार्याबद्दल असे म्हणणे अयोग्य ठरत नसेल, तर आपल्याच रक्षकांच्या अर्थात जनतेचा मूर्खपणा, भ्रष्टाचार आणि उपेक्षेमुळे ही केवळ तासाभरात उद्ध्वस्त होऊ शकते. मी अशी शिफारस करतो की, आपण या शब्दांवर विचार करावा. नागरिकांचे सदाचार, हे जनभावना आणि बुध्दिमत्तेतून उत्पन्न होतात. गणराज्यांचे पतन तेव्हा अटळ होते, जेव्हा बुध्दिमंतांना जनसभांमधून घालवून दिले जाते. कारण ते धैर्याने सत्य प्रकट करतात आणि भ्रष्टाचाऱ्यांना सन्मानित केले जाते; कारण ते लोकांना फसवता यावे म्हणून लोकांची हांजी हांजी करीत असतात.

समाजाच्या कल्याणासाठी केवळ चणेफुटाणे खाऊन कार्य करणारे बाबासाहेबांच्या सारखे नेते जगाच्या पाठीवर कोणी असतील काय?

बाबासाहेब स्वतःपेक्षा दुसऱ्याचीच काळजी करीत होते. दुसऱ्यांच्या मनाला जपत होते. ही जाणीव सात्विकवृत्तीच्या मनुष्यातच असते. अशी व्यक्ती स्वतः झिजते आणि दुसऱ्यांना आनंद देते. डाॅ.बाबासाहेबांचा बराच काळ जरी पाश्चात्त्य देशात गेला होता, तरी त्यांनी आपल्या समाजाच्या
परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला होता व परिस्थितीला अनुसरून वागण्याची त्यांनी आपल्याला सवय लावून घेतली होती. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांच्यासह सर्व सत्याग्रहींनी केवळ चणेफुटाणे खाऊन ती रात्र घालविली. समाजाच्या कल्याणासाठी केवळ चणेफुटाणे खाऊन कार्य करणारे बाबासाहेबांच्या सारखे नेते जगाच्या पाठीवर कोणी असतील काय?