Thursday, 23 June 2016

🔻नारायणाचा बाप कोण🔻

🔻नारायणाचा बाप कोण🔻

सत्यनारायणाच्या भंकस कथा बंद झाल्या पाहिजेत, अशी जळजळीत टीका अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ११ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली.

आणि या सत्यनारायणाचा बाप कोण
याची चर्चा सुरु झाली...?

यावर अरुण जावळे यांनी २२
मार्च २०१३ च्या लोकप्रभा साप्ताहीकात लिहीलेला 'सत्यनारायण कुठून आला?' हा लेख.


सत्यनारायणाची पूजा अगदी अलीकडची आहे. सुमारे
दोनशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये सत्येन पीर हा मुस्लिम दर्गा होता. या पिराची पूजा-उरूस दरवर्षी होत असे. त्याला प्रारंभी फक्त मुसलमान जमत. नंतर
ब्राह्मणही जाऊ लागले. पुढे काहीतरी गडबड झाली आणि ब्राह्मणांनी जायचे बंद केले.

पर्यायी पूजा करण्यास सुरुवात केली.
त्यासाठी सत्येन मधल्या ‘ सत्ये’ चा ‘ सत्य’ केला आणि ‘ न’ चा ‘ नारायण’ झाला आणि ‘सत्य-नारायण’ अस्तित्त्वात आला.

पुरोहित - भट् वर्गाने हा नवा धंदा 💵👀 तात्काळ ओळखला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वाढविला.

त्यासंबंधीच्या पोथ्या लिहिल्या. स्कंद
पुराणात सत्यनारायणाची कथा घुसडली आणि त्याला प्राचीनतेचा, पौराणिकतेचा टच दिला.

👉मराठी माणसाला ज्या वारकरी परंपरेचा वारसा लाभला त्यात ही पूजा कुठेच नाही.

👉शिवाजीमहाराजांनी आयुष्यात ही पूजा एकदाही केली नाही.

👉दिवसरात्र देवदेव, जपजाप्य करणाऱ्या आणि कर्मठ कर्मकांडांबद्दल कुप्रसिध्द असणाऱ्या पेशवाईतही सत्यनारायणाचे नामोनिशाण नाही.

👉अलीकडच्या शंभर-सव्वाशे वर्षांत
सत्यनारायण चौखूर उधळला.

👉८ नोव्हेंबर १९५६ रोजी बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक कार्यक्रम आहे, त्याला या, असे निमंत्रण
गाडगेमहाराजांना मिळाले. ते गेले तर तिथे सत्यनारायणाची पूजा होती. संत गाडगेमहाराज जाम भडकले. ‘तुमचा हा सत्यनारायण बुडालेल्या नौका वर काढतो ना, मग मुंबई बंदराजवळ भारताची एक नौका आपल्या देशाचं सोनंनाणं घेऊन बुडालेली आहे ती बाहेर काढण्यास त्याला का सांगत नाही?

👊निघाले सारे हाप मॅड
सत्यनारायण करायला,’ असा जळजळीत टोला त्यांनी उपस्थितांना लगावला.

👉प्रबोधनकार ठाकरेंनाही कुणीतरी सत्यनारायणाला बोलावले तेव्हा ते सत्यनारायणाचे हे थोतांड ताबडतोब बंद करा असे गरजले.

संकटाचे निवारण करेल किंवा केले
म्हणून सत्यनारायणाची पूजा करायची तर आधी संकट आणलेच कसे...?

यासाठी त्याची झाडाझडती घ्यायला हवी, सत्यनारायणाचे हे लफडे घराच्या बाहेर फेकून द्या,’ इतक्या संतापाने त्यांनी सत्यनारायणावर
हल्ला केला आहे.

एकदाच नव्हे तर आयुष्यभर!

▪घरात चोरी झाली...,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.

▪अतिरेकी हल्ल्यात जिव गेला...,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.

▪कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो...,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.

▪राजकारन्यांनी अवघा देश लुटून खाल्ला....,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.

▪कुपोषानामुळे लाखो बालके मरतात..,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.

▪देशात स्त्री भ्रूण हत्या होतात....,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.

▪हुंडाबळी मुळे मुलींचे बाप बेजार
झालेत...,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.

▪भर दिवसा तरुनीवर बलात्कार झाला...,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.

अरे बस्स झाल तुझ पाठिशी रहाणे,
....मर्दा सारखा जरा पुढे ये !!!!!

आम्ही कोण ?????

आम्ही कोण ?????
.
.
.
.
.
बौद्ध धम्म स्वीकारून आज आपल्याला जवळपास साठ वर्ष झाले. या साठ वर्षात आमची एक पीढ़ी मातीत गेली. 1956 साली ज्याचा जन्म झाला आज तोही मोडकळीस आला.
मानवाच्या जीवनात साठ वर्ष म्हणजे पूर्ण आयुष्यच.
मंग माझा प्रश्न तमाम माझ्या बौद्ध बांधवांना आहे,
या साठ वर्षात आपण बौद्ध धम्म आत्मसात केला का ?
याचे उत्तर मला "नाही "हेच मिळेल.
पण, का नाही ?
बौद्ध धम्म आपल्या मेंदूपर्यंत पोचवण्या नेमके कमी कोण पडले ?

जर तुमचे उत्तर "हो " आहे तर, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या !
का आपल्यावर उच्च जातीच्या हिंदू लोकांचे आजही हल्ले होतात ?
का आपल्याला आजही दलितच संबोधतात ?
का आपल्याला आजही काही उच्चवर्णी महार म्हणून हिणवतात ?

जर एखाद्या दलित हिंदू व्यक्तीने मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्यांच्यावर आपल्यासारखा अन्याय होतो का ?
मुळीच नाही !
मंग आपल्यावरच का ?
जर एखाद्यानी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर तो तन मन धनाने तो धर्म अंगी कारतो.त्याच्या गळ्यात, खिशात, घरात, दारात त्या त्या धर्मगुरुचेच फोटो दिसतील. धर्मांतर केल्यानंतर त्यानी अगोदरच्या धर्माला पूर्णतः सोडलेले असते.

जर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर तो नियमित मस्ज़िदला जाणार व त्या धर्माचे काटेकोरपणे पालन करणार.
जर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर तो नियमित चर्च मधे जाऊन प्रार्थना करणार व धर्माचे पालन करणार.

मंग मला प्रश्न असा उद्भवतो, आपण धर्मांतर करून बौद्ध झालो.
काय आपण बौद्ध तत्वाचे पालन करतो ?
बौद्ध धम्मासोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन करतो ?

1956 साली आपण हिंदू धर्म जरूर सोडला पण हिंदू धर्माचे देव, सण,चालीरीती मात्र सोडल्या नाही.
ज्या मंदिरात आप
ल्याला प्रवेश नाही त्या मंदिरात आपण बाहेरून हात जोडून दर्शन घेतो पण विहारात कधी ढुंकूनही बघत नाही.

कुणी आपल्याला कुलदैवत विचारले तर आपण खंडोबा सांगतो.
दसरा,दिवाळी,होळी,पंचमी,रक्षाबंधन सारे सण न चुकता धुमधडाक्यात साजरे करतो.
शिर्डी शेगांवच्या देवस्थानात जास्त आम्हींच गर्दी करतो.

मंग आम्ही कोण ?
बौद्ध की महार ?
जर आपण बौद्ध धम्माचे तत्व न पाळता हिंदू धर्माचेच तत्व पाळत असणार तर आपल्याला उच्च वर्णी हिंदू दिन दलित मागासलेला महार समजणारच व आपल्यावर पूर्वीसारखाच अन्याय अत्याचार करणार.
हिंदू धर्मातील कित्येकानी पूर्वी मुस्लिम व ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मंग त्यांच्यावर का उच्च हिंदू अन्याय अत्याचार करीत नाहीत.
कारण ते आता हिंदू नाहीच !
त्यांचा देव वेगळा आहे.धर्म वेगळा आहे. सण वेगळा आहे.कुलदैवत वेगळे आहे.
जर ते हिंदू नाहीत तर उच्च नीच लेखण्याचे काहीएक कारण नाही.

डॉ बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, आपल्या समाजाला नुसते नामांतर करून काहीही फायदा होणार नाही. आपल्याला जर शूद्र नावाची घाण आपल्यातून उखाडून फेकायची असेल तर आपल्याला धर्मांतर शिवाय गत्यंतर नाही.
ते आपल्या भाषणात हिंदूतून धर्मांतर केलेल्या काही जातीचे पुरावेही दाखवत होते.एका शूद्र जातीतील जेंव्हा ते हिंदू होते तेंव्हा त्यांना गावातल्या विहीरीत सवर्णा बरोबर पाणी भरण्या मनाई होती पण त्यानी धर्मांतर केल्यावर त्यांना आपोआप त्या विहिरीवर पाणी भरण्याचा अधिकार मिळाला.
ही आहे धर्मांतराची ताकत. मंग ती अध्यापही आपल्याला का लागू झाली नाही. आजही खेड्यापाड्यात आमच्या बांधवाना गावात उच्च वर्णाच्या विहीरीवर पाणी भरण्यास मनाई आहे.
आजही आम्हांला गावात खालचा दर्जा आहे.
याचे कारण एकच, आपण बौद्ध धम्म स्वीकारला पण अंगीकारला नाही.
त्यामुळे सवर्णाला आजही आम्ही महारच दिसतो.

जो पर्यंत तुम्ही बौद्ध धम्माचे तत्व व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अंगीकारत नाही. तो पर्यंत तुम्हांला बौद्ध म्हणून सांगण्याचा अधिकारच नाही.

* पोस्ट नः 73 ** बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडः भाग पाचवा 4) उपनिषदे आणि त्यांची शिकवण

* पोस्ट नः 73 **
    बुध्द आणि त्यांचा धम्म
    प्रथम खंडः भाग पाचवा
4) उपनिषदे आणि त्यांची शिकवण

1) उपनिषदे हे वाडमयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होते उपनिषदे वेदांचा भाग नव्हते कोणताही धार्मिक कायदा यात सांगितला नाही
2) असे असुनही उपनिषदे हा धार्मिक वाड्मयाचाच एक भाग झाला
3) उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे ब्राम्हण पुरोहीत यांच्या विरुध्द असल्याबद्दल गणली जात
4) त्यापैकी काही उपनिषदे वैदिक ब्राम्हण पुरोहीत यांच्या विरुध्द असल्याबद्दल गणली जात
5) वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय याविषयी या सर्वाचे एकमत होते
6) चार वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय याविषयी या सर्वाचे एकमत होते
7) वेद हे ईश्वरनिर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते
8) यज्ञ व त्यांचे फल औध्र्वदेहिक आहुती आणि ब्राम्हणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राम्हणी तत्वज्ञानातील मूलभुत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वाचे एकमत होते
9) तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता त्यांनी केलेली चर्चा ब्रम्ह व आत्मा यांच्यावर केर्दिंत झाली होती
10) विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रम्ह हे सर्वव्यापी तत्व असुन आत्म्याने परमात्याचे ज्ञान करुन घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे
11) उपनिषदांचा मुख्य सिध्दांत असा कि ब्रम्ह हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रम्हच होय उपाधीत गुंतल्यासारखे आत्म्याला मी ब्रम्ह आहे याची जाणीव होत नाही
12) प्रश्न असा होता कि ब्रम्ह हे सत्य आहे काय ? उपनिषदांचे सिध्दांत मान्य करावयाचे कि नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबुन आहे
13) ब्रम्ह हे  सत्य आहे हे सिध्द करणारा  कोणताही पुरावा बूध्दाला मिळाला नाही म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले
14) उपनिषदांच्या कर्त्याना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते
15) अशा प्रकारचे ज्ञान याज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते बृहदारण्यकोपनिषदांत याज्ञवल्क्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे
16) त्याला विचारण्यात आले ब्रम्ह म्हणजे काय ? आत्मा म्हणजे काय? या प्रश्नावर नेति नेति मला माहीत नाही मला माहीत नाही एवढेच याज्ञवल्क्य सांगु शकला
17) ज्याच्याविषयी कोणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असु शकेल ? असा बुध्दांचा प्रश्न होता उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुध्दांना कोणतीही अडचण भासली नाही

क्रमशः
रोज वाचा
 " बुध्द आणि त्यांचा धम्म "
प्रत्येक रविवारी बुध्द विहारात गेलेच पाहिजे
विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Wed, 4 Feb 2015 : Sheetal Deore


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ मध्ये महू (मध्यप्रदेश) येथे झाला. १९१३ ला ते जेव्हा बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेला गेले.परदेशात असतांनाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी'. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली.भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी,  त्यांनी ‘मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०)  आणि ‘प्रबुध्द भारत’ (१९५६)  अशी वृत्तपत्रे  चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्रांचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही.केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी ‘दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’,  ‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ हा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला.उत्तम समाजसमीक्षक  असण्याबरोबरच स्वत: एक  वाङ् मय-समीक्षक असणार्‍या डॉ. आंबेडकरांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, मुक्तेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘खरा ब्राम्हण’, यशवंत टिपणीस यांच्या ‘दख्खनचा दिवा’ या नाटकांवरदेखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेले आहेत. बटर्‌रान्ड रसेल यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ या नाटकावर त्यांनी आपले मत नोंदवले आहे. ‘रिडल्स इन हिंदुइझम’, ‘महाराष्ट्र अॅ ज अ लिंग्विस्टिक स्टेट’, ‘स्टेट्स अँड मायनॉरिटिज’, ‘भारतातील जाती’ या ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली.डॉ. आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा  होती. जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था, या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले.डॉ.आंबेडकरांनी १९२७ ला महाडच्या (जि. रायगड)  चवदार तळयावर अस्पृश्यांनादेखील पाणी भरता यावे यासाठी सत्याग्रह केला. स्वत: डॉ.आंबेडकर जरी हिंदू देव देवतांना मानत नव्हते, तरीही त्यांनी १९३० ला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरू केला. कारण जर मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला, तर त्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्र्न सुटण्यास हातभार लागेल, असे त्यांचे मत होते. हे सत्याग्रह केवळ त्या तळ्यापुरते किंवा मंदिरापुरते मर्यादित नव्हते, तर तो लढा सन्मानाने  जगण्याच्या हक्कांसाठी होता. तो लढा तत्कालीन अस्पृश्यांमधील आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी आणि मानवी हक्कांसाठी होता.वर्णव्यवस्थेचे समर्थन करणार्‍या ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे जाहीर दहनही केले. १९१७ ते १९३५ या काळात हिंदू धर्मात राहूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न केला.१९३५ मध्ये त्यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा येवला येथे केली. १९५६ मध्ये सुमारे पाच लाख अस्पृश्य बांधवांसह बौध्द धर्माची दीक्षा घेऊन डॉ. आंबेडकरांनी धर्म-परिवर्तनाची घोषणा प्रत्यक्षात आणली. (दिनांक १४ ऑक्टोबर, १९५६., नागपूर.).१९३० सालच्या गोलमेज परिषदेच्या वेळी  त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असा सल्ला दिला होता. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्र्लेषण केले होते. विभक्त मतदारसंघांच्या प्रश्नावरून जेव्हा महात्मा गांधींनी आमरण उपोषण सुरू केले, तेव्हा  डॉ.आंबेडकर यांच्यासमोर महात्मा गांधींचे प्राण महत्त्वाचे की आपल्या जातिबांधवांचे हित महत्त्वाचे असा प्रश्न उभा राहिला. शेवटी त्यांनी तडजोड स्वीकारून महात्मा गांधीजींना आमरण उपोषण मागे घ्यायला लावले व त्याच वेळी अस्पृश्यांसाठी वेगळया रीतीने राखीव मतदारसंघ निर्माण करून  आपल्या जातिबांधवांचे हितदेखील पाहिले (पुणे करार).जेव्हा त्यांनी धर्मांतर करायचे ठरवले, तेव्हा सखोल अभ्यास व चिंतन करून त्यांनी अहिंसा, सत्य, मानवता यांना प्राधान्य देणारा बौध्द धर्म निवडला. धर्म परिवर्तनाच्या या कृतीतूनही त्यांचे देशप्रेम लक्षात येते.शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे १९४६ मध्ये सिध्दार्थ महाविद्यालयाची, तर औरंगाबाद येथे १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी’  या शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केली. शिक्षणाबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रातही १९२४ मध्ये ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली.१९२७ ला सवर्णांच्या अन्याय व अत्याचारापासून पददलितांचे संरक्षण करावे या हेतूने शिस्तबध्द असे ‘समता सैनिक दल’ स्थापन केले. १९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, तर १९४२ साली ‘अखिल भारतीय शेडयूल्ड कास्ट फे डरेशन’ ची स्थापना केली. पुढे अखिल भारतीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे त्यांनी ठरवले होते, परंतु दुर्दैवाने त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.१९४७ मध्ये डॉ.आंबेडकरांचा स्वतंत्र भारताचे कायदामंत्री म्हणून पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात प्रवेश झाला व त्याच वर्षी त्यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी व घटना समितीचे सभासद म्हणून निवड झाली.राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर, १९५६ ला हे जग सोडून गेले.
🙏🏻🌷🙏🏻🌻🙏🏻💐🙏🏻🌼🙏🏻

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतात घडवून आणलेली लोकशाही क्रांती नष्ट करून भारताचा पुन्ह:श्च हिंदुस्तान करण्याच्या दिशेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आगेकूच सुरु आहे

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
दै.महानायक,
संपादक- लेखक
सुनिल खोब्रागडे

"डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारतात घडवून आणलेली लोकशाही क्रांती नष्ट करून भारताचा पुन्ह:श्च हिंदुस्तान  करण्याच्या दिशेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आगेकूच सुरु आहे. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रजासत्ताक लोकशाही भारताच्या अस्तित्वाला असलेला सर्वात मोठा धोका आहे. आंबेडकरवादी बुद्धीजीवी,कार्यकर्ते,राजकीय नेते, सामान्य आंबेडकरी जनता हा धोका ओळखून आहेत. यामुळे संघाशी भिडले पाहिजे,संघाचा मुकाबला केला पाहिजे ही सर्व स्तरातील आंबेडकरी जनतेची तीव्र भावना आहे. यामुळे संघावर टीका करणारे कम्युनिष्ट,समाजवादी,काही काँग्रेसी, प्रागतिक विचारांचे लेखक,साहित्यिक,अभिनेते किंवा अन्य जे कोणी असतील अशा सर्व  लोकांना बहुसंख्य आंबेडकरी जनता नेहमीच पाठींबा देत आली आहे. आंबेडकरी जनतेच्या या संघविरोधी मानसिकतेचा सद्य:स्थितीत  पुरेपूर वापर विविध कम्युनिष्ट  पक्ष-संघटना करीत आहेत. यामुळे संघाच्या विरोधात आक्रमक बोलणारा बोलघेवडा नेताही लोकांना लढाऊ,खंबीर,विद्वान,धाडसी,निर्भीड वगैरे सर्वगुणसंपन्न वाटतो. मात्र, रा.स्व.संघाच्या विरोधात नुसते आक्रमक बोलून कोणतीही व्यक्ती, किंवा कोणताही राजकीय पक्ष संघाचे काहीही बिघडवू शकत नाही ही वस्तुस्थिती सामान्य आंबेडकरी माणूस लक्षात घ्यायला तयार नाही. संघाचा सर्वोच्च ध्येयसंकल्प काय आहे ? या ध्येयसंकल्पाचे सैद्धांतिक अधिष्ठान काय आहे ? संघाची कार्यपद्धती कशी आहे ? संघाच्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी कशी केली जाते ? संघपरिवार व त्याच्या पिलावळ संघटना यांचे संघटनात्मक स्वरूप,अंतरसंबंध व कार्यपद्धती इत्यादी अनेक पैलूविषयी रा.स्व.संघाला  नामोहरण करण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या बहुसंख्य आंबेडकरवाद्यांना नेमकी आणि वस्तुस्थितीवर आधारित अशी माहिती नाही. ज्या शत्रूशी लढायचे आहे त्याची बलस्थाने,कमजोरी,त्यांचे लढाईचे तंत्र, त्यांच्या संघटनेचे स्वरूप इत्यादीविषयी माहिती नसेल तर केवळ .... मुडदे पाडू ! ....उखडून फेकू ! ....अमुक करू ! इत्यादी प्रकारच्या वल्गना करून काहीही साध्य होणार नाही. यामुळे रा. स्व. संघाशी खरेच मनापासून भिडायचे असेल तर सर्वप्रथम संघाचे अंतर्बाह्य स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.,......

:साभार संग्रह-
संतोष सूर्यवंशी, संयोजक
बौद्ध धम्म जनअध्ययन संघ, महाराष्ट्र
🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅

26 वर्षांनंतर नवबौद्धांना दिलासा, नोकरी आणि शिक्षणात मिळणार सवलती...

26 वर्षांनंतर नवबौद्धांना दिलासा, नोकरी आणि शिक्षणात मिळणार सवलती...

तब्बल 26 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवबौद्धांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नवबौद्धांना केंद्र सरकारने मोठा दिलासा असून या पुढे आरक्षण, शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये सवलती मिळणार आहे. केंद्रीय समाज कल्याणमंत्री थावरचंद गहेलोत यांनी आज यासंबंधी घोषणा केली आहे.

बौद्ध धर्म स्विकारणार्‍या नवबौद्धांना आरक्षण आणि नोकर्‍यांमधील आरक्षणापासून वंचित राहावे लागत होते. यापूर्वी 1956 नंतर बौद्ध धर्म स्विकारणार्‍यांना केंद्राच्या सवलती मिळत नव्हत्या. त्यांना केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये आणि शिक्षणातल्या सवलती मिळत नव्हत्या. आता मात्र, ही परिस्थिती बदलणार आहे. केंद्रीय समाज कल्याणमंत्री थावरचंद गहेलोत यांनी आज यासंबंधी घोषणा केली. त्यानुसार, नवबौद्धांना यापुढे आरक्षण आणि नोकर्‍यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातल्या नवबौद्धांना मिळणार आहे. आत्तापर्यंत केंद्राच्या यादीत असलेल्या जातींनाच केंद्र सरकारच्या योजनांच्या सवलती मिळत होत्या. महाराष्ट्रातल्या नवबौद्धांचा त्यामध्ये समावेश नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रातल्या नवबौद्धांना त्याचा फटका बसत होता. नवबौद्धांना या सवलती मिळाव्यात यासाठी तब्बल 26 वर्षांपासून संघर्ष सुरू होता. अखेर त्याला आता यश मिळालंय.

- http://www.ibnlokmat.tv/archives/220073

Wednesday, 22 June 2016

सिद्धार्थ बुद्ध विहार, गुलबर्गा शहर कर्नाटक

सिद्धार्थ बुद्ध विहार, गुलबर्गा शहर कर्नाटक

गुलबर्गा कर्नाटक में एक बहुत बड़ा बुद्ध विहार बनाया गया है,यह गुलबर्गा से छह किलोमीटर की दूरी पर स्थित है और गुलबर्गा विश्वविद्यालय परिसर के पास है आज यह दक्षिण भारत के बड़े विहारों में से एक है और करीब18 एकड़ में फैला है ,इसे देख कर आप को ताज महल की याद आ जाएगी बस ताज महल और इस में फर्क यह है ताज महल पूरी तरह संगमरमर से बना है और यह विहार आरसीसी संरचना है जिसे इतालवी सफेद संगमरमर से पूरी तरह ढक दिया गया है इस विहार में सांची, सारनाथ , अजंता और नागपुर के बौद्ध केंद्रों की स्थापत्य का सुन्दर मिश्रण किया गया है। मूल रूप से एक छोटे से विहार का निर्माण 2002 में शुरू हुआ था लेकीन ट्रस्ट ने अपना मन बदला और एक बड़ा बौद्ध विहार बनाने का निर्णय लिया जो दक्षिण भारत में सबसे सर्वश्रेस्ट हो

गुलबर्गा विहार कुल 70 एकड़ भूमि पर फैला है और इस का मुख्य ढाचा 18 एकड़ में फैला है और इस के तहखाने में एक ध्यान केंद्र है और पहली मंजिल पर भगवान बुद्ध का चैत्य है इस के गुंबद ऊंचाई में 70 फुट और व्यास में 59 फीट है। इसके अलावा, यह मुख्य भवन के कोनों में 48 फुट लंबा चार अशोक स्तंभों है। इस के अन्य आकर्षण में एक 2,500 सीटों की क्षमता के साथ 100 × 100 फुट खुली हवा में एक थिएटर हैं और विहार के चारो तरफ चार बड़े साँची द्वार बनाये गए है जीने संगमरमर से ढका गया है ,इस के अलावा इस में 11 मुर्तिया है जो सीमेंट से बानी है और जिन का नेतृत्व बाबा साहेब की काँसे से बानी प्रतिमा कर रही है जो 1956 की धम्म क्रांति यात्रा को दर्शाता है इस की अन्य विशेषता है अग्रेजी के शब्द यू के आकार का धम्म काम्प्लेक्स जिस में एक छात्रावास, आवास एक पुस्तकालय, अध्ययन केंद्र, रसोई, डाइनिंग हॉल, कॉन्फ्रेंस हॉल, प्रदर्शनी हॉल और अतिथि कमरे आदि है ,इस के अलावा इस के ध्यान केंद्र में हमेशा बुद्धं शरणं गच्छामि बजता रहता हैं और ध्यान केंद्र में एक 6.5 फुट लंबे काले ग्रेनाइट बुद्ध मूर्ति है प्रसिद्ध मूर्तिकार अशोक गुडिगार द्वारा बनाया गया है ,इस विहार का प्राथना घर 15,625 वर्ग फुट में फैला है और करीब 1500लोगो की बैठने की छमता रखता है और इस के अंदर अजंता, एलोरा, नागपुर, बोधगया, सारनाथ , राजगीर, लुम्बिनी, कुशीनारा , थाईलैंड, सिंगापुर, श्रीलंका, तिब्बत, जापान और रोम आदि जगह की नक्कासी की गयी है परिसर में मुख्य आकर्षण में बुद्ध की 8.5 फुट लम्बी सोने से ढकी प्रतिमा है
इस विहार के प्रमुख ट्रस्टी कांग्रेस के नेता मल्लिकार्जुन खड़गे है

बुद्ध विहार को 1994 में स्थापित सिद्धार्थ विहार ट्रस्ट के तत्वावधान में निर्माण किया गया है।इस विहार को बनाने में सीमेंट के लगभग 1,500 टन, स्टील के 250 टन, 5 लाख ईंटों और रेत के 200 घन मीटर का इस्तेमाल हुआ है, इस विहार के निर्माण में कांग्रेस के नेता और इस समय विपक्ष के नेता मलिकार्जुन खड़गे और अन्य समाज सेवी लोगो का योगदान है ,और इस समय यह भारत के सबसे बड़े विहारों में एक है। ऐसा कहा गया है की सन 2009 में कुल 8 करोड़ रुपये की लागत से सिद्धार्थ विहार ट्रस्ट ने इस विहार को बनवाया है...!!
🙏🙏रमाई🙏🙏💐💐