Thursday, 30 June 2016

पण इथून पुढे जय भीम मात्र करू नकोस !!!!

पण इथून पुढे जय भीम मात्र करू नकोस !!!!
हा video कोणी तयार केला आहे माहित नाही पण मस्त आहे नक्की पहा .

Wednesday, 29 June 2016

Give missed call to connect International Buddhism Festival


दादार आजचा मोर्चा यशस्वी जवळपास 15000 हजार भिमसैनिकांनी !

दादार कालचा मोर्चा यशस्वी
जवळपास 15000 हजार भिमसैनिकांनी !⭕⭕⭕
दिली सलामी //// मोठ्या प्रमाणात दादार ///
बंद संपूर्ण दादार परिसर सुनसान //
जय भिमराव// जय भिमराव
जय भीम // जय बाबासाहेब🙏🙏🙏

डॉ. आंबेडकरांची वास्तू जशी उद्ध्वस्त केली तशीच म गांधी, सरदार पटेल, बाळ गंगाधर टिळक यांच्या पण वास्तू उद्ध्वस्त करून तेथे नवीन अत्याधुनिक गगनचुंबी स्मारक बांधणार काय???

डॉ. आंबेडकरांची वास्तू जशी उद्ध्वस्त केली तशीच म गांधी, सरदार पटेल, बाळ गंगाधर टिळक यांच्या पण वास्तू उद्ध्वस्त करून तेथे नवीन अत्याधुनिक गगनचुंबी स्मारक बांधणार काय???
मूळ वास्तू हेरिटेज म्हणून जतन करायचे असते, ते उद्ध्वस्त करायचे नसते किंवा ते उद्ध्वस्त करून नवीन बांधायचे नसते. दिल्ली अलीपुर स्थित डॉ.आंबेडकर यांचे निवास्थान जेथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले ते, दादर स्थित डॉ. आंबेडकर यांचे निवासस्थान व प्रेस जमीनदोस्त करून डॉ.आंबेडकर यांच्या स्मृती मिटवून डॉ. आंबेडकरकर यांच्या अनुयायींच्या भावनांशी खेळणे तर सुरु केलेले नाही??
नव्या वास्तूशी तो जिव्हाळा ती आपुलकी कोठून येईल?
गौतम नागवंशी

आपण आंबेडकरवादी लोक म्हणतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन मधील वास्तव्य केलेली वास्तू ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करायची.

आपण आंबेडकरवादी लोक म्हणतो की
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी   लंडन मधील वास्तव्य केलेली वास्तू  ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करायची.

पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी   मुंबई  मधील वास्तव्य केलेली वास्तू चळवळीचे  प्रमुख केंद्र असलेली बुद्ध  भूषण  प्रेस व आंबेडकर भवन या ऐतिहासिक वास्तू जतन न  करता पाडून टाकायची.

यावर आंबेडकरवादी लोकांनी काय
केले  पाहिजे ....आता तरी विचार करून योग्य निर्णय घ्याला हवा.

(संदर्भ झी न्युज २४ तास चर्चा दी.२८.०६.२०१६)..🔥🔥🔥 रत्नाकर गायकवाड कुठे पांग फेडशील रे; ह्याच समाजानी तुला घडवीला; वीसरु नको🔥🔥🔥🔥

(संदर्भ झी न्युज २४ तास चर्चा दी.२८.०६.२०१६)..🔥🔥🔥 रत्नाकर गायकवाड कुठे पांग फेडशील रे; ह्याच समाजानी तुला घडवीला; वीसरु नको🔥🔥🔥🔥

आत्ताच झी न्युज २४ तास वरील आंबेडकर भवनासंदर्भातली चर्चा ऐकली; व रत्नाकर गायकवाडांची प्रतीक्रीया व त्याला सपोर्ट करनारी बीजेपी ची दलाल झी न्युज यांचा फास जवळुन बघीतला... मन छीन्नबीछीन्न; सुन्न-सुन्न झालंय..."

चर्चेत आनंदराज आंबेडकर; अर्जुन डांगे; न्यायमुर्ती कोळसे पाटील व गायकवाड ही व्यक्ती समावीष्ट होती..

चर्चा सुरु असतांना गायकवाड नी आल्या आल्या "आंबेडकर भवन हे गुंडाचे आश्रयस्थान आहे" अश्या शब्दात सरसकट आंबेडकरी चळवळीचा अपमान केला..

अ.अरे ज्या ईमारतीला बाबासाहेबांनी स्वताच्या पैश्याने स्वकष्टाने सामाजीक प्रभोधनासाठी नीर्मान केली;

ब. ज्या ईमारतीत दलीतांची; शोषीतांची चळवळ ऊभी राहीली..

क. पैश्यांने जागा कीरायाने घेन्यास गरीब; असमर्थ पन ईमानदार आंबेडकरी कार्यकर्तांना; सामाजीक संघटनांना; राजकीय पार्ट्यांना फार शुल्लक पैश्यात कींबहुना बंहुतांश वेळी मोफत ईमारतीमध्दील हॉल देन्यात येऊन चळवळीला बळकट देन्याचे काम भुतकाळात करन्यात आले.

ड. जी ईमारत रीपब्लीकन मोव्हमेंन्ट चा प्रवास असो की दलीत पँन्थर चा गजर; की मास मोव्हमेन्ट चा यलगार की मुंबईतुन देशभरात रोवल्या जानार्या आंबेडकरी संघटना असो त्याचा साक्षीदार राहीला आहे. मोठे मोठे नीर्नय भवनातुन नींघुन ते भारतवर्षात अमलात आनले गेलेले आहेत..

५. ह्याच ईमारतीत झालेल्या हजारो संभामध्दुन दादासाहेब गायकवाड; बँरास्टर खोब्रागडे; राजा ढाले; नामदेव ढसाळ; जे.व्ही पवार; प्रकाश आंबेडकर; रामदास आठवले; अरुन कांबळे; भाई संघारे; अर्जुन डांगे व अशी कीतीतरी शेकडो आंबेडकरी चेहरे तयार झाले; प्रगल्भ झाले व समाजात रुजले..

आणी..आणी हा बीकाऊ नौकरशहा ज्याचा स्वभाव व क्रुतीवरुन आंबेडकरी चळवळीला बदनाम करुन बाद करन्याचा डाव दीसुन येतो.. "येवढ्या घानेरड्या शब्दात बांबासाहेबांचा वास्तुलाच डाग लावतोय" हे फार वेदना दायक आहे.."

महत्वाचे म्हनजे झी न्युज वरील संपुर्ण चर्चा ही सुनीयोजीत रीत्या वीषयाला भरकटवीनारी व आंबेडकरी समाजात संब्रम नीर्मान करनारी वाटत होती..!! गायकवाडच्या स्पीकरचा वॉलुम जानुनबुजुन जास्त केलेला होता.. तो जेव्हा बोलत होता तेव्हा आंनदराज; डांगे व कोळसे पाटील यांचा आवाज वारंवार मुट करन्यात आला. जनु फक्त गायकवाडचाच आवाज जनतेपर्यंत जावा हाच हेतु चँनल बाळगुन आहे की काय याची स्पष्ट प्रचीती होत होती...!!

या ऊलट जेव्हा जेव्हा आंनदराज; डांगे व पाटील यांनी खरी भुमीका मांडन्याचा प्रयत्न केला त्यांना गायकवाडनी मध्दात जोरात जोरात ओरडुन डीस्टर्ब केले व त्यावेळी झी न्युज ने ते घडु दीलं. गायकवाड चा स्पीकर म्युट केला नाही..!! दादागीरी तर ही की प्रवक्ताने/ एन्करने खरी परीस्थीती सांगत असतांना त्या पासुन गायकवाड वगळता ईतरांना पराव्रुत्त केले व नेमके सत्य काय? हे लोकांसमोर येन्यापासुन हेतुपुरस्सर मज्जाव केला..!!

न्युज वर गायकवाडाला सुसाट सोडल्यामुळे जो आपल्या समाजवीघातक क्रुतीला जस्टीफाय करु शकत नसतांनाही व कोनत्याही प्रश्णाचे ज्याचाकडे ऊत्तर नसतांनाही; तो  कुठले ते पञ घेऊन आंबेडकरी घरान्याला संपुर्ण मीडीयावर बदनाम करन्या़चा प्रयत्न करु लागला..

अरे आंबेडकरांच्या घरान्यावीषयी एवढी गरड ओकन्याची ब्राम्हनशाहीची हीम्मत झाली नाही आणी तु समाजकंठका दुश्मनांच्या अस्तीनात राहुन वीष ओकायला लागलास..!!

खरचं गायकवाड ची वागनुक बघुन व आंबेडकरी समाजावीषयी व चळवळीवीषयी त्याचा मनात असलेला अनादर पाहुन मनं व्याकुळ झालं...

हे अशे आपल्या समाजाचे वॉईट कॉलर्ड ज्यांना समाजाच्या भावनांची; आंबेडकरी चळवळीची; नीळ्या अस्मीतेची तीळभर सुध्दा कदर नाही ही लोकं ज्यांनी साध्या एक आंदोलनात कधी सहभाग घेतला नाही; ही..ही.. चळवळ बांधतील ..ईमारत बांधुन.. !! जे चळवळीलाच मरनाचीत्त करुन ईमारतीचे स्वप्ण भोळ्या बाभळ्या जनतेला दाखऊन " आंबेडकरी चळवळीचे स्मारक" बांधु ईच्छीतात..!!??!!

आंबेडकरी चळवळीला डाग लावन्यार्या व बीजेपी आनी वर्तमान प्रशासनाच्या ओंझळीने पाणी पीनार्या गायकवाडाने चळवळीच्या बालकील्याला गुंडाचे आश्रयस्थान म्हनुण आपला डीएनए ब्राम्हनशाहीच्या ऊदरातुन समाजाची अस्मीता वीकुन स्व:तात संचारऊन/ईंन्जेक्ट करुन घेतला आहे यात काही शंका ऊरलेली नाही त्याची वागनुक बघुन...!!

अरे.. कुठं फेडशील हे पांग; ह्याच समाजानी तुला घडवीला; वीसरु नको..!!व जर वेळ आली तर तुझ्या सारख्या बईमान शञुला समाज तुझी जागा दाखवील्याशीवाय राहनार नाही..!! ध्यानात ठेवं...!!
---- एकच म्हनावस वाटंत---- की तु गायकवाड... आंबेडकरांची औलाद होऊच शकत नाही.. ती तुझी लायकी नाही...!!

ऊपरोक्त कारनामुळे रत्नाकर गायकवाड व झी न्युज यांचा जाहीर नीषेध...

नीस्वार्थ आंबेडकरी कार्यकर्ता...
(Forwarded post)

Monday, 27 June 2016

"रिपब्लिकन चळचळीच महाराष्ट्रातल केन्द्र उध्वस्त-समाज मात्र कृतघ्नच"

"रिपब्लिकन चळचळीच महाराष्ट्रातल केन्द्र उध्वस्त-समाज मात्र कृतघ्नच"
आजवर रिपब्लिकन चळचळीच्या वेळोवेळी भुमीका जिथून देशभरात जात होत्या,हजारो बैठका मधून रिपब्लिकन चळचळीला याच भुमीतुन नवि दिशा मिळत होती तेच ‪#‎आंबेडकर‬भवन आज अस्ताव्यस्त अवस्थेत पाहण्याचा षंढपणा करणारा करणारा समाज कृतघ्नच ना ??? बाबासाहेबाच्या चळचळ उभारनित मुद्रित शिदोरी पुरवणारी बुद्धभुषण प्रिटींग प्रेस आज भग्न झाली आहे सोबतच भारतीय बौद्ध महासभा,रिपब्लिकन सेना,भारिप बहुजन महासंघ यांचे कार्यालय देखील काल रात्री 2:30 वाजता बेकायदा रित्या जातीयवाद्यांची दलाली करणार्याचा हस्तक रत्नाकर गायकवाड याने खाजगी गुंड व जेसीबी लावून जमिन दोस्त केली वर्षानुवर्षे आंबेडकरी जनतेला मुंबईत आधार वाटणारे आंबेडकर भवन आता सत्ताधारी व दलालांच्या पोटपाण्यासाठी नेस्त नाबुत झाल्याचं पाहण्याची नामुष्की आज आपल्यावर ओढावली आहे.आंबेडकर भवनाशी नाते असणारे आज प्रचंड अस्वस्थ झालेत,परंतु ज्यांना आंबेडकर भवन,राजगृह कोणत्या दिशेला आहे हे माहित नसणारे घरात बसुन पुढच्या घटनेची वाट पहात आहेत.
आज आंबेडकर भवन उद्या औरंगाबाद,महाड,पुणे यांच्यासह देशातील अनेक स्फुर्ती स्थळं आपल्या कृतघ्नते मुळे लयास जातील पण आपल्याला त्याच काय???उद्या राजगृहातले उपरे 'राजगृहा' वर देखील डोळा ठेवतील...
एखाद्या वस्तीवर शासनाची नजर पडली,एखाद्या पेपर टायगर नेत्यांच्या अतिक्रमणावर बडगा आला,कारवाईत घरे गेली की निळे झेंडे घेवून न्यायासाठी रस्ते अडविणारे आज मात्र घरात झेंडा गुंडाळून बसलेत.
कारण,आमची घरे दारे अजून शाबुत आहेत पण बाबासाहेबांच्या सहवासाचा सुगंध असणारे एकेक स्थळ तुडवत दलाल आपली पोळी भाजुन घेताहेत.
पण लक्षात ठेवा यातूनच तुमच्या सहनशीलता तपासल्या जात आहेत आणि आता तर आपल्या जाणीवा बधीर झाल्यात हा दावा करण्याचं धाडस दलालांच्या घोळक्यास झाल्यास नवल वाटु नये एवढी सहनशीलता आपण वाढवली आहे.
बाबासाहेब म्हणायचे की,"सहनशीलतेची मर्यादा जिथे संपते,तिथे क्रांतिचा उदय होतो."पण आपली मर्यादा मात्र संपत नाहीये त्यामुळे या वांझोट्या माणसीकतेत क्रांतिचा जन्म होईल???
आजपर्यंत पुस्तके,पक्ष,माणसे संपवली आता तुमच्या स्फुर्ती स्थळांची बारी आहे.
समाजातील दलाल डोक्यावर घेवून मिरवतो पण बाबासाहेबांच कुटुंब वार्यावर सोडून मोकळा होणारा,जाणीवा बधिर झालेला,दलालांच समर्थन करणारा,चळचळीला कमकुवत करणारा,तोंडाने 'बाबासाहेबांना बाप म्हणणारा' पण बाबासाहेबांच्या कुटुंबाशी असलेलं नातं व त्यांच्या प्रतीचे कर्तव्य विसरणारा समाज कृतघ्न नाही तर कोण???
भलेही राजकीय दृष्या आंबेडकरी कुटुंबाला न स्विकारण्याची कारणं उभी केली जातात, शेकडो अफवा पसरवल्या गेल्यात पण बाबासाहेबांच रक्त म्हणून त्यांचे उपकार विसरणारे कृतघ्नच आहेत.
आपण आपल्या बाप-जाद्यांच्या संपत्तीला जिवापाड जपतो,त्यावर अधिकार दाखवतो,प्रसंगी हाणामार्या,कोर्ट कचेरी करतो,हक्क गाजवतो अन् त्यांची अवहेलना झाल्यास हळहळतो तश्याच भावना आंबेडकर कुटुंबाच्या पिई सोसायटी,पिपल्स ईम्प्रूमेंट ट्रस्ट,बौद्धजन पंचायत समिती,राजगृह व बाबासाहेबांच्या ईतर संस्था व समाजाच्या बाबतीत आहे पण स्वतःला चळचळीचे वाहक समजणारे मात्र आंबेडकर कुटुंबाला या सर्व वास्तुपासुन वंचित ठेवून बाबासाहेबांच्या उपकारचे चांगलेच पांग फेडत आहेत. होय ना??परंतु बाबासाहेबांच्या पुण्याईने जगण्यास समर्थ झालेला सुशिक्षीत समाज आज बाबासाहेबांना धोका देणाराच ठरला आहे हे कडु सत्य आहे अर्थात कृतघ्नच ठरतोय पण आंबेडकर कुटुंबा सोबत असणारा प्रत्येक भिम सैनिक सदैव जिवावर उदार होऊन त्यांचा पाठीशीच राहतो प्रसंगी प्राण पणास लावतोय- लावत राहिल, स्वमग्न लोक मात्र कृतघ्नच राहतील.
-सचिन निकम.
रिपब्लिकन विद्यार्थी सेना,औरंगाबाद
मो.9270049458/8975823580/9096281181