Wednesday, 7 September 2016

( पोस्ट नः 149 ) बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग पहिला मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही ,

( पोस्ट नः 149 )

  बुध्द आणि त्यांचा धम्म   तिसरा खंडः भाग पहिला

मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही ,
*******

31) ब्राम्हणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी आभ्यास केला असताना काहीना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधना येत नाही.

32) परंतु तथागत याचे कारण काय ? तिथे ते निर्वाण आहे इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे, इथे श्रमण गौतमासारखा थोर गृहस्थ आहे, मग ज्यांना तु असा उपदेश केला आहेस शिक्षण दिले आहेस ,त्यांच्यापैकी काहीनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये हे कसे ?

33) ब्राम्हणा , त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो. परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल , सांग तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय ?

34) होय मला तो पुर्ण माहीत आहे

35) बरे मग ह्या रस्त्यासंबंधी पुरी माहीती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालु लागतो.

36) नंतर दुसरा मनुष्य येतो तो मार्गनिर्देशासंबंधी तुला विनंती करतो तु त्याला त्याच सुचना करतोस तो तुझ्या सुचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितेपणे राजगृहाला जाऊन पोहोचतो.

37) ब्राम्हण बोलु लागला " त्याला मी काय  करणार ? फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे ,

38) ब्राम्हणा , मग मी काय करतो ,हे तु ताडले असशीलच तथागत फक्त मार्गच दाखवितो

39) या सुक्तावरुन स्पष्ट होते कि बुध्द हे मोक्षाची आश्वासने देत नाही, तो फक्त मार्ग दाखवितो ,

40) आणि मोक्ष म्हणजे काय?

41) महंमद आणि येशु खिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषितांच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे .

42) तथागत बुध्दांच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण  ! आणि निर्वाण म्हणजे रागलोभादी विकारांचा निग्रह .

43) अशा धर्मात मोक्षाचे वचनबध्द आश्वासन कसे मिळणार?

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर*
INDIA THAT IS BHARAT
9922047333

Tuesday, 6 September 2016

( पोस्ट नः 146 ) बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग पहिला तथागत म्हणतात ,मी मार्गदाता आहे , मी मोक्षदाता नाही . ********

 ( पोस्ट नः 146 )

    बुध्द आणि त्यांचा धम्म
    तिसरा खंडः भाग पहिला

 तथागत म्हणतात ,मी मार्गदाता आहे , मी मोक्षदाता नाही .
********

1) बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणुन वर्णिले जातात. परंतु तथागत बुध्दांचा धम्म हा साक्षात्कार नव्हे.

2) साक्षात्कारी धर्म म्हणजे " मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करुन आत्म्याला मोक्ष मिळवुन द्या असे प्राणीमात्रास सांगणारा देवाचा संदेश

3) हा संदेश बहुधा नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषितांच्या मार्फत पाठविलेला असतो. त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करुन सांगतो मग त्याला धर्म असे म्हणतात

4) प्रेषितांचे काम म्हणजे, त्याच्या धर्माशी इमा राखणारयाना मोक्ष लाभ निश्चित करणे

5) धर्माशी इमान राखणारयाचा मोक्ष म्हणजे , जर ते प्रेषितांला देवदुत मानत असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असतील तर त्यांची नरकातील पाठवणीपासुन सुटका करणे

6) तथागत बुध्द आपण किंवा देवदुत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे आणि असे कोणी मानल्यास त्यांचे खंडण करीत असे

7) अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे तथागत बुध्दांचा धम्म हा एक शोध होता. आणि म्हणुन जे धर्म साक्षात्कारी म्हणुन समजले जातात त्यापासुन तो अगदी वेगळा समजला पाहिजे

8) तथागत बुध्दाचा धम्म हा एक शोध आहे. असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातुन तो उदभवला आहे ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो, त्यांच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परपंरा ह्यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्टनिष्ट वळण ह्यांच्या संशोधनाच्या परिणाम म्हणजे बुध्द धम्म

9) सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्ववासन न देणारा तथागत बुध्द हाच एक गुरु आहे, मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये त्याने विभाजक रेषा काढली आहे. एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे,

10) तथागत बुध्द हे केवळ मार्गदाता होता, मोक्ष हा ज्याचा त्याने आपला श्रमाने मिळवण्याचा आहे

11) आपले हे मत मोग्गलान ह्या ब्राम्हणाला खालील सुक्तात तथागत बुध्दांनी स्पष्ट करुन सांगितले आहे

12) एकदा तथागत श्रावस्तीत मिगार मातेच्या पुर्वाराम प्रासादात उतरले होते

13) नंतर मोग्गलान हा गणक ( हिशेब ठेवणारा ) ब्राम्हण तथागतांजवळ आला आणि स्नेहाचे अभिवादन करुन त्यांच्या बाजुला बसला. कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोग्गलान तथागताला म्हणाला

14) श्रमण गौतमा ज्याप्रमाणे माणसाला या प्रासादाचे दर्शन क्रमशः होते पाऊल पुढे पडते क्रमशः पुढील मार्ग दिसतो हळुहळु पायरया चढुन शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राम्हणांचे शिक्षणः क्रमश घडते म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते

रोज वाचा
    बुध्द आणि त्यांचा धम्म
बुध्दांनी मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही

पुढील पोस्ट मध्ये वाचा
     तथागत म्हणतात मी "मार्गदाता आहे ,मोक्षदाता नाही,"(ii)

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो  "
*******
           विश्वरत्न
  डाँ.बाबासाहेब आंबेडकर
*INDIA THAT IS BHARAT

( पोस्ट नः 145 ) बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग पहिला

( पोस्ट नः 145 )

    बुध्द आणि त्यांचा धम्म
    तिसरा खंडः भाग पहिला

19) यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले हे बरोबर आहे काय ? संगीतीने होकारत्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवावा.

20) हा पठणानंतर वस्तुतः काश्यपाने संगतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी तथागत बुध्दांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती

21) परंतु काश्यापाने असे काहीच केले नाही . त्याने असा विचार केला असावा कि संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन प्रश्नांशीच कर्तव्ये आहे

22) काश्यपाने तथागत बुध्दांच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केला असते तर आज आपणाला तथागत बुध्दांचे संपुण चरित्र उपलब्ध झाले असते.

23) तथागत बुध्दांच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपाला का सुचले नसावे. ?

24)  केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही , ह्याचे उत्तर म्हणजे तथागत बुध्दांनी आपल्या धम्मशासनात आपणा स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नाही हेच होय.

25) बुध्द आणि त्यांचा धम्म या दोन अगदी अलग गोष्टी होत .

26) तथागत बुध्द स्वतःला आपल्या धम्मशासनापासुन अलग मानीत असे याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपण उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार

27) दोन तीन वेळेला त्याच्या अनुयायानी त्यांच्या पश्चयात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची विंनती केली

28) आणि प्रत्येक वेळी तथागत बुध्दांनी तसे नाकारले .

29) धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी , असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे .

30) धम्म हा स्वतःच्या अंगी सामर्थ्यानेच जगला पाहिजे . त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे

31) ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे

32) धम्माची सत्ता चालावयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे

33) धम्म आणि त्यातील आपले स्थान यासंबधी तथागत बुध्दांचा दृष्टीकोन अशा प्रकारचा होता.

रोज वाचा
    " बुध्द आणि त्यांचा धम्म

 पुढील पोस्ट मध्ये
बुध्दांनी मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही

     तथागत म्हणतात मी "मार्गदाता आहे ,मोक्षदाता नाही
1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे"

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो "
*******
        विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

INDIA THAT IS BHARAT

( पोस्ट नः 148 ) बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग पहिला तथागत म्हणतात " मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही ,"

( पोस्ट नः 148 )

    बुध्द आणि त्यांचा धम्म
    तिसरा खंडः भाग पहिला

तथागत म्हणतात " मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही ,"

24) नंतर हे ब्राम्हणा श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला
कि तथागत त्याला पुढे असा पाठ देतात श्रमणा ये जागृतीचा ( सती) अभ्यास कर दिवसा चालता बसता तु चित्त शुध्दीचा प्रयत्न कर, रात्रीच्या पहिल्या प्रहारी सुध्दा येरझरया करीत किवा एका जागी बसुन चित्त शुध्दीची साधना करीत रहा दुसरया प्रहारी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसरया पायावर ठेवुन पडुन रहा आणि सावध राहुन बुध्दी पुरस्पर व एकाग्रतेने चित्त शुध्दीचा विचार कर तिसरया प्रहारी उठुन आणि येरझारा करीत किंवा बसुन आपले चित्तः चित्तमलापासुन परिशुध्द कर

25) हे ब्राम्हणा तो श्रमण जागृतेचा आभ्यास झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात तो असा श्रमण ये जागृकता आणि स्मृती ( सम्यक जाणीव ) यांनी युक्त हो पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा. पुढे किंवा मागे पाहताना वाकताना किंवा विसावा घेताना अंगात वस्त्रे घालाताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना खाताना चघळताना स्पर्श करताना शरीर व्यापार करताना चालताना उभे असतान निंद्रेंस्त असताना किंवा सावध असताना बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव मृती युक्त म्हणजेच जाणीवपुर्वक संयम राखीत जा

26) नंतर हे ब्राम्हणा त्या शिष्याला आत्मसंयम साधता आले तर तथागत त्याला पुढील पाठ देतात श्रमणा ये एखादे एकांताचे स्थान शोधून मग ते अरण्य असु एखादे वृक्ष असो पर्वत गृह असो पर्वत गुंफा असो स्मशान स्थान असो आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत पेंढ्याच्या राशीजवळची जागा असो तसेच एखादे एकांत स्थान शोधुन काढ आणि अन्नग्रहण केल्यानंतर आसन मांडी घालुन शरीर ताठ ठेवुन चार प्रकाराच्या ध्यानांचा अभ्यास कर

27) हे ब्राम्हणां जे श्रमणशिष्य आहेत ज्यांनी मनोग्रह अद्यापही साधला नाही पंरतु तो तसा साधण्याची ज्याला इच्छा आहे त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो

28) पंरतु ज्यांनी अर्हतपद प्राप्त केले आहे ज्यांनी आसवांचा नाद केला आहे ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे जे कृतकृत्य झाले आहेत ज्यांनी आपल्या शिरावरील भार उतरवुन दिला आहे मोक्ष मिळवला आहे ज्यानी भावबंधनाचा उच्छेद केला आहे प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपुर्ण आणि जागृकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो

29) तथागताचे हे भाषण ऐकुन तो गणक ब्राम्हण म्हणाला

30) परंतु गौतमा मला हे सांग कि तुझे सर्व शिष्य अशा प्रकारची परिपुर्णता  किंवा निर्वाण मिळवू शकतात काय ? किंवा काहीना ते मिळविताना अपयश येते काय?

   रोज वाचा
बुध्द आणि त्यांचा धम्म

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो  "
***
       विश्वरत्न
   डाँ. बाबासाहेब आंबेडकर

INDIA THAT IS BHARAT
9922047333

( पोस्ट नः 147 ) बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग पहिला तथागत म्हणतात " मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही ,"

( पोस्ट नः 147 )

    बुध्द आणि त्यांचा धम्म
    तिसरा खंडः भाग पहिला

तथागत म्हणतात " मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही ,"
------------------

15) श्रमण गौतम ज्याप्रमाणे आंकगणनेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते, त्याप्रमाणेच आम्हा ब्राम्हणांची आपल्या शिक्षणक्रमात क्रमशः प्रगती होते.

16) जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी एक दुरकी कोण तिरकी तीन चौके चार असे शंभरापर्यत पाढे शिकवतो गौतमा आता सांग तुझ्या धम्मामध्ये अशाच तह्रेने प्रगतीशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय ?

17) होय असेच मिळते ब्राम्हणा एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषांचे उदाहरण घेऊ. तो प्रथम जातीवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालुन पहिला धडा देतो, नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवु लागतो,

18) ब्राम्हणा ,अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात,बंधु शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित करा  प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा

19) सदाचार संपन्न हो क्षुद्र दोषातही भय आहे, हे ओळखुन स्वतःचे वर्तन ठेव विनयाचे परिपालन कर,

20) हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात. ये श्रमणा हे डोळ्यांनी वस्तु पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस "

21) संयमरहित चक्षुरिद्रियाने रुपग्रहण करताना ज्या सतृष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चिताला बुडवुन टाकतात . त्या द्रृर्वृतींना दुर ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत रहा चक्षुरिद्रियाविषयी सावधान रहा चक्षुरिद्रिये संयमित ठेव

22) इतर इंद्रियांबाबतही असाच निग्रह कर जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस , नाकाने वास घेतोस, जिव्हेने रूची घेतोस, शरीराने वस्तुला स्पर्श करतोस आणि ज्या वेळी त्या वस्तुंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोडुन जाऊ नकोसं

23) शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळविले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात, श्रमणा ये हात राखुन खात जा खाताना चित्त सावध राहु दे केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीरसौष्ठव राखण्यासाठी म्हणुन खाऊ नकोस तर शरीरयष्टी ठिक राहावी, तिचे पोषण व्हावे तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे भोजनसमयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे. नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपुर्ण होईल

रोज वाचा
    " बुध्द आणि त्यांचा धम्म "
बुध्दांनी मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही

     तथागत म्हणतात मी "मार्गदाता आहे ,मोक्षदाता नाही
1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात "सकाळी "  गेलेच पाहिजे "

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो  "
***
        विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर
INDIA THAT IS BHARAT
9922047333

Friday, 2 September 2016

पोस्ट नः 144 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग पहिला धम्मामध्ये बुध्दांचे स्थान

पोस्ट नः 144

बुध्द आणि त्यांचा धम्म
 तिसरा खंडः भाग पहिला

धम्मामध्ये बुध्दांचे स्थान

तथागत बुध्दांनी  आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही

1) ख्रिस्त स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानत असे

2) शिवाय तो आपणाला देवपुत्र मानत असे

3) माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यत मानले नाही तोपर्यत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची अट होती.

4) अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता व देवपुत्र मानण्यावर अवलंबुन ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले

5) इस्लाम धर्माचा प्रणेता महमंद हा स्वतःला परमेश्वराला पैंगबर (प्रेषित ) मानीत असे,

6) याशिवाय तो असे मानीत असे कि माणसाने दोन अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात ( मुक्ती ) नाही

7) इस्लाम धर्मातील मुमुक्षुने प्रथम महंमदास देवाचा ( प्रेषित ) मानले पाहिजे

8) इस्लाम धर्मातील मुमुक्षुने नंतर   महंमद हा परमेश्वराचा शेवटचा पैंगबर आहे असे मानले पाहिजे.

9) इस्लाम धर्मात वरील दोन अटी मानणारयानांच मोक्षाचा मार्ग खुला आहे

10) मुसलमानांच्या मोक्ष हा महमंदाला देवप्रेषित समजण्यावर अवलंबुन ठेवल्यामुळे महंमदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे

11) तथागत बुध्दाने अशी कधीही अट घातली नाही

12) शुध्दोदन आणि माहामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत ह्यापलीकडे स्वतःसंबधी तो अधिक काही म्हणत नाही.

13) येशु ख्रिस्त आणि महंमद यांनी आपापल्या धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली मोक्षाच्या मार्गात आपले महत्व सांगितले तसे तथागत बुध्दांनी केलेले नाही

14) ह्यामुळेच त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबधी विपुल माहीती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यत येऊन पोहोचली नाही

15) पहिली बुध्दसंगिती ही बुध्दांच्या निर्वाणानंतर लवकरच भरविली गेली हे सर्वश्रुतच आहे

16) या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुध्दांच्या कपिलवस्तुचेच रहिवाशी आणि ज्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या निर्वाणकाळापर्यत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगतीला उपस्थित होते

17) परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले

18) त्यांने आनंदाला धम्माचे पठन करायला सांगुन संगीतीला प्रश्न केला हे बरोबर आहे काय ? ज्या ज्या वेळी संगीती होकारत्मक उत्तर देईल त्या त्या वेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तो प्रश्न तिथेच संपवी

रोज वाचा
    " बुध्द आणि त्यांचा धम्म "

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे"

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो "
*******
     
       विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर  

   INDIA THAT IS BHARAT
      9922047333

Thursday, 1 September 2016

पोस्ट नः 143 बुध्द आणि त्यांचा धम्म दुसरा खंडः भाग आठवा 4) धम्मदीक्षेची जोखीम

पोस्ट नः 143

बुध्द आणि त्यांचा धम्म
 दुसरा खंडः भाग आठवा

4)  धम्मदीक्षेची जोखीम
-----------------*
1) पुर्वो तथागत बुध्द राजगृहापासुन 500 योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची एक टोळी राहत होती. हे लोक शिकार करुन मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत,

2) तथागत बुध्द त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्या वेळी ते पुढीलप्रमाणे उपदेश करतात.

3) जो दयाळु आहे तो प्राण्याची हत्या करीत नाही, ( किंवा प्राण्याची हत्या न करणे हा दयाळु माणसाचा धर्म होय ) तो प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो,

4) धर्म अमर आहे या धर्माचे पालन करणारयावर कधीही संकट कोसळणार नाही.

5) विनयशीलता ऐहिक भोगाविषयीची उपेक्षा कोणाला कष्ट न देणे कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्राम्हलोकाचे लक्षण आहे

6) दुर्बलाविषयी कणव बुध्दांच्या शिकवणुकीनुसार शुध्द जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यकता ते मिळाल्यावर थांबणे जन्ममरणाच्या फेरयातुन सुटण्याचे हे साधन आहे. हे शब्द ऐकताच त्या स्त्रिंयांचे परिवर्तन झाले. आणि पुरुष परत आल्यानंतर तथागतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती . तरी त्यांच्या स्त्रिंयांनी त्यांना आवरुन धरले आणि हे मैत्रीचे सुक्त ऐकताच त्यांचेही परिवर्तन झाले

7) आणि तथागतांनी पुढील उदगार काढले.

8) जो प्राणीमात्रांशी  मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अनेक गोष्टींचा लाभ होतो.

9) त्यांचे शरीर नेहमी ( सुखी ) असते त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो त्या वेळीही त्याला एकाग्रता लाभते

10) त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत  आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात . विषारी वस्तुंचा त्याला त्रास होत नाही . आणि युध्दातील नाशापासुन त्याचा बचाव होतो, अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही

11) तो जिथे जिथे राहतो तिथे यशस्वी , हेच ते लाभ होत.

12) हा उपदेश ऐकल्यावर तथागतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली.


रोज वाचा
    बुध्द आणि त्यांचा धम्म "

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो  "
*******
         विश्वरत्न
    डाँ.बाबासाहेब आंबेडकर