Tuesday, 3 January 2017

"स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत", भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, सावित्रीबाई फुले यांचा १८७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!!

                        🙏🏻 ३ जानेवारी १८३१ 🙏🏻
ज्यांनी स्त्रियांन बद्दल "चुल आणि मुल" ही भावना  मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं. आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांचे जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली अश्या "स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत", भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, सावित्रीबाई फुले यांचा १८७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!!

Tuesday, 20 December 2016

*जे चळवळीत भाग घेत नाही ते शेणातले कीडे.*  -- डॉ बाबासाहेब आंबेडकर

*जे चळवळीत भाग घेत नाही ते शेणातले कीडे.*
   __ _डॉ बाबासाहेब आंबेडकर

 जे चळवळीचे कार्य करीत नाही त्यांना बाबासाहेबांनी “शेणातील किडे” असे म्हंटले आहे. ते म्हणतात, समाजात कार्य करणारी माणसे अत्यंत थोडी असतात... बाकीचे
सर्वजण शेनातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात.

अशा माणसाला तु शेनातल्या किड्याचे जीवन जगतो आहेस
याची जाणीव करून देणे हे प्रत्येक सुक्षशीताने आपले कर्तव्य समजले पाहिजे. ज्या शिक्षितांवर बाबासाहेबांनी हि जबाबदारी सोपवली तेच सुशिक्षित आज
कोणतेही कार्य न कर्ता शेनातल्या किड्याचे जीवन जगत असतील. तर त्यांच्याकडून काय अपेक्ष करणार?
चळवळ हि महापुरुषांच्या विचार प्रमाणे करवयाची असते लोकांच्या कालाप्रमाणे नव्हे जे अशी चळवळ करतात ते केवळ सवंग प्रसिद्धीसाठी तसे करीत असतात जगात काही माणसे भित्री असतात

माणसाने एकटे जाण्याचे धैर्य केले पाहिजे एकटे जाण्याचे धैर्य
मी करतो हजारो लोक जरी माझ्या मागे नसेलतरी मी त्यांची पर्वा करीत नाही किंवा त्यांची खंतही बाळगत नाही.

बाबासाहेबांची हि भूमिका पाहिली तर ते लोकांपेक्षा भूमिकेला महत्व देत होते हे आपल्या लक्षात येईल.

जय भिम

🙏🙏*विज्ञानवादी गाड़गे बाबा*🙏🙏

🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤

  🙏🙏*विज्ञानवादी गाड़गे बाबा*🙏🙏

एकदा गाडगेबाबा गावातून
जात असताना नदीच्या काठावर
त्यांना काही भटजी पिंडदानाची
पूजा करत असलेले दिसले.
बाबा तिकडे जाउन म्हणाले-

 "भडजीबुवा..भडजी बुवा..
मले लय भूक लागली बाप्पा,
मी हा भात खाऊ का..??"
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆


गाडगेबाबांचा एकंदर वेश
एखाद्या भिकाऱ्या सारखाच..!!
अंगावर असलेल्या कपड्यात
एकसंध कपडा कुठेच नव्हता,
ठिकठिकाणी ठिगळ लाऊन
तयार केलेलं ते नेसले होते.
त्यांचा तो अवतार बघून
भटजी त्वेषाने म्हणाले-

"अरे वेड्या, हा भात नाही,
याला पिंड म्हणतात पिंड..."!
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

"पिंड म्हणजे काय असते बाप्पा..?
गाडगेबाबांनी प्रश्न केला.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

"अरे हे जे गृहस्थ दिसतायत ना
त्यांचे वडील मृत्यू पावले आहेत,
ते स्वर्गात गेले आहेत,
त्यांच्यासाठी आम्ही हे पिंड ठेवले आहे...

" बाजूला बसलेल्या डोक्याचा गोटा केलेल्या माणसाकडे बोट दाखवत भटजी म्हणाले.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

गाडगेबाबांनी चेहरा प्रश्नार्थक केला, म्हणाले- "त्यायले पिताजी तिकडे स्वर्गात,
भात इथं, त्यायले कसला पोहोचते..??
मले खूप भूक लागली..
मीच खातो तो भात..द्या मले..."
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

"अरे वेड्या,
त्यासाठीच तर मी मंत्र म्हणतोय ना..??"
भटजी रागाने म्हणाले.


"मंत्र बोलून काय होईल बाप्पा..??
" गाडगेबाबांनी लग्गेच प्रश्न टाकला.


"वेड्या, अरे मंत्र म्हटले कि,
हे पिंड त्यांच्या पिताजींना पोहोचणार,
तिकडे स्वर्गात, आणि ते संतुष्ट होणार..
" भटजी बाबांना टाळण्यासाठी बोलला.


"माह्या बाप्पा, काय म्हणता भडजीबुवा..??
मंत्र बोलला कि, भात असा सर्गात जाऊन पोहोचते..??
पण सरग तर लय दूर असेल ना..??
गाडगेबाबा म्हणाले.


"होय रे वेड्या स्वर्ग खूप दूर आहे इथून..
" इति भटजी.


"मबई इतका दूर..??
गाडगेबाबांनी लग्गेच प्रश्न केला.


"अरे हो रे वेड्या, मुंबई काय घेऊन बसलास..??  इथून लाखो-करोडो मैल दूर आहे स्वर्ग..
" भटजी अत्यंत त्रासिकपणे म्हणाले.

"माह्या बाप्पा.. काय म्हणते हे भडजीबुवा..
" असं स्वतःशीच बडबडत गाडगेबाबा नदीच्या पाण्यात उतरले..
चांगल्या कंबरेभर पाण्यात गेल्यावर दोन्ही हात वर आकाशाकडे करून ते जोरात म्हणाले-
"मह्या बाप्पा, बाप्पा..
ह्यायने मंत्र म्हटला कि, ह्यायचा भात तिकडे दूर स्वर्गात जाते रे...
" असं म्हणत त्यांना काय वाटले कोण जाणे..??
 त्यांनी दोन्ही हातांनी भर-भरून पाणी
जोरात हवेत उडवायला सुरुवात केली.
काठावर पूजेसाठी बसलेली माणसं,
भटजी सगळे भिजून गेले. सगळे चिडले बाबांवर.
भट रागाने म्हणाला-
"अरे ए वेड्या, तुला वेड लागले काय रे..??
अरे मुर्खासारखा पाणी काय उडवतोस
आमच्या अंगावर...??"



बाबा त्यांच्याकडे बघून हसले आणि म्हणाले-
"बाप्पा मी, नाय पाणी उडवत..??

"मग काय करतोयस तू हे..??"
भट रागाने म्हणाला.

 "माह्या बाप्पा, मी माझ्या शेताले पाणी देऊन ऱ्हायलो..."



"अरे वेड्या, कुठे आहे तुझं शेत इथे..??"
त्रासिक भट.

"ते तिकडे अमरावतीला हाव..
मी त्यालेच पाणी देऊन ऱ्हायलो ना बाप्पा.." गाडगेबाबा पाणी उडवत शांतपणे म्हणाले.

"हाहाहा..
अरे वेड्या तू उडवलेले पाणी फार फार तर फर्लांगभर जाईल रे..
अमरावती इथून ४०० मैल दूर आहे, तिकडे कसे जाईल?
एवढे साधे कळत नाही तुला..
वेडा रे वेडा..."
भट कुत्सितपणे हसत म्हणाला.


गाडगेबाबा तितक्याच शांतपणे म्हणाले-
"तुह्या मंत्राने जर हा भात लाखो-करोडो मैल दूर सर्गात जात असेल तर माह्य पानी बी माझ्या शेताले पोचायला हवं ना रे बाप्पा...?"

भट निरुत्तर झाला.

अंगावर चिंध्या पांघरलेल्या वेडगळ दिसणाऱ्या मनुष्याने आज तिथे आपल्या वागण्यातून खूप मोठा संदेश लोकांना दिला होता. एकही इयत्ता न शिकलेल्या गाडगेबाबांना जी गोष्ट कळाली होती ती गोष्ट आज "डिग्र्यांनी" भरलेल्या फाईल्स घेऊन फिरणाऱ्या तुमच्या आमच्या सुशिक्षितांना कळत नाही या पेक्षा मोठे दुर्दैव आणि मानसिक गुलामगिरी ती आणखी काय असावी..??

जेव्हा आज-सारखी नियतकालिके, साप्ताहिके, मासिके किंवा प्रिंट मिडिया नव्हता तेव्हा समाज प्रबोधनाचं अत्यंत जिकरीचं काम महाराष्ट्रात संतांनी लोकांना समजेल अशा भाषेत प्रभावीपणे केले हे आजही त्यांना 'टाळ-कुटे देवभोळे' मानणाऱ्या तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रीयांना माहित नाही, हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे दुर्दैव म्हणावे लागेल..!!

Saturday, 17 December 2016

महापारीनिर्वाण दिनी रेल्वेच्या खिशात ७ कोटी


भारतातील भयानक विरोधाभास. वाचा आणि पटलं तर बघा.

भारतातील भयानक विरोधाभास. वाचा आणि पटलं तर
बघा.
१) आम्ही मुलीच्या लग्नासाठी इतका खर्च
करतो जितका तिच्या शिक्षणासाठी कधीच करत नाही.
२) आम्ही अशा देशात राहत आहोत जिथे
पोलिसाला पाहिल्यावर आमच्या मनात
सुरक्षिततेची भावना निर्माण
होण्याऐवजी चिंता निर्माण होते.
३) IAS परीक्षेतील उमेदवार आपली बुद्धिमत्ता वापरून
हुंडा पद्धत किती वाईट आहे यावर अतिशय छान निबंध
लिहून लोकांना प्रभावित
करतो आणि परीक्षा पासही होतो. आणि एक वर्षानंतर
तोचउमेदवार वधूपित्याकडून एक करोड
हुंड्याची मागणी करतो. कारण तो आता एक IAS ऑफिसर
असतो.
४) भारतीय लोक खूप लाजाळू आहेत.
तरीही भारताची लोकसंख्या १२१ कोटी आहे.
५) भारतीय लोक आपल्या मोबाईलच्या पडद्यावर
स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून आवर्जून त्यावर स्क्रीन गार्ड
लावतात. परंतु गाडी चालवना हेल्मेट.
घालण्याची काळजी घेत नाहीत.
६) भारतीय समाज मुलींना बलात्कार होऊ नये म्हणून
काय काळजी घ्यावी हे शिकवतो. पण मुलांना बलात्कार
करू नये हे शिकवत नाही.
७) इथे अतिशय टुकार सिनेमे सुद्धा अतिशय
चांगला व्यवसाय करतात.
८) इथे पोर्नस्टार मुलीला एक सिलेब्रिटी म्हणून
स्वीकारले जाते. पण बलात्कार
झालेल्या मुलीला सामान्य माणूस म्हणूनही स्वीकारले
जात नाही.
९) इथले राजकारणी आमच्यात फुट पडतात
आणि अतिरेकी आमच्यात एकी निर्माण करतात.
१०) इथे प्रत्येकजण घाईत आहे. परंतु कुणीच वेळेत पोचत
नाही.
११) पियंका चोप्रा ने मेरी कोमचे पात्र रंगवून
जितका पैसा मिळाला तितका पैसा मेरी कोमला तिच्या संपूर्ण
आयुष्यात मिळवता आला नाही.
१२) इथे अनोळखी व्यक्तीशी बोलणे धोकादायक मानले
जाते. परंतु अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे चालते.
१३) गीता आणि कुराण यांच्या नावावर
भांडणाऱ्या लोकांपैकी ९९% लोकांनी ते वाचलेले नसते.
१४) इथे बूट आणि चपला वातानुकुलीत दुकानात
विकल्या जातात आणि भाजीपाला रस्त्यावर
विकला जातो.
If you agree then like,comments or share.