Friday, 18 January 2019

नांदेड़ की जाहिर सभा में प्रकाश आंबेडकर का महत्त्व पूर्ण भाषण PRAKASH AMBEDKAR NANDED SPEECH


नांदेड़ की जाहिर सभा में प्रकाश आंबेडकर का महत्त्व पूर्ण भाषण PRAKASH AMBEDKAR NANDED SPEECH

Thursday, 17 January 2019

वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड़ संवाद यात्रेत रामचंद्र येईलवाड यांचे भाषण

वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड़ संवाद यात्रेत रामचंद्र येईलवाड यांचे भाषण

नांदेड येथील संवाद यात्रे मध्ये मुस्लिम समाजाची भूमिका जाकेर चाऊस यांनी मांडली

नांदेड येथील संवाद यात्रे मध्ये मुस्लिम समाजाची भूमिका जाकेर चाऊस यांनी मांडली

वंचित आघाडी तर्फे संवाद यात्रे मध्ये प्रकाशजी आंबेडकर यांची नांदेड येथील सभा

वंचित आघाडी तर्फे संवाद यात्रे मध्ये प्रकाशजी आंबेडकर यांची नांदेड येथील सभा

नांदेड़ बहुजन वंचित अघाड़ी की जाहिर सभा में इम्तियाज़ जलील का ज़बरदस्त भाषण

LATEST SPEECH OF MIM MLA IMTIYAZ JALEEL ON 17 JAN 2019 .AT NANDED RALLY BAHOJAN VANCHIT AGHADI
सत्ता संपादन मेळावा जाहीर सभा, नांदेड आयोजक वंचित बहुजन आघाडी स्थळ : शाहिद रोहित वेमुला परिसर , नवा मोंढा मैदान , कृषि उत्पन्न बाजार समिती , नांदेड 17.01.2019 खा.बँरिष्टर असुदुद्दीन ओवैसी साहेब शत:शत: नमन आपल्या वैचारिक भूमिकेला. मा.खासदार ओवैसी साहेब, आपल्याला मनापासून सलाम करतो.आम्ही अनेक राजकीय पुढारी, नेते ,पक्षाचे अध्यक्ष पाहिले आहेत. त्यांच्या राजकीय भुमिका आम्ही वेळोवेळी पाहत आलेलो आहोत. त्यांची राजकीय भाषणे आम्ही ऐकत आलेलो आहोत.पण...पण आज महाराष्ट्रात च्या नांदेड भुमित एमआयएम पक्षाचे अध्यक्ष म्हणून,वंचित बहुजन आघाडीचा घटक मित्र म्हणून, एक संविधानवादी म्हणून, एक प्रखर देशभक्त म्हणून, एक खरा सेक्युलर नेता म्हणून आज जी भुमिका घेतली जाहीर केली त्या वैचारिक भुमिकेला माझ्या सारखे लाख्खो लोकं तुम्हाला तहे दिल सें लाख लाख धन्यवाद देत आहेत... शुक्रीया अदा करत आहेत. सलाम तुमच्या जिगरबाज दिलेरीला...सलाम तुमच्या जजब्याला !! वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेसला लोकसभा युतीचा प्रस्तावजुन २०१८ मध्ये दिला. मात्र वंचित बहुजन आघाडीने खा.असुदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाशी युती केली आहे त्या मैत्रीच्या आडुन कॉंग्रेस छक्क्या- पंजाचे राजकारण करत आहे. खा ओवैसी भडकावू भाषण करतात, ओवैसी कट्टरवादी आहेत, खा ओवैसींचा पक्ष भाजपची बी टिम आहे म्हणत बाळासाहेब आंबेडकरांनी आधी एमआयएमशी युती तोडावी नंतरच आम्ही बाळासाहेबांशी युती करू अशी कॉंग्रेसवाल्यांनी भुमिका मांडली. मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी कॉंग्रेसची भुमिका अमान्य करत ,"आम्ही मैत्रीसाठी एकदा धरलेला हात सोडणार नाही!" असे कॉंग्रेसला ठणकावले ! खरंतर कॉंग्रेसचा युतीचा इतिहास पाहता मुळात कॉंग्रेसला युतीच करायची नाही. एमआयएम हा एक बहाना आहे. मात्र कॉंग्रेसची सत्तेची नशा खासदार ओवैसी साहेब आपण चुरचुर केली आहे." वंचित बहुजन आघाडी आणि कॉंग्रेस युतीत मी आणि माझा एमआयएम पक्ष अडसर ठरत असेल तर मी बाजूला होतो ! मला एकही जागा देऊ नका पण बहुजन समाजाचे नेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी कॉंग्रेसने सन्मानाने युती करावी आणि बाळासाहेबांच्या कद -हैसिएत नुसार त्यांना युतीत जागा वाटप करा.संविधान विरोधी भाजप आरेसेसचा पराभव करा.मला महाराष्ट्रात येवून मुख्यमंत्री व्हायचे नाही. माझ्या गाडीवर लाल दिवा लागावा अशी माझी मंशा नाही. तर इथला गरीब,ओबीसी, दलित, आदिवासी, धनगर, माळी ,मुसलमान विधानसभेत,लोकसभेत निवडून गेला पाहिजे असे मला मनापासून वाटते !! यासाठीच मी महाराष्ट्रात वंचित समाजासाठी लढाई लढणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यायला आलो आहे. मुस्लिम समाजावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खूप उपकार आहेत. या उपकाराची काही अंशी का होईना त्याची भरपाई करण्यासाठी मी येथे आलो आहे. मी मेल्यावर उपर गेल्यावर मला अल्ला तलाला जबाब द्यावा लागणार आहे. माझा अल्ला मला विचारणार आहे तु जिवंतपणी गोरगरीबांसाठी, दलितांसाठी, शोषितिंसाठी काय केले ? असे विचारल्यावर मला प्रामाणिकपणे उत्तर देता आले पाहिजे. असे सांगत ओवैसी जी आपण ," मी जे युतीबद्दल बोललो तो एक जुमला समजू नका तर माझी ती प्रामाणिक भुमिका कॉंग्रेसच्या अशोक चव्हाणांनी लक्षात घ्यावी" अशी भावनिक साध घातली !! मा ओवैसी साहेब आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या साठी आणि त्यांनी घेतलेल्या वंचित समूहासाठी आज खूप मोठी त्याग भावना व्यक्त करत असताना मी प्रसारमाध्यमांवर आपल्याला ऐकत होते, पाहत होतो तेंव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी तरळले.अरे ज्याला तुम्ही मुसलमानांचा नेता म्हणून नाकारता आहात, तो कट्टरवादी आहे असे संबोधुन तुम्ही त्याला अपमानास्पद वागणूक देत आहात, तो जहाल भाषण करतो म्हणून त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धिक्कार करत आहात ...त्या ओवैसींनी आज त्यांच्या माणुसकी,सेक्युलरझम,गरिब, वंचित-ओबीसीं समूहाबद्दलचा कनवाळूपणा, सत्तेचा माज नसलेला, स्वातंत्र्य, समता,न्याय, बंधुत्वाची बीज रोवणारा ,प्रसंगी आपल्या राजकीय इच्छा आकांक्षाचा त्याग करणारा महान मुसलमान राजकारणी म्हणून सिध्द केले आहे. हि त्यांची भूमिका म्हणजे खरंतर कॉंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या थोबाडीत मारले सारखे आहे. आणि म्हणूनच मा खा.ओवैसी जी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईल, आपले मनापासून आभार मानतो.आज जी आपण नांदेडच्या भुमित भूमिका घेतली ती ऐतिहासिक घटना आहे. आपल्या मैत्रीसाठी आपला आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या भावभावना- इच्छा आकांक्षाची खूप मोठी कुर्बानी देत आहात.. परत एकदा सलाम आपल्या जिगरबाज दिलेरीला !! आपलाच एक कायल चाहता ©सुरेश शिरसाट, अकोला. https://www.facebook.com/suresh.shirs..

Wednesday, 16 January 2019

देशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.

#Once_Again_Ambedkar
देशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.
                                         ---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.                       

देशाचा व व्यवस्थेचा कुठलाही धर्म राहणार नाही हे भारतीय संविधानाने घोषीत केले असले तरी माणसाला धर्म असतो हे त्याच संविधानाने मान्य केले आहेत्यामुळे"व्यवस्था ही ज्या माणसांच्या हातात येते तेव्हा त्या माणसाचा धर्म त्या व्यवस्थेला येतो."हे निर्विवाद सत्य कुणी नाकारू शकते का ? आज प्रत्येक माणुस धर्मातच जन्मतो.त्यामुळे त्याच्यावर त्याच धर्माचे संस्कार बालपणापासून पडत असतातमग आयुष्यभर तो त्याच संस्कारांना उराशी बाळगून जगत असतोत्याच्या संवेदनाबांधीलकी,आपुलकीन्याय हेसुद्धा त्याच धर्माच्या चौकटीत बंधीस्त असते. (तुरळक अपवाद वगळता.) जातिव्यवस्थेसारखे लांछन ज्या समाजव्यवस्थेत फोफावलेले आहे त्या समाजव्यवस्थेत धर्म हे विषच ठरतेकितीही कायद्याच्यासमानतेच्या व समान न्यायाच्या बाजू उचलून धरल्या तरीही माणुस धर्मसंस्कारानेच संचालित होतोमग न्यायालयातला न्यायाधीश असो की देशाचा पंतप्रधान किंवा पोलिस असो की अधिकारीबाबू असो की चपरासी त्याच्या न्यायदानाचे व कार्याचे पहीले मेरीट(प्राधान्यजात व धर्म हेच असतेकारण त्यांच्या संवेदना जातीत व धर्मात बंधिस्त आहेतहे जर रोजच्या आकलनातले वास्तव सत्य असेल तर समान न्यायाच्या वल्गना करून आम्ही आपलीच फसगत करीत आहोत. असे वाटत नाही का ?
जाती-धर्म टिकवून आम्ही प्रशासनिक भरती करीत असू तर न्यायाची अपेक्षा माणसांकडून करायची की त्याच्या जाती-धर्माकडून करायची ? हा यक्षप्रश्न माझ्यापुढे पडतोतो प्रश्न तुमच्यापुढेही असेल असे गृहीत धरण्यास हरकत नाहीकारण न्याय हा देणा-यांच्या जातीय-धार्मिक संवेदनांवरूनच ठरेलेला असेलएवढे निश्चितच. व्यवस्था बदलाच्या व परिवर्तनाच्या लढाया आम्ही कुठल्या आधारावर लढतोय ? समान न्यायाची अपेक्षा कुठल्या आधारावर करतोय ? माणसांवर विश्वास ठेऊन की त्याच्या जातीय-धार्मिक संवेदनांवर विश्वास ठेऊन ? हे अन्यायाचे उघड पण छुपे प्रतिमान नाही का ?
रोहीत वेमुलाची आत्महत्या नव्हती तर तो एक राजकीय खुनाचा बळी ठरला. तर भीमा कोरेगाव येथे झालेला हल्ला हा देखील पूर्वनियोजित राजकीय षड्यंत्राचाच भाग होता. हे आता निर्विवाद सत्य आहेतो एका सरकारी/राजकीय खूनाचा व हल्ल्याचा प्रकार होता. काहींना राजकीय भांडवल मिळाले तर काहींना सत्तेचा पुरस्कार रोहीतमुळे मिळाला व पुढे मिळणारपण या सर्वात दलित समाजाला काय मिळाले ? तर शून्य...आणि फक्त शून्य...असे खून अनेक झालेत व पुढेही होत राहतील.त्यांच्या राजकीय सत्तेचा तो मार्ग आहेपण दलित समाज मात्र राजकीय अक्कलशून्यतेने ग्रासला असल्याने तो कायम पिडीत राहीलखून करणारे सत्तेत बसतील तर ज्यांचा खून होईल ते कायम जमिनीतच गाडले जातील. राजकीय खून करणारे आज सत्तेत आहेत तर ज्या दलित समाजातल्या माणसांचा खून झाला ते कायम आंदोलनात उतरून निवडणूकांत विकले गेलेकुणी विकले या समाजाला ? कुणी राजकीय सौदा केला खूनाचा ? कोण जबाबदार या राजकीय खूनाला ? अन्यायाचे भांडवल करून कुणी कुणी आपले सामाजिक भांडवल करून घेतले ? व त्या आंदोलनातल्या गर्दीचा सौदा करून निवडणूकीतल्या खाऊचा पैसा कुणी गोळा केलाकोण कोण आहेत ते समाजकारणी ? कोणकोणत्या आहेत त्या सामाजिक संघटना ?स्वत:ला दलित व दलितांच्या कैवारी म्हणून घेणाऱ्या त्या संघटना कोणत्या ? कोण त्याचे म्होरके ? का केला जातो दलितांवर होणाऱ्या अन्यायाचा सौदा ? कोण जबाबदार दलितांवर होणाऱ्या अन्यायाला व त्यांच्या खूनाला ? उत्तर शोधावेच लागेल.
रमाई हत्याकांड झालेखैरलांजी झालीबुद्धगया बॉम्बस्फोट झालेजवखेडा झालाशिर्डी झाली, हैद्राबादचा रोहीतचा खून झाला आणि १ जानेवारी २०१७ ला भीमा कोरेगाव येथे जमलेल्या लाखो वंचित समूहावर हल्ला झाला. अजून भविष्यात ही यादी वाढत जाणारव दलित समाज मुक मोर्चेशांती मार्चसर्वपक्षीय / सर्वसंघटनांचे मोर्चे निघत राहणारया मोर्चांमध्ये राजकीय नेतृत्वावर आगपाखड होणारनिषेध होणार व या मोर्चाचे नेतृत्व करणारे ढोंगी समाजकारणी या मोर्चातल्या गर्दीचा सौदा निवडणुकीत करणार व पून्हा राजकीय पक्षांच्या नेतृत्वाला बदनाम करून पून्हा एक हल्ला होण्याची वाट बघत राहणारपून्हा सर्वपक्षीय / सर्वसंघटनांचे मोर्चे काढणारमोर्चाच्या नावावर पैसे गोळा करणारत्या मोर्चाचे नेतृत्व करू पाहणार व पून्हा नेत्यांना बदनाम करून मोकळा होणारहे चक्र असेल सुरू राहणार जोपर्यंत दलितांमध्ये राजकीय अक्कलशून्यता आहे. अन्याय - अत्याचाराचे भांडवल करून मोर्चेकरी झालेले समाजकारणी समाजाचा सौदा करतातआजपर्यंत सामाजिक आंदोलनाचे नेतृत्व केलेते ढीसाळ समाजकारणी ढोंग्यांनीनिकाल काय तर २०१४ च्या निवडणुकांमध्ये हे लाखभर लोकांच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे त्या लाख लोकांच्या मताचा सौदा करून मोकळे झाले व दलितांचे पक्ष व उमेदवार हजाराच्या पुढे गेले नाहीतव पून्हा सत्तेवर यांनी कुणाला बसविले तर त्याच अन्यायकर्त्यांना.
दलितांवर झालेल्या अन्याय अत्याचाराचे भांडवल जितके रिपब्लिकन नेत्यांनी केले नाही त्यापेक्षा जास्त या बेगडी समाजकारण्यांनी व छोट्या छोट्या संघटनांचे दुकान काढून बसलेल्या समाजकारण्यांनी केले आहेनेत्यांविरूद्ध द्वेष व आपल्याप्रती सहानुभूती  मिळवून यांनी समाजाच्या भावना विकल्यासामान्य माणसाने केलेला विद्रोह विकलादलितांना झालेल्या जखमाही यांनीच विकल्याअशा समाजद्रोही समाजकारण्यांपासून दलित समाज सावध होणार की नाही ?
चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या संदर्भाने पसरविण्यात येत असलेले आंबेडकरी विचार ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीसाठी धोक्याचे ठरले आहे.भाषणातून लोकांनी सांगितलेले बाबासाहेब समाजाने प्रमाण मानले असल्याने खरे बाबासाहेब मांडणा-यांना त्रास होणार आहेतो त्रास घेण्याची तयारी जर काहींनी आपल्या खांद्यावर घेतली तर दुकानदा-या चालविण्यासाठी आणि आपापसात फाटाफूट पाडण्यासाठी थाटण्यात आलेले संघटनरुपी दुकाने बंद होतीलआणि एक नवीन प्रवाह या चळवळीसाठी तयार करता येईलअभ्यासूतरुण आणि तात्त्विक विचारांची बैठक असणारी माणसे एकत्र करून आंबेडकरी चळवळीला उभारी देण्याची गरज आहेकाहीच्या भावनिक आंदोलनाला बळी पडलेला तरुण वर्गाला त्या भावनिक संमोहनातून बाहेर काढावे लागणार आहेआंबेडकरी चळवळीतील तरुणांची कल्पनाशक्ती आणि तार्किक बुद्धी वेठीस धरण्यात आली आहेत्यामुळे या तरुणांना योग्य काय आणि अयोग्य काय हे आंबेडकरी विचारांच्या आधारे तपासून पाहताच येत नाहीत्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या तरुण वर्गाचा विश्वास संपादन करावे लागणार आहेकधी प्रखर होऊन तर कधी सौम्य मार्गाने.कारण यांनी स्वतः कधी बाबासाहेबाच्या विचारांचे वाचन केलेले नाहीपण कॅडर च्या माध्यमातून ऐकलेल्या बाबासाहेबांना यांनी इतके प्रचलित केले की जणू यांच्या मुखातूनच बाबासाहेब बोलत आहेतहा प्रतीक्रांतीचा पहिला मजलाच आम्हाला उडवावा लागणार आहेबाकीचे मजले असेच धराशाही होतील.
दुसरा एक तरुणांचा वर्ग आहे जो आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीपासून अलिप्त आहेतो आर्थिक व्यवहाराच्या जगात घर आणि नौकरीमध्ये व्यस्त झालेला आहेज्याला वाटते की आता कुठे समाजात भेदाभेद आहेजो स्वतःला सुरक्षित समझतो आहेजो चळवळीतील आंदोलनाला निरर्थक संबोधतो आहेजो चळवळीपासून दूर जातो आहेजो रोजगाराच्या विवंचनेतआर्थिक परिस्थितीच्या विवंचनेत विचार व चळवळीसोबत जुळत नाहीअश्या तरुण वर्गाला सोबत घेण्यासाठी काही आर्थिकसामाजिक आणि शैक्षणिक स्त्रोतांची निर्मिती करण्याची जबाबदारी आपली आहेया चळवळीतील काहींच्या हातात सद्यस्थितीत ब-यापैकी साधन संसाधने एकवटली आहेतया संसाधनांचा वापर उद्याच्या पिढीसाठी स्त्रोतांची निर्मिती करण्यासाठी करावा लागणार आहेतेव्हाच या चळवळीत हा तरुण वर्ग स्वतःला सुरक्षित समजेलसमाजाची एकजूट त्यातून साध्य होईलअशी अपेक्षा आहेत्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी ही या चळवळीत काम करणा-या तरुण-सुशिक्षित-विचारवंत-आर्थिक संपन्नता मिळविलेल्या लोकांची आहेत्यांची एकजूट झाली तर समाजाला एकत्र करायला वेळ लागणार नाही.
आंबेडकरी चळवळीत आमच्या काही जबाबदा-या आहेत.  विचार आत्मसात करीत असतांना त्याची सत्यासत्यता पळताळून  पाहणेशैक्षणिकआर्थिकसामाजिक आणि सांस्कृतिक स्त्रोतांचे बळकटीकरण करणेआधुनिक संसाधनांचा वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण घेणे व देणेसोबतच ही आधुनिक संसाधने आपल्या हातात घेता येतील असा प्रयत्न करणे; भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सरकारी योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचविणेशासकीय अनुदानाचा वापर करून समाजाचे आर्थिक सबलीकरण करता यावे यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे;वाढत चाललेली राजकीय उदासीनता घालविण्यासाठी राजकीय प्रशिक्षण संस्था किंवा तत्सम प्रयत्न करणेधम्मातील वाढती प्रदूषणे आणि प्रतीक्रांतीची छुपी आक्रमणे याच्या जाळ्यात हा समाज मोठ्या प्रमाणात अडकला आहेत्याला त्यातून बाहेर काढून त्यांच्यात प्रतीक्रांतीची पाऊले ओळखण्याची कुवत निर्माण करण्यासाठी आंबेडकरी विचारातील महत्वाची आचारसंहिता समाजापर्यंत पोहोचविणे. निदान इतक्या काही गोष्टी जरी आम्हाला प्राथमिक स्तरावर करता  आल्या तर निश्चितच सद्यकालीन परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही.
हल्ली चळवळीत नवतरूण उतरतांना पाहून आनंद होतोजरी ते बोटावर मोजण्याइतके तरूण असतील पण त्यांच्यातील समाजाविषयी व चळवळीविषयी दिसणारी तळमळ वाख्खानण्यासारखी आहेचळवळ गतिमान राहील याचा विश्वास आहे. परंतू सोबतच चिंतेची बाब ही की, या नवतरूण पिढीचे अतिउत्साही व अतिभावनिक आंदोलनाने समाजाला व चळवळीला दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतेकारण या नवतरूणांना दिशा देणारा त्यांच्यातलाच थोडा उच्चशिक्षीत किंवा अतिउत्साही नवशिखा नेतृत्वधारी या  नवतरुणांना चुकीच्या मार्गाने आंदोलनास भाग पाडून सामाजिक विद्वेष पसरविण्यास कारणीभूत ठरू शकतो. विवेकाने व भविष्याचा वेध घेऊन केलेले आंदोलन समाजात चैतन्य निर्माण करू शकते तर अविवेकाने केलेले आंदोलन मोठ्या कष्टाने उभ्या केल्या गेलेल्या चळवळीला व समाजाला धोकादायक परिस्थितीत आणू शकतेनिदान याची समज आपल्या नवतरूणांत येणे गरजेचे आहे.
विरोधकांच्या कुठल्या कृतीला विरोध करायचा व कुठे करू नये ? किती प्रतिक्रीयावादी व्हायचे की प्रतिक्रीयावादी न बनता आपला  उद्देश व हेतू साध्य करायचा ? याचा विचार करणे आज गरजेचे आहेफक्त भावनिक विरोधाने समाजहीत सुरक्षित ठेवता येत नाहीतर तत्कालिन परिस्थीतीचा आढावा घेऊन परिस्थितीसापेक्ष व्युहरचना आकारण्यातून चळवळीला सुरक्षित करता येईल. म्हणून सर्व नवतरूण मित्रांना विनंती आहे कीकुठलाही सामाजिक आंदोलनाचा किंवा प्रतिक्रीयावादी आंदोलनाची व्यूहनिती रचतांना चळवळीतील अनुभवसंपन्न कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्यावाकारण त्यांनी केलेल्या चुकासुद्धा तुम्हाला मार्गदर्शक व प्रोरणादायी ठरू शकतातज्यामुळे तुम्हाला तुमचे आंदोलन यशस्वी करण्यात मदत होईलत्यामुळे भावनिकतेतून निर्णय न घेता सारासार विचारानेच आंदोलनाची आखणी करा ! तुमच्या तळमळीततुमच्या प्रामाणिक हेतूसोबततुमच्या चळवळीच्या गांभिर्यासोबतशिवाय तुमच्या आंदोलनातही आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोतफक्त घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नका हीच विनंती.
१ जानेवारी भीमा कोरेगावच्या जातीय दंगलीला आज १ वर्ष पूर्ण होईल. या संपूर्ण १ वर्षात जातीय राजकारण ढवळून निघाले असणार. परीस्थितीय सामाजिक बदल दिसून येणार. अन्याय-अत्याचार झाल्याची जाणीव जिवंत असणार. झालेल्या जखमाही ताज्या असणार. संघटीत राहिले पाहिजे याची नितांत गरज भासत असणार. न्याय मिळविण्याकडे लक्ष असेल. अन्यायाला वाचा फुटेल याची आस असेल. परंतु अन्याय करणारे राज्यकर्ते आणि सत्ताधारी कायम असतील. त्यांना कायम ठेवून आम्ही परिवर्तनाची अपेक्षा करू शकत नाही. आम्हाला न्याय पाहिजे असेल तर देशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करावा लागेल. देशाच्या व राज्याच्या राजकारणाच्या सातबाऱ्यावर भाजप किंवा कॉंग्रेस या आलटून पालटून नावे येणाऱ्या पक्षांना हद्दपार करून वंचितांच्या नावे या राजकारणाच्या सातबाऱ्याचे फेरफार करावे लागणार आहे. देशाच्या व राज्याच्या सातबाऱ्यावर वंचितांच्या नावाचे फेरफार करून जोपर्यंत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील ‘वंचित बहुजन आघाडी’ला सत्तेत बसवत नाही तोपर्यंत न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. तेव्हा येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये देशाच्या व राज्याच्या राजकारणाच्या सातबाऱ्याचे फेरफार करण्यास सज्ज व्हा.
                                                                                                                adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.