काय हवंय मित्रा तुला
काय ????
मोठ्यांन बोल जरा
हं आरक्षण हवंय???
त्या स्कार्पीओमधून खाली उतर
हातातल्या अंगठ्या
गळ्यातील चैन काढून टाक.
आरक्षण देतो रे
फक्त एक दिवस
आमच्या ओंजळीनं पाणी पिऊन दाखव
गळ्यात मडकं
ढुंगणाला खराटा बांधून
पाच पावलं चालून दाखव
भूक काय असते
माहीती आहे?
अपमान जिंदगीचा पाहीला आहेस का?
वर्गाच्या बाहेर बसून
बघ शिक्षण घेता येता का?
जसं आम्ही शिवाजी महाराज की जय म्हणतो
तसं फक्त तु एकदा बाबासाहेब आंबेडकर नाव घेऊन दाखवशील
मित्रा??
खरंच कुणाला कळले का
हो बाबासाहेब
की समजून घ्यायचंच नाही
असं ठरवलय तर मग
बाबासाहेब तुमच्या जवळचे कसे झाले
बाबासाहेब समजून घ्यायला
फक्त एकच गोष्ट पुरी आहे मित्रा
रमा नावाचा झंझावात
ज्याला कळला
त्याला बाबासाहेब समजायला
फारसा वेळ लागत नाही...
त्यांनी दिलेली लोकशाही आहे ही
तु मोर्चा काढ
पण एक लक्षात ठेव
या लोकशाहीला कुठं डाग लागता कामा नये...
नाहीतर गाठ
या निळ्या पाखरांशी आहे 🙏
काय ????
मोठ्यांन बोल जरा
हं आरक्षण हवंय???
त्या स्कार्पीओमधून खाली उतर
हातातल्या अंगठ्या
गळ्यातील चैन काढून टाक.
आरक्षण देतो रे
फक्त एक दिवस
आमच्या ओंजळीनं पाणी पिऊन दाखव
गळ्यात मडकं
ढुंगणाला खराटा बांधून
पाच पावलं चालून दाखव
भूक काय असते
माहीती आहे?
अपमान जिंदगीचा पाहीला आहेस का?
वर्गाच्या बाहेर बसून
बघ शिक्षण घेता येता का?
जसं आम्ही शिवाजी महाराज की जय म्हणतो
तसं फक्त तु एकदा बाबासाहेब आंबेडकर नाव घेऊन दाखवशील
मित्रा??
खरंच कुणाला कळले का
हो बाबासाहेब
की समजून घ्यायचंच नाही
असं ठरवलय तर मग
बाबासाहेब तुमच्या जवळचे कसे झाले
बाबासाहेब समजून घ्यायला
फक्त एकच गोष्ट पुरी आहे मित्रा
रमा नावाचा झंझावात
ज्याला कळला
त्याला बाबासाहेब समजायला
फारसा वेळ लागत नाही...
त्यांनी दिलेली लोकशाही आहे ही
तु मोर्चा काढ
पण एक लक्षात ठेव
या लोकशाहीला कुठं डाग लागता कामा नये...
नाहीतर गाठ
या निळ्या पाखरांशी आहे 🙏