"बुद्धज्ञान "

=======================================================================
१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
---------  गौतम बुद्ध .


२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे. ---------  गौतम बुद्ध .

३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे. --------- गौतम बुद्ध .

४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन. ---------
गौतम बुद्ध .

५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
--------- गौतम बुद्ध .

६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
---------  गौतम बुद्ध .

७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके!
---------  गौतम बुद्ध .

८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
---------  गौतम बुद्ध .

९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
---------  गौतम बुद्ध .

१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
---------  गौतम बुद्ध
========================================================================
👌🏿एक व्यक्ती ने  तथागत बुद्ध से पुछा...
आनंदउत्सव  करने का बेहतरीन दिन कौन सा है?
बुद्ध ने प्यार से कहा.
मौत से एक दिन पहले...
व्यक्ति- मौत का तो कोई वक्त नहीं..!
तथागत बुद्ध ने मुस्कुराते हुए कहा..
तो जिंदगी का हर दिन आखरी समझो... और आनंदउत्सव करो.

       "भवतू सब्ब मंगलम"

                   🙏🙏🙏🏻

========================================================================
🙏किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा ? याचे फार छान उत्तर भगवान गौतम बुद्धने बरोबर दिले आहे,🙏

""नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडीलां ची काळजी घेता यावी.
अब्रुने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. ""
🔷🔷
💐💐💐💐
========================================================================🍀बुद्धांची शिकवण🍀

🌀१) मूर्खांची संगती करु नका.
🌀२) विद्वानांची संगती करा.
🌀३) आदरणीय व्यक्तींचा आदर करा.
🌀४) अनुकूल देशात निवास करा.
🌀५) चांगली कामे करा.
🌀६) चित्तास स्थिर ठेवा.
🌀७) अनेक विषयांचे ज्ञान असू द्या.
🌀८) विद्वान व्हा.
🌀९) संयमी राहा.
🌀१०) बोलणे मधुर व सत्य असू द्या.
🌀११) मातापित्याची सेवा करा.
🌀१२) पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा.
🌀१३) उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या.
🌀१४) दानधर्म करा.
🌀१५) धम्माचरण करा.
🌀१६) नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा.
🌀१७) निर्दोष कर्मे करा.
🌀१८) पापकर्मापासून अलिप्त राहा.
🌀१९) मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.
🌀२०) धम्म कार्यात प्रमादरहित असा.
🌀२१) गौरवाची भावना जोपासा.
🌀२२) मनाच्या शांतीची जोपासना करा.
🌀२३) क्षमाशील असा.
🌀२४) संतुष्ट असा.
🌀२५) कृतज्ञ असा. लीन असा.
🌀२६) सुसमयी धम्माचे श्रवण करा.
🌀२७) मधुर भाषी, मितभाषी असा.
🌀२८) नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या.
🌀२९) ब्रम्हचारी राहा.
🌀३०) चार आर्यसत्यांचा अंगीकार करा.
🌀३१) निर्वाणाचा साक्षात्कार करा.
🌀३२) वेळोवेळी धम्मचर्चा करा.
🌀३३) वैराग्य अंगी बाणा व तपस्वी व्हा.(देहदंड नव्हे)
🌀३४) निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऎहिक धर्माच्या सानिध्यात आल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ हेवा.
🌷-नमो बुद्धाय🌷
💐💐💐💐🙏🙏🙏

  ।।पंचशील।।
     
🌹 1⃣मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
🌹2⃣मी चोरी करण्यातासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
🌹3⃣मी कामवासनेच्या अनाचारापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
🌹4⃣मी खोटे बोलण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
🌹5⃣मी मद्य,मादक तसेच इतर सर्वमोहांत पाडणार्या मादक वस्तुंच्या सेवनातासुन अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.
------------------------

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
  🔵चार आर्य सत्य🔵
🍀1⃣दुःख  :

:- मानवी जीवनात विविध स्वरुपात दुःख अस्तित्वात असते.

🍀2⃣दुःख समुदाय  :

:- दुःख तीव्र इच्छा व तृष्णेपासून निर्माण होते.

🍀3⃣दुःख निरोध  :

:- तीव्र इच्छा व तृष्णेला समूळ नष्ट करुन दुःखापासून मुक्तता होवू शकते.

🍀4⃣दुःख निरोगामिनी प्रतिपदा  :

🌷:- दुःख मुक्तिचा मार्ग आहे. तो मार्ग आहे बुद्धांनी मार्गदर्शीत केलेला आर्य अष्टांगिक मार्ग.
↔↔↔↔↔↔↔↔🔶आर्य अष्टांगिक मार्ग🌷
       (सदाचाराचा मार्ग)
🍃1⃣सम्यक दृष्टि  :- निसर्ग नियमा विरुद्ध कोनतीही गोष्ट होऊ  शकते ही गोष्ट न मानणे.
🌱2⃣सम्यक संकल्प  :-  म्हणजे योग्य निर्धार, विचार.
🌿3⃣सम्यक वाचा  :- करुणायुक्त व सत्यपुर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे.
🌾4⃣सम्यक कर्मांत  :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
🌸5⃣सम्यक आजिविका  :- वाईट मार्गाने आपली उपजिविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
🌺▶सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरीत नाश करणे.
🌴7⃣सम्यक स्मृती  :- तात्विक गोष्टींचे स्मरण करुन चित्तास ( मनाला) जागृत ठेवणे.
🌲8⃣सम्यक समाधी  :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन् अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे।
▶▶▶▶▶▶▶▶
   🔴दहा पारमिता🔴
          (शिल मार्ग)
🍁1) शिल  :- शील म्हणजे नितिमत्ता,वाईट गोष्टी न करण्याकडे  असलेला मनाचा कल.
🍁2) दान  :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता,रक्त,देह अर्पण करणे.
🍁3)उपेक्षा  :-  निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत रहाणे.
🍁4) नैष्क्रिम्य  :-  ऐहिक सुखाचा त्याग करणे.
🍁5)वीर्य  :-  हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे.
🍁6) शांति  :- शांति म्हणजे क्षमाशीलता,द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
🍁7) सत्य  :- सत्य म्हणजे खरे,मानसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
🍁8) अधिष्ठान  :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
🍁9) करुणा  :- सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.
🍁10) मैञी  :- मैञी म्हणजे सर्व प्राणी,मित्र,शञूविषयी देखिल नव्हे तर सर्व जीवनमाञाविषयी बंधुभाव बाळगणे.
🙏🙏🙏🙏🙏🙏

जर आपण या बौद्ध् तत्वांचा, शिकवणुकीचा आपल्या जीवनात अंगीकार केला तर आपले अस्तित्व असताना नक्कीच आपण दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो व जीवंतपणीच
मुक्ति प्राप्त करु शकतो.

🍀 सबका मंगल हो .🍀.....🙏🙏🙏

विद्रोह हा कायम रचनात्मक असायला हवा,
ज्यात उद्याची स्वप्ने दिसली पाहिजेत असा
काहीसा अर्थ मला बुद्ध तत्वज्ञानात जाणवतो.
रोहिणी नदीच्या वादावरून शाक्य आणि कोलिय
या दोन महाजनपदांमध्ये असलेला वाद
सोडवताना बुद्धाने घेतलेली संयमित भूमिका,
श्रमण संस्कृतीला वैदिक लोक त्रास देत
असतानाही बुद्धाने सांगितलेला सम्यक मार्ग या
सगळ्या गोष्टी मला कायम फ्यासिनेटिंग
वाटल्यात . फार ताणायचं नाही आणि तुटू
देखील द्यायचं नाही, हा बुद्धाचा संदेश कायम
डोक्यात असतो, त्यामुळे शत्रूंची कमी आणि
मित्रांची गर्दी जास्त जमवता आली. स्वतःच
असं काही विशेष तत्वज्ञान नाही, पण
आयुष्याच्या उन्हात जेव्हा जेव्हा अनुभवाचे
चटके लागतात, तेव्हा डोक्यावर सावली धरायला
बुद्ध कायम सोबत असतो.कधी तो मित्राच्या
रुपात असतो, कधी शिक्षकांच्या, कधी
आईच्या, कधी भावाच्या तर कधी
झाडाफुलांच्या रुपात असतो. असे अनेक जिवंत
बुद्ध कायम माझ्या आजूबाजूला असतात,
त्यांना एकदा ओळखल कि मग अडचण नाही,
सगळ काही सुरळीत असत. असे जिवंत बुद्ध
घडवणारा 'तथागत' एका वर्षाने आणखी
मोठा होणार आहे, त्यालाV कितीही दुर्लक्षित
करा, कितीही टाळा, कुठे न कुठे तो तुम्हाला
भेटतोच, आणि सांगतो 'अत्त दीप भव,स्वयंप्रकाशित हो'!

No comments:

Post a Comment