आमच्या बद्दल थोडे

वाचक मित्रांनो,       

                    खूप दिवसापासून इच्छा होती सम्राट पेपर online मिळावा पण तो काही शक्य झाला नाही, पण तो लवकरच होईल आशी आशा बाळगते, या पेपर मधील लेख खूप माहिती देणारे असतात हा पेपर नसून बहुजन समाजाचा आरसा आहे आणि मी या पेपर ची नियमित वाचक आहे. मला या मधील लेख खूप आवडतात. त्यामुळे मला माझा समाजाची सध्याची परिस्थिती समजते सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्या समाजाशी कुठे तरी जवळीक असावी आणि माझा समाजात चाललय काय? त्यांच्या आडचणी काय आहेत? माझा समाज खरोखरच प्रगतीकडे वाटचाल करतोय काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे मला “वृत्तरत्न सम्राट” मध्ये मिळतात.  

                   मग मी ठरवलं कि या लेखांचा संग्रह करावा आणि आपल्या बांधवाना पण तो सहज देता यावा आणि समाज प्रबोधनला हातभार लावावा. तसा विचार खूप छान होता पण कळत नवते तो कसा साध्य करावा. हा मोठा प्रश्न माझ्या पुढे उभा होता खूप दिवस विचार केला पण काही कळेना मग मनात विचार आला कि, आपण या सगळ्या लेखचे online संचय करू म्हणजे ते दीर्घकाळ टिकतील आणि सांभाळायचे पण टेन्शन राहणार नाही, जेव्हा हवे तेव्हा भेटतील आणि माझ्या इतर बांधवांना पण सहाज मिळतील.

                   आणि अशा प्रकारे सम्राट लेख या ब्लोग चा जन्म झाला!!!. आणि आपण पण या ब्लोगचे नियमित वाचक व्हा आणि समाजाशी जवळीक साधा आणि " वृत्तरत्न सम्राट पेपर" नियमित वाचा आणि आपल्या इतर बांधवांना पण वाचण्यास प्रेरित करा हिच विनंती.

                    

****   जय भिम    ****

****   जय बुध्द    ****

****   जय भारत  ****

3 comments:

  1. जय भीम

    ReplyDelete
    Replies
    1. Jay Bhim
      this is Ashok Bankar from Aurangabad currently i am doing MA in 'Media And Cultural Studies' in Tata Institute of social science ,Mumbai
      in my assignment topic is based on 'dainik Samrat' newspaper Maharashtra. i saw your whole blog-page and i think you done important work of documentation about Samrat newspaper. most help get me in your blog.
      please share yourn email or contact number

      can you help me some

      Delete
  2. Please सम्राट papar link pdf file

    ReplyDelete