Wednesday, 18 October 2017

*"जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे - बाबासाहेब"*

*"जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे- बाबासाहेब"*
प्रथमतः अस्पृश्य समाजात मोडणाऱ्या महार, चांभार, भंगी, मातंग वगैरे ज्या जाती आहेत त्यात एकी नाही हे आपण सर्वांचे दुर्दैव होय. ही एकी नसण्याचे खरे कारण म्हणजे
हिंदुसमाजातील जातीभेद हेच आहे. ह्या जातिभेदाला महार, मांग, चांभार किंवा भंगी हे जबाबदार नाहीत. जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे हा आपल्याकडे वाहत येणारा नरक आहे आणि त्यामुळे जातीभेदाची कटू फळे व त्याचा दुष्परिणाम आपल्याला सोसावा लागत आहे आणि खेदाची गोष्ट हि कि, हे हिंदुलोक जातीभेद तर दूर करीत नाहीतच उलट अस्पृश्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचा जातीभेद दृढ करावयास झटतात.. मातंगांना हाती धरून महाराविरुद्ध उठवावयाचे.. चांभारांना हाती धरून त्यांना महार-मांगाविरुद्ध उठवावयायचे व भेद्निती आमच्यात पसरावयाची आणि आपली एकी होऊ द्यावयाची नाही मात्र
या जातीभेदाची मूळ जबाबदारी जरी हिंदूसमाजावर असली तरी आपण आपली जबाबदारी विसरणे आत्मघाती ठरेल.. आपल्यातील जातीभेद नाहीसे करणे व आपल्यात भेद्नितीचा फैलाव न होऊ देणे हे आपले आद्यकर्तव्य आहे आणि आपण हे साधल्याशिवाय आपला उत्कर्ष कधी होणार नाही. महार-मांगातील-चांभारामधील रोटिबंदी , बेटीबंदी अजिबात नष्ट झाली पाहिजे.. प्रत्येक जात जर आपली शेखी मिरविण्याकरिता आपल्या जातीसच चिकटून राहील.. महार महारच राहील व मांग मांगच.. चांभार..भंगी च राहील तर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार आपण करू शकणार नाही. "महार किंवा मांग.. चांभार या नावात असे काय आहे कि त्यात तुम्हांला अभिमान वाटावा?? या नावाने असा कोणता उज्वल इतिहास तुमच्या डोळ्यासमोर राहतो कि जुनी परंपरा चालू ठेवण्यास तुम्ही झटावे?" सर्व समाज या नावांना तुच्छ लेखित आहे तुम्हांला आज उकिरड्यावरील कचऱ्याची देखील किंमत नाही तेव्हा या नावाचा अभिमान न बाळगता आपले दोनही समाज एका वरवंटयाखाली चिरडले जात आहेत, हे जाणले पाहिजे दोघांनी एकजुटीने राहिले पाहिजे.. आपल्याला गरीब जनतेचे म्हणजे आपले स्वतःचे जिणे सुखाचे करावायचे आहे म्हणून आपण आपलीच शक्ती वाढविली पाहिजे आहे !!
विचार- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ- पंढरपूर कुर्डूवाडी येथील बाबासाहेबांचे भाषण ३१-१२-१९३७

एससी, एसटी च्या निधीवर मुख्यमंत्र्यांचा दरोडा