Wednesday, 6 December 2017

एका महानायकाच्या निर्वाणापूर्वीचे पाच दिवस... ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले.

एका महानायकाच्या निर्वाणापूर्वीचे
पाच दिवस...
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ
शांत झाले. भारतीय राजकारणातील
आयुष्यभर उन्हात उभे राहून
तमाम
दलितांना मायेची सावली देणारी कोट्यवधी दलितांची माऊली पोरके
करून निघून गेली. पण
जाताना भारताला राज्यघटना आणि अशोकचक्राची देणगी देऊन
गेली. धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊन
गेली. आयुष्यभर संघर्ष
करून मिळवून दिलेल्या अधिकाराचे जतन
करण्यासाठी रिपब्लिकन
पक्षाची मांडणी करून गेली. ‘बुद्ध
आणि त्यांचा धम्म’
या ऐतिहासिक ग्रंथाला पूर्णत्व देऊनच
आपल्या ऐहिक
जीवनाची समाप्ती केली. गुरुवार, दि. ६
डिसेंबर १९५६
रोजी सकाळी सहा वाजता एक पाय
उशीवर, डोक्याजवळ
हस्तलिखित कागद काही महत्त्वपूर्ण
ग्रंथ,चष्मा एक इंजेक्शन
सिरिज, एक औषधाची बाटली या अवस्थेत
माईसाहेबांनी बाबासाहेबांना पाहिले.
निद्रावस्थेत बाबांचे देहावसान
झाले होते. हे कळल्यावर सात
कोटी दलितांच्या अनभिषिक्त
राजाच्या अंतिम क्षणी कुणीही नसावे
असे म्हणून जगजीवनराम
बाबासाहेबांचे पाय धरून
ओक्साबोक्सी रडले. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या शेवटच्या पाच
दिवसांचा प्रवास अतिशय व्यस्त
आणि भावनिक होता.
शेवटचे पाच दिवस- १ डिसेंबर १९५६
रोजी बाबासाहेबांनी दिल्लीतील
मथुरा रोडवरील बुद्धिष्ट आर्ट एक्झिबिशन
पाहिले त्यातील विविध
देशांतील बुद्धाचे पुतळे पाहिले, त्यानंतर परत
निघताना कॅनाट प्लेस
रोडवरील बुक डेपोत जाऊन ७ पुस्तके विकत
घेतले व
रात्री उशिरापर्यंत हेच पुस्तके चाळीत
राहिले. २ डिसेंबर १९५६
रोजी दिवसभर त्यांनी ‘बुद्ध
आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे लेखन
केले. त्यामुळे दुपारचे जेवण उशिराच घेतले.
संध्याकाळी दलाई
लामांच्या सत्कार कार्यक्रमात उपस्थित
राहिले.
यावेळी त्यांनी भारतात बुद्ध
धम्माचा प्रचार-प्रसार
कसा करता येईल याची चर्चा केली,
रात्री परत ग्रंथाचे लेखन केले.
यावेळीच ते नानकचंद रत्तुना म्हणाले की,
पुस्तके माझ्या हयातीत
प्रकाशित होतील काय? बौद्ध
धम्माचा भारतभर मी प्रचार करू शकेन
काय? त्यावर नानकचंद रत्तू ‘हाँ साहब’
एवढेच म्हणाले. पण
बाबासाहेब आज थोडे थकलेले होते म्हणून
रात्री १०.३० वाजताच
झोपले. ३ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब
आंबेडकरांनी १६ डिसेंबर
रोजी व मुंबईत बौद्ध धम्मदीक्षा समारंभ
कार्यक्रम आखला तसे
मुंबईच्या कार्यकत्र्यांना कळविले. नानकचंद
रत्तूना रेल्वेची फस्ट
क्लासची चार तिकिटे बुक करण्यास
सांगितली. पण तिकिटे बुक
झाली नाहीत तेव्हा बाबासाहेबांनी १४
डिसेंबरची विमानांची तिकिटे
बुक केली. १४ ते १८ डिसेंबरपर्यंत बाबासाहेब
मुंबईत कुमारसेन
समर्थ यांच्याकडे थांबणार होते. ४ डिसेंबर
१९५६
रोजी रात्रीच्या जागरणामुळे
बाबासाहेब उशिरा उठले. पण खूपच
थकलेले वाटत होते.११ वाजता जैन धर्मीय
अधिवेशनासंबंधी चर्चा केली. त्यानंतर
त्यांनी रिपब्लिकन
पक्षाच्या अनुषंगाने थोर समाजवादी नेते
एस.एम.जोशी व
प्र.के.अत्रे यांना पत्र
लिहिली त्याचप्रमाणे भारतात बौद्ध
धम्माचा प्रसार
करण्यासाठी आर्थिकसाह्य मिळावे म्हणून
ब्रह्मदेशाच्या सरकारला एक पत्र लिहिले.
५ डिसेंबर १९५६
रोजी बाबासाहेब मुंबईत
होणारा धर्मांतर सोहळा, भारतात
धर्माचा प्रचार या चिंतेत होते. दिवसभर
उर्वरित ग्रंथाचे लेखन केले
हे ग्रंथ आपल्या हयातीत प्रकाशित व्हावेत,
अशी त्यांची तळमळ
होती. रात्री त्यांना अस्वस्थ वाटत होते.
अशा अवस्थेतही बुद्ध
आणि धम्म ग्रंथाची प्रस्तावना लिहिली.
अत्रे,
जोशी यांना लिहिलेली पत्रे
डोळ्यांखालून घातली. झोपेचे इंजेक्शन
घेऊन झोप येत नव्हती. हे सारे जवळून नानकचंद
पाहात होते.
या अनुषंगाने ते म्हणतात
मला बाबासाहेबांचा चेहरा थकलेला दिसत
होता.
अशा अवस्थेतही त्यांनी मुंबईच्या तिकिटाची कार्यक्रमाची चौकशी केली.
तेवढ्यात स्वयंपाकी सुदाम
बाबांनी जेवणास बोलावले. डायनिंग
हॉलचा मार्ग ड्रार्इंग रूममधूनच होता.
या हॉलच्या दोन्ही बाजूंनी ग्रंथाची खचून
भरलेली कपाटे होती ते
पाहातच बाबासाहेब डायनिंग हॉलकडे गेले.
इच्छा नसतानाही दोन
खास खाल्ले. ड्रार्इंग हॉलमध्ये आल्यानंतर
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर डोळे मिटून थोडा वेळ स्तब्ध झाले.
एक दीर्घश्वास
सोडला त्यांनी त्रिशरण म्हटले त्यानंतर
नानकचंदकडून मालिश करून
घेतली. मसाज झाल्यानंतर
काठीच्या आधाराने उठले व उठतानाच
‘चल उचल कबिरा तेच भवसागर डेरा’ असे
म्हणाले नानकचंदाना बुद्ध
गीताची रेकॉर्ड लावण्यास सांगितली.
त्यांना चिंता होती.
दलितांच्या भविष्याची, रात्री ११.१५
वा. नानकचंद रत्तू
घरी जाण्यास निघाले पण परत
बाबासाहेबांनी बोलावून घेतले
त्यांनी लिहिलेली पत्र जवळ ठेवण्यास
सांगितले. ११.३५ वा.
नानकचंदांनी बाबासाहेबांची परवानगी घेतली,
रत्तूनी बाबासाहेबांचे
जवळून शेवटचे दर्शन घेतले. अखेरचा प्रवास ६
डिसेंबर १९५६
रोजी सकाळीच बाबासाहेब निघून
गेल्याची बातमी स्वयंपाकी सुदामबाबांनी दिली.
नानकचंदांनी दिल्लीच्या प्रसारमाध्यमांन
ा ही बातमी दिली. ११.५५
वा. मुंबईच्या पी.ई
सोसायटीच्या ऑफिसमध्ये फोन
केला घनशाम
तळवटकर यांना प्रथम बातमी दिली.
त्यानंतर औरंगाबादला फोन
करून बळवंतराव वराळे यांना ही दुःखद
बातमी सांगितली. त्यानंतर
वा-यासारखी ही बातमी सर्वत्र
पसरली.
दिल्लीच्या निवासस्थानी तत्कालीन
पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू
इतर मंत्री यांनी भेट
दिली.सायंकाळी ४.३० वा.
बाबासाहेबांचा पार्थिव देह ट्रकने
दिल्ली विमानतळावर आणला.
बाबासाहेबांच्या अंतिम
प्रवासाची सुरुवात झाली. रात्री ९.००
वा. हे
विमान नागपूरला उतरण्यात आले.
ज्या ठिकणी दीक्षा समारंभ
झाला, त्या ठिकाणी त्यांचा देह अंतिम
दर्शनासाठी ९ ते १२
वा.पर्यंत ठेवण्यात आला.१२ वा. हे विमान
नागपूरहून निघाले व
रात्री १.५० वा. मुंबईच्या सांताक्रुझ
विमानतळावर पोहोचले.
त्या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय
जमलेला होता. त्या ठिकाणाहून
बाबासाहेबांना राजगृहावर आणण्यात
आले. त्या ठिकाणी प्रचंड
आक्रोश सुरू होता. अन्त्यसंस्काराल
ा जागा दिला नाही बाबासाहेबांच्या
अंतिम संस्काराची व्यवस्था सुरू
करण्याची वेळ येऊन ठेपली. हिंदू
कॉलनीच्या हिंदू स्मशानभूमीत
अन्त्यसंस्कार करू न देण्याची हळूच
चर्चा सवर्णात
असल्याची जाणीव झाली.
तेव्हा कार्यकर्ते अस्वस्थ झाले पण
त्यांनी निर्णय घेतला. मी हिंदू म्हणून
मरणार नाही.
अशी प्रतिज्ञा करणा-
या बाबासाहेबांचा अंतिम संस्कार
हिंदूच्या स्मशानभूमीत कशाला? व प्रचंड
गर्दी लक्षात
घेता त्यांचा अंतिम संस्कार
शिवाजी पार्कवर करण्यावर एकमत
झाले. पण तत्कालीन म्युनिसिपल कमिशनर
पी. आर. नायक
यांनी विरोध केला व
परवानगी नाकारली. त्यानंतर सध्या मुंबईत
असलेल्या आंबेडकर महाविद्यालयाच्य
ा ठिकाणी मोकळे मैदान होते
तेथे अन्त्यसंस्कार करण्याचे ठरले. पण
ती जागादेण्यासा ठी काँग्रेसने विरोध
केला तेव्हा बाबासाहेबांच्या
जवळचे कार्यकर्ते सी. के. बोले
यांच्या मालकीची जमीन होती.
त्या जमिनीवर अन्त्यसंस्कार करण्यास
सांगितले व
त्या ठिकाणी बौद्ध धम्म विधिनुसार
भिक्खू एच धर्मानंद
यांच्या उपस्थितीत भदन्त आनंद कौशल्य
यांच्या हस्ते
हा अन्त्यसंस्कार पार पडला...जय भीम

Wednesday, 1 November 2017

राज्यातील नवबौध्द समुदायास बौद्ध समाजाप्रमाणे अल्पसंख्याक विकास विभागाच्या सर्व सुविधा / योजनांचा लाभ अनुज्ञेय असल्याबाबत.

राज्यातील नवबौध्द समुदायास बौद्ध समाजाप्रमाणे अल्पसंख्याक विकास विभागाच्या सर्व सुविधा / योजनांचा लाभ अनुज्ञेय असल्याबाबत.

official link
https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

सांकेतांक क्रमांक :: 201709281611349814


GR download link

Wednesday, 18 October 2017

*"जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे - बाबासाहेब"*

*"जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे- बाबासाहेब"*
प्रथमतः अस्पृश्य समाजात मोडणाऱ्या महार, चांभार, भंगी, मातंग वगैरे ज्या जाती आहेत त्यात एकी नाही हे आपण सर्वांचे दुर्दैव होय. ही एकी नसण्याचे खरे कारण म्हणजे
हिंदुसमाजातील जातीभेद हेच आहे. ह्या जातिभेदाला महार, मांग, चांभार किंवा भंगी हे जबाबदार नाहीत. जातीभेद ही वरून वाहत आलेली गटारगंगा आहे हा आपल्याकडे वाहत येणारा नरक आहे आणि त्यामुळे जातीभेदाची कटू फळे व त्याचा दुष्परिणाम आपल्याला सोसावा लागत आहे आणि खेदाची गोष्ट हि कि, हे हिंदुलोक जातीभेद तर दूर करीत नाहीतच उलट अस्पृश्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचा जातीभेद दृढ करावयास झटतात.. मातंगांना हाती धरून महाराविरुद्ध उठवावयाचे.. चांभारांना हाती धरून त्यांना महार-मांगाविरुद्ध उठवावयायचे व भेद्निती आमच्यात पसरावयाची आणि आपली एकी होऊ द्यावयाची नाही मात्र
या जातीभेदाची मूळ जबाबदारी जरी हिंदूसमाजावर असली तरी आपण आपली जबाबदारी विसरणे आत्मघाती ठरेल.. आपल्यातील जातीभेद नाहीसे करणे व आपल्यात भेद्नितीचा फैलाव न होऊ देणे हे आपले आद्यकर्तव्य आहे आणि आपण हे साधल्याशिवाय आपला उत्कर्ष कधी होणार नाही. महार-मांगातील-चांभारामधील रोटिबंदी , बेटीबंदी अजिबात नष्ट झाली पाहिजे.. प्रत्येक जात जर आपली शेखी मिरविण्याकरिता आपल्या जातीसच चिकटून राहील.. महार महारच राहील व मांग मांगच.. चांभार..भंगी च राहील तर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार आपण करू शकणार नाही. "महार किंवा मांग.. चांभार या नावात असे काय आहे कि त्यात तुम्हांला अभिमान वाटावा?? या नावाने असा कोणता उज्वल इतिहास तुमच्या डोळ्यासमोर राहतो कि जुनी परंपरा चालू ठेवण्यास तुम्ही झटावे?" सर्व समाज या नावांना तुच्छ लेखित आहे तुम्हांला आज उकिरड्यावरील कचऱ्याची देखील किंमत नाही तेव्हा या नावाचा अभिमान न बाळगता आपले दोनही समाज एका वरवंटयाखाली चिरडले जात आहेत, हे जाणले पाहिजे दोघांनी एकजुटीने राहिले पाहिजे.. आपल्याला गरीब जनतेचे म्हणजे आपले स्वतःचे जिणे सुखाचे करावायचे आहे म्हणून आपण आपलीच शक्ती वाढविली पाहिजे आहे !!
विचार- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
संदर्भ- पंढरपूर कुर्डूवाडी येथील बाबासाहेबांचे भाषण ३१-१२-१९३७

एससी, एसटी च्या निधीवर मुख्यमंत्र्यांचा दरोडा

Tuesday, 11 April 2017

११ एप्रिल देशातील पहिल्या सत्यशोधक चळवळीचे संस्थापक,स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती महोत्सवास विनम्र अभिवादन.

११ एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती...

११ एप्रिल -
क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले या महामानवाचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
एका सत्यशोधकांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
२०० वर्षे झाकुण ठेवलेली रायगडावरील छत्रपती  शिवराय यांची समाधी शोधुन पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या महापुरूषांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
छत्रपती शिवराय यांच्या जीवन चरित्रावर पहिला पोवडा करणाऱ्या शाहीराचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
भारतरत्न , कायदे तज्ञ, संविधानकार डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या महागुरू चा जन्म दिवस.

११एप्रिल -
मुलींना शिक्षणाची दरवाजे ऊघडी करून देणाऱ्या शिक्षकाचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
स्त्री शिक्षणात व इतर समाज कार्यात स्वत: च्या पत्नीला खंबीरपणे ऊभे करणारे महामानव यांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
सतीची चाल, केश वपन इत्यादी समाजातील अनिष्ठ चाली-रितींचा नायनाट करणाऱ्या समाजप्रबोधनकार यांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
उच्चभ्रु ब्राम्हण संस्कृती ने निर्माण केलेल्या शुद्र-अतिशुद्र या गलिच्छ विचारांचा नाश करून माणसांना माणसात बसवणाऱ्या महा-मानवाचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
दलितांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वत: ची विहीर सदैव बहाल करणाऱ्या महा-पुरूषांचा जन्म दिवस.

११ एप्रिल -
बहुजण समाजाला सर्व क्षेत्रापासुन वंचित ठेवणारे खरे दुश्मन शोधुन बहुजण समाजाला सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या महासंशोधकांचा जन्म दिवस .

|| जय जोती जय क्रांती ||


...महात्मा जोतिबा फुले यांचा जिवनपट:-
इ.स. ११ एप्रिल १८२७ - जन्म.
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
इ.स. १८४९ - वरील कारणांमुळे वडिलांशी मतभेद व गृहत्याग
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ - 'तृतीयरत्न' नाटकाचे लेखन.
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवा पुनर्विवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - वडील गोविंदराव यांचा मृत्यू
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ - 'गुलामगिरी' ची लेखन
इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८३ - 'शेतकऱ्याचा आसूड'चे लेखन
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले
🏻.जय जोति....🏻

Tuesday, 7 February 2017

🔵👉🏻.. ७ फेब्रुवारी २०१७ माता "रमाई भीमराव आंबेडकर" १२०वी जयंती..👈🏻🔵

🔵👉🏻.. ७ फेब्रुवारी २०१७ माता "रमाई भीमराव आंबेडकर" १२०वी जयंती..👈🏻🔵

७ फेब्रुवारी १८९७ "माता रमाई भीमराव आंबेडकर" जयंती निमित्त "माता रमाईला" माझा कोटी-कोटी प्रणाम..🙏🏻

रमाई म्हणजे कठोर कर्तव्यनिष्ठेचे मुर्तिमंत प्रतिक, तिच्या कर्तव्यकठोर निष्ठेतुनच भारत देशात भारतीय घटनेचे शिल्पकार तसेच कोहिनुर हि-या समान डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांन सारखा दैदिव्यमान सुर्य या जगास लाभला.

माता "रमाई भीमराव आंबेडकर" यांच्या१२०व्या जयंतीनिमित्त माता रमाईस कोटी-कोटी वंदन..🙏🏻🙏🏻सर्वांना हार्दीक हार्दीक शुभेच्छा...💐💐💐

🙏🏻..जय भीम..🙏🏻
🙏🏻..जय माता रमाई..🙏🏻

Tuesday, 3 January 2017

"स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत", भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, सावित्रीबाई फुले यांचा १८७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!!

                        🙏🏻 ३ जानेवारी १८३१ 🙏🏻
ज्यांनी स्त्रियांन बद्दल "चुल आणि मुल" ही भावना  मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं. आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांचे जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली अश्या "स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत", भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, सावित्रीबाई फुले यांचा १८७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!!