Thursday, 24 September 2015

तुम्ही म्हणालात शिक्षण हे वाघिणीचं दुध आहे. आणि हे दूध जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही...

तुम्ही म्हणालात शिक्षण हे वाघिणीचं दुध
आहे.
आणि हे दूध जो कोणी पिईल तो
गुरगुरल्याशिवाय
राहणार नाही...
हे दुध आम्ही प्यायलो पण मांजरीसारखे डोळे
लावून
पितोय...
म्हणून आम्हाला गुरगुरता काही येत नाही...
.
काहींच्या अंगात हे दुध क्रांतीरुपाने भिनलंय पण
काहींनी बेईमानी केलीये...
तुम्ही आम्हाला जगात महान असा बौध्द धम्म
दिला...
पण आमच्या मनातून अजूनही ३३ कोटी
काल्पनिक दगडधोंड्यांचे वास्तव्य जाता जात
नाही...
.
बाबा आम्ही तुमच्या कृपेने शिकलो सवरलो पण
तुम्ही दिलेल्या २२ प्रतिज्ञा आजही आम्हाला
समजल्याच नाहीत...
.
आता गणपती बसवलाय... आम्ही तिथे जाणारच
कारण आम्ही सर्वधर्म समभाव मानणारे आहोत...
मग तुम्ही दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे उल्लंघन झाले
तरी
चालेल...
कारण आम्ही वरून बौध्द झालोय पण फक्त बेगडी
आहोत...
आतून अजून हिंदू 'महार'च आहोत...
.
बुध्दालाच हत्तीचे मुंडके बसवून पुजा करतोय...
बुध्दालाही ३३ कोटींच्या पंक्तीत बसवून
तुमच्या
विचारांशी गद्दारी करतोय...
माफ करा बाबा आम्हाला आम्ही अजून महारच
म्हणवून घेण्यात धन्यता मानतोय...
.
निळी टोपी निळाच सदरा घालतोय...
अन घरात गणपती बसवून
खुशाल जय भीम म्हणतोय...
खुशाल जय भीम म्हणतोय...
🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment