Friday, 15 July 2016

# डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनवर १२ मे, १९५६ रोजी केलेले भाषण #

# डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनवर १२ मे, १९५६ रोजी केलेले भाषण #

" मला बुद्ध धम्म का आवडतो ?
 . .    मला दिलेल्या थोड्या वेळात मला दोन प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे.
पहिला प्रश्न : "मला बुद्ध धम्म का आवडतो ?" आणि
दुसरा प्रश्न : "वर्तमानस्थितीत तो जगाला कसा उपयोगी आहे ?"
"मला बुद्ध धम्म आवडतो, कारण त्यामध्ये इतर कुठल्याही धर्मात नाहीत अशी तीन तत्त्वे एकत्रितपणे शिकविण्यात आली आहेत. इतर सर्व धर्म हे ईश्वर आणि आत्मा आणि मृत्यूनंतरचे जीवन यामध्येच गुंतलेले आहेत. बुद्ध धम्म प्रज्ञेची (अंधश्रद्धा आणि दैववाद याऐवजी समजदारपणा किंवा ज्ञान) शिकवण देतो. तो करूणा (प्रेम) शिकवितो, तो समता शिकवितो. पृथ्वीवरील चांगल्या आणि सुखी जीवनासाठी मानवाला हेच आवश्यक असते. बुद्ध धम्माची ही तीन तत्त्वे मला प्रभावित करतात. ही तीन तत्त्वे सर्व जगाला प्रभावित करतील. ईश्वर आणि आत्मा हे समाजाचे संरक्षण करू शकत नाहीत."
     जगात आणि विशेषतः दक्षिणपूर्व आशियाला आकर्षित करू शकणारी तिसरी गोष्ट बुद्ध धम्मात आहे. जगावर कार्ल मार्क्स आणि साम्यवाद, ज्याचा तो निर्माता आहे, यांचा जोरदार हल्ला झाला आहे. हे अत्यंत गंभीर असे आव्हान आहे. मार्क्सवाद आणि साम्यवाद हे ऐहिक विषयांशी संबंधित आहेत. त्यांनी सर्व राष्ट्रांच्या धार्मिक संस्थांचा पाया खिळखिळा केला आहे. ऐहिक व्यवस्थेशी जुळलेले नसताना सुद्धा धार्मिक व्यवस्थेसाठी ही आज स्वाभाविक बाब आहे की, धार्मिक व्यवस्थेवरच लौकीक व्यवस्था अवलंबून असते, लौकीक व्यवस्था ही धर्माच्या आशेशिवाय अधिक काळ टिकू शकत नाही, ती किती दूर असली तरी.
      दक्षिणपूर्व आशियातील बौद्ध राष्ट्रे साम्यवादाकडे वळल्यामुळे मी फारच आश्चर्यचकीत झालो आहे. याचाच अर्थ ते बुद्ध धम्म काय आहे हे जाणत नाहीत असा होतो. बुद्ध धम्म हा मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांना पूर्णपणे उत्तर आहे असा मी दावा करतो.
     रशियन प्रकारचा साम्यवाद हा रक्तरंजित क्रांतीमुळेच घडून येऊ शकतो. बुद्धाने सांगितलेला साम्यवाद हा रक्तविहीन मानसिक क्रांतीने घडून येतो. ज्यांना साम्यवाद अंगिकारायचा आहे त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, भिक्खूसंघ ही साम्यवादी संघटना आहे. तेथे खाजगी संपत्तीला स्थान नाही. यामुळे हिंसा घडून आली नाही. मनातील बदलामुळे हे शक्य झाले आणि ही व्यवस्था २५०० वर्षे टिकून राहिली. त्या व्यवस्थेचा -हास झाला तरी ते विचार अजूनही जीवंत आहेत. रशियन साम्यवादाने या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे. त्यांना अजूनही दोन प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.
पहिला प्रश्न आहे  : साम्यवादी व्यवस्था ही नेहमीकरिता का आवश्यक आहे ? रशियन लोक कधीही करू शकले नसते असे कार्य त्यांनी केले आहे हे मान्य केले पाहिजे, परंतु जेव्हा हे कार्य घडून आले आहे तेव्हा लोकांनी बुद्धाने शिकविलेल्या प्रेमासह स्वातंत्र्य का उपभोगू नये ? दक्षिणपूर्व आशियातील राष्ट्रांनी रशियाच्या जाळ्यात उडी मारण्यापूर्वी काळजी घ्यावी. ते कधीही त्या जाळ्यातून बाहेर पडणार नाहीत. त्यांना बुद्धाने काय शिकविले याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बुद्धाच्या शिकवणीला त्यांनी राजकीय स्वरूप देणे आवश्यक आहे. दारिद्य्र आजही आहे आणि ते नेहमीसाठी राहिल. रशियामध्येही दारिद्य्र आहे. तथापि, दारिद्य्र मानवी स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे कारण होऊ शकत नाही.
       दुर्दैवाने बुद्धाची शिकवण ही योग्य प्रकारे समजून घेण्यात आली नाही, त्यांची शिकवण ही सिद्धांत आणि सामाजिक सुधारणा यांचे मिश्रण होते, हे लोक पूर्णपणे विसरलेले आहेत. बुद्ध धम्म हा एक सामाजिक संदेश आहे याची जाणीव झाली की, त्याचे पुनरूज्जीवन हे चिरकाली ठरून बुद्ध धम्म हा प्रत्येक व्यक्तीसाठी आकर्षणाची बाब कां हे जग जाणायला लागेल.
                          (सही)
               ( भी. रा. आंबेडकर )

.२६ अलीपूर रोड,
नवी दिली
दिनांक १२ मे, १९५६

(संदर्भ : आद. श्याम तागडे, आय.ए.एस. लिखित ग्रंथ " बोधिसत्त्व आंबेडकरांचे बुद्ध धम्म मिशन " मधील परिशिष्ट - ६)

चलो मुंबई ! चलो मुंबई !! चलो मुंबई !!!

चलो मुंबई !    चलो मुंबई !!     चलो मुंबई !!!

😂 आंबेडकरी माणसं,
👉गल्लीतले नेते,
👉गल्लीबोळातल्या संस्था,
👉संघटना,
👉विचारवंत,
👉लेखक,
👉भाषणकार,
👉कवि,
👉संस्थाकार,
👉पक्षकार (राजकीय),
👉जयंती मंडळे,
👉बुद्धविहार समित्या,
👉फेसबूककार,
👉वॉट्सअॅपकार,
👉आंबेडकरी पत्रकार,
👉वर्तमानपत्र, मासिक, त्रैमासिक, पाक्षिक, वार्षिकांकाचे संपादक (खंडणीवसूलदार),
👉जाहीरातकार,
👉समाजाचे दुःख विकणारे सावकार,
👉चळवळीचे भांडवलदार इ. सर्व

😹👊🏼 तुम्ही सर्व कुणीतरी जिवानिशी मारले जाण्याची वाट बघत बसलात का ?

😹👊🏼 तुम्ही सर्व कुणीतरी हैद्राबाद, खैरलांजी, खर्डा, सोनई, शिर्डी, जवखेडा किंवा अन्य ठिकाणी तुमच्यातला कुणीतरी जिवानिशी मारला जाण्याची वाट बघत बसला आहात का ?

😹👊🏼 कुणीतरी जिवानिशी मारा तेव्हाच आम्ही रस्त्यावर येऊ किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची किंवा भगवान बूद्धाची विटंबणा करा तेव्हाच आम्ही रस्त्यावर येऊ अशी वाट पाहत आहात का ?

🐍 आंबेडकरी चळवळीवर कुंडली (गुंडाळी) मारून बसलेल्या विद्वानांनो...

🗡🔪 अरे समाजात कुणीतरी एक मारला जातो तर तुम्ही पेटून उठता व जिवाचे रान करता...

🏠आंबेडकर भवन पाडून तुमच्या कित्येक चळवळीतल्या पिढ्या यांनी मारल्या. व भविष्यात आंबेडकर भवनातून घडू पाहणाऱ्या हजारो-लाखो कार्यकर्त्यांना यांनी मारले. तरी तुम्ही गप्पच...?🔪🗡

👹 पुतळ्यांची विटंबना झाली की रस्त्यावर उतरणारे तुम्ही किंवा घरातून तरी काथ्याकूट करणारे तुम्ही...

🏠आंबेडकर भवन पाडून उध्वस्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच संपुर्ण आंबेडकरी चळवळीची व बौद्ध धम्म चळवळीची विटंबना करण्यात आली. तरी तुम्ही गप्पच घरात बसून...

🏤🏬👞🎩🚗 चळवळीने दिलेला बंगला, माडी, गाडी, नौकरी, साडी, चोळी, सुट, बूट, ऐशोआराम व समाजाने केलेली प्रशंसा तुम्ही चळवळीवर केल्या गेलेल्या या आक्रमण काळात घरात बसून राहण्यासाठी नव्हे...

🏃🏻🏃🏻चला आता घरातून बाहेर पडा...🏃🏻🏃🏻🏃🏻

दि. १९/०७/२०१६ ला...

🙏 चळवळीच्या अस्तित्वासाठी व चळवळीवर आक्रमण करून तुमच्या कार्यकर्त्यांच्या पिढ्या मारणाऱ्या व चळवळीचे केंद्रबिंदू उध्वस्त करून चळवळीची विटंबना करणाऱ्यांना परतवून लावण्यासाठी...🙏

🏃🏻मुंबई विधानभवनावर हल्लाबोल मोर्चात सामिल व्हा !🏃🏻

स्थळ : राणीबाग भायखळा ते मुंबई विधानभवन, मुंबई.
वेळ :- सकाळी ११.०० वा.
दि. : १९/०७/२०१६
नेतृत्व : मा. बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व आपण सर्व...

👬 खूप झाले आपले आपले, आता आपल्यातलेच विदूषक संपवायचे. व त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारची गादी हालवायची.👬
🏃🏻बघता काय, चला आता मुंबई मोर्चात सामिल व्हा ! 🏃🏻

मधु कांबळे, लोकसत्ता यांचा लेख अवश्य वाचा... 👇🏻

मधु कांबळे, लोकसत्ता यांचा लेख अवश्य वाचा... 👇🏻

प्रकाश आंबेडकर यांना बाबासाहेबांचा वारसा सांगून सत्तापदे मिळविता आली असती, परंतु त्यांनी स्वाभिमानाने सत्ता मिळविण्यावर भर दिला व संघर्ष सुरूच ठेवला. तर रामदास आठवले यांनी सत्तेसाठी इतर पक्षांच्या झेंडय़ांचे ओझे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर लादले. यातूनच आंबेडकरी चळवळीपुढे एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे..
गेल्या महिनाभरात आंबेडकरी चळवळीवर पुन्हा नव्याने खल व्हावा, अशा दोन घटना घडल्या. आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेली दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याची पहिली घटना. त्यापाठोपाठ रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश ही दुसरी घटना. हा अचानक घडलेला योगायोग की घडवून आणलेला योगायोग, यावरही उलटसुलट चर्चा सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या घटनेच्या मागे एक राजकीय हिशेब आहे, एवढे मात्र निश्चित. हिशेब मांडणारा कुणीही असो, आंबेडकरी चळवळीला तो मारक आहे, हेही तेवढेच खरे.
पहिल्या म्हणजे आंबेडकर भवन पाडल्याच्या घटनेचे राज्यभरातील आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. आंबेडकर भवन पाडणारे शासकीय सेवेतील मूठभर अधिकारी आणि समाज अशी सरळ विभागणी झाली आहे. ही वास्तू पाडण्याचे समर्थन करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठय़ा कष्टाने उभ्या केलेल्या संस्थांपासून आंबेडकर कुटुंबीयांना अलग पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते बाबासाहेबांनी तयार केलेल्या विविध संस्थांच्या घटनांचा आधार घेत आहेत. हे खरे आहे की बाबासाहेबांनी आपले सर्व जीवन समाजासाठी आणि देशासाठी व्यतीत केले. त्यासाठी अपार कष्ट सोसले, मान-अपमानाची तमा बाळगली नाही. त्याच बाबासाहेबांपुढे आज जगातील मानवतावादी समाज नतमस्तक होत आहे. राजकारण असो, समाजकारण असो, की संस्थात्मक उभारणी असो, बाबासाहेबांनी आपल्या जीवनात उच्चतम सामाजिक नैतिकता पाळली,नव्हे तसे जगले आणि सर्वच समाजापुढे त्यांनी तसा आदर्श ठेवला. त्याचा वेगळा अर्थ काढून बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्थांपासून आंबेडकर कुटुंबीयांना दूर ठेवण्याचा आटापिटा सुरू आहे. हे कोणत्या नैतिकतेत बसते? बाबासाहेबांनी फक्त आपल्या कुटुंबाचाच विचार केला असता तर, कुणी राज्याच्या मुख्य सचिवपदरयत पोहोचले असते का? देशातील कोटय़वधी दीनदुबळा समाज कुठे राहिला असता? बाबासाहेबांनी समाजासाठी कुटुंबाकडे दुर्लक्ष केले, किंबहुना स्वत:चे कुटुंबही समाजाचा एक भागच मानले, त्यांनी मनाची विशालता दाखवली.. त्यांच्या पश्चात आंबेडकर कुटुंबाचा मानसन्मान राखण्याइतपत अजून आपले मन मोठे झाले नाही, हाच त्याचा अर्थ. हा भावनेचा नव्हे नैतिकतेचा प्रश्न आहे.
बाबासाहेबांच्या कुटुंबातील त्यांचे पुत्र भय्यासाहेब असो, मीराताई असो, प्रकाश, भीमराव किंवा आनंदराज हे काही वारसा हक्काने एखाद्या संस्थेवर फक्त दावा सांगत नाहीत, तर त्यांनी आपल्या परीने आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे, करीत आहेत. आंबेडकर भवन पाडून त्या जागी १७ मजली इमारत बांधण्याचे आणि ते आंबेडकरी चळवळीचे केंद्र बनविण्याचे मनसुबे जाहीर करण्यात आले. कोणत्याही चळवळी टॉवरमधून तयार होत नाहीत, तर त्या झोपडपट्टीतून, चाळीतून जन्माला येतात. त्या रस्त्यावर वादळासारख्या घोंघावतात. अशा वादळी चळवळी व्यवस्था बदलण्यास हातभार लावतात. या चळवळीत आंबेडकर कुटुंब कायम अग्रभागी राहिले आहे. आंबेडकर भवन पाडण्याचे समर्थन करणारे कधी आंबेडकरी चळवळीत होते का? शासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याने उच्च पदाचा आधार घेऊन विपश्यनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेऊन लोकांना अध्यात्माकडे, पर्यायाने अंधश्रद्धेकडे नेण्याची घातक परंपरा सुरू केली.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आंबेडकर भवन पाडणे आणि रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळणे हा घडवून आणलेला योगायोग असला-नसला तरी, आंबेडकरी चळवळीच्या भवितव्याबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आज आंबेडकरी चळवळ असो की राजकारण असो, त्यात दोन प्रमुख नेत्यांची तुलना केली जाते. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले. या दोघांमधील नेतृत्व-संघर्षही जगजाहीर आहे. आज तरी या दोन नेत्यांच्या भूमिकांवर आंबेडकरी चळवळ किंवा राजकारण हेलकावे खात आहे.  प्रकाश आंबेडकरांची राजकीय भूमिका कुणाला मान्य असो अथवा नसो, परंतु आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेली वास्तू पाडल्याच्या विरोधात ते पुढे आले आणि त्यांच्यामागे मोठय़ा संख्यने कार्यकर्ते उभे राहिले. ते सर्व गटा-तटांतील आहेत, हे विशेष. प्रकाश आंबेडकरांना एखादी खासदारकी किंवा मंत्रिपद मिळणे सहज शक्य असतानाही त्यांनी केवळ सत्तेचे राजकारण केले नाही. देशातील इतर घराणेशाहीप्रमाणे ते वारसा हक्काने रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वावर दावा सांगू शकले असते. मात्र दलित, आदिवासी, ओबीसी, कामगार, कष्टकरी, शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी आधी ते रस्त्यावर उतरले. पुढे राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही त्यांनी एका जातीत अडकलेल्या पक्षाचा परीघ रुंदावला. सत्तावंचित समाजघटकांचा पक्ष त्यांनी केला. बाबासाहेबांचा वारसा सांगून त्यांना सत्तापदे मिळविता आली असती, परंतु त्यापेक्षा त्यांनी स्वाभिमानाने सत्ता मिळविण्यावर भर दिला. स्वत: दोन वेळा खासदार झाले. त्यांनी निवडून आणलेल्या तीन आमदारांच्या बळावर त्यांच्या पक्षाला राज्याच्या सत्तेत सहभागही मिळाला. मात्र ते कुठल्या युती-आघाडीत अडकले नाहीत.यश मिळो अथवा अपयश, प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पक्षाच्या चिन्हावर शिक्का मारण्याचा स्वाभिमान त्यांच्या अनुयायांना शिकविला. त्यांनी सत्तेच्या राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व दिले. रोहित वेमुला आत्महत्येच्या प्रकरणात त्यांनी प्रस्थापितांविरुद्ध आघाडी उभी केली. कन्हैयाकुमार प्रकरणाच्या निमित्ताने त्यांनी लोकशाहीवर येऊ पाहणाऱ्या संकटाचा सैद्धांतिक आणि रस्त्यावर उतरून मुकाबला करण्याची भूमिका घेतली. खर्डा, जवखेडा दलित हत्याकांडानंतर त्यांनी परिवर्तनवादी विचारांच्या संघटनांच्या नेत्यांना जवळ करून, जातिअंताची प्रबोधनात्मक चळवळ सुरू केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कन्नड लेखक कलबुर्गी यांची हत्या करणाऱ्या सनातन्यांच्या विरोधात निधडय़ा छातीने ते उभे राहिले. त्यांची ही सत्तेकडून संघर्षांकडे वाटचाल सुरू आहे. पूर्वी त्यांच्यावर भाजपचे छुपे समर्थक असा आरोप व्हायचा, आता त्यांना डाव्यांनी घेरले आहे, अशी टीका केली जात आहे. खरे तर डावे आणि उजवे या कुणामध्येही आंबेडकरी विचार सामावून घेण्याची क्षमता नाही. आंबेडकरी राजकारणाचा अजेंडा केवळ सत्ता असता कामा नये, तर तो जातिअंताचा म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा असला पाहिजे. हा विषय आज तरी कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंडय़ावर नाही. आर्थिक विषमता संपुष्टात आणण्यासाठी गरिबी हटावसारखे कार्यक्रम राबवले जातात, मग सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी जाती हटाव कार्यक्रम का हाती घेतला जात नाही? सर्वच राजकीय पक्षांसाठी हा प्रश्न आहे.
रामदास आठवले हे संघर्षांतून तयार झालेले नेतृत्व आहे. मात्र कोणताही ठोस अजेंडा न घेता त्यांची वाटचाल सत्तेकडे सुरू राहिली.त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे नाव घेतले, परंतु मतपेटीतून त्याचे भक्कम अस्तित्व कधीही ते दाखवू शकले नाहीत. अन्य प्रस्थापित पक्षाच्या आधारानेच त्यांनी सत्तापदे काबीज केली. त्यासाठी त्यांनी कधी हाताचा पंजा, कधी घडय़ाळ, तर आता धनुष्यबाण आणि कमळावर शिक्का मारण्याची सवय आपल्या अनुयायांना लावली. स्वत:च्या खासदारकीसाठी, मंत्रिपदासाठी इतर पक्षांच्या झेंडय़ाचे ओझे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर लादले. अर्थात रामदास आठवले यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी कोणती राजकीय भूमिका घायची हा त्यांचा अधिकार आहे. राजकारण हे डावपेचावर चालते. त्या डावपेचाचा भाग म्हणून ते कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी करण्यास मोकळे आहेत. नुकतेच त्यांना केंद्रातील भाजप सरकारमध्ये राज्यमंत्रिपद मिळाले आहे. सत्तेच्या माध्यमातून समाजपरिवर्तन त्यांना अपेक्षित असेल. मात्र आठवले आता संघर्षांकडून सत्तेत स्थिरावत आहेत, एवढे मात्र नक्की.
वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरलेला समूह सत्तेपेक्षा चळवळीवर जास्त प्रेम करणारा आहे. म्हणूनच एके काळी रस्त्यावर उतरून जातिव्यवस्थेला धक्के देणारे आमदार-खासदार-मंत्री नसलेले राजा ढाले, नामदेव ढसाळ आजही आंबेडकरी समाजाच्या हृदयात घर करून आहेत. विद्यापीठ नामांतरासाठी लॉँगमार्च काढणारे प्रा. जोगेंद्र कवाडे एका आमदारकीपेक्षा मोठे वाटतात, सत्तापदांची फिकीर न करता सामाजिक परिवर्तनासाठी जनआंदोलन उभे करणारे आणि अशा चळवळींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे प्रकाश आंबेडकर एका खासदारापेक्षा लोकांना अधिक जवळचे वाटतात, तद्वतच मंत्री रामदास आठवले यांच्यापेक्षा रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे, पोलिसांच्या लाठय़ाकाठय़ा खाणारे, पॅँथर रामदास आठवले सर्व समाजाला आपले वाटतात,सत्ता विचार जगवण्यास उपयोगी पडतेच असे नाही. उलट सत्ता कधी कधी विचार मारते किंवा भ्रष्ट करते असाच आजवरचा इतिहास आहे. परंतु संघर्षांतून चळवळ जिवंत राहते आणि चळवळ विचार जगवते. म्हणूनच आता पुन्हा एकदा नव्याने सत्ता की संघर्ष, असा प्रश्न आंबेडकरी चळवळीपुढे उभा राहिला आहे.

🔵अभी नही तो कभी नही.🔵

🔵अभी नही तो कभी नही.🔵
भारतात व महाराष्ट्रात ऐतिहासिक आंबेडकर भवन उध्वस्त करणा-यांच्या व त्यांना साथ देणा-यां सरकारच्या विरोधात १९/०७/२०१६रोजी  होणा-या नियोजित महामोर्च्याच्या दरम्यान सरकार किंवा विरोधक गणिमी कावा करण्याच्या तयारीला लागले असतील.कसा ही करून हा मोर्चा रद्द करण्यासाठी देशात अथवा महाराष्ट्रात दंगल घडवून आंणतील  किंवा एखादे प्रकरण ब्रेकींग न्युज म्हणून सतत टिव्हीला दाखवण्याच्या प्रयत्नात असतील .कारण हया मोर्च्याकडे कोणाचेही लक्ष जावू नये म्हणून.परंतु आपले लक्ष एकच असले पाहिजे १९ जुलैचा मोर्चा मध्ये सामिल होऊन सत्ताधारी पक्षाला हादरून सोडायचे.पुन्हां एकदा या देशात रिडल्सची पुर्नवर्ती करून गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून देण्याची वेळ आलेली आहे.पक्ष कुठला असूद्या,नेता कोणी ही असेना,पक्षीय झेंडे हातात कुठलेही पकडा,पण मोर्च्यात सामिल व्हा, हा लढा फक्त ऐका ऐतिहासिक आंबेडकर भवनसाठी नसून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक वास्तुचे जतन व सुरक्षित रहाण्यासाठी हा ऐतिहासिक लढा आहे.
      जयभीम 🙏फक्त स्वाभिमानी भीमसॆनिकासाठी



हा सत्याग्रह करताना कदाचित सरकार शांतता भंग होउ नये म्हणून आपणाला कोणत्यातरी कलमाखाली पकडून तुरुगांत घालील.तर तुरुगांत जाण्याकरिता तुमची तयारी पाहीजे.ज्यांना आपल्या बायकामुलांची काळजी वाहावयाची असेल अशा लोकांनी ह्या सत्याग्रहात मुळीच भाग घेउ नये असे मी निक्षुन सांगतो.आम्हाला सत्याग्रहात जी मानसे पाहिजेत ती निधड्या छातीची व स्वाभिमानी अशी पाहिजेत.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
 ५ जुलै १९२७ मुंबई.

✒ उमेश मि नेवरेकर.
    📞९८३३१५७३३२.
मी मोर्चाच्या वाटेवरी... !!
१९ जुलै मुंबई राणीबाग ते विधानभवन.

ऊठ रे मुर्द्या...चल बापाच्या रश्रणाला बस झाली झोप ऊठ रे मुर्द्या ऊठ....

ऊठ रे मुर्द्या...चल बापाच्या रश्रणाला बस झाली झोप ऊठ रे मुर्द्या ऊठ....

चलो मुंबई !
चलो मुंबई !!
चलो मुंबई !!

आंबेडकरी माणंस,
गल्लीतले नेते,
गल्लीबोतल्या संस्था,
संघटना,
विचारवंत,
लेखक,
भाषणकार,
कवि,
संस्थाकार,
जयंती मंडळे,
बुद्धविहार समित्या,
फेसबुककार,
वॉट्सअँपकार,
आंबेडकरी पञकार,
वर्तमान, मासिक, ञेमासिक, पाश्रिक, संपादक (खंडणीवसुलदार)
जाहीरतकार,
समाजातचे दु:ख विकणारे सावकार,
चळवळीचे भांडवलदार इ.सर्व

आंबेडकर भवन पाडुन उद्धवस्त करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत संपुर्ण आंबेडकरी चळवळीची व बौद्ध धम्म चळवळीची विटंबना करण्यात आली...
तरी तुम्ही गप्पच घरात बसुन
बाबासाहेबांमुळे मिळालेला बंगला, गाडी, नोकरी, साडी, सुट, बुट, ऐषाआराम इ.व समाजाने केलेली प्रशंसा.तुम्ही चळवळीवर केल्या गेलेल्या या आक्रमण काळात घरात बसुन राहण्याची वेळ नव्हे तर घरातुन बाहेर पडण्याची वेळ आहे..
दि.१९/०७/२०१६ ला
चळवळीच्या आस्तित्वासाठी व चळवळीचे केंद्रबिंदु उद्धवस्त करुन चळवळीची विटंबना करणार्या हरामखोरांना त्यांना त्याची औकात दाखवुन देण्यासाठी
मुंबई विधानभवनार हल्लाबोल मोर्चात सामील व्हा....
चला आता मुंबई मोर्चात सामिल व्हा..!

चलो मुंबई
चलो मुंबई !
चलो मुंबई !!

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

✊चलो मुंबई १९ जुलै २०१६ एक दीवस अस्मितेसाठी..✊

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢 =========================================
✊चलो मुंबई १९ जुलै २०१६ एक दीवस अस्मितेसाठी..✊               =========================================
काय झाल कस झाल कळलच नाही..चित्र फक्त एवढच होत ..जिथ बाबासाहेबांनी बहीष्क्रुत भारत ,मुकनायक सारख पत्रके छापली.. ते एक आमच अस्थित्व च ऊधवस्थ झालेले दीसले..

फक्त मातीचा ढीगारा..
होतं नव्हत ते नष्ट झालं...

खुप संताप आहे मनात ..

परंतु आम्ही षंढ झालोय असा आरोप येनारी पीढी करेल येनारी पीढी विचारेलही कुठय आंबेडकर भवण?

कस पडल??
तुम्ही काय केलत मग त्यासाठी?

तेंव्हा मान खाली घालावी लागेल
😔😔😔

तस होनार नाही..कारण आपण सर्व भिमअनुयायी..

एकाच जागी जमनार आहोत..गैरसमजामधे असनारे आणि गैरसमज पसारवनारे..

तुम्ही विचारच करत बसा..

आम्ही जानार आहोत
संघर्ष करायला..✊

कारण बाबासाहेब सांगुन गेलेत की

"""संघर्षा शिवाय न्याय मिळत नसतो..चला तर मग.."""""

💥भिमाकोरेगाव⚔
💥चैत्यभुमी🙏
💥दीक्षाभुमी ला🙏

जसा भिमसागर असतो
तसेच लाखोंच्या संख्येने एकत्र एऊन या मनुवादी सरकार ला दाखऊ की..
पिक्चर अभी बाकी है..

तुम्ही कीती भी लावा शक्ती..
कीती भी लढवा युक्ती..
तुम्ही करा रे कीती ही हल्ला
लय मजबुत भिमाचा कील्ला..

ना गट ना तट
ना पक्ष ना नेता..

फक्त बाबासाहेबांचे अनुयाई म्हणुन एकत्र येऊ..ही लढाई कोण्या व्यक्तीच्या विरोधात नसुन मनुवादी व्रुत्ती च्या विरोधात आहे
===========================================
चला तर मग बरोबर
दिनांक १९ जुलै २०१६
सकाळी १०:३० वाजता
स्थळ👉राणीचा बगीचा (भायखळा)
              ते विधान भवन (मुंबई)
===========================================
टिप 👉मुंबईच्या भिमसैनिकांनी शक्य झाल्यास अल्पउपहार व पाण्याचा बंदोबस्त करावा.
===========================================
हा मेसेज महाराष्ट्राच्या कान्या कोप-यापर्यंत गेला पाहिजे...
तरच लाखो भिमसैनिक एकाच वेळी एकाच ठिकाणी दिसतील
===========================================
जयभिम🙏

एक तळमळीचा भिमसैनिक )

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢