Friday, 15 July 2016

🔵अभी नही तो कभी नही.🔵

🔵अभी नही तो कभी नही.🔵
भारतात व महाराष्ट्रात ऐतिहासिक आंबेडकर भवन उध्वस्त करणा-यांच्या व त्यांना साथ देणा-यां सरकारच्या विरोधात १९/०७/२०१६रोजी  होणा-या नियोजित महामोर्च्याच्या दरम्यान सरकार किंवा विरोधक गणिमी कावा करण्याच्या तयारीला लागले असतील.कसा ही करून हा मोर्चा रद्द करण्यासाठी देशात अथवा महाराष्ट्रात दंगल घडवून आंणतील  किंवा एखादे प्रकरण ब्रेकींग न्युज म्हणून सतत टिव्हीला दाखवण्याच्या प्रयत्नात असतील .कारण हया मोर्च्याकडे कोणाचेही लक्ष जावू नये म्हणून.परंतु आपले लक्ष एकच असले पाहिजे १९ जुलैचा मोर्चा मध्ये सामिल होऊन सत्ताधारी पक्षाला हादरून सोडायचे.पुन्हां एकदा या देशात रिडल्सची पुर्नवर्ती करून गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून देण्याची वेळ आलेली आहे.पक्ष कुठला असूद्या,नेता कोणी ही असेना,पक्षीय झेंडे हातात कुठलेही पकडा,पण मोर्च्यात सामिल व्हा, हा लढा फक्त ऐका ऐतिहासिक आंबेडकर भवनसाठी नसून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक वास्तुचे जतन व सुरक्षित रहाण्यासाठी हा ऐतिहासिक लढा आहे.
      जयभीम 🙏फक्त स्वाभिमानी भीमसॆनिकासाठी



हा सत्याग्रह करताना कदाचित सरकार शांतता भंग होउ नये म्हणून आपणाला कोणत्यातरी कलमाखाली पकडून तुरुगांत घालील.तर तुरुगांत जाण्याकरिता तुमची तयारी पाहीजे.ज्यांना आपल्या बायकामुलांची काळजी वाहावयाची असेल अशा लोकांनी ह्या सत्याग्रहात मुळीच भाग घेउ नये असे मी निक्षुन सांगतो.आम्हाला सत्याग्रहात जी मानसे पाहिजेत ती निधड्या छातीची व स्वाभिमानी अशी पाहिजेत.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
 ५ जुलै १९२७ मुंबई.

✒ उमेश मि नेवरेकर.
    📞९८३३१५७३३२.
मी मोर्चाच्या वाटेवरी... !!
१९ जुलै मुंबई राणीबाग ते विधानभवन.

No comments:

Post a Comment