Monday, 19 September 2016

पोस्ट नः 161 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा ------------------ 6) कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म

पोस्ट नः 161

बुध्द आणि त्यांचा धम्म
तिसरा खंडः भाग दुसरा
------------------
6) कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म
----------------------
1) ह्या पार्थिव जगात एक सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिध्द होते

2) आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे.

3) ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे.

4) काही विशिष्ट व्यवस्थेनुसार बींजाचे वृक्ष होतात. वृक्षापासुन फळ उत्पन्न होते आणा फळापासुन परत बीज निर्माण होते.

5) बौध्द परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात एकामागुन एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शविणारया नियमांना ऋतुनियम बीजनियम असे संबोधितात.

6) समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे.तो कसा उत्पन् होतो? कसा राखला जातो?

7) जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्याचे उत्तर सरळ आहे.

8) ते म्हणतात, संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आहे. आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे

9) त्यांच्या मते नैतिक नियम  माणसांच्या भल्यासाठी असतात. कारण ते ईश्वरी आज्ञास्वरुप आहेत आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालु राहतो.

10) जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांचे विचार वरील प्रमाणे असतात.

11) ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही. कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासुन सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते?

12) ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे *ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय आधिकार आहे?
हे संयुक्तिक प्रश्न आहेत परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे म्हतातात त्यांच्या जवळ या प्रश्नांना उत्तर नाही

13) ही अडचण दुर करण्यासाठी हा सिध्दांत थोडा बदलला गेला आहे

14) असे म्हटले जाते कि परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली हे ही सत्य आहे की ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हे ही खरे आहे कि त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे

15) परंतु या उपरांत ईश्वराने सुष्टीला प्रारंभी जे नियम घालुन दिले आहेत. त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे

16) म्हणुनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सुष्टीचा ( प्रकृतीचा ) आहे ईश्वराचा नाही

17) सिध्दांतात असा बदल करुनही वरील अडचण सोडविली जात नाही. या सिध्दांतातील बदलामुळे ईश्वरावर आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर ( प्रकृतीवर ) का सोपवावे?

18) सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला तथागतांनी दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे

19) तथागतांचे उत्तर सोपे आहे ते असे नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसुन ती कम्म ( कर्म) नियमाप्रमाणे सांभाळली जाते

20) सुष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल परंतु तथागतांच्या मते ती माणसावर सोपविलेली आहे इतर कोणावर नाही.

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न  
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

Sunday, 18 September 2016

पोस्ट नः 160 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 5) सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म

पोस्ट नः 160

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा
 
5) सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म
------------------

1) अनित्यतेच्या सिंध्दांताला तीन पैलु असतात.

2) अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तु अनित्य आहे

3) व्यक्तीगत रुपाने प्राणी अनित्य आहे

4) प्रतीत्य समुत्पन्न वस्तुंचे आत्मतत्व अनित्य आहे

5) अनेक तत्व मिळुन बनलेल्या वस्तुंची अनित्यता बौध्दत्वताचा असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे

6) असंग म्हणतो सर्व वस्तु ह्या हेतु आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतु प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तुंचे अस्तित्व ठरत नाही

7) सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी,आप ,तेज, आणि वायु या चार महाभुतांचा परिणाम होय, आणि ह्या चार भूतांचे पृथ्वकरण झाले कि हा प्राणी प्राणी म्हणुन उरत नाही

8) अनेक तत्वे मिळुन झालेली वस्तु अनित्य आहे ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे

9) सजीव प्राण्यांच्या आनित्यतेचे वर्णन तो नाही ,तो होत नाही ह्या शब्दात करता येईल या शब्दात करता येईल

10) ह्या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमानकाळात असु शकत नाही. आणि तोच प्राणी भविष्यकाळात असु शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पुर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पुर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही

11) म्हणजेच मनुष्यप्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो असु शकत नाही

12) अनित्यतेच्या सिध्दांताचा तिसरा पैलु सामान्य माणसाला समजायला कठीण आहे

13) प्रत्येक सजीव प्राणी केव्हि ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे

14) परंतु ती जिंवत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे

15) हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला तथागतांचे उत्तर असे " सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे "

16) ह्याच विचारसारणीतुन पुढे शुन्यवादाचा उदय झाला

17) बौध्द शुन्यवाद म्हणजे पुर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे . त्याचा अर्थ ऐवढाच की, ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी चालु आहे.

18) शुन्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते शुन्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते . सर्व वस्तुंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसरया वस्तुंचे अस्तित्व अवलंबुन आहे.

19) जर वस्तु सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या तर एका प्रकारापासुन  दुसरया प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तुंचा जो विकास चालला आहे त्याला मिळाला असता.

20) जर मनुष्यप्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता ? असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती

21) शुन्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनवस्था उदभवली असती

22) परंतु तसे मानलेले नाही. शुन्य हा एक बिंदुसमान पदार्थ असुन त्याला आशय आहे परंतु त्याला लांबी रुंदी नाही

23) तथागत बुध्दांचा उपदेश असा कि सर्व वस्तु अनित्य आहेत

24) तथागत बुध्दांच्या ह्या सिंध्दातापासुन बोध काय घ्यावयाचा हा अति महत्वाचा प्रश्न आहे.

25) या अनित्यतेच्या सिध्दांतापासुन असा बोध घ्यावयाचा की, कोणत्याही वस्तुसंबधी आसक्ती राखु नका

26) लोकांनी मालमत्ता , मित्र इत्यादीसंबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच तथागत बुध्दांनी म्हटले की, सर्व वस्तु अनित्य आहेत

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न  
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट नः 159 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 4) तृष्णा - त्याग म्हणजे धम्म

पोस्ट नः 159

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा
 
4) तृष्णा - त्याग म्हणजे धम्म
-----------------

1) धम्मपदामध्ये तथागत बुध्द म्हणतात. सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष.

2) या संतोषवृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे.

3) कारण तसा अर्थ करणे बुध्दांच्या शिकवणुकीविरूध्द आहे.

4) निर्धन लोक धन्य होत असे बुध्दांनी कधीही  म्हटलेले नाही.

5) पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करु नये . असे बुध्दांनी कधीही सांगितलेले नाही.

6) उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो, दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने उत्साहपूर्वक प्रयासाने तो परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो.

7) जेव्हा तथागत बुध्द म्हणतो की, संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय . तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की, माणसाने अमर्याद अशा लोभाच्या आधीन होऊ नये

8) भिक्खू रथपाल म्हणतो, माझ्यासमोर कित्येक श्रींमत मनुष्य आहेत की ते मुर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरुन नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपुर माप कोणाच्याच पदरात पडत नाही

9) महानिदान सुक्तात तथागत बुध्दांने आंनदाला लोभ संयमनाची महती सांगितली आहे

10) आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते. आणि जेव्हा त्या इच्छेने मालमत्ता मिळविण्याच्या इच्छेने पर्यवसान होते. आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळविलेले हातातून निसटू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते तेव्हा त्या इच्छेचे लोभात रुपांतर होते.

11)  लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबधी सतत सावध राहिले पाहिजे

12) ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? याचे कारण बुध्द आंनदाला सांगतो ते असे कि पुष्कळच वाईट आणि दृष्ट गोष्टींचा त्याच्यांपासुन उदभव होतो. मारामारी आघात झगडे वादप्रतिवाद भांडण ,निंदा असत्य ह्या सर्वाचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे,

13) वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही

14) म्हणुनच तथागत बुध्दांनी लोभ आणि तृष्णा आपल्या काबुत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न  
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट नः 158 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे ( iv )

पोस्ट नः 158

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा

 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे ( iv )
------------------
49) निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही . निब्बाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे, यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता.

50) निब्बाण हा निर्दोष जीवणाला प्रतिशब्द आहे हे बुध्दांनी राधला एके ठिकाणी स्पष्ट करुन सांगितले आहे

51) एकदा स्थविर राध तथागतांकडे गेला. तथागतांना आभिवादन करुन त्यांच्या समीप बसुन त्यांनी विचारले. तथागत निब्बाण म्हणजे काय ?

52) तथागतांनी उत्तर दिले " निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन,

53) तथागत, परंतु निब्बाणाचा उद्देश काय ?

54) राध, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे

55) निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे हे बुध्दांनी सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे.

56) एकदा तथागत श्रावस्तीतील अनाथ पिंडिकाच्या आश्रमात आले होते . सारीपुत्त त्या ठिकाणी राहत होता.

57) भिक्खुना उद्देशुन तथागत म्हणाले , भिक्खुनो ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा . तुमच्याविषयी वाटणारया करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणुन मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवित आहे.

58) असे बोलुन तथागत आपल्या गंधकुटीत निघुन गेले

59) सारीपुत्त मागे राहिला आणि भिक्षुंनी त्यांला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले.

60) तेव्हा सारीपुत्त म्हणाला, लोभ हा द्वेष आहे , व्देष हा दोष आहे.

61) हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यममार्ग आहे , हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो , तो आपणाला शांती , अभिज्ञा बोधी आणि निब्बाण याकडे नेतो

62) हा मध्यममार्ग कोणता? हा मध्यममार्ग म्हणजे अष्टांगमार्ग होय त्याशिवाय दुसरा मार्ग नाही , सम्यक दृष्टी , सम्यक संकल्प, सम्यक वाणी , सम्यक कर्मान्त , सम्यक आजीविका , सम्यक प्रयत्न ( व्यायाम ) , सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी . भिक्षूंनो हा मध्यममार्ग आहे.

63) होय क्रोध, द्वेष, ईर्षा, मत्सर ,कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उध्दटपणा, मोह, प्रमाद हे सर्व दृष्ट विकार आहेत.

64) मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यममार्गाने होतो. त्यांच्या योगाने पहायला दृष्टी मिळते हा मार्ग आपणाला पाहयला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती देतो अभिज्ञा बोधि आणि निब्बाण याकडे नेतो
65) निब्बाण हे दुसरे तिसरे काही नसुन आंष्टागमार्ग आहे

66) अशा रितीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना हे ऐकुन आंनद वाटला.

67) निब्बाणात जो मुलभुत विचार आहे तो आष्टांगर्माग . अष्टांगमार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही

68) प्रवृतींचा संपुर्ण अच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यममार्ग आहे.

69) हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबधीच्या गोंधळाचा निरास होईल.

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न  
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर                         

आरक्षणावर आता चर्चा नको, कृती हवी - शरद पवार


भाजप व संघ आहेत धर्माचे व्यापारी


"त्यांना" लग्नावेळी आरक्षण लपवायचे असते - अजित पवार