Monday, 19 September 2016

पोस्ट नः 161 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा ------------------ 6) कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म

पोस्ट नः 161

बुध्द आणि त्यांचा धम्म
तिसरा खंडः भाग दुसरा
------------------
6) कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म
----------------------
1) ह्या पार्थिव जगात एक सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिध्द होते

2) आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे.

3) ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे.

4) काही विशिष्ट व्यवस्थेनुसार बींजाचे वृक्ष होतात. वृक्षापासुन फळ उत्पन्न होते आणा फळापासुन परत बीज निर्माण होते.

5) बौध्द परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात एकामागुन एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शविणारया नियमांना ऋतुनियम बीजनियम असे संबोधितात.

6) समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे.तो कसा उत्पन् होतो? कसा राखला जातो?

7) जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्याचे उत्तर सरळ आहे.

8) ते म्हणतात, संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आहे. आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे

9) त्यांच्या मते नैतिक नियम  माणसांच्या भल्यासाठी असतात. कारण ते ईश्वरी आज्ञास्वरुप आहेत आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालु राहतो.

10) जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांचे विचार वरील प्रमाणे असतात.

11) ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही. कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासुन सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते?

12) ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे *ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय आधिकार आहे?
हे संयुक्तिक प्रश्न आहेत परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे म्हतातात त्यांच्या जवळ या प्रश्नांना उत्तर नाही

13) ही अडचण दुर करण्यासाठी हा सिध्दांत थोडा बदलला गेला आहे

14) असे म्हटले जाते कि परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली हे ही सत्य आहे की ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हे ही खरे आहे कि त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे

15) परंतु या उपरांत ईश्वराने सुष्टीला प्रारंभी जे नियम घालुन दिले आहेत. त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे

16) म्हणुनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सुष्टीचा ( प्रकृतीचा ) आहे ईश्वराचा नाही

17) सिध्दांतात असा बदल करुनही वरील अडचण सोडविली जात नाही. या सिध्दांतातील बदलामुळे ईश्वरावर आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर ( प्रकृतीवर ) का सोपवावे?

18) सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला तथागतांनी दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे

19) तथागतांचे उत्तर सोपे आहे ते असे नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसुन ती कम्म ( कर्म) नियमाप्रमाणे सांभाळली जाते

20) सुष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल परंतु तथागतांच्या मते ती माणसावर सोपविलेली आहे इतर कोणावर नाही.

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न  
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment