Tuesday, 13 September 2016

पोस्ट नः 153 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा १) धम्म म्हणजे काय ? ( ग )

पोस्ट नः 153

 बुध्द आणि त्यांचा धम्म
  तिसरा खंडः भाग दुसरा

१) धम्म म्हणजे काय ?
       ( ग )
3) 1) पाच प्रकारच्या दुर्बलता आहेत. त्या साधनेला बाधक ठरतात त्या कोणत्या ?

2) जीवहिंसा ,चोरी , काममिथ्याचार, असत्य भाषण आळस वाढविणारया मद्याचे सेवन

3) ह्या पाच दुर्बलता साधनेतील अपयशाची पाच कारणे आहेत.

4) साधनेतील या पाच बाधा दुर केल्यानंतर चार प्रकारच्या सावधानतेच्या ( स्मृती - उपस्थानांचा ) मनात उदभव घडेल असे वागले पाहिजे

5) पहिल्या सावधानतेत भिक्षु ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवुन , प्रयत्नपुर्वक जागरूकपणे आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानुन ( कायानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो,

6) वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे मानुन ( वेदनानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो

7) चित्त हे चित आहे असे मानुन ( चित्तानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो

8) चित्ताच उत्पन्न होणारे विचार ते केवळ चित्तधर्म आहेत असे मानुन ( धर्मानुपश्यना करीत ) प्रयत्नपुर्वक जागरुकतेने आणि स्वाधीनतेने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवतो

9) तेव्हा साधनेतील पाच दुर्बलता दुर होतात , चार सावधानतांचा ( स्मृती उपस्थानाचा ) उदय होतो.

 4) घ
1) घात ( अपयश ) तीन प्रकारचे आहेत शीलघात , चित्तघात , आणि दृष्टीघात

2) शीलघात म्हणजे काय ? जीवहत्या,  चोरी, कामभोगासंबधी , मिथ्याचार , असत्य भाषण ,निंदा , कटु भाषण व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भुत होतात.

चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात.

4) लोभ आणि दृष्टपणा हे चित्तघात होत

5) दुष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात

6) दृष्टीघातामुळे मनुष्य असा विकृत दृष्टीकोन स्वीकारतो की दान त्याग परित्याग यामध्ये काहीच गुण नाही. सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही कि त्यांचा परिणामही घडत नाही , इहलोक नाही कि परलोक नाही आई नाही कि बाप नाही आणि प्राणी स्वोत्पन्नही नाही या जगामध्ये ज्यांनी अतुच्च्य शिखर गाठले आहे . पुर्णता मिळवली आहे. ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडच्या जगाचा साक्षात्कार झाला आहे , आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करु शकतात असे श्रमण आणि ब्राम्हण या जगात नाहीत, असे जे समजतात त्या लोकांच्या ठिकाणी भिक्षुहो दृष्टीघात झाला आहे असे समजावे

7) भिक्खुंणो ! शीलघात , चीत्तघात , दृष्टीघात या तीन घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते, असे हे तीन घात आहेत

8) भिक्खुंनो लाभ तीन प्रकारचे असतात , ते म्हणजे शीललाभ दृष्टीलाभ

9) शीललाभ म्हणजे काय ?

10) हिंसा चोरी मिथ्याचार असत्य भाषण निंदा कटु भाषण निंदा व्यर्थ बडबड यांच्यापासुन परावृत्त होणे म्हणजे शीललाभ होय,

11) चित्तलाभ म्हणजे काय ?

12) लोभ आणि दृष्टपणा यापांसुन दुर राहणे म्हणजे चित्तलाभ होय.

13) दृष्टीलाभ म्हणजे काय

14) दान त्याग परित्याग यामध्ये काही पुण्य आहे. सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात, इहलोक आणि परलोक आहे, आईबाप आणि स्वोत्पन्न प्राणी आहेत, ज्यांना या जगापलीकडील दुसरया जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करु शकतात आसे श्रमण आणि ब्राम्हण आहेत अशी दृढ समजुत म्हणजे दृष्टीलाभ , भिक्षुनों या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात,

15) या तीन लाभांमुळेच प्राण्याला शरीरनाशांनतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते भिक्खुंनो असे हे तीन लाभ आहेत,

क्रमशः
रोज वाचा
बुध्द आणि त्यांचा धम्म
पुढील पोस्ट मध्ये वाचा

 " धम्म म्हणजे काय"

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
         विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

INDIA THAT IS BHARAT
       9922047333

No comments:

Post a Comment