Friday, 9 September 2016

( पोस्ट नः 151) बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा इतरांच्या मते बुध्दांनी काय शिकविले ?

( पोस्ट नः 151)

    बुध्द आणि त्यांचा धम्म
    तिसरा खंडः भाग दुसरा

इतरांच्या मते बुध्दांनी काय शिकविले ?
*******
1) तथागत बुध्दांची शिकवणुक कोणती?

2) त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायांत किंवा बौध्द धम्माच्या अभ्यासाकांत एकमत नाही

3) काहीच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे

4) काहीच्या मते त्यात विपश्यना ( एक प्रकारचा प्राणायाम ) महत्वाचा आहे

5) काहीच्या मते बौध्द धम्म म्हणजे केवळ दिक्षितानांच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे .तर इतरांना तो एक सर्वाना उद्देशुन उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो

6) काहीच्या मते ती एक रुक्ष दर्शनपध्दती आहे

7) काहीच्यामते ते एक एहिक जीवनापासुन स्वार्थी पलायन आहे

8) काहीच्या मते तो केवळ गूढवाद आहे

9) काहीच्या मते ह्रदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पध्दतशीर विरोध शिकविणारे ते शास्त्र आहे

10) बौध्द धम्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्नमतांचा संग्रह करता येईल

11) ही मत भिन्नता आश्चर्यकारण आहे

12) यापैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहे असे लोक म्हणजे ज्यांना बौध्दधम्माचे सार समाधी विपश्यना किंवा दिक्षितांना प्राप्त होणारया गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक

13) दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौध्दधम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय. या लेखकांचा बौध्द धम्म हा मुळ आभ्यासाचा विषय नसतो त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरुपाचा असतो

14) त्यांच्यापैकी कोणीही बौध्द धम्माचे अभ्यासक नसतात

15) धम्माचा उगम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्यांचेही ते अभ्यासक नसतात

16) प्रश्न असा उदभवतो की तथागत बुध्दांना काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हाता काय

17) या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौध्द धम्माचे विद्यार्थी दोन मुद्यांचा हवाला देतात ते म्हणतात

18) तथागत बुध्दांनी अहिंसा शिकवली

19) तथागत बुध्दांनी शांती शिकवली

20) त्यांना आणखी असा प्रश्न केला कि तथागत बुध्दांने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय ?

21) तथागत बुध्दांनी न्याय शिकविला काय ?

22) तथागत बुध्दांनी प्रेम( मैत्री) शिकवली काय ?

23) तथागत बुध्दांनी स्वातंत्र्य शिकविले काय ?

24) तथागत बुध्दांनी समता शिकविली काय ?

25) तथागत बुध्दांनी बंधुता शिकविली काय ?

26) तथागत बुध्द कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतात काय ?

27) बौध्द धम्माची चर्चा करताना हे प्रश्न क्कचितच उपस्थित केले जातात

28) माझे असे उत्तर आहे कि तथागत बुध्दाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता, तो वरील सर्व प्रश्नाची उत्तरे देतात, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनांत अगदी गाडुन टाकली आहेत

तथागत बुध्दांनी स्वतः केलेले वर्गीकरण
*******
1) तथागत बुध्दांनी आपल्या धम्माचे एक वेगळेच वगीकरण केले आहे

2) पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली

3) त्यांनी एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले, तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला  गेला

4) त्यांनी तिसरा एक वर्ग निर्मिला त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली

5) हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय

6) तथागत बुध्दांचा धम्म , अधम्म  आणि सद्धम्म ह्या तीनही वर्गाची ओळख करुन घेतली पाहीजे,

क्रमशः
रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म "

पुढील पोस्ट मध्ये वाचा

 " धम्म म्हणजे काय "

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "
*******

       विश्वरत्न
डाँ.बाबासाहेब आंबेडकर
INDIA THAT IS BHARAT
9922047333

No comments:

Post a Comment