Tuesday, 13 September 2016

पोस्ट नः 155 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे ( I)

पोस्ट नः 155

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा

 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे ( I)
*********
1) निब्बाणासारखे परमसुख दुसरया कशातही लाभत नाही असे तथागत बुध्दांचे वचन आहे

2) तथागत बुध्दांनी शिकवलेल्या सर्व सिंध्दांताचा निब्बाण हा केंद्रंवर्ती सिंध्दांत आहे.

3) निब्बाण म्हणजे काय ? बुध्दप्रणीत निब्बाण हे बुध्दपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे

4) बुध्दपुर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानीत असत

5) चार प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरुपाचा दुसरा यौगिक तिसरा ब्राम्हणी आणि चौथा औपनिषदिक

6) ब्राम्हणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते, या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई. तथागत बुध्दाने या सिध्दांताचा निषेध केला आहे, म्हणुन निब्बाणविषयक ब्राम्हणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे तथागत बुध्दांना कठीण गेले नाही

7) निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरुपाची असल्यामुळे तथागत बुध्दांस ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणुन ज्या इंद्रिय भुका असतात त्यांचे शमन करणे ह्यापलीकडे दुसरा आशय नाही त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते

8) असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुध्दांच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे

9) कारण इंद्रिय भुकांचे शमन करणे म्हणजे अधिक भूका निर्माण करण्यासारखे आहे अशा प्रकारचा जीवानमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवुन देऊ शकत नाही. उलट त्याने येणारया सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते.

10) योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी व्यवस्था होती, त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरुपाचे होते. आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार पराडमुख व्हावे लागते त्यांच्या योगाने वेदना टाळता येतात. परंतु सुख मिळत नाही आणि सुख मिळालेच तर ते योग चालु आहे तोपर्यंतच. ते स्थायी स्वरुपाचे नव्हते. अस्थायी स्वरुपाचे होते.

11) तथागत बुध्दांची निब्बाणविषयक कल्पना त्यांच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती

12) त्याच्या निब्बाण कल्पनेत तीन विचारांचा अंतर्भाव होतो

13) आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार.

14) जिंवतपणी ह्या सर्व संसारात असताना सुख हा दुसरा विचार . आत्म्याचा मोक्ष आणि मृत्युनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे दोन विचार बुध्दांच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत.

15) तथागत बुध्दांच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणारया विकारांच्या ज्वलावर निग्रह साधणे.

16) गयेत राहत असताना बुध्दांनी भिक्खुंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्निसारखे होत हा आहे

17) भिक्खु, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तु जळत आहे

क्रमशः
       रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म".
पुढील पोस्ट मध्ये वाचा

 "निब्बाण प्राप्त करणे हा  धम्म आहे" ( ii)

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
       विश्वरत्न
    डाँ.बाबासाहेब आंबेडकर

        INDIA THAT IS BHARAT

No comments:

Post a Comment