Thursday, 1 September 2016

पोस्ट नः 143 बुध्द आणि त्यांचा धम्म दुसरा खंडः भाग आठवा 4) धम्मदीक्षेची जोखीम

पोस्ट नः 143

बुध्द आणि त्यांचा धम्म
 दुसरा खंडः भाग आठवा

4)  धम्मदीक्षेची जोखीम
-----------------*
1) पुर्वो तथागत बुध्द राजगृहापासुन 500 योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची एक टोळी राहत होती. हे लोक शिकार करुन मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत,

2) तथागत बुध्द त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्या वेळी ते पुढीलप्रमाणे उपदेश करतात.

3) जो दयाळु आहे तो प्राण्याची हत्या करीत नाही, ( किंवा प्राण्याची हत्या न करणे हा दयाळु माणसाचा धर्म होय ) तो प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो,

4) धर्म अमर आहे या धर्माचे पालन करणारयावर कधीही संकट कोसळणार नाही.

5) विनयशीलता ऐहिक भोगाविषयीची उपेक्षा कोणाला कष्ट न देणे कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्राम्हलोकाचे लक्षण आहे

6) दुर्बलाविषयी कणव बुध्दांच्या शिकवणुकीनुसार शुध्द जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यकता ते मिळाल्यावर थांबणे जन्ममरणाच्या फेरयातुन सुटण्याचे हे साधन आहे. हे शब्द ऐकताच त्या स्त्रिंयांचे परिवर्तन झाले. आणि पुरुष परत आल्यानंतर तथागतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती . तरी त्यांच्या स्त्रिंयांनी त्यांना आवरुन धरले आणि हे मैत्रीचे सुक्त ऐकताच त्यांचेही परिवर्तन झाले

7) आणि तथागतांनी पुढील उदगार काढले.

8) जो प्राणीमात्रांशी  मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अनेक गोष्टींचा लाभ होतो.

9) त्यांचे शरीर नेहमी ( सुखी ) असते त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यासमग्न असतो त्या वेळीही त्याला एकाग्रता लाभते

10) त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत  आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात . विषारी वस्तुंचा त्याला त्रास होत नाही . आणि युध्दातील नाशापासुन त्याचा बचाव होतो, अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही

11) तो जिथे जिथे राहतो तिथे यशस्वी , हेच ते लाभ होत.

12) हा उपदेश ऐकल्यावर तथागतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली.


रोज वाचा
    बुध्द आणि त्यांचा धम्म "

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो  "
*******
         विश्वरत्न
    डाँ.बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment