Tuesday, 13 September 2016

पोस्ट नः 154 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 2) जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय

पोस्ट नः 154

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा

 2) जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय

1) तीन प्रकारच्या पुर्णता असतात

2) कायिक, वाचिक आणि मानसिक .

3) मानसिक पुर्णता कोणत्या प्रकारची असते?

4) आसवे अथवा चितमल पुर्ण नष्ट होऊन ह्या जीवनात संपुर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे प्रज्ञेने आसवांपासुन विमुक्ती मिळवुन त्याच अवस्थेत सतत वर्तने ह्यासच मानसिक पुर्णता म्हणतात.

5) आणखीही पारमिता आहेत, आणि तथागत बुध्दांने त्या सुभूतीला सांगितल्या

6) सुभूति बोधिसत्वाची " दान पारमिता " कोणत्या प्रकारची असते?

7) तथागत बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवुन अंतर्बाह्य वस्तुंचे दान करतो आणि त्या सर्व प्राणीमात्रांना दिल्यावर बोधि ला त्या अर्पण करतात. दुसरयांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तुबद्दल त्यांच्या मनात आसक्ती नसते. ह्या अवस्थेला दान पारमिता म्हणतात.

8 सुभुति बोधिसत्वाची  " शील पारमिता " कशी असते?

9) तथागत या पारमितेत तो स्वतः सदाचाराची दहा पथ्ये पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो.

10) तथागतः बोधिसत्वाची " क्षान्ति- पारमिता " कशी असते?

11) तथागतः या पारमितेत तो स्वतः  क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो,

12) सुभितिः बोधिसत्वाची
 " वीर्य पारमिता "कशी असते?

13) तथागतः या पारमितेत तो पाचही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरानांही तसेच करण्याची प्रेरणा देतो

14) सुभितिः बोधिसत्वाची  "समाधी ही पारमिता " कशी असते?

15) तथागतः या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो तथापि तो तत्संबधित रुप लोकात पर जन्म घेत नाही , आणि इतरानांही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो,

16) सुभूतिः बोधिसत्वाची  "प्रज्ञा - पारमिता " कशी असते?

17) तथागतः या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात ( भौतिक अथवा आधिभौतिक ) मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरुपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो

*18) अशा पारमिता अंगी बाणविणे यालाच धम्म म्हणतात.

क्रमशः
रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म ".
पुढील पोस्ट मध्ये वाचा

 निब्बाण प्राप्त करणे हा  धम्म आहे

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात "सकाळी"  गेलेच पाहिजे "
*******
        विश्वरत्न
    डाँ.बाबासाहेब आंबेडकर

INDIA THAT IS BHARAT
         9922047333

No comments:

Post a Comment