जात नष्ट होत नाही तोवर ॲअट्रॉसिटी कायदा रहाणारच- राजकुमार बडोले
सातारा दि. २६ (प्रतिनिधी) ः समाजातून जोवर जात नष्ट होत नाही तोवर देशातून ॲऑट्रॉसिटीचा कायदा रद्द होणार नाही, हे माझेच म्हणणे नाही तर देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचेही तेच म्हणणे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर हा कायदा अधिक बळकट करून, पिडीताला नुकसान भरपाईची रक्कम साडे आठ लाख करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन आपण अनुसूचित जातींच्या मागे भक्कमपणे असल्याचे सिध्द केले, असे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.
आज सातारा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ऐतिहासिक श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल आणि भिमाई स्मारकाला बडोले यांनी भेट दिली. त्यानंतर येथील सर्किट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती निमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित पन्नास स्थाळांचे संवर्धन आणि विकास करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला असून यात या शाळेचा समावेश करण्यात आला आहे. मात्र ही इमारत हेरिटेजमध्ये समाविष्ट असल्याने वेगळे काही करता येणार नाही. शाळेने किंवा जिल्हापरिषदेने कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, तरीही येथे सुसज्ज ग्रंथालय देणार असे त्यांनी सांगितले. सोबतच भिमाई स्मारकाच्या विकासाचाही समावेश करण्यात आलेला आहे, असेही बडोले म्हणाले.
आज सकाळी त्यांनी भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला भेट देऊन पाहणी केल्याचे सांगत सदरील जागेवरील अतिक्रमण लवकरच हटवले जाईल, डॉ. बाबासाहेब दरवर्षी एक जानेवारीला या विजयस्तंभाला आवर्जून उपस्थित रहात. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचाही विकास करण्यात येईल, असेही बडोले यावेळी म्हणाले.
राज्यात जात पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली असून आवश्यक पदांना मंजूरीही मिळाली आहे. त्यामुळे आजवर ३६ समित्या स्थापन करण्यात आलेल्या असून त्यातील काही पदांमुळे कार्यरत झालेल्या नाहीत. मात्र पूर्वीच्या पंधरा समित्या कार्यरत असून काही अपवाद वळगळता प्रत्येक जिल्ह्याला समिती आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्याही बरीच कमी झालेली असल्याचे ते म्हणाले. यावेळी दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे माजी आमदार डॉ. येळगावकर आदी उपस्थित होते.
..................................

No comments:
Post a Comment