Thursday, 15 September 2016

पोस्ट नः 157 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे iii

पोस्ट नः 157

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा

 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे iii

32) माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे माणसांच्या रागाद्वेषावर अग्नीचे रुपक योजुन बुध्दांनी येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे

33) रागद्वेषाच्या आधीन होण्याचे मनुष्य दुःखी होतो राग द्वेष हे विकार म्हणजे  मनुष्याच्या निब्बाणास्थितीपर्यत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणारया शृंखलाच आहेत.ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारापासुन मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमु लागतो

34) तथागत बुध्दांच्या मते ह्या विकारांचे तीन प्रकारचे  वर्ग आहेत.

35) पहिल्या वर्गात तृष्णेतुन उदभवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात

36) दुसरया वर्गात वितृष्णेतुन उदभवणारे घृणा क्रोध आणि द्वेष हे दोष येतात

37) तिसरया वर्गात अविद्येतुन उदभवणारे जडता मुर्खता आणि मूढता हे दोष येतात.

38) पहिल्या व दुसरया अग्नीचा संबंध भावना आणि दुसरया संबंधीचा दृष्टीकोन आणि भूमिका यांच्यांशी निगडीत आहे. तर तिसरया प्रकारचा अग्नी मोह हा जे सर्व विचार सत्यापासुन भिन्न असतात त्यांच्याशी निगडीत आहे.

39) तथागत बुध्दांच्या निब्बाण सिंध्दांतासंबंधी काही गैरसमजुती आहेत

40) निब्बाण शब्दाच्या व्यत्पतीदृष्ट्या अर्थ फुंकर घालुन विझविणे किंवा मालविणे असा आहे

41) या शब्दाचा व्युत्पतीचा आधार घेऊन टिकाकारांनी निब्बाणसिंध्दांत अर्थहीन बनविला आहे

42) ते असे मानतात कि निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे आणि ही क्रिया मृत्युसमान आहे.

43) असा वाकडा अर्थ लावुन त्यांनी निब्बाणसिंध्दांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे

44) टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ तथागतानां अभिप्रेत नव्हता हे जो कोणी अग्नी प्रवचना ( अग्निस्कंधोपम सूक्ताचा ) भाषादृष्टया अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल,

45) अग्नीस्कंधोपम सूक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यु म्हणजे तो मालविणे असे म्हटलेले नाही, तिथे म्हटले आहे की रागाग्नी द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहेत,

46) सर्व प्रकारच्या प्रवृतीना पुणपणे मालवुन टाकावे असे अग्नीसूक्त म्हणत नाही ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवु नका

47) दुसरी गोष्ट अशी की , टिकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुंकले आहेत.

48) उदानात असे सांगितले कि जेव्हा शरीर नाश पावते.  वाहाणे थांबते संज्ञा नाहीशा होतात चलन वलनादी क्रिया थांबतात चेतना जाते तेव्हा परिनिब्बाण घडते परिनिब्बाण म्हणजे पुर्णपणे मालविणे,  नाहीसे होणे


क्रमशः
      रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म

पुढील पोस्ट मध्ये वाचा

 निब्बाण प्राप्त करणे हा  धम्म आहे( ii)

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment