Friday, 9 September 2016

✍🏻🌹 बघ तुला माझा आभास होतो का ? 🌹✍🏻 ✍🏻_अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर.🌹

✍🏻🌹 बघ तुला माझा आभास होतो का ? 🌹✍🏻
✍🏻_अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर.🌹

कालपरवा पर्यत मी शांत होतो,
तु ही व्यस्त होतीस कामात,
नव्या भारताच्या निर्मितीचे, नवे धोरण ठरविण्यात...
तेवढ्यात...
पेटलेली चेतना, विझलेली आग,
झालेली राख, उध्वस्त झालेली मायेची काख,
किंकाळी ऐकू आली,
मोर्चा निघाला...
खैरलांजी व्हाया मुंबई, कोपर्डी दिल्ली...
चल ! सामिल हो, तू पण...
मी आहे मोर्चाच्या पहील्या टोकावर...
पिडीतांच्या दुःखाचे ओझे वाहत.
पण तुला मात्र मध्यंतरीतला मोर्चा सांभाळावा लागेल.
गोंधळ माजवलाय म्हणते, मधातल्यांनी...
जातीच्या नावाने, अॅट्रोसिटीच्या नावाने,
कालच्या व आजच्याही शूद्रांनी...
मराठ्यांची आर्ची पळविली म्हणते...
तूच सांग त्यांना...
शरदाचे चांदणे, भोसल्यांचे उदयन, ठाकऱ्यांचे 'राज'कारण पुरते बोंबलले...
मी सांगणार नाही तुला
बंदूका घ्यायच्या की तलवारी...
पण हा हल्ला तुलाच करायचा.
'स्त्री'च्या योनिला जात लावणाऱ्यांवर...
कुस्करल्या त्या साऱ्याच पाकळ्या तुझ्या होत्या हे दाखविण्यासाठी...
या मधातल्यांनी माणुसकीच्या दिशेने निघालेला मोर्चा...
मध्येच अडवून धरलाय जातीश्रेष्ठत्वासाठी...
तो तुला परत मार्गान्वित करायचाय.
पिडीतांच्या दुःखांचे भांडवलदार संपवून...
माणुसकीचा प्रवाह गतिमान करायचाय.
जातीचे, पंथाचे कठडे तोडून,
तुला सैराट पळायचे,
माणुसकीचे झाड रोवण्यासाठी...
बघ ! तो मोर्चा निघालाय त्याच माणुसकीच्या दिशेेने...
त्या मोर्चाला बघून...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
✍🏻_अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर.🌹

No comments:

Post a Comment