Saturday, 17 September 2016

भागवत आधुनिक हिटलर : प्रकाश आंबेडकर

भागवत आधुनिक हिटलर : प्रकाश आंबेडकर
नवी दिल्ली- "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आधुनिक काळातील हिटलर आहेत," अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भागवत यांच्यावर घणाघाती टीकास्त्र सोडले.

देशभरातील दलित अत्याचारांच्या विरोधात आज (शुक्रवार) दिल्लीत भारिप बहुजन पक्षाच्या वतीने प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित स्वाभिमान संघर्ष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासह सीताराम येचुरी, माजी खासदार वृंदा करात, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार डी. राजा, सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांची भाषणे झाली.
अनुसूचित जाती-जमातींच्या रक्षणार्थ अॅट्रॉसिटीचा कायदा आणखी कडक करण्यात यावा. दलितांवर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करावेत. गोरक्षकांवर बंदी घालावी. तसेच, खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे, आणि संघाच्या विभाजनवादी अजेंड्याला व सांस्कृतिक राष्ट्रवादाला सरकारी पातळीवरून खतपाणी घालू नये, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंबडेकर म्हणाले, "आता देशातील दलितांनी याचा निर्णय करावा की, त्यांना राज्यघटना हवी की वामनाची पूजा करणारा मनुवाद याची निवड त्यांनी करावी."
आंबेडकर यांनी भागवत यांच्यासह पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. रामदास आठवले यांच्यावरही आंबेडकर यांनी यावेळी निशाणा साधला.


‘मोदी काळातले मनुवादी हे प्राचीन मनुवाद्यांपेक्षा भयंकर आहेत‘ असा सूर सभेतील इतर वक्त्यांनी आळवला.                         

No comments:

Post a Comment