Sunday, 18 September 2016

पोस्ट नः 159 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 4) तृष्णा - त्याग म्हणजे धम्म

पोस्ट नः 159

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा
 
4) तृष्णा - त्याग म्हणजे धम्म
-----------------

1) धम्मपदामध्ये तथागत बुध्द म्हणतात. सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष.

2) या संतोषवृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे.

3) कारण तसा अर्थ करणे बुध्दांच्या शिकवणुकीविरूध्द आहे.

4) निर्धन लोक धन्य होत असे बुध्दांनी कधीही  म्हटलेले नाही.

5) पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करु नये . असे बुध्दांनी कधीही सांगितलेले नाही.

6) उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो, दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने उत्साहपूर्वक प्रयासाने तो परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो.

7) जेव्हा तथागत बुध्द म्हणतो की, संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय . तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की, माणसाने अमर्याद अशा लोभाच्या आधीन होऊ नये

8) भिक्खू रथपाल म्हणतो, माझ्यासमोर कित्येक श्रींमत मनुष्य आहेत की ते मुर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरुन नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपुर माप कोणाच्याच पदरात पडत नाही

9) महानिदान सुक्तात तथागत बुध्दांने आंनदाला लोभ संयमनाची महती सांगितली आहे

10) आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते. आणि जेव्हा त्या इच्छेने मालमत्ता मिळविण्याच्या इच्छेने पर्यवसान होते. आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळविलेले हातातून निसटू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते तेव्हा त्या इच्छेचे लोभात रुपांतर होते.

11)  लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबधी सतत सावध राहिले पाहिजे

12) ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? याचे कारण बुध्द आंनदाला सांगतो ते असे कि पुष्कळच वाईट आणि दृष्ट गोष्टींचा त्याच्यांपासुन उदभव होतो. मारामारी आघात झगडे वादप्रतिवाद भांडण ,निंदा असत्य ह्या सर्वाचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे,

13) वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही

14) म्हणुनच तथागत बुध्दांनी लोभ आणि तृष्णा आपल्या काबुत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न  
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment