Saturday, 17 September 2016

काल रात्री उशिरा, उणा आंदोलनाचा हिरो "जिग्नेश मेवाणी" याला गुजरात पोलिसांनी अटक करून गायब केलं आहे.

काल रात्री उशिरा, उणा आंदोलनाचा हिरो "जिग्नेश मेवाणी" याला गुजरात पोलिसांनी अटक करून गायब केलं आहे. मोदिशेठ यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना कोठेही गालबोट लागू नये म्हणून गुजरात पोलिसांनी विशेष सावधानता बाळगत हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

गंमत अशी आहे की, ज्या "जिग्नेश" ला अटक करण्यात आलीय,तो मुलगा  एक दलित ऍक्टिव्हिस्ट असून उणा आंदोलनानंतर गुजरातमध्ये तो जबरदस्त लोकप्रिय बनला आहे. दलित समाजाचा सर्वात मोठा आणि सेन्सिबल लीडर म्हणून त्याच्याकडं पाहिलं जात आहे. कोणतेही भडकाऊ स्टेटमेंट देण्यापेक्षा तो संविधानिक मार्गानं आणि सोबतच पूर्ण अभ्यासानिशि दलित समाजाच्या मागण्या गुजरात सरकारपुढं मांडत आहे.आणि म्हणून दिवसेंदिवस त्याला मिळणारा पाठिंबा वाढतच चालला आहे.

त्यात गायीच्या मुद्द्यावरून भावनिक राजकारण करत "गो-आतंकवाद" ही संकल्पक रुजवू पाहणाऱ्या गो-रक्षकांची तर हवाच जिग्नेशने काढून टाकली आहे. "गाई तुमची माता आहे तर, तिच्या मृत्यूनंतर तिच्या शरीराची विल्हेवाट ही तुम्हीच लावा,यापुढं कोणताही दलित बांधव गायीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावनार नाही" असा आक्रमक पवित्रा जिग्नेशने घेतला.आणि तशी संवैधानिक शपथही त्याने लाखो दलित बांधवांना 15 ऑगस्टला दिली. परिणामी गुजरातमध्ये हजारो मृत गायींचा खच पडला असून, त्यांची विल्हेवाट लावायला कोणतीही गो-रक्षक संघटना पुढे येत नाहीये. जिग्नेशच्या आंदोलनाच हे सर्वात मोठं यश असून, याचा सगळ्यात मोठा धसका मोदिशेठ अन अमित श्या या जोडगोळीने घेतला आहे.
कारण...या आंदोलनांनंतर 2017 मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुद्द RSS ने केलेल्या सर्वेत, गुजरात बीजेपीच्या हातून जात आहे, असा धक्कादायक तर्क नोंदवला आहे. लगेच जर निवडणुका झाल्या तर बीजेपीला फक्त 60-63 जागा मिळतील अस,संघाचं म्हणणं आहे. सध्या आनंदीबेन पटेल यांनी वयाचं कारण देत  मुख्यमंत्रीपदाचा जो राजीनामा दिला त्याला ही जिग्नेशच आंदोलन हेच खरं कारण असल्याचं बोललं जातय.

आधी हार्दिक पटेलन उभं केलेलं पाटीदार लोकांच आंदोलन आणि आता जिग्नेश मेवाणी ने उभा केलेलं दलित आंदोलन, यान गुजरात मध्ये बीजेपी विरोधात मोठं वादळ निर्माण केलं आहे. लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याचीच परिणीती म्हणजे, अमित श्या ला गुजरातमध्ये स्टेजला जाळ्या लावून सभा घ्यावी लागते आहे,पण तेथून ही भर सभेत त्यांना पळ काढावा लागला. म्हणूनच जे अमित श्या सोबत झालं, तेच मोदीशेठ यांच्या सोबतही व्हायची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याने, विशेष खबरदारीचा उपाय म्हणून जिग्नेशला अटक करण्यात आली आहे.

मीडिया किती जरी गुजरातचे गोडवे गात असला तरी, ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. एक जबरदस्त असंतोष सध्या तेथील बहुतांशी लोकांत आहे.
त्यात इथल्या मीडियाला वाढदिवसादिवशी मोदीशेठ आईला भेटायला गेल्याच कौतुक अन इंटरेस्ट जास्त आहे. ग्राउंड रियालिटी दाखवण्यात त्यांना काहीही इंटरेस्ट नाहीये. यामुळ ही लोकांमधील राग वाढतच चालला आहे.

56 इंची छाती आज कितीतरी वजनाचा रेकॉर्डब्रेक केक कापून आपलं वाढदिवस साजरा करणार आहे म्हणे...पण त्याला जिग्नेशच्या अटकेची काळी बाजू हि आहे....!!

No comments:

Post a Comment