Wednesday, 7 September 2016

जातीयवाद..आता धुरळा तर उडणारच...

जातीयवाद..आता धुरळा तर उडणारच...
आजकाल कोपर्डी प्रकरणाचे निमित्त लावून मराठा मुक मोर्चा निघताहेत. खरोखरच त्या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चे, आंदोलने झालीच पाहिजेत. त्या पिडीत मुलीच्या कुटूंबियांना न्याय मिळालाच पाहिजे पण लोकशाहीने मोर्चे आंदोलने काढण्याचा अधिकार दिला म्हणजे असे नाही की आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या खचलेल्या पिचलेल्या धनगर आणि दलित समाजाचे घटनेनं दिलेले अधिकार हिसकावून घ्यायची ही तुमची भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची नसून घरात बसून शतरंजचा (Chess) खेळ खेळणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांची ही चाल आहे. त्याचे कारण असे की कधी नव्हे इतिहासांत पहिल्यांदाच धनगर समाजातील दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर दलित समाजातील एक कॅबिनेट मंत्री झाला  शिवाय भारताच्या इतिहासांत पहिल्यांदाच धनगर समाजाचा एक खासदार राज्यसभेवर गेला म्हणून त्या घरात बसलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागले. मग वजीरांना (बिनडोक मराठा अभ्यासक ज्याच्याशी फोनवरून माझे बोलणे झाले होते त्यांना) सांगून प्याद्यांना रस्त्यावर उतरवून दलित समाजाचा अधिकार असलेल्या ॲट्राॅसिटी कायद्याचे हक्क रद्द करण्याची मागणी म्हणजेच शिवरायांच्या राज्यात केलेला जातीयवाद आहे हे विसरू नका. जर या ॲट्राॅसिटी कायद्याचा कोणी गैरवापर करत असेल तर संबंधितांना शिक्षा आणि दंड करण्याची तरतूद जरूर केली पाहिजे कारण जर कोणी या कायद्याचे उल्लंघन करत असेल तर होणाऱ्या शिक्षेस त्याला पात्र राहावे लागेल. ॲट्राॅसिटी रद्द करून सर्व आदीवाशी व दलिंतांवर टांगती तलवार ठेवू नका. शिवाय त्या मराठा अभ्यासकाबरोबर (???) माझी बाचाबाचीही झाली कारण तो म्हणत होता की धनगर समाजाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज अनुसुचित जमातीचे म्हणजेच आदीवाशींचे आरक्षण मागतोय ही त्या बिनडोकने केलेली बिनबुडाची भाषा होती. पुढे तो हे पण म्हणाला की या लढाईमद्ये आदीवाशींच्या बाजूने मराठा समाज ठामपणे उभे राहणार असून धनगर समाजाच्या आरक्षणाला आम्ही विरोध करू. पण मराठा समाजातल्या कोणत्याही नेत्यांना जाऊन विचारा की बाबांनो मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता तेव्हा धनगर समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता आणि आजही मराठा समाजाच्या पाठीशी ठाम आहे. मग आम्ही आमच्या हक्काचे मागतोय जे आम्हाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत दिले आहे. त्या अनुसुचित जमातीच्या सवलतींचा अंमल झाला नाही त्या सवलती आम्हाला लवकरात लवकर लागू केल्या तर धनगर समाजाच्या पुढच्या पीढीवर अन्याय सहन करायची वेळ येणार नाही. आम्हाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळायला पाहिजे म्हणून आम्ही आरक्षण मागतोय यातला विषय नाही. अरे तुम्ही "ख्वाडा" चित्रपट पाहिलाच असेल जातीवरून शिवीगाळ केली किंवा अन्याय केला तर आम्ही काय करू शकतो ते त्या चित्रपटाच्या माध्यमातून शिकून घ्या. एकतर आजपर्यंत मी मराठा समाजाच्या नव्हे तर कोणत्याच समाजाच्या विरोधात बोललो नव्हतो कारण माझा मित्रपरिवार हा मराठा समाजातील सुद्धा आहे त्यामुळे मी लिहलंही नव्हते पण तुमच्याच मराठा समाजातले बिनडोक अभ्यासक मला लिहायला भाग पाडताहेत. पुढे त्या मराठा समाजाचे अभ्यासक मला म्हणतात की धनगर समाजातील नेत्यांना जातीचा फायदा करून घ्यायची सवय आहे म्हणूनच धनगर समाजाच्या नेत्यांना खासदार व मंत्रीपद दिले जाते. मग मराठा समाजाचे अभ्यासक म्हणवून घेणाऱ्या बिनआकलेच्या कांद्यांनो आजपर्यंतचा इतिहास काढून बघा महाराष्ट्र राज्याचे जेवढे मुख्यमंत्री झाले त्यातील एक-दोन सोडले तर सर्वच मराठा समाजाचे होते मग बाकीच्या खात्यात मराठा समाजाचे कीती मंत्री होते याचा आकडा तुम्हीच काढा मग सांगा की महाराष्ट्र राज्यात जातीयवाद कोणी केला?? आज जरी तुमच्या (जातीयवादी) नेत्यांनी घरात बसून शतरंजचा खेळ मांडला असेल तर मांडू द्या कारण आम्ही पण शतरंजच्या खेळात माहीर आहोत. कोण कशी चाल करतोय याची खबर ना खबर आम्हाला असते. कारण जगजेत्या सिकंदराला पराभूत करणाऱ्या आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य , राजा सम्राट अशोक, थोरले मल्हारराव होळकर , राष्ट्रमाता अहिल्याई होळकर, अजिंक्यवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जमातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी आहोत आणि स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या नादाला लागू नका. नाद केला तर बाद करायला आम्हाला वेळ लागणार नाही. आज तुम्ही कोपर्डीच्या प्रकरणाचे निमित्त लावून जरूर एकत्रित या कारण लोकशाहीने तुम्हा-आम्हाला अधिकार दिला आहे पण आमच्या विरोधात जर तुम्ही आमच्या दलित बांधवाचे व धनगर समाजाचे हक्क हिसकावून घेऊ पाहू इच्छित असाल तर माझा एक धनगर समाजबांधव उद्या रस्त्यावर उतरू शकतो हे लक्षात ठेवा.
आजपर्यंत माझा धनगर समाज आणि दलित समाज मराठा समाजातील नेत्यांच्या मागे-पुढे करत होता आजही धनगर समाजाचे नेते मराठा समाजाच्या समाजातील नेत्यांची चमचेगीरी, हुजरेगीरी करत आहेत पण आता इथून पुढे ते शक्य नाही. पण बांधवांनो मराठा समाजातील नेत्यांनी प्यादे रस्त्यावर उतरवून स्वता घरात बसून वजीरांच्या साह्याने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात चाल खेळली, दलित समाजाची ॲट्राॅसिटी काढून घेण्यासाठी चाल खेळली पण ही चाल खेळून त्यांचाच म्हणजेच मराठा समाजातील नेत्यांच्याच पराभव झाला त्यामुळे तुम्ही आम्ही जिंकलो आहोत. पण आता इथून पुढे षंढ बसू नका प्रस्तापित यंत्रणा जातीयवाद करत तुमच्या आमच्या विरोधात आवाज उठवत आहेत मग डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणेच "थंड राहून षंढ बसण्यापेक्षा अन्यायाविरोधात बंड करून गुंड झालेलं बरं" या सल्ल्याप्रमाणे बंड करायला पुढे यावे नाहीतर त्या गोडबोल्या औलादी सुखाने जगू देणार नाहीत. बांधवांनो ज्याप्रमाणे मराठा समाज गट-तट, पक्षभेद, संघटना भेद बाजूला ठेवून एकत्रित येत असेल तर मग तुम्ही-आम्ही सुद्धा पक्षभेद, मनभेद, मतभेद, गट-तट बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात बंड करायला पुढे यावं हीच नम्र विनंती.
टीप:- आम्हाला पण काय काम-धाम नाही म्हणून मराठा-धनगर वाद आम्ही पेटवतोय असे काही नाहीये. तर मराठा समाजातील बिनडोक (अभ्यासक??) लोक जातीयवाद पेटवताहेत आणि  जातीयवादाला चालना देत आहेत. त्यांना अगोदर सुधारा कारण धनगर समाज ही एक आग आहे आग आणि या आगीबरोबर खेळल्यावर भडाकाच होणार आणि उडणार नुसता धुरळाच आणि पडणार ती म्हणजे राख विषय संपला.
जय मल्हार। जय अहिल्या।। जय यशवंत।।
 जय भीम।। जय ज्योती।। जय शिवराय।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment