Wednesday, 31 August 2016

‘दलित’ शब्दाला बंदी करा - हायकोर्ट

http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=14420864
‘दलित’ शब्दाला बंदी करा - हायकोर्ट
First Published :30-August-2016 : 06:42:48
नागपूर : अनुसूचित जातींविषयी सररासपणे वापरला जाणारा ‘दलित’ हा शब्द असंवैधानिक असल्याने शासकीय व्यवहार आणि व प्रसारमाध्यमांसह सर्वांना हा शब्द वापरण्यास मनाई करावी, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात करण्यात आली असून, न्यायालयाने त्यावर केंद्र व राज्य सरकारला नोटीस काढली आहे.
सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी केलेल्या या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर न्या. भूषण गवई व न्या. अतुल चांदुरकर यांच्या खंडपीठाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव, प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे सचिव, राज्याचे मुख्य सचिव व नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. शासकीय अभिलेख, परिपत्रके, अधिसूचना, योजना इत्यादी दस्तावेजांतून ‘दलित’ शब्द काढून टाकण्यास शासनाला निवेदने सादर केली, पण त्यावर काहीच निर्णय न झाल्याने ही याचिका करण्यात आली आहे. ‘दलित’ शब्दाऐवजी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध या शब्दाचा वापर करण्यात यावा, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे. (प्रतिनिधी)
याचिकेत म्हटले की, सुप्रीम कोर्टाने ‘एस. पी. गुप्ता वि. राष्ट्रपती’ या प्रकरणात शासकीय अभिलेखातून ‘दलित’ शब्द काढण्याचे निर्देश दिले होते. लता सिंग वि. उत्तर प्रदेश शासन व अरुमुगम सेरवाई वि. तामिळनाडू शासन प्रकरणामध्ये ‘दलित’ शब्द असंविधानिक असल्याचे म्हटले आहे. अनुसूचित जाती आयोगाचे हेच मत आहे.
‘दलित’ शब्द भेदभावजनक, आक्षेपार्ह व जातीवाचकही आहे. या शब्दामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद १४, १५, १६, १७, १९, २१ व ३४१चे उल्लंघन होते. राज्यघटनेत कुठेही ‘दलित’ शब्द न वापरता अनुसूचित जाती असा शब्द वापरण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही या शब्दाला विरोध होता, असे याचिकाकर्त्याते वकील अ‍ॅड. शैलेश ननावरे यांनी निदर्शनास आणले.
‘दलित’ शब्दाला बंदी करा - हायकोर्ट
for more info.
http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=14420864⁠⁠⁠⁠

मी तुमचा बाप बोलतोय

मी तुमचा बाप बोलतोय


अजून किती दिवस मी पुतळ्यात बंद राहू
एरवी एकटाच असतो कार्यक्रमाला हारांचे ढीग किती पाहू
उघड्या डोळ्यांनी समाज नांगवा करताना पाहतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। धृ ।।
शासनकर्ते व्हा या शब्दाचा अर्थ तुम्ही चुकीचा घेतला
सत्तेसाठी लेकरानो  लाचारीचा मार्ग तुम्ही पत्करला
मी स्वाभिमानाचा मार्ग तुम्हा दिला
राजकारणात तुम्ही माझ्या विचारांचा खून केला
राजकारणापरिस अर्थकारण तुमचे मजबूत करा हेच सांगत आलोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय  ।। १ ।।
वंचितांसाठी लढा माझा होता रे तुम्ही त्याला विसरून गेलात
आरक्षणाचा फायदा घेण्यात तुम्ही देखील चुकलात
संधीचे सोने करून बांधवाना बरोबरीने नेण्यात कमी पडलात
स्वार्थाने तुमच्या लेकरानो तुम्हीच तुमचा घात केलात
का आजला माझा स्वाभिमानी समाज लाचारीत धन्यता मानतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। २ ।।
जयंती आली कि माझ्या  नावाचा जयघोष होतो
का रे माझ्या विचारांचा खून करून  खुशाल जयभीम करतो
आंबेडकरी चळवळीची नुसतीच चर्चा पाहतो
माझ्या समता रथाला का मागे तू खेचतो
अरे जिंदगी माझी जाळून मी त्याला इथवर घेवून आलोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ३ ।।
शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध लेकरा मीच तुम्हा सांगितले
पण शिक्षण घेवून तुम्ही मात्र गुलामीकडे का चालले
परिवर्तन होईल समाजात पण समाजाची लाचारीकडे पाऊले
माझ्या कर्तुत्वाचा खून करून तुम्ही का निघाले
तरी देखील आज हि तुम्ही स्वाभिमानी व्हाल हीच आस धरतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ४।।
५६ ला मी गुलाम धर्माचा त्याग करून तुम्हाला समतेचा धम्म दिला
काय गुन्हा होता माझा म्हणून तुम्ही माझ्या विचारांचा घात केला
गुलामीतून मुक्त होण्यासाठी २२ प्रतिज्ञांचा विचार दिला
त्याच प्रतिज्ञा पाळण्याचा लेकरानो तुम्हाला त्रास झाला
अरे स्वातंत्र्यासाठीच मी तुम्हाला त्या २२ प्रतिज्ञा देतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ५ ।।
अंधरुढीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी मला अनेक दशके लढावी लागली
समाज माझा सुज्ञ व्हावा म्हणून अनेक संकटे मी स्वतःवर ओढवून घेतली
हिंदुत्ववाद्यांचा मी कट्टर शत्रू झालो पण मी काळजी माझ्या समाजाची केली
तरी पण अजून तुमची देवांची हौश कशी नाही भागली
बुद्ध हाच तुमच्या मुक्तीचा मार्ग आहे हे मी किती दशके सांगतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ६ ।।
माझ्या मरणाला आज ६ दशके झाली पण तुम्ही नाही बदलले
तुमच्यातून एखादा आंबेडकर होताना अजून नाही पाहिले
जे जे लोक पुढे आले सगळे मला गद्दार निघाले
पण मला मात्र तुम्ही जातीवाद्यांच्या दावणीला बांधले
आता मी मुक्त होण्याची वात बघतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ७ ।।
भीमसैनिक म्हणवता ना स्वतःला मग पुढे कधी येणार
माझ्या समता रथाला  तुम्ही पुढे कधी नेणार
माझ्या वंचित लेकरांना न्याय कधी देणार
बापाच्या ध्येयाची सांगा पूर्तता कधी करणार
आता मी तुमच्यातील स्वाभिमानी भीमसैनिक शोधतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ८ ।।
आज माझा समाज काही पहिल्या सारखा अडाणी नाही
पहिल्यासारखे आता सर्वच काही गरीब राहिले नाहीत
रहायला माडी दारात गाडी आता काही नवीन नाही
सुखसोयी मध्ये लेकरानो आता चळवळीला हि वेळ नाही
माझ्या त्या अडाणी जनतेचा स्वाभिमान आणि इमान आज मला आठवतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ९ ।।
वचन द्या लेकरानो मला माझे कार्य पुढे घेवून जाण्याचे
या समाजालाच नव्हे तर वंचित मानवाला न्याय मिळवून देण्याचे
जातीधर्माच्या पलीकडे असणारे नाते जपण्याचे
पालन करा त्या सम्यक बुद्धाच्या मार्गाचे
लेकरानो शेवटचे माझे ऐका आज हातात हात घ्या इतकेच सांगतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। १० ।।
मानवतेची कास धरा बुद्धाचा मार्ग स्वीकारून
आपलाच नाही तर वंचितास त्या रे न्याय द्या मिळवून
माझ्या जयघोषापरिस माझ्या विचारांचे मोल घ्या जाणून
घराघरात क्रांतीसाठी एक भीमसैनिक घ्या तयार करून
रविकिरणांची साथ आहे रे क्रांतीची मशाल घेण्यासाठीच बोलवतोय
अरे माझीच औलाद आहात ना मी तुमचा बाप बोलतोय ।। ११ ।।
🙏🙏🙏

काय कमाल आहे.... अॅट्रासिटी अॅक्ट चा विरोध एकच समाज करतोय.... आणि या विरोधाचा विरोध पण एकच समाज करतोय...

काय कमाल आहे....
अॅट्रासिटी अॅक्ट चा विरोध एकच समाज करतोय....
आणि या विरोधाचा विरोध पण एकच समाज करतोय....
.
.
.
फक्त बौद्ध समाजाचेच नेते व कायॅकतेॅ अॅट्रासिटी अॅक्टच्या बाजुने बोलत आहेत,विरोध करण्यारयाचा निषेध करीत आहे,मोचेॅ काढत आहेत....
याचा अर्थ काय समजायचा....
अनुसुचीत जाती जमातील इतर जातीतील झोपलेत कि झोपेचे सोंग घेतायत हेच कळत नाही...
फक्त आणि फक्त बौद्ध समाजातीलच
.
.
 मा.प्रकाश आंबेडकर
मा.रामदास आठवले
मा.जोगेद्र कवाडे
मा.अजुॅन डागंळे
मा.अविनाश महातेकर
मा.विवेक चव्हाण

यांनीच फक्त या विषयावर प्रतिक्रिया नोंदवुन शरद पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे बाकीचे....त शेपुट घालुन कोणत्या बिळात बसेलत कोणास ठाऊक...


.कुठे गेले लक्षमण ढोबळे
.कुठे गेले जनादॅन चादुंरकर
.कुठे गेले सुशीलकुमार शिंदे
.कुठे गेले बाळा नादंगावकर
.कुठे गेले बबनराव घोलप
.कुठे गेले मधुकरराव पिचड
.कुठे गेले विष्णू सावरा
.कुठे गेले विजयकुमार गावित
.कुठे गेले सगळ्या पक्षातील एससी-एसटी चे नेते व कायॅकतेॅ
.
.या अॅक्टची गरज काय फक्त बौद्ध समाजालाच आहे का.....

शेगावकर सराची पोस्ट Whatsapp वरुन ☀सम्राट अशोका संबंधी प्रचलित गैरसमज आणि त्याचे निरसन☀ 📕📕📕📕📕📕📕📕📕

शेगावकर सराची पोस्ट Whatsapp वरुन ☀सम्राट अशोका संबंधी प्रचलित गैरसमज आणि  त्याचे निरसन☀
📕📕📕📕📕📕📕📕📕
🚫सम्राट अशोकाने प्रजेला बळजबरी बौद्ध बनवले.

✏सम्राट अशोकाने बळजबरीने प्रजेला बौद्ध बनविले..हा धादांत खोटा आरोप आहे.... प्रजा सुध्दा होणार्या हिंसेला कंटाळली होती.... अशोकाने हिंसेचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारल्याने प्रजा आश्वस्त झालेली होती ,आणि अशोकाच्या धर्माज्ञांमुळे प्रजेला सुरक्षिततेची खात्री पटली, व त्यामुळे प्रजेनेच स्वतः उत्स्फूर्तपणे बौद्ध धम्माचा स्वीकार केला.... अशोकानेच काय ,तर जगातील कुठल्याही राजाने बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार आणि स्वीकार हा कुठल्याही प्रकारच्या बळजबरीने, अथवा लालुच दाखवून केला नाही, असा हा एकमेव धम्म आहे.......!!!


🚫सम्राट अशोकाच्या अहिंसेच्या धोरणामुळे देश परकीयांचा गुलाम बनला
✏सर्व मौर्यकाळात एकही पराकिय आक्रमण झाले नाही . ज्यावेळी परकिय आक्रमणे झाली त्या वेळी बौध्द राजे नव्हते .

🚫सम्राट अशोकाने  सारा राज कोष धर्मप्रसारासाठी रिकामा करून देशाला
✏90 करोड रुपयाचे बांधकामे आशोकांनी केली ( 84 हजार स्तुपाची बाँघकामे ) ती लोकांनी लग्न , इतर संमारंभावार होणारा खर्च वाचवून उस्फुर्त दानातून केली , राजकोषातून नव्हे .
मौर्याच्या राजकोषात पाटलीपुत्र राजवाड्यात 36 करोड नाणी होती ती कनिंघमनी शोधून काढली .
84 हजार स्तुप पुजेसाठी नव्हते , तर तिथे जनतेचे व पशुसाठीचे ते विनामुल्य दवाखिने होते . व तिथेच शिक्षणाचे कार्यही चालत असे हे कार्य राजकोश आणी दानावर चालत असे .

🚫सम्राट अशोकाने सत्तेच्या हव्यासापोटी आपल्या 99 भावांचा  खुन केला.
✏मुळात त्याला 99 भाऊ होते हेच चूक आहे .
जेव्हा त्यांच्या शिलालेखाची भाषा सामजत नव्हती तेंव्हा तसे म्हमत त्या सर्व दंतकथा निघाला .
एका स्तँभलेखावर अशोक म्हणतो की मी लिहिलेले नियम माझ्या मुलांना व भावांनाही बंधनकारक राहतील .
भावा बहिणी सोबत त्याचे संबध स्नेहाचेच होते .
फक्त युध्दाचे वेळी सुशिम आग लागलेल्या खंदकातपडून मरण पावला .

 🚫सम्राट अशोक दीसायला अतिशय कुरूप होता
कथा कांदब-यातील मजकुर हा इतिहास नसतो .....
काळा व कुरुप हा दुसरी धम्म संगितीला धन देणारा कालाशोक होता .
सम्राट अशोकांनी तिसरी धम्म संगिती घेतलेले आहे . या दोघामध्ये अनेक वार्षाचे अंतर आहे .कालाशोक व सम्राट आशोकांचे चरित्र एकमेकात जाणुनबुजून मिक्स करण्यात आले आहे .

अशोक हा दिसायला कुरूप नसून त्याचे व्यक्तीमत्व हे प्रभावशाली होते....सातवाहनांनी बांधलेल्या अमरावती स्तूपावर त्याचे जे शिल्प कोरलेले आहे, त्यावरनच त्याच्या व्यक्तीमत्वाची कल्पना येते...आणि भारत सरकारने त्याच्या प्रति आदर व्यक्त करून, त्याच्या सन्मानासाठी जे पोस्ट तिकीट जारी केले आहे... त्या तिकीटावरील असलेले अशोकाचे चित्र हे अमरावती स्तूपावर असलेल्या अशोकाच्या शिल्पावरूनच घेतलेले आहे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

थोडे डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्वा विषयी

थोडे डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्वा विषयी

डॉ. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक महत्त्वपूर्ण
पैलूंपैकी त्यांचं फॅशन स्टेटमेंट हे एक महत्त्वाचं अंग आहे. ते
अशासाठी की त्या काळात अप टू डेट राहणारी केवळ तीनच
माणसं भारतीय समाजकारणात अग्रेसर होती. पं. जवाहरलाल
नेहरू, बॅ. मोहम्मद अली जिन्ना आणि तिसरे डॉ. बाबासाहेब
आंबेडकर.
या तिघांपैकी बाबासाहेब सोडले तर बाकी दोघे हे सधन
कुटूंबातील. बालपण आणि तारुण्य सर्व सुख सोयी आणि
संसाधनांनी भरलेल्या वातावरणात गेलं. याउलट
बाबासाहेबांच्या घरी कमालीचं दारिद्र्य होतं. जातीव्यवस्थेचे,
अस्पृश्यतेचे चटके अलग. तरी वकिली व्यवसायातून
कमावलेल्या संपत्तीतून त्यांनी स्वतःचं एक फॅशन स्टेटमेंट
तयार केलं होतं. तसे ते स्वभावाने पूर्णतः युरोपीयनच होते.
पोटाला खायला मिळालं नाही तरी चालेल पण अंगावर चांगलं
कापड हवं हा त्यांचा आग्रह असे. बाबासाहेबांना सिडनहम
कॉलेजमध्ये असताना पहिला पगार मिळाला. त्यांनी रमाईला
सांगितलं की घरातल्या सर्वांना कपड्यांची मनसोक्त खरेदी
करून घे. रमाई सुद्धा जिंदादील माणसाचीच सोबती. बैलगाडी
भरून कपड्यांची खरेदी केली. हा भाग वेगळा की त्या वेळी
बाबासाहेबांना नऊशे रुपये पगार झाला होता. तर
बाबासाहेबांकडे उंची सुट होते. प्रत्येक मोसमात घालता
येतील अशा पद्धतीने त्यांनी कापडांची निवड सुट साठी केलेली
होती. प्रत्येक सुटची शिलाई वेगळ्या ढंगाने केलेली होती.
प्रत्येक सुट हा थ्री पीस असे. सुटच्या आत पेनांसाठी वेगळा
खिसा, अचानकपणे टिपणे काढल्यानंतर कागद सुरक्षित
रहावा म्हणून असलेला वेगळा खिसा अशी ठेवण असायची.
त्यातल्या त्यात त्यांच्या जोधपुरी सुटची मिजास ही भारीच
असायची. पंजाबात असताना त्यांनी परिधान केलेला काळा
जोधपुरी सुट हा मला त्यांनी आजवर परिधान केलेला सर्वात
बेस्ट सुट वाटतो. अन् दुसरा सुट हा तत्कालीन राष्ट्रपती
राजेंद्रप्रसाद यांच्यासोबत असताना घातलेला पांढऱ्या रंगाचा
जोधपुरी सुट. त्यांची पँट मस्त ढगाळ, लांबीला भरपूर अन्
पोटापर्यंत ओढलेली असायची. त्यांचे वापरायचे बेल्ट हे साधे
असले तर उच्च दर्जाचे होते. त्यांना हॅट आवडत. त्याचं एक
वेगळं कलेक्शन होतं त्यांच्याकडे. बाबासाहेबांच्या चष्म्याच्या आकर्षक फ्रेम ह्या त्यांनी अनेकदा
युरोपात असताना बनवून घेतल्या होत्या. बाबासाहेबांचं
कपाळ भव्य होतं. डोळे मोठे होते. कान सुद्धा मोठे होते.
त्यांचे हात आणि हातांची बोटं सुद्धा साधारण लांबीपेक्षा
मोठी होती. ही सारी गुणवैशिष्ट्ये बुद्धाच्या शरिरातही होती.
खरे तर ही लक्षणे एका महान प्रकांड पांडित्याची असतात.
त्यामुळे गोलाकार... थोडक्यात अंडाकृती फ्रेमचा चष्मा
त्यांना परफेक्ट शोभायचा. बाबासाहेब शर्टवर तसे फारच
कमी असायचे. फावल्या वेळेत ते लेहंगा किंवा लुंगी नेसत.
त्यांचा फक्त शर्टवरचा एकमात्र फोटो आहे तो मिलिंद
कॉलेज, औरंगाबदमधला.
आता थोडंसं पुढे येऊयात... बाबासाहेबांच्या खिशाला एकाच
वेळेस सहा पेन असत. त्यातील कित्येक पेन महागडे असायचे.
तब्बल दोनशे रुपयांचे पेन असायचे ते. त्यांना इन्क पेन
आवडायचे. त्यांची पेन पकडण्याची पद्धत सुद्धा अफाट
होती. कित्येक पेनवरची कव्हर कलर अजूनही शाबूत आहेत.
इतक्या लेवीश पेनचं कलेक्शन अजूनतरी कोणा इतरांकडे असेल
असे वाटत नाही.
बाबासाहेब युरोपीयन स्टाईलवालं चैनीचं घड्याळ वापरायचे.
तसंच त्यांच्या हातातील घड्यांळ्यांचं कलेक्शन सुद्धा फार
सुंदर होतं.
बाबासाहेब सुट परिधान करताना आतला शर्ट हा कोटांच्या
पुढे कसा असेल आणि शर्टाला असलेली बटणं आणि पुढचं
घड्याळ शिस्तीत कसं असेल याकडे खुप बारकाईने लक्ष
ठेवायचे. तीच गत त्यांच्या बुटांच्या बाबतीत. त्यांनी
वापरलेले बुट हे त्या काळातले सर्वोत्तम बुटांपैकी एक होते.
आज अनेक ठिकाणी त्यांनी वापरलेल्या बुटांचे जोडे
आपल्याला पहायला मिळतात. मी मघाशीच म्हटलं की त्यांना
हॅटचा शौक होता. त्यांनी विविध प्रकारच्या हॅट वापरल्या,
काही वेळा कॅप वापरल्या. राऊंड कॅप सुद्धा घातली. तसेच
काळ्या चष्म्यांच्या बाबतीतही तीच गत होती. त्यांच्याकडे
निरनिराळ्या रंगाच्या टाय होत्या. कोणत्या रंगाच्या
सुटसोबत कोणत्या टाय असाव्यात याबाबतचा त्यांचा
चॉईससुद्धा भन्नाट होता. डायबिटीसचा त्रास झाल्यानंतर
त्यांनी काठीचा आधार घ्यायला सुरूवात केली. पण त्यांच्या
काठीवर नक्षीकाम आणि काठ्यांचं कलेक्शनही तसंच
स्टाईलिश होतं.
बाबासाहेबांनी अनेकदा भावूक होऊन सांगितलं होतं की, न्हावी
पैसे घेऊन सुद्धा त्यांचे केस कापत नसे. त्यांची बहिणच त्यांचे
केस कापून देई. परंतू बाबासाहेबांनी कधी वाढलेले केस, दाढी
असा अवतार ठेवला नाही. क्लिन शेव्ह्ड असायचे ते.
बाबासाहेबांचं राजबिंड रुप खुलून दिसायचं. त्यांना
उद्धारकर्ता, बाप या भावनेतून पाहील्यानं त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाचं असं आकलन करण्याला आपण वावच ऊरू
दिला नाही.

तर दोस्तहो थोडक्यात काय तर... कुणीही कधी तुम्हाला
म्हटलं की एवढं लॅविश का राहता? हे असं सोनं नाणं का
घालता? हे असलं उंची का जेवता ? तर एवढंच सांगा..
आमच्यात हे असंच करतात.. असंच खातात.. असेच कपडे
घालतात. आपल्या शेकडो पिढ्या बिनकपड्यांच्या हिंडल्यात.
एक सितारा जन्माला आला अन् त्यानं सारं काही पालटून
टाकलं. जे घालाल ते चांगलंच घाला. भारीच घाला. आपलं
सौंदर्यशास्त्र ठासून सांगा, दाखवा अन् मिरवा ही. याला भले
ते निर्लज्ज प्रदर्शन म्हणोत तर म्हणूदे.. मेहनतीच्या
कमाईने आलेल्या वस्तूला निर्लज्जपणा म्हणत नाहीत.
स्वाभिमान म्हणतात.

आज मोठ्या अभिमानाने सांगतो की, होता तो भिम माझा कोहिनूर भारताचा

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतात जन्माला आले नसते तर आज *मी* देखिल शिकुन मोठि झाले नसते

अशा युगपुरुषास कोटी-कोटी प्रणाम..... जयभिम
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

पोस्ट नः 142 बुध्द आणि त्यांचा धम्म दुसरा खंडः भाग आठवा 3) इतर गुन्हेगारंची धम्मदीक्षा

पोस्ट नः 142

  बुध्द आणि त्यांचा धम्म    दुसरा खंडः भाग आठवा

 3) इतर गुन्हेगारंची धम्मदीक्षा
------------------
1) राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दुर एक पर्वत होता,

2) या पर्वतावर एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातुन दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता.

3) पाचशे दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणारया प्रवाश्यांची लुटमार आणि खुन करीत

4) त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवीत असे, पंरतु ते नेहमी निसटुन जात.

5) जवळच राहत असलेल्या तथागत बुध्दांनी या लोकाच्या स्थितीचा विचार केला त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरुप कळत नव्हते आणि जरी तथागत त्यांना शिकवण्यासाठी त्या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्याच्या धम्माची माहीतीही त्यांच्या कानावर पडली नव्हती म्हणुन तथागतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले

6) आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रींमत माणसाचा वेष धारण केला. खडग आणि धनुष्य यांसह उत्तम झुल घातलेल्या उमद्या घोड्यावर लगाम मोल्यवान जडजावहीर लावुन सजविला

7) दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला लुट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती , चला जल्दी करुन आपण त्याला पकडू या

8) तो प्रवाशी निसटुन जाऊ नये म्हणुन ते त्याला घेरु लागले . पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले.

9) ते जमिनीवर पडल्यानंतर उदगारले अरे देवा हे काय आहे ? अरे देवा हे काय आहे

10) त्यावर त्या प्रवाशानी त्या डाकुंना समजावुन सांगितले कि ह्या सर्व संसारात घेरुन टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे कि त्याच्या मानाने ते डाकु दुसरयाला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्यांच्या यातना काहीच सुचत नाहीत  अंश्रध्दा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकु दुसरयांना ज्या जखमा
आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक व संदेहाच्या जखमा भरुन येऊ शकतात दुसरया कशाने त्या भरु शकत नाहीत नंतर तो प्रवाशी पुढे म्हणाला

11) दुःखासारखी यातना देणारी जखम कोणतीही नाही, दृष्कृत्यासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही, धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही , या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते भ्रान्त झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते,

12) आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते,

13) म्हणुन अंश्रध्दा दुर करण्यास दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवुन देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे जे ती ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त

14) ज्याने सर्वात अधिक पुण्य सांपादिले आहे तोच ह्या पदवीला पात्र ठरतो

15) हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दृष्ट जीवनाचा पश्चात्ताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळुन पडले आणि त्यांच्या जखमा भरुन निघाल्या .

16) नंतर ते तथागतांचे शिष्य झाले. आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला.

रोज वाचा
    " बुध्द आआणि त्यांचा धम्म
पुढील पोस्ट मध्ये वाचा

धम्मदीक्षेची जोखीम


1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो "
*******
        विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

(INDIA THAT IS BHARAT.)

Tuesday, 30 August 2016

जनरली adv.प्रकाश आंबेडकर यांच्यावर केले जाणारे आरोप आणि वास्तविकता ?

१ )आरोप - प्रकाश आंबेडकर यांनी चळवळ चालवली नाही ?

वास्तविकता - १९८० सालापासून सम्यक समाज , गायरान जमिनीचा सत्याग्रह ,मंडल आयोगाचा लढा , व्ही .पी सिंग सोबत तह करून बौद्धांचा मंडल आयोगात समावेश ,संसदेत तैलचित्र ,बाबासाहेबांना भारतरत्न , चलनी नाण्यावर बाबासाहेब , पोष्ट तिकिटावर बाबासाहेब , भारताच्या इतिहासात सर्वात लौंग मार्च रिडल्स च्या वेळी काढण्यात येणार्या मोर्चाचे नेतृत्व , २ वेळा केंद्रीय मंत्रिपद नाकारून समाजाच्या हिताच्या गोष्टी करून घेणारे , रिपब्लिकन ऐक्य झाले तेंव्हा उत्तम प्रशासकाची भूमिका निभावून ऐक्यानंतर एकीकृत " रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया " स्वबळावर लढण्यावर जोर देऊन पक्षाला मान्यता आणि अधिकृत चिन्ह मिळवून देण्यात सिंहाचा वाटा , राजगृहावर आलेले तत्कालीन कॉंग्रेस आणि आताचे राष्ट्रवादी कॉंन्ग्रेस चे बलाढ्य नेते शरद पवार यांना २ तास वाट पाहायला लावून राजकीय मुसद्दीपणा दाखवून पहिल्यांना ४ खासदार रिपब्लिकन पक्षाला देणारे बाळासाहेब , पक्षाची लोकशाही निवडणूक घेऊन राजा ढाले यांना निवडणूक प्रक्रियेतून अध्यक्ष करणारे बाळासाहेब , राजा ढाले लोकशाही मार्गाने निवडणूक मान्य न करून त्यांना विरोध करणारे रा .सु .गवई ,रामदास आठवले यातून ऐक्य तुटू न देता रा .सु .गवई ला अध्यक्षपद देणारे फक्त बाळासाहेब ,पुढे रा .सु .गवई .आणि रामदास आठवले ऐक्य तोडण्यास कारणीभूत तरीही परत लढून लोकसभेत जाणारे बहुजन लोकांना आमदार ,मंत्री करणारे बाळासाहेब ,किनवट pattern आणि अकोला pattern च्या रुपात पहिली सोशल इंजिनियरिंग करणारे बाळासाहेब आंबेडकर , २० वर्षापासून अकोला जि .प .पंचायत समित्या ताब्यात ठेवणारे बाळासाहेब , डाउ या रासायनिक प्रकल्प याला विरोध करण्यासाठी वारकर्यासोबत मोठ आंदोलन करणारे बाळासाहेब ,भामरागड डंकल प्रस्तावाला विरोध करण्यासाठी आदिवासी जनतेला सोबत घेऊन बंदूक मोर्चा काढणारे बाळासाहेब ,तिबेट मधील बौद्ध भिक्खू वरील अत्याचाराला विरोध करण्यासाठी कॅण्डल मार्च काढणारे बाळासाहेब , शेतकर्याच्या आत्महत्येप्रकरणी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग , सोनिया गांधी यांच्यावर खटला भरणारे बाळासाहेब , दक्षिण आफ्रिकेत संयुक्त राष्ट्रात भरलेल्या जागतिक परिषदेत भारताच्या १२५ खासदाराचे नेतृत्व करून जागतिक रंगभेदापेक्षा भारतातील जातिवाद खूप मोठा आहे असे सांगणारे बाळासाहेब , २००५ मध्ये सुप्रीम कोर्टाने खाजगी मेडिकल इंजिनियरिंग संस्थे मध्ये आरक्षण राहणार नाही हा निर्णय न्यायालयाने घेतला असता त्या निर्णयाला आव्हान देऊन अंगावर कोट चढवून एस .सी ,एस.टी . ओबीसी साठी लढणारे देशातील एकमेव नेते,अन्याय आत्याचाराच्या वेळी समाजाच्या पाठीशी उभे राहणारे बाळासाहेब अशा अनेक गोष्टी त्या लिहायला अपुर्या पडतील ते आजवर जातींतच्या बाबतीत बाबासाहेबांच्या उद्देशाला पुढे नेणारे एकमेव बाळासाहेबच .........तरी सुद्धा आरोप करायचा कि चळवळीला काहीही योगदान नाही ?

२) प्रकाश आंबेडकर हे ऐक्याविरोधी आहे ?

वास्तविकता - १९८९ आणि १९९५ च्या ऐक्याच्या वेळी सर्वसमावेशक आणि समाजहिताची भूमिका घेणारे एकमेव बाळासाहेब होते . १९८९ ला आणि १९९५ ला ऐक्य प्रकाश आंबेडकर यांनी फोडलं नाही उलट रा .सु .गवई ने स्वतः च्या घरातील लोकांचा समावेश असलेली खोटी कार्यकारिणी निवडणूक आयोगाला दाखवून आणि आठवले कवाडे यांच्या फुटीर आणि स्वार्थी भूमिकेमुळे ऐक्य तुटलेलं आहे १९८९ आणि ९५ नंतर च्या प्रत्येक गोष्टीचा तपशील अभ्यास केल्यावर हेच दिसत परंतु ऐक्याच खापर आणि बळी प्रकाश आंबेडकर ठरलेले आहेत .

३) प्रकाश आंबेडकर यांची बायको ब्राह्मण आहे आणि चळवळ त्यामुळे दाबून ठेवलेली आहे ?

वास्तविकता - प्रकाश आंबेडकर यांची पत्नी ब्राह्मण असली तरी जातीअंताचा भाग म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी हि कृती होती आणि त्यांच्या पत्नी बौद्ध विवाह पद्धतीने विवाहबद्ध होऊन बौद्ध धम्माची दिक्षा ग्रहण केलेली आहे त्यामुळे असले आरोप हीन पातळीचे आणि सूडबुद्धीचे आणि खालच्या दर्जाची मानसिकता दाखवितात . मुळात प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजलीताई सच्च्या आंबेडकरवादी आहेत .कर्वे instititute च्या समाजसेवा विभागाच्या मुख्य सदस्य आहेत , सीएसपी प्लान च्या दिल्ली ,मुंबई आणि पुणे च्या मुख्य सल्लागार ,आदिवासी , मागासवर्गीय ज्या आंबेडकरी समाजाच्या हितासाठी सरकारच्या मुख्य समित्यावर सल्लागार म्हणून काम पाहतात . युनिसेफ आणि tata सोशल च्या सदस्य म्हणून काम पाहतात .ग्रामीण भागातील दलित महिला सबलीकरणासाठी असलेली "चैतन्य " या NGO च्या सल्लागार समिती सदस्य ,सम्यक समाज च्या प्रतिष्ठान च्या विश्वस्त ,अनेक समाजोपयोगी संस्थेत कार्यरत , भारिप कार्यकर्त्यांना नेहमी सहकार्य आणि मनमिळावू स्वभाव यामुळे सर्वांच्या अडी अडचणीत सहभागी , आपले पती प्रकाश आंबेडकर महिन्यातून फक्त १ दिवस आपल्या कुटुंबासोबत असतात तरी सुद्धा कुठलीही तक्रार न करणाऱ्या अंजलीताई ,बाळासाहेबांनां साथ देणाऱ्या अंजलीताई!

१ दिवस आपल्या कुटुंबासाठी देणारे बाळासाहेब सतत विविध भागात दौर्यावर असतात तरीही आपल्या ब्राह्मण बायकोमुळे चळवळ दाबून टाकलेली आहे असे आरोप करणारे मानसिक रुग्ण आहेत अस मी मानतो .

४ ) प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या मुलाची मुंज केली ?

वास्तविकता - प्रकाश आंबेडकर यांचा विवाह ब्राह्मण स्त्री शी झालेला असला तरी त्या स्त्री ने बौद्ध धम्माची दिक्षा ग्रहण केलेली आहे तरीसुद्धा विश्लेषण करण्यासाठी घेतल्यास मनुस्मृती व्यवस्थेत मुंज उपनयन करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांना आहे . मनुस्मृती चा संदर्भ इथे लावला असता पिता म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे वर्णाने शुद्र आणि पत्नी ब्राह्मण आहे परंतु त्यांच्यापासून होणार्या पुत्राला पित्याचा वर्ण लागतो हे मनुस्मृती आणि गौतमीसुत्र मध्ये सांगितलेलं आहे .त्यामुळे त्यांच्या पुत्राचा वर्ण शुद्र होतो त्यामुळे मुंज करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ब्राह्मण वर्णाला आहे , शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला ब्राह्मणांनी का विरोध केला होता याचे संदर्भ शोधले तर शुद्र व्यक्तीस कुठलाही अधिकार मनुस्मृतीने दिलेला नाही .त्यामुळे असले आरोप नालायकपणाचे आणि घाणेरडी प्रवृत्ती दाखवितात .

५) प्रकाश आंबेडकर मंदिरात गेले आणि ब्राह्मणांनी गोमुत्र दिले ?

वास्तविकता - बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात आपापल्या जाती धर्माचे स्वातंत्र्य तर सांगितलेच आहेत परंतु लोकप्रतिनिधी किंवा सार्वजनिक व्यक्ती ला सामाजिक सहिष्णता पाळण्याचे मार्गदर्शक तत्वे डॉ .बाबासाहेबांनी समाविष्ट केलेली आहेत .प्रकाश आंबेडकर यांना मानणारे आंबेडकरी लोक आहेत तितकीच ओबीसी हिंदू आहेत . अनेक वेळा विहार ,बाबासाहेबांची स्मारके पुतळे यांची उद्घाटन बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहेत तशीच इतर जाती धर्माशी नेहमीच संविधानानुसार सहिष्णुता निर्माण केलेली आहे . पक्षाचे आमदार निधीतून एका गावी ओबीसी वर्गाच्या आस्थेच प्रतिक असलेल्या मंदिराच्या जीर्नोधार करण्यात आला होता त्या प्रसंगी ओबीसी हिंदू लोकांनी मंदिर पाहण्यास बाळासाहेब आंबेडकर यांना आग्रह केला असता ,मंदिराची पाहणी करण्यास गेले असता तेथील उपस्थित पुजार्यांनी बाळासाहेबांना नारळ पाणी असलेला प्रसाद दिला असता तो कसा घ्यावा हे त्यांना माहित नसलेले बाळासाहेब त्यात दिसतात आणि कुठलेच दर्शन न घेतलेले बाळासाहेब कुणाच्या भावना दुखवू नये म्हणून ओबीसी समाजाच्या आग्रहाखातर मंदिरात गेल्याच चित्रण video स्वरुपात दिसते परंतु विलास खरात नामक विकृत मानसिक रुग्ण असलेल्या मूलनिवासी नराधमाने अनेक ठिकाणी असे भ्रामक video पसरवून आंबेडकर परिवाराला सतत बदनाम करण्याचे कारस्थान केलेले आहे . वास्तविक असल्या video मध्ये पाहल्यास काहीही नाही परंतु भ्रामकपणे बदनामी करून आपल्याच चळवळीला बदनाम करण्यात येत .ज्या महामानव बाबासाहेबांना मंदिरात प्रवेश नाकारला होता त्यांच्याच नातुपुढे पुजारी वर्ग आज लोटांगण घालत असेल तर बाबासाहेबांच्या चळवळीच खूप मोठ यश आणि परिवर्तन मानव लागेल आणि बाळासाहेब सर्व समाजाचे नेते आहेत आणि कुठेही गेले तरी आंबेडकरी विचारधारा बदलत नसते अस असत तर आज संपूर्ण महाराष्ट्रात जातीअंताचा लढा परिषदा घेणारे ते एकमेव नेते आहेत हे आपण लक्षात घ्यायला हव .

ती त्यांच्या जातीची नव्हती

ती त्यांच्या जातीची नव्हती

भोतमांगे मायलेकीचा
 सामूहिक बलात्कार करुन
लाकडं घातली मायांगात
भावालाच सांगत होते
बलात्कार कारायला चारचौघात
प्रतेकाची मती अंध होती

कारण  ती जातीची नव्हती

ते चेकाळलेच होते
उघडे अंग बघुन वखवखले होते
फिदीफिदी हसत होत्या
त्यांच्या बायका अन मुलंही
तीची त्याना पडली नव्हती

कारण ती जातीची नव्हती

रांगेत उभे होते
बलात्कार करण्यासाठी
आळीपाळीनी
मरेपर्यन्त बलात्कार केला
म्हणे त्यांनी
थूंकले,मुतले,हसले
लाकडे घातली मायांगात
निर्दयी नराधमांनी
तीच्या अंगावर चिंधीही नव्हती

कारण ती जातीची नव्हती

भर दिवसा घटना घडली होती
मायलेकीला घराबाहेर काढली होती
सम्पूर्ण गावाने पाहिला होता अत्याचार
पण एकही नव्हता साक्षीदार
गाव मुग गिळून बसले होते
कशी जिरवली म्हणून हसले होते
तोंडात तिच्या माती होती

कारण ती जातीची नव्हती

कोणालाच काही माहित नव्हते
दिन बांधव गाव सोडून गेले होते
कोणीच रस्त्यावर उतरले नव्हते
कोणी धरणे धरले नव्हते
बाजार बंद केले नव्हते
कोणी मेनबत्या पेटवत नव्हते
कोणी भेटायला जात नव्हते
कोणाला तिची आस्था नव्हती

कारण ती जातीची नव्हती


त्या घटनेला दहा वर्ष झाली
त्यातील काहीची निर्दोष मुक्तता झाली
काहींना फाशी सोडून जन्मठेप झाली
ती दिल्ली किंवा कोपर्डीची नव्हती
तिच्या साठी गाव लढत नव्हते
गावाला तिची सहानुभूती नव्हती

कारण ती जातीची नव्हती

मायलेकीला मारण्यात पूर्ण गावाचा सहभाग होता
खैरलांजी गावाला तंटा मुक्त गावाचा पुरस्कार मिळाला होता.
तिच्या बाजूने कोणी दादा,भाऊ
काका,साहेब, अण्णा आला नव्हता
ती माणुस होती तरीही

ती त्यांच्या जातीची नव्हती

तिच्याकडे माणूस म्हणून
 बघायला हवे होते
ती कोणाची तरी आई होती
कोणाची बहिण होती
कोणाची पत्नी होती
ती गावातील रहीवाशी होती
पण दुर्दैवाची गोष्ट अशी होती

की ती त्यांच्या जातीची नव्हती

🍀गौतम बुद्ध ने ईश्वर का अस्तित्व ही नहीं माना है🍀

🍀गौतम बुद्ध ने ईश्वर का अस्तित्व ही नहीं माना है🍀

गौतम बुद्ध ने कहा--
ईश्वर की चर्चा से कोई प्रयोजन सिद्ध नहीं होता । धर्म की धुरी पर ईश्वर और आदमी का संबंध नहीं है, बल्कि आदमी - आदमी का संबंध है । धर्म का प्रयोजन यही है कि वह आदमी को शिक्षा दे कि वह दूसरे आदमियों के साथ कैसे व्यवहार करें ताकि सभी आदमी प्रसन्न रह सकें ।
ये सब मिथ्या विश्वास के घर है और मिथ्या-विश्वास सम्यक दृष्टि का शत्रु है।
गौतम बुद्ध की दृष्टि में ईश्वर विश्वास बड़ी ही खतरनाक बात थी क्योंकि ईश्वर-विश्वास ही प्रार्थना और पूजा की सामथ्र्य में विश्वास का उत्पाक कारण है और प्रार्थना कराने की जरूरत ने ही पादरी-पुरोहित को जन्म दिया और पुरोहित ही वह शरारती दिमाग है जिसने इतने अंधविश्वास को जन्म दिया और सम्यक्-दृष्टि के मार्ग को अवरूद्ध कर दिया ।
इसलिए , ईश्वर-विश्वास के लिए प्राणघातक है ।

(संदर्भ - बुद्ध और उनका धर्म 1996 संस्करण, पृष्ट 196-199)

पोस्ट नः 141 बुध्द आणि त्यांचा धम्म दुसरा खंडः भाग आठवा अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा

पोस्ट नः 141
    बुध्द आणि त्यांचा धम्म
    दुसरा खंडः भाग आठवा

अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा
********

21) त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाला आपला उजवा हात दाखवुन तथागत म्हणाले राजा हा पहा अंगुलीमाल

22) त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि ती स्थविर अंगुलीमालाजवळ जाऊन म्हणाला आपण खरोखर अंगुलीमाल आहात काय ? होय महाराज

23) महाशय आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते ? आणि आपल्या मातेचे कोणते ? माझ्या पित्याचे गोत्र गार्ग्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी ( मैत्रायणी ) होते

24) गार्ग्य मैत्रायणीपुत्रा सुखी हो आपल्या सर्व गरजा पुरविण्याची मी काळजी घेईन

25) परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची भिक्षेवर जगण्याची व तिहीपेक्षा अधिक चिवरे व वापरण्याची प्रतिज्ञा केली होती, म्हणुन आपल्याला तीन वस्त्रे वापरायला मिळाली आहेत या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले साहाय्य नाकारले

26) नंतर राजा तथागतांच्या जवळ गेला आणि त्याला वंदन करुन एका बाजुला बसल्यावर म्हणाला आश्चर्य आहे तथागत खरोखर हे आश्चर्य आहे. अमनुषाला माणसाळविण्याची अपराजितता पराभुत करण्याची आणि अशांततेला शांत करण्याची तथागतांची केवढी ही किमया हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिकुं शकलो नाही परतु काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता मला अद्याप उराकावयाची आहे

27) राजन आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या नंतर आपल्या आसनावरुन ऊठुन राजाने तथागतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघुन गेला

28) एके दिवशी चिवर परिधान करुन आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकुन मारली तर दुसरयाने सोटा मारला तिसरयाने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकुन मारला त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले त्यांच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटुन गेली आणि तशा स्थितीत तो तथागतांच्या समोर येऊन उभा राहिला तो जवळ येत असताना तथागत त्याला म्हणाले हे सगळे सहन कर हे सगळे सहन कर

"29) याप्रमाणे तथागत बुध्दांची शिकवण स्वीकारुन डाकू अंगुलीमाल एक संतपुरुष बनला*
30) मुक्तीचा आंनद व्यक्त करीत तो म्हणाला ज्याच्या ठायी पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवु लागला आपले पुर्वजीवन जो सदगुणांनी झाकुन टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुध्दांना शरण जातो तो वादळातुन मुक्त चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो

31) माझ्या शंत्रूनी ही शिकवण समजुन घ्यावी व या मार्गाचा अवंलब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंबन करणारया प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे, माझ्या शत्रुंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा

32) स्वतःला अंगुलीमाल म्हणवून व प्रवाहपतित होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण तथागतांनी त्या प्रवाहातुन मला किनारयाला आणले अंगुलुमाल म्हणुन मी राक्ताने माखलेला होतो, आता माझा उध्दार झाला आहे,

*रोज वाचा"
" बुध्द आणि त्यांचा धम्म  "
पुढील भागात वाचा

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो "
*******
       
         विश्वरत्न
    डाँ बाबासाहेब आंबेडकर

👆🏻👆🏻👆🏻👆🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻हॉटेल सर्व्हिस असोसियेट या कोर्ससाठी सिंहगड कॉलेज आंबेगाव बुद्रुक पुणे येथे मोफत प्रवेश सुरू आहे. सीट संपण्या आधी संपर्क साधा

👆🏻👆🏻👆🏻👆🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻हॉटेल सर्व्हिस असोसियेट या कोर्ससाठी सिंहगड कॉलेज आंबेगाव बुद्रुक पुणे येथे मोफत प्रवेश सुरू आहे.
सीट संपण्या आधी संपर्क साधा
शैक्षणिक पात्रता :- १० वी १२ वी पास (पद्वीधारक नको'
कालावधी : ३ महिने.
प्रवेश घेण्याची शेवटची तारीख :-
१ सप्टेंबर २०१६ .
संपर्क:-
मिलिंद सर :- ९१५८८३५८२८
दत्ता जाधव सर ९४२३५८१२२६

टिप:-कृपया आपल्याच मुलांना सांगा. आपल्या ओळखितील एका तरी मुलाला पाठवा