ती त्यांच्या जातीची नव्हती
भोतमांगे मायलेकीचा
सामूहिक बलात्कार करुन
लाकडं घातली मायांगात
भावालाच सांगत होते
बलात्कार कारायला चारचौघात
प्रतेकाची मती अंध होती
कारण ती जातीची नव्हती
ते चेकाळलेच होते
उघडे अंग बघुन वखवखले होते
फिदीफिदी हसत होत्या
त्यांच्या बायका अन मुलंही
तीची त्याना पडली नव्हती
कारण ती जातीची नव्हती
रांगेत उभे होते
बलात्कार करण्यासाठी
आळीपाळीनी
मरेपर्यन्त बलात्कार केला
म्हणे त्यांनी
थूंकले,मुतले,हसले
लाकडे घातली मायांगात
निर्दयी नराधमांनी
तीच्या अंगावर चिंधीही नव्हती
कारण ती जातीची नव्हती
भर दिवसा घटना घडली होती
मायलेकीला घराबाहेर काढली होती
सम्पूर्ण गावाने पाहिला होता अत्याचार
पण एकही नव्हता साक्षीदार
गाव मुग गिळून बसले होते
कशी जिरवली म्हणून हसले होते
तोंडात तिच्या माती होती
कारण ती जातीची नव्हती
कोणालाच काही माहित नव्हते
दिन बांधव गाव सोडून गेले होते
कोणीच रस्त्यावर उतरले नव्हते
कोणी धरणे धरले नव्हते
बाजार बंद केले नव्हते
कोणी मेनबत्या पेटवत नव्हते
कोणी भेटायला जात नव्हते
कोणाला तिची आस्था नव्हती
कारण ती जातीची नव्हती
त्या घटनेला दहा वर्ष झाली
त्यातील काहीची निर्दोष मुक्तता झाली
काहींना फाशी सोडून जन्मठेप झाली
ती दिल्ली किंवा कोपर्डीची नव्हती
तिच्या साठी गाव लढत नव्हते
गावाला तिची सहानुभूती नव्हती
कारण ती जातीची नव्हती
मायलेकीला मारण्यात पूर्ण गावाचा सहभाग होता
खैरलांजी गावाला तंटा मुक्त गावाचा पुरस्कार मिळाला होता.
तिच्या बाजूने कोणी दादा,भाऊ
काका,साहेब, अण्णा आला नव्हता
ती माणुस होती तरीही
ती त्यांच्या जातीची नव्हती
तिच्याकडे माणूस म्हणून
बघायला हवे होते
ती कोणाची तरी आई होती
कोणाची बहिण होती
कोणाची पत्नी होती
ती गावातील रहीवाशी होती
पण दुर्दैवाची गोष्ट अशी होती
की ती त्यांच्या जातीची नव्हती
भोतमांगे मायलेकीचा
सामूहिक बलात्कार करुन
लाकडं घातली मायांगात
भावालाच सांगत होते
बलात्कार कारायला चारचौघात
प्रतेकाची मती अंध होती
कारण ती जातीची नव्हती
ते चेकाळलेच होते
उघडे अंग बघुन वखवखले होते
फिदीफिदी हसत होत्या
त्यांच्या बायका अन मुलंही
तीची त्याना पडली नव्हती
कारण ती जातीची नव्हती
रांगेत उभे होते
बलात्कार करण्यासाठी
आळीपाळीनी
मरेपर्यन्त बलात्कार केला
म्हणे त्यांनी
थूंकले,मुतले,हसले
लाकडे घातली मायांगात
निर्दयी नराधमांनी
तीच्या अंगावर चिंधीही नव्हती
कारण ती जातीची नव्हती
भर दिवसा घटना घडली होती
मायलेकीला घराबाहेर काढली होती
सम्पूर्ण गावाने पाहिला होता अत्याचार
पण एकही नव्हता साक्षीदार
गाव मुग गिळून बसले होते
कशी जिरवली म्हणून हसले होते
तोंडात तिच्या माती होती
कारण ती जातीची नव्हती
कोणालाच काही माहित नव्हते
दिन बांधव गाव सोडून गेले होते
कोणीच रस्त्यावर उतरले नव्हते
कोणी धरणे धरले नव्हते
बाजार बंद केले नव्हते
कोणी मेनबत्या पेटवत नव्हते
कोणी भेटायला जात नव्हते
कोणाला तिची आस्था नव्हती
कारण ती जातीची नव्हती
त्या घटनेला दहा वर्ष झाली
त्यातील काहीची निर्दोष मुक्तता झाली
काहींना फाशी सोडून जन्मठेप झाली
ती दिल्ली किंवा कोपर्डीची नव्हती
तिच्या साठी गाव लढत नव्हते
गावाला तिची सहानुभूती नव्हती
कारण ती जातीची नव्हती
मायलेकीला मारण्यात पूर्ण गावाचा सहभाग होता
खैरलांजी गावाला तंटा मुक्त गावाचा पुरस्कार मिळाला होता.
तिच्या बाजूने कोणी दादा,भाऊ
काका,साहेब, अण्णा आला नव्हता
ती माणुस होती तरीही
ती त्यांच्या जातीची नव्हती
तिच्याकडे माणूस म्हणून
बघायला हवे होते
ती कोणाची तरी आई होती
कोणाची बहिण होती
कोणाची पत्नी होती
ती गावातील रहीवाशी होती
पण दुर्दैवाची गोष्ट अशी होती
की ती त्यांच्या जातीची नव्हती
No comments:
Post a Comment