Tuesday, 30 August 2016

पोस्ट नः 141 बुध्द आणि त्यांचा धम्म दुसरा खंडः भाग आठवा अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा

पोस्ट नः 141
    बुध्द आणि त्यांचा धम्म
    दुसरा खंडः भाग आठवा

अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा
********

21) त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाला आपला उजवा हात दाखवुन तथागत म्हणाले राजा हा पहा अंगुलीमाल

22) त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि ती स्थविर अंगुलीमालाजवळ जाऊन म्हणाला आपण खरोखर अंगुलीमाल आहात काय ? होय महाराज

23) महाशय आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते ? आणि आपल्या मातेचे कोणते ? माझ्या पित्याचे गोत्र गार्ग्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी ( मैत्रायणी ) होते

24) गार्ग्य मैत्रायणीपुत्रा सुखी हो आपल्या सर्व गरजा पुरविण्याची मी काळजी घेईन

25) परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची भिक्षेवर जगण्याची व तिहीपेक्षा अधिक चिवरे व वापरण्याची प्रतिज्ञा केली होती, म्हणुन आपल्याला तीन वस्त्रे वापरायला मिळाली आहेत या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले साहाय्य नाकारले

26) नंतर राजा तथागतांच्या जवळ गेला आणि त्याला वंदन करुन एका बाजुला बसल्यावर म्हणाला आश्चर्य आहे तथागत खरोखर हे आश्चर्य आहे. अमनुषाला माणसाळविण्याची अपराजितता पराभुत करण्याची आणि अशांततेला शांत करण्याची तथागतांची केवढी ही किमया हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिकुं शकलो नाही परतु काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता मला अद्याप उराकावयाची आहे

27) राजन आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या नंतर आपल्या आसनावरुन ऊठुन राजाने तथागतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघुन गेला

28) एके दिवशी चिवर परिधान करुन आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकुन मारली तर दुसरयाने सोटा मारला तिसरयाने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकुन मारला त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले त्यांच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटुन गेली आणि तशा स्थितीत तो तथागतांच्या समोर येऊन उभा राहिला तो जवळ येत असताना तथागत त्याला म्हणाले हे सगळे सहन कर हे सगळे सहन कर

"29) याप्रमाणे तथागत बुध्दांची शिकवण स्वीकारुन डाकू अंगुलीमाल एक संतपुरुष बनला*
30) मुक्तीचा आंनद व्यक्त करीत तो म्हणाला ज्याच्या ठायी पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवु लागला आपले पुर्वजीवन जो सदगुणांनी झाकुन टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुध्दांना शरण जातो तो वादळातुन मुक्त चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो

31) माझ्या शंत्रूनी ही शिकवण समजुन घ्यावी व या मार्गाचा अवंलब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंबन करणारया प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे, माझ्या शत्रुंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा

32) स्वतःला अंगुलीमाल म्हणवून व प्रवाहपतित होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण तथागतांनी त्या प्रवाहातुन मला किनारयाला आणले अंगुलुमाल म्हणुन मी राक्ताने माखलेला होतो, आता माझा उध्दार झाला आहे,

*रोज वाचा"
" बुध्द आणि त्यांचा धम्म  "
पुढील भागात वाचा

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "

2) अन्याय करणारयापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो "
*******
       
         विश्वरत्न
    डाँ बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment