*शिक्षण* ✒
*शिक्षण घेण्याच्या काळात तरूणांनी आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावरच केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. यातूनच त्यांच्या ठिकाणी हाती घेतलेल्या प्रत्येक कामाबद्दल निष्ठा बाळगण्याची सवय वाढीला लागू शकते. तसे ते जीवनाच्या इतर क्षेत्रांत तसेच देशाच्याही इतर घडामोडीत रस घेऊ शकतात. पण जेव्हा त्यांनी स्वतःच्या शिक्षणाचे कर्तव्य अंगावर घेतेलेले असते तेव्हा त्यांची मुख्य निष्ठा ही अभ्यासावरच केंद्रित झाली पाहिजे. मागास जातीच्या प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलांना शिकविण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केला पाहिजे. त्यातून ते समाजाचा दर्जा उंचावू शकतील. डाॅ.आंबेडकर हे ज्ञानाचे आणि ग्रंथाचे निष्ठावंत उपासक होते. या निष्ठेमुळेच ते विद्वान आणि महापंडित होऊ शकले. तरूणांनी त्यांचे उदाहरण समोर ठेवून त्याप्रमाणे वागावे.*
*न्यायमूर्ती आर.आर.भोळे*
*सर्वांसाठी_आंबेडकर*
No comments:
Post a Comment