Monday, 31 December 2018

📚📖✒ शिक्षण आणि कायदा 🎓

डाॅ.आंबेडकरांचा अग्रक्रम नेहमीच शिक्षण आणि कायदा या क्षेत्रांना होता. आपल्या संस्था आणि महाविद्यालये त्यांनी नेहमीच राजकारणापेक्षा महत्वाची मानली होती. कारण त्यांच्या हे लक्षात आले होते की जनतेला उदारमतवादी शिक्षण मिळाल्याखेरीज त्यांची परिस्थिती सुधारण्याची सुतराम शक्यता नाही आणि आता डाॅ.आंबेडकरांचा वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी त्या संस्थावरच आहे. वकिलांबद्दल त्यांना नेहमीच जिव्हाळा होता आणि त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये वकिलांचा भरणा मोठा होता. हुकूमशाही आणि नायकपूजा या दोन संकटांनी घेतलेल्या या देशातील लोकशाहीचे अस्तित्व अबाधित राहायचे तर वकिलांचा स्वतंत्र वर्ग जोपासला जाणे अत्यावश्यक आहे असा त्यांचा दृढ विश्वास होता.

प्रा.हेलेकर

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर: अनुभव आणि आठवणी या पुस्तकातून

No comments:

Post a Comment