Sunday, 30 December 2018

वंचित माळी समाज राजकीय एल्गार मधील प्रकाश आंबेडकर यांचं मार्गदर्शनीय भाषण (Full Speech)

आमदार बळीराम सिरस्कार यांच्या उमेदवारीने पुन्हा एकदा अशोक चक्र गतिमान करत आहोत शेगाव : वंचित बहुजन आघाडीतर्फे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरस्कार यांना बुलडाणा लोकसभेची उमेदवारी शेगांव येथील वंचित माळी समाज राजकीय एल्गार परिषद मध्ये जाहीर करण्यात आली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सभेत ही घोषणा केली. वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेसची चर्चा सुरू असून आघाडी बाबत निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आज मोठी घोषणा करत लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पाहिला उमेदवार बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा जाहीर केला आहे. भारिप बहुजन महासंघाचे बाळापूर मतदार संघाचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली. वंचित माळी समाज राजकीय एल्गार मधील प्रकाश आंबेडकर यांचं मार्गदर्शनीय भाषण

No comments:

Post a Comment