सत्ता संपादन मेळावा जाहीर सभा, नांदेड
आयोजक वंचित बहुजन आघाडी
स्थळ : शाहिद रोहित वेमुला परिसर , नवा मोंढा मैदान , कृषि उत्पन्न बाजार समिती , नांदेड
17.01.2019
खा.बँरिष्टर असुदुद्दीन ओवैसी साहेब शत:शत: नमन आपल्या वैचारिक भूमिकेला.
मा.खासदार ओवैसी साहेब, आपल्याला मनापासून सलाम करतो.आम्ही अनेक राजकीय पुढारी, नेते ,पक्षाचे अध्यक्ष पाहिले आहेत. त्यांच्या राजकीय भुमिका आम्ही वेळोवेळी पाहत आलेलो आहोत. त्यांची राजकीय भाषणे आम्ही ऐकत आलेलो आहोत.पण...पण आज महाराष्ट्रात च्या नांदेड भुमित एमआयएम पक्षाचे अध्यक्ष म्हणून,वंचित बहुजन आघाडीचा घटक मित्र म्हणून, एक संविधानवादी म्हणून, एक प्रखर देशभक्त म्हणून, एक खरा सेक्युलर नेता म्हणून आज जी भुमिका घेतली जाहीर केली त्या वैचारिक भुमिकेला माझ्या सारखे लाख्खो लोकं तुम्हाला तहे दिल सें लाख लाख धन्यवाद देत आहेत... शुक्रीया अदा करत आहेत. सलाम तुमच्या जिगरबाज दिलेरीला...सलाम तुमच्या जजब्याला !!
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेसला लोकसभा युतीचा प्रस्तावजुन २०१८ मध्ये दिला. मात्र वंचित बहुजन आघाडीने खा.असुदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाशी युती केली आहे त्या मैत्रीच्या आडुन कॉंग्रेस छक्क्या- पंजाचे राजकारण करत आहे. खा ओवैसी भडकावू भाषण करतात, ओवैसी कट्टरवादी आहेत, खा ओवैसींचा पक्ष भाजपची बी टिम आहे म्हणत बाळासाहेब आंबेडकरांनी आधी एमआयएमशी युती तोडावी नंतरच आम्ही बाळासाहेबांशी युती करू अशी कॉंग्रेसवाल्यांनी भुमिका मांडली. मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी कॉंग्रेसची भुमिका अमान्य करत ,"आम्ही मैत्रीसाठी एकदा धरलेला हात सोडणार नाही!" असे कॉंग्रेसला ठणकावले ! खरंतर कॉंग्रेसचा युतीचा इतिहास पाहता मुळात कॉंग्रेसला युतीच करायची नाही. एमआयएम हा एक बहाना आहे.
मात्र कॉंग्रेसची सत्तेची नशा खासदार ओवैसी साहेब आपण चुरचुर केली आहे." वंचित बहुजन आघाडी आणि कॉंग्रेस युतीत मी आणि माझा एमआयएम पक्ष अडसर ठरत असेल तर मी बाजूला होतो ! मला एकही जागा देऊ नका पण बहुजन समाजाचे नेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी कॉंग्रेसने सन्मानाने युती करावी आणि बाळासाहेबांच्या कद -हैसिएत नुसार त्यांना युतीत जागा वाटप करा.संविधान विरोधी भाजप आरेसेसचा पराभव करा.मला महाराष्ट्रात येवून मुख्यमंत्री व्हायचे नाही. माझ्या गाडीवर लाल दिवा लागावा अशी माझी मंशा नाही. तर इथला गरीब,ओबीसी, दलित, आदिवासी, धनगर, माळी ,मुसलमान विधानसभेत,लोकसभेत निवडून गेला पाहिजे असे मला मनापासून वाटते !!
यासाठीच मी महाराष्ट्रात वंचित समाजासाठी लढाई लढणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यायला आलो आहे. मुस्लिम समाजावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खूप उपकार आहेत. या उपकाराची काही अंशी का होईना त्याची भरपाई करण्यासाठी मी येथे आलो आहे. मी मेल्यावर उपर गेल्यावर मला अल्ला तलाला जबाब द्यावा लागणार आहे. माझा अल्ला मला विचारणार आहे तु जिवंतपणी गोरगरीबांसाठी, दलितांसाठी, शोषितिंसाठी काय केले ? असे विचारल्यावर मला प्रामाणिकपणे उत्तर देता आले पाहिजे. असे सांगत ओवैसी जी आपण ," मी जे युतीबद्दल बोललो तो एक जुमला समजू नका तर माझी ती प्रामाणिक भुमिका कॉंग्रेसच्या अशोक चव्हाणांनी लक्षात घ्यावी" अशी भावनिक साध घातली !!
मा ओवैसी साहेब आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या साठी आणि त्यांनी घेतलेल्या वंचित समूहासाठी आज खूप मोठी त्याग भावना व्यक्त करत असताना मी प्रसारमाध्यमांवर आपल्याला ऐकत होते, पाहत होतो तेंव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी तरळले.अरे ज्याला तुम्ही मुसलमानांचा नेता म्हणून नाकारता आहात, तो कट्टरवादी आहे असे संबोधुन तुम्ही त्याला अपमानास्पद वागणूक देत आहात, तो जहाल भाषण करतो म्हणून त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धिक्कार करत आहात ...त्या ओवैसींनी आज त्यांच्या माणुसकी,सेक्युलरझम,गरिब, वंचित-ओबीसीं समूहाबद्दलचा कनवाळूपणा, सत्तेचा माज नसलेला, स्वातंत्र्य, समता,न्याय, बंधुत्वाची बीज रोवणारा ,प्रसंगी आपल्या राजकीय इच्छा आकांक्षाचा त्याग करणारा महान मुसलमान राजकारणी म्हणून सिध्द केले आहे. हि त्यांची भूमिका म्हणजे खरंतर कॉंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या थोबाडीत मारले सारखे आहे.
आणि म्हणूनच मा खा.ओवैसी जी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईल, आपले मनापासून आभार मानतो.आज जी आपण नांदेडच्या भुमित भूमिका घेतली ती ऐतिहासिक घटना आहे. आपल्या मैत्रीसाठी आपला आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या भावभावना- इच्छा आकांक्षाची खूप मोठी कुर्बानी देत आहात.. परत एकदा सलाम आपल्या जिगरबाज दिलेरीला !!
आपलाच एक कायल चाहता
©सुरेश शिरसाट, अकोला.
https://www.facebook.com/suresh.shirs..
No comments:
Post a Comment