Saturday, 5 January 2019

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची अमरावतीमधील संपूर्ण सभा | UNCUT | एबीपी माझा

'मी गेल्यावर माझ्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली तर मी पुर्ण भारतातून मोठी फौज महाराष्ट्रात पाठवेन', असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे. आझाद यांची आज अमरावतीमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजप सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. भाजप सरकारने माझ्या तीन सभा रद्द केल्या, मात्र अखेर मी अशा ठिकाणी सभा करत आहे जेथे माझे पितृतुल्य काशीराम यांनी भाषण केले होते. आज मी पोटभर बोलणार, कारण मी महाराष्ट्रात बोलत आहे. हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असे आझाद म्हणाले. संविधान कितीही चांगला असला तरी त्याला चालवणारे चांगले असायला पाहिजे. संविधानाचा गैरवापर करुन भाजप सरकारने मला 16 महिने कैदेत ठेवले. मात्र मी येथून गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यावर कारवाई केली तर देशभरातून महाराष्ट्रात फौज पाठवेन, असा इशारा आझाद यांनी दिला.

No comments:

Post a Comment