Wednesday, 16 January 2019

तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करा.

#Once_Again_Ambedkar
तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करा.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

"वैयक्तिक कर्तबगारी हि आदरणीय असतेपण पुष्कळ वेळा ती अनुकरणीय नसते ; म्हणूनच वैयक्तिक कर्तबगारी  सामुदायिक कर्तबगारी यांच्यात तुलना करता सामुदायिक कर्तबगारीशेकडो पटींनी श्रेयस्कर ठरतेवैयक्तिक कर्तबगारी आकाशाएवढी उंच असली तरी साधारण उंचीच्यासामुदायिक कर्तबगारीच्या पासंगालाही ती पुरणार नाही." (अग्रलेख : बहिष्कृत भारतता फेब्रुवारी१९२९खंड - २० - पान ३५बाबासाहेबांवर होणा-या टीकेला उत्तर देण्यासाठी हा लेख तेव्हाच्याबहिष्कृत भारतात संपादकांनी लिहिला होताअतिशय बोध घ्यावा अशी काही वाक्य मी इथे दिलेलीआहेतकारण हल्ली इथे मात्र वैयक्तिक कर्तबगारीने रान माजविले आहेप्रत्येकाला मी किती श्रेष्ठआणि किती समाजाचा उद्धारक हे सिद्ध करायचे आहेज्यांनी साधा दगडही कधी फोडला नाही.त्यांनी समाजाचे आम्हीच उद्धारक म्हणून बुद्धिभेद केला आहेआणि मेंढरांची जमात त्याला बळीपडून वैयक्तिक कर्तबगारीचा उदोउदो करीत सुटले आहे१९७२ नंतर ज्यांनी समाजासाठी त्यागकेला ते आज समाजापासून तुटले आहेतआणि ज्यांनी समाजाला विकून (जाती जोडो आणि वैचारिकआंदोलनाच्या नावाखालीस्वतःची पोळी भाजून घेतलीते आता महापुरुषांच्या रांगेत बसू लागलीआहेतसायकल वरून फिरायची लायकी नसणारेबुद्धीने दिवाळखोर असणारेआणि साध्यामण्याची गाटी घालायची लायकी नव्हती ते हि-याचे दागिने घालणारे समाजालाच वाडीत टाकायलानिघालेतआणि जे समाजासाठी झटलेलढलेमेलेआणि आताही तडपत आहेत ते मेंढरांच्याकळपात कुठेच नाहीत ? हे सर्व आम्ही मेंढरांची जमात बनल्यामुळे झाले आहेजर आम्ही वैयक्तिकआणि सामुदायिक कर्तबगारी ओळखली असती तर आज ही परिस्थिती पाहायला मिळालीनसतीत्यामूळे सामूदायिक कर्तबगारी लक्षात घेऊन वाटचाल करा.
मानवी जिवनातील व्यक्तीगत मर्यादा ओळखता आल्या की सामाजिक परिस्थितीवर मातकरण्याची कला अवगत होतेप्रबोधन/सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या व्यक्तीगतमर्यादांना बलस्थान समजून तेच सामाजिक परिवेशात उतरविण्याचा प्रयत्न केलात्यामूळे सामूहीकउर्जा असूनही या चळवळी सातत्याने अपयशी ठरत आहेत.  व्यवस्थात्मक जिवनात सामाजिक कार्यतळीस न्यायचे असेल तर व्यक्तीला प्राप्त झालेले सामाजिकराजकियधार्मिकसांस्कृतिक,साहीत्यिक याम स्विकारावे लागतेत्यांचा अंगीकार करून वाटचाल करावी लागतेकारण हेसामाजिक व्यक्तीत्वाचे मूलभूत अंग आहेजसे शरिराचे सर्व भाग कार्यरत असले तर शरिर सुदृढराहून व्यक्ती विकासात पोषक ठरतोशरिराच एक भाग जरी निकामी किंवा अकार्यरत असला तरत्याला अपंगत्व बहाल होतेतसेच समाजिक व्यक्तीत्वाचे आहेसामाजिकराजकीयधार्मिक,सांस्कृतिक यापैकी एकाचा जरी आपण तिटकारा करीत असू किंवा अस्विकार करीत असू तरसामाजिक व्यक्तीत्व अपंगपंगू बनतेत्यामूळेच समाजही अपंगत्वाकडे वळायला लागते अपंगसमाज चळवळ चालवू शकत नाही.
व्यक्तीवादाच्या आम्ही घातलेल्या मर्यादा बाजूला सारून व्यवस्थात्मक जिवनाकडे वाटचालकरण्याच्या दृष्टीने विचार केल्यास कूठल्याच गोष्टींचा तिटकारा येत नाही सामाजिक कार्यसिद्धीलामदत होतेफक्त सामाजिकफक्त राजकीयफक्त धार्मिक म्हणणे ही व्यवस्थेपासून पळवाट आहेव्यक्तिगत मर्यादा निदर्शक होयते सामाजिक अपंगत्वाचे लक्षण होयहा प्रबोधन/सुधारणावादीचळवळी समोरचा सर्वात महत्वाचा धोका लक्षात घेऊन आपण वाटचाल करूलाविजय नक्कीचमिळेल. जात संपविणे हे आमचे ध्येय असायला हवे होते. पण आपण जात  संपविता जातीतच वर्गाचीनिर्मिती केलीतर दूसरीकडे वर्ग संपविणे ज्यांची जबाबदारी होती त्यांनी वर्ग  संपविता वर्गातचजातीची निर्मिती केलीपूरोगामी विचार नेमका इथेच माघारलाएकसंघ समाज निर्मिती हे पहिले ध्येयअसावेतेव्हाच आम्ही सर्व पातळ्यांवर लढू शकतो. अन्यथा सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.
आंबेडकरी चळवळ लयाला जाण्यास परकीय शत्रूंपेक्षा जास्त अंतर्गत शत्रू कारणीभूत आहेत.हवसे गवसे नवस्यांपासून ते थेट जूणे जाणते भाषणबाजबिनबुडाचे विचारवंतनिवृत्त प्रशासकीयअधिकारीथोर लेखक-कवी  सामा़जिक कार्यकर्ता असण्याचे बोंबा ठोकणारे सारेच. या लोकांनाना विचार ना आचारकुणीही बोलवाकुठेही बोलवा हमखास जाणारकुठलाही विषय असोछातीठोक बेंबीच्या देठापासून आंबेडकर सांगणारजसे काही यांच्याच कानात बाबासाहेब सर्व काहीसांगून गेलेतयांना ना राजकीय पक्षाची काळजीयांना ना सामाजिक भानयांना ना चळवळीचेगांभिर्यकशाचीच ना चिंता ना पर्वाफक्त काळजी स्वतःचे मोठेपण टिकविण्याची मिरविण्याची. हेचसर्व जेव्हा समाजात येतात तेव्हा आंबेडकरी राजकीय पक्षाला  नेत्यावर टिका करणार दुसऱ्यापक्षाच्या स्टेजवर जाऊन त्यांचा ऊदोउदो करणारसमाजातल्या लोकांना हे करा ते करा असेफुकटचे सल्ले देणार  स्वतःहा मात्र लाचार होऊन प्रस्थापितांसमोर पायघड्या घालणार. आज यासर्वांची अवस्था नर्तकी नर्तकांसारखी झालेली आहेपैसे देऊन कुठल्याही गीतावर नाचायला सांगा तेनाचणारतशीच यांची अवस्थाकुठेही जाऊन ढुंगण हालवून येणारविचारधारेचे द्वंद्वमतभेद,अन्याय अत्याचार सामान्य माणसाला सांगण्यासाठी मात्र यांच्या वर्तणुकीत नर्तकीचेच गूणकुठल्यास्टेज वर जायचेत्यातून समाजाला काय संदेश द्यायचाचळवळीवर काय परिणाम होईलसामान्यमाणसे काय बोध घेणार यांच्याकडून कशाचीच पर्वा नाही यांना. राजकीय तडजोडू नेत्यांनी केल्या तरअख्खी मिरची पूडचा कारखाना यांच्या नाका-तोंडात गेल्यासारखे समाजात बोंबलणार  नेत्याविषयीसमाजात द्वेष पसरविणारपण हे कुठल्याही संघटनेच्याविचारांच्या स्टेजवर गेले तर यांना कुणीचकाही म्हणायचे नाही ऊलट त्यांचा सन्मान किती वाढला हे दाखवून समाजातून त्याची किंमत वसूलकरणाररेड लॉईट मधल्या देहविक्रय करणाऱ्या  स्त्रियांनाही स्वाभिमान आहे पण यांना नाहीअशासामाजातल्या किड्यांना किती दिवस पोसायचे हे ठरविणे आता गरजेचे आहेतुम्ही चढत असलेल्याविविध-विभिन्न स्टेजवरील तुम्ही बसलेल्या जागेच्या खाली फटाके फोडायला समाजाला वेळ लागणारनाहीती वेळ येण्याआधी सावध होऊन कुठलाही एक मार्ग निवडाएक निश्चित भूमिका घेऊन तीवठवा. "सारे भारतीय माझे बांधव म्हणा !" पण सारे भारतीय पक्षसंघटनाविचारधारा माझ्या म्हणूनका ! हीच कळकळीची विनंती.
तूमच्यातल्या आमच्यातल्या घरभेद्यांची ओळख होणे आज गरजेचे आहे. बिजेपी आरएसएस किंवा तत्सम संघटनांशी जूळलेले लोक म्हणतात नेता नको नेते कशाला ? नेतृत्वकशाला पाहीजे ? नेत्यांविषयी संभ्रम  बदनामीकारक सतत बोलणारे व लिहिणारे. सामाजिककार्याच्या नावाखाली धार्मिकसांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून राजकीय लोकांकडून रसद मागणे व स्व आंबेडकरी राजकारणाविषयी समाजात द्वेष पसरविणारे हे लोक आहेत. हीच माणसेसाहीत्यिक  धार्मिक प्रदूषण पसरविण्यात पटाईत असतात.
काँग्रेस  तत्सम संघटनांशी जूळलेले लोक म्हणतात, आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून आणूशकत नाहीलोकशाही टिकून ठेवायची असेल तर संविधानविरोधी पक्ष सत्तेवर येऊ नये. हिंदूत्ववादीपक्ष सत्तेत आल्यास देशाला धोका आहे म्हणून तूमच्या मतांचे विभाजन करु नका. म्हणून कॉंग्रेस ला मत द्या असे म्हणतात. मार्क्सवादी  तत्सम डाव्या विचाराशी जूळलेले लोक म्हणतात संविधानाने,कायद्याने काही होणार नाही म्हणून शस्त्र घेऊन लढणारे हे लोक कधी कधी जशास तसे ची भाषाबोलतात.  प्रसंगी संविधान काय कामाचे असेही म्हणतात. जातीची ओळख टिकवू पाहणारेधर्माचीओळख टिकवून ठेवणारेफक्त भांडवलशाहीविरूद्ध रस्ते रंगविणारे. सत्ताधारी  भांडवलदारयांच्याविरोधात सदैव आंदोलन उभारणारे. परंतु संविधानिक लोकशाहीने राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी कुठलीही स्पष्ट भूमिका घेत नाही.
बिएसपीबामसेफ  तत्सम संघटनांशी जूळलेले लोक म्हणतात सत्ता आल्यावर आम्ही सर्वकाही करूसत्ता आवश्यक आहेदलित पंतप्रधानमूख्यमंत्री बनल्याशिवाय समाजाचा विकासहोणार नाही. कूठल्याही कार्यक्रमात माणसांपेक्षा सर्व समाजसूधारकांना फोटोरूपी स्थान देणारे.बाबासाहेबांना कमी करून तत्सम महापूरूष उभे करणारेबाबासाहेबांना प्रश्नांकीत करणारेजिवंतव्यक्तींचे पूतळे उभारणारे. सामाजिक अन्याय अत्याचार प्रसंगी सत्ता पाहीजेच असा नारा लावणारे.परंतु आंदोलनांवर विश्वास  दाखविणारे. रिपब्लिकन विचारांशी जूळलेले लोक मात्र यापेक्षा वेगळे वागतांना दिसतात. socio-politics हे प्रमाण माननारेसत्तेची वाट  बघता सामाजिक कार्यावरविश्वास ठेवणारेसर्व समदूःखी बहूजन वर्गाला सोबत घेऊन राजकीय प्रतिनिधीत्व देणारे. सामाजिकपरिवर्तनावर विश्वास ठेवून सातत्याने त्यासंबंधी कार्यक्रमाची आखणी करणारेवर्तमानाला अभिप्रेतसामाजिक बदल सत्ताधा-यांपूढे ठेवणारे. वैचारीक नेतृत्वावर विश्वास ठेवणारेसमाजाला खंबीरनेतृत्वाची गरज आहे यावर विश्वास असणारेवैचारिक आंदोलनातून समाजाला प्रत्यक्ष लाभ मिळवूनदेणारे. संविधानावर विश्वास ठेऊन सरकारच्या असंवैधानिक  अकल्याणकारी नितीवर सातत्यानेप्रहार करणारे. हे लोक आहेत परंतु इच्छाशक्ती व सामुहिक नियोजनाच्या अभावाने व एक विचार एक नेतृत्व असा वैचारिक अभाव असल्याने पाहिजे तसे राजकीय व सामाजिक यश हे प्राप्त करू शकलेले नाहीत.
हल्ली आंबेडकरी अनुयायी म्हणविणारे  काही फक्त जन्माने (दलितआंबेडकरी ठरलेल्यालोकांमध्ये आंबेडकरी आंदेलने किंवा कुठलाही समकक्ष निगडीत कार्यक्रम हेटाळणीचा टवाळगिरीचा किंवा टिकाटीपणीचा विषय बनला आहेहे सर्व करतांना आपण बाबासाहेबांचाअपमान करतो याची जाणिव  ठेवता हे विद्वान चारचौघात बाबासाहेबांच्या स्मारकाविषयीकिंवातत्सम आंदोलनाची हेटाळणी करतांना पाहून वाईट वाटते. कुठली गोष्ट चारचौघात करायची कुठली करू नये. हे या सुडो आंबेडकरी लोकांना कळत नाहीआपल्यातले हे विदूषक खरंच याचळवळीचा सत्यानाश करीत आहेतस्वतःला सुशिक्षितपणाचा शिक्का मारून घेतलेले हे लोकजेव्हाचळवळीला टप-यांवर नेऊन ठेवतात; तेव्हा -या कार्यकर्त्यांच्या बलिदानाचा  त्यागाचा पूढच्यापिढीत विसर पडतोहा सर्व तमाशा पाहतांना इतर लोक या परिवर्तनवादी न्यायाच्या चळवळीपासूनस्वतःला दूर ठेवतातचळवळीची हानी यामुळेच झाली आहेया तमाशगिरांना थांबवा.
समाज नेतृत्वाशिवाय चालू शकत नाही ज्यांना नेता नाहीतो समाजाची फसवणूक करतो स्वतःची सूद्धावर्तमान समाजाला खंबीर पायावर उभे राहायचे असेल तर राजकीय  सामाजिकनेतृत्व करणारा नेता आवश्यक आहे. आजपर्यंतच्या इतिहासात ज्या समाजाकडे राजकीय सामाजिक नेतृत्व करणारा नेता होता त्याच समाजाचे वर्चस्व समाजव्यवस्थेवर होते....आजही हेचआहे... तूम्हाला आम्हाला समाजाला नेत्याची गरज आहेनेता आहे अस्तीत्वात तो निवडण्याची स्विकारण्याची गरज आहेज्या दिवशी एक नेता एक पक्ष स्विकार करू त्या दिवशी समाज चळवळ पूढे जाईलनेता स्विकारतांना थोडी मेहनत घ्यावी लागेल. आज अस्तीत्वात असलेले सर्व नेते१९८० च्या दशकात  त्यानंतर आलेले आहेत.  या सर्वांमध्ये चळवळीला सर्वात जास्त योगदान कूणीदिले ? सामाजिक आंदोलने कूणी केली ? सामाजिक प्रश्नांवर कुणी लढा दिला ? सत्तेची लाचारी पत्करता स्वाभीमान कुणी जपला ? आज व्यवस्थेलामिडीयाला  प्रतिगामी शक्तींना कोणत्यानेत्याची भिती वाटते  ? हे सर्व करतांना कोणत्या नेत्याला सर्वात जास्त बदनाम केल्या जाते ? याप्रश्नांचा शोध घ्याउत्तर सापडेल. उत्तर नाही सापडले तर मंडल कमिशन कुणाच्या प्रयत्नाने लागू झालेसंविधान समिक्षेच्या विरोधात संसदेत कोण डरकाळी फोडत होता ? लवासा प्रश्न कूणी मांडला ?खाजगी विज कंपनी एन्रान ला कूणी हाकलले ? शेतकरी आत्महत्येवर सऱकारला कोर्टात कुणी खेचलेन्याय कुणी मिळवून दिला ? आजही समाजाच्या प्रश्नावर सर्वात जास्त मोर्चांमध्ये कोणत्या नेत्याचाचेहरा दिसतो ? शोध घ्यानेता निवडायला सोपे जाईलउत्तर मिळेलप्रश्न पडणार नाही.
स्वयंकेन्द्री माणसे आणि स्वयंकेन्द्री समाज कधीच परिवर्तन घडवू शकत नाही२१ व्याशतकाची नाडी आता वेगाने बदलाकडे वळत चालली आहेत्यामुळे पारंपारिकतेचा त्याग हाचएकमेव पर्याय आधुनिक पिढीसमोर आहेतर दुसरीकडे नेतृत्वाच्या भुकेचे डोहाळे लागलेलेदिल्लीकडे तोंड करून ढेकर देतांना दिसून येत आहेतदिल्लीतली मेजवानी गल्लीतल्या नेत्यांची भूकभागवेल अशी अपेक्षा असेल तर ते केवळ स्वप्नरंजन ठरेलअजूनही दिल्लीतल्या साहेबांना गल्लीपर्यंतपोहचविणारी साधने तुमच्याकडे नाहीत हे लक्षात घ्याआणि जे आहेत ते पोट भरण्यासाठी सर्वचनेतृत्वाची भूक लागलेल्यांना मेजवानी द्यायला निघाले आहेतपरिवर्तनवादी युवक यातून काय बोधघेतो त्यावर निर्भर आहेशेवटी एकच सांगतो तुमचा उद्धार तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशीउभा करण्यातच आहेदिल्लीतले परिवर्तन गल्लीत पाहायला मिळतील हे २१ व्या शतकाची शपथघेऊन सांगतो.
ओल्या मातीत जेव्हा माझा बाप गाडला गेला.
हिरवळ होती चहूकडेझाडाची पानेही हिरवीगार होती,
पण त्याच झाडाच्या फांदीला माझा बाप फाशीला लटकला होता.
                                                                                                                   ---संदीप
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275

No comments:

Post a Comment