Saturday, 5 January 2019

🎙 *बेळगावची सभा (१९३८)* 👨‍👩‍👦‍👦👨🏽

🎙 *बेळगावची सभा (१९३८)* 👨‍👩‍👦‍👦👨🏽

१९३८ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने *बेळगावला (कर्नाटक)* डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली *जाहीर सभा* आयोजित केली होती. सभेला सुमारे *५० हजार लोक* उपस्थित होते. सभेला जमलेल्यांत *मराठा समाजातील* शेतकरी व मजूर लोकांचा भरणा अधिक होता. बेळगावच्या आजूबाजूच्या खेड्यातील सर्व समाजातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने हजर राहिला होता.
          सभेला सरुवात होताच बाबासाहेबांनी *विशेषतः मराठा समाजातील शेतकऱ्यांना व मजुरांना* सद्यपरिस्थितीची जाणीव करुन देऊन *अत्यंत मार्मिक* व प्रसंगाला अनुसरून असे विवेचन केले. मराठा समाज व अस्पृश्य समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यांची सुखदुःखे समान आहेत असे पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले,
         "मराठा समाज व अस्पृश्य समाज *दारिद्रयाने* पिडलेला आहे. शेटजी-भटजी व जमीनदार यांच्या बंधनातून त्यांना मुक्त करणे आवश्यक आहे. *शेतकरी राबतो* आणि त्याचे फळ मिळते शेटजी-भटजींना. शेतकऱ्यांना आपल्या *कामाचा मोबदला* मिळत नाही. शेतामध्ये एक शेर धान्य पेरल्यानंतर त्या शेतातून एक मण धान्य मिळते. ते *शेतकऱ्याच्या मनगटाच्या* आधारावर! पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्याने शेतात खुरपे चालवून शेतातले तण जर काढले नाही तर तेथे धान्य केव्हाच पिकणार नाही. शेतकऱ्यांच्या श्रमामुळेच शेत पिकते. पण त्या *पिकाचा हिस्सा* त्याच्या राबणुकीच्या मानाने त्याला मिळत नाही. ही अत्यंत चीड आणणारी गोष्ट आहे. यासाठी *शेतकऱ्यांनी संघटीत होणे आवश्यक आहे.* आपल्या श्रमाचे फळ आपल्या पदरात पाडून घेणे जरूरीचे आहे. हे जर त्यांनी केले नाही तर तो आपल्या उपासमारीतून किंवा हालअपेष्टांतून मुक्त होणे शक्य नाही. शेतकरी आपल्या घरी *दुभती जनावरे* बाळगतो पण त्याला *दूध किंवा लोणी* सणावाराच्या दिवशीसुध्दा मिळत नाही. हे सर्व *शेटजी-भटजी-जमीनदारांच्या घरी* जाते. परिस्थितीचा हा एक अजब प्रकार आहे. ही सर्व परिस्थिती नाहीशी करण्यासाठी *महार व मराठा समाजाने एकत्रित येऊन संघटित झाले पाहिजे.* या दोन्ही समाजाच्या दुर्दैवाने *भटाभिक्षुकांनी* घालून दिलेली *जातिभेदाची* पध्दत अत्यंत हानिकारक झाली आहे. तिला आपण *मूठमाती* दिली पाहिजे. मनुष्यजात ही एकच आहे असे समजून आपण *बंधुभावनेने* वागले पाहिजे. महार आणि मराठा हे दोन्ही समाज आर्थिकदृष्ट्या सारखेच नाडलेले आहेत. शेटजी-भटजी व जमीनदारांच्या गुलामगिरीतून व जुलमातून या समाजाला सोडवायचे असेल तर हे दोन्ही समाज एकत्र आले पाहिजेत. महारांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे मराठा लोकांना वाटते ही *ब्राम्हण धर्माची शिकवण* आहे. मराठ्यांना देखील ब्राम्हण लोक *कनिष्ठ* मानतात. मराठे लोक जसे महारांना वागवतात त्याचप्रमाणे ब्राम्हण मराठ्यांना वागवतात. ही *उच्चनीच भावना* कशी नष्ट केली पाहिजे याचा विचार मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. महार दारात बसतो एवढ्यावर मराठ्यांनी समाधान मानू नये. कारण ब्राम्हणांच्या घरी त्यांची जागा *व्हरांड्यातच* असते. ब्राम्हणाच्या माजघरात, स्वयंपाक घरात त्यांना प्रवेश मिळत नाही. याबद्दल त्यांना खंत वाटली पाहिजे. जातिभेदाची ही रूढी मोडायची असेल तर या दोन्ही समाजांनी एकत्र येऊन *जातिभेदाविरुध्द चळवळ* सुरु केली पाहिजे. तरच या *अनिष्ट रूढीपासून* आपला बचाव करता येणे शक्य आहे. यासाठी दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन *बंधुभावाने* कार्य चालविले पाहिजे."
         बेळगावचे मराठा समाजाचे पुढारी माझे मित्र रा.ब.लाड, 'राष्ट्रवीर' चे संपादक श्यामराव देसाई, व्ही.एस.पाटील व इतर काही कार्यकर्ते यांनी बाबासाहेबांच्या या सभेसाठी अमोल साहाय्य केले होते. सभा यशस्वी करण्यासाठी नेमाण्णा पाटील, खेमाण्णा पाटील, इराप्पा मेस्त्री यांनी बरेच परिश्रम घेतले होते.

*डाॅ.आंबेडकरांचा सांगाती* या पुस्तकातून

*#सर्वांसाठी बाबासाहेब*

No comments:

Post a Comment