Tuesday, 1 January 2019

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना आपले रक्त आटवून, आपले आरोग्य पणास लावून रात्रंदिवस काम करावे लागले.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना आपले रक्त आटवून, आपले आरोग्य पणास लावून रात्रंदिवस काम करावे लागले. संविधान सभेचा बारा खंडात प्रसिध्द झालेला वृत्तांत त्यांच्या विद्वत्तेची, परिश्रमाची, जिद्दीची आणि अपरिमित ज्ञानाची साक्ष देण्यास पुरेसा आहे.
        अनेकदा संसदेच्या सेंट्रल हाॅलमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा स्टेनोटायपिस्ट आणि कुत्रा एवढे तीनच जीव दिसून येत. अठरा-वीस तास दररोज काम करुन त्यांनी घटना पूर्ण केली. आपल्या कार्यपूर्तीला साकार रुप देत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी 'जैसेफ स्टोरीचे' विचार उद्धृत करीत म्हटले, "उत्कृष्ट, प्रतिभाशाली आणि निष्ठावंत शिल्पकारांनी इमारत बांधून उभी केली आहे. हिचा पाया मजबूत आहे. हिचे विभाग सुंदर आणि लाभकारी आहेत. यात केलेल्या सोयी बुध्दिमत्ता आणि व्यवस्थेच्या सूचक आहेत. हिची किलेबंदी इतकी सबल आहे की, बाहेरून कुणीही आत शिरु शकत नाही. ही कायम स्वरूपात उभी राहावी म्हणून उभारली आहे. मानवी कार्याबद्दल असे म्हणणे अयोग्य ठरत नसेल, तर आपल्याच रक्षकांच्या अर्थात जनतेचा मूर्खपणा, भ्रष्टाचार आणि उपेक्षेमुळे ही केवळ तासाभरात उद्ध्वस्त होऊ शकते. मी अशी शिफारस करतो की, आपण या शब्दांवर विचार करावा. नागरिकांचे सदाचार, हे जनभावना आणि बुध्दिमत्तेतून उत्पन्न होतात. गणराज्यांचे पतन तेव्हा अटळ होते, जेव्हा बुध्दिमंतांना जनसभांमधून घालवून दिले जाते. कारण ते धैर्याने सत्य प्रकट करतात आणि भ्रष्टाचाऱ्यांना सन्मानित केले जाते; कारण ते लोकांना फसवता यावे म्हणून लोकांची हांजी हांजी करीत असतात.

No comments:

Post a Comment