Monday, 16 May 2016

बुध्द आणि त्यांचा धम्म ***************** प्रथम खंडः भाग पहिला ( पोस्ट नं 1 ) भाग पहीला जन्मापासुन परिव्रज्येपर्यत

*****************
बुध्द आणि त्यांचा धम्म
*****************
प्रथम खंडः भाग पहिला

( पोस्ट नं 1 )

भाग पहीला
जन्मापासुन परिव्रज्येपर्यत
************************
1) कुळ
 ********
1) ख्रिस्तपुर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते .

2) सबंध देश निरनिराळ्या अनेक लहानमोठ्या राज्यात विभागला गेला होता . त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती .तर काहीवर एका राजाची सत्ता नव्हती .

3) राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकुण सोळा होती .त्यांची नावे अंग ,मगध 'काशी ,कोशल, व्रर्जी, मल्ल, चेदी ,वत्स,कुरु पांचाळ, मत्सय, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार, आणि कंबोज ही होत .

4) ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत कपिलवस्तुचे शाक्य, पावा, व कुशीनारा येथील मल्ल , वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह , रामग्रामचे कोलिय , अल्लकपचे बळी , रेसपुत्तचे कलिंग , पिप्पलवनाचे मोर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग

 5) ज्या राज्यावर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या त्या राज्यांना '  संघ ' किंवा
 ' गणराज्य ' असे म्हणत असत .

6) कपिलवस्तु येथील शाक्यांच्या शासनपध्दतीविषयी विशेष अशी माहीती मिळत नाही या राज्याची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती कि त्यावर विशिष्ठ लोकांची सत्ता होती ते समजत नाही

7) तथापि हे माञ निश्चित की, शाक्याच्या गणतंञ राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवीत होते .

8) अशा प्रकारे राजसत्ता चालविणारया राजघराण्यांच्या प्रमुखाला '  राजा ' अशी संज्ञा होती

9) सिध्दार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुध्दोधनाची होती .

10) शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपरयात वसले होते .ते एक स्वतञ राज्य होते,. परंतु कालातंराने कोशल देशाच्या शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले .

11) कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते

12) तत्कालीन राज्यांत कोशलराज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते . मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते . कोशल देशाचा राजा पसेनदी ( प्रसेनजित ) व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिध्दार्थ गौतमाचे समकालीन होते.

प्रत्येक रविवारी बुध्द विहारात सकाळी गेलेच पाहिजे.
      विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment