Wednesday, 25 May 2016

🌷 धोकेबाज 🌷

🌷 धोकेबाज 🌷
दगडाच्या नागोबाला पुजणारा
जीवंत नागाला मारतो
सांगा बरं मानव
असे का करतो...||1||
हनुमान असतो देव
म्हणत बसतो मंत्र
माकडांना हाकलुन देतो
कसलं हे तंत्र...||2||
उंदराला म्हणतो वाहन
करतो त्याची आरती
विष देऊन मरतो
माणूस असतो स्वार्थी...||3||
कुत्रा म्हणे खंडोबा
चित्रापुरता असतो फक्त
त्याला दगडाने ठेचताना
कुठे जातो भक्त...||4||
दगडाला नैवेद्य असतो
दगड खेळतो तुपाशी
जीवंत कोटी कोटी देव
झोपतात रोज उपाशी...||5||
दगडाला देव मानणारा
माणसात मानतो भेद
जन्मदात्रीचा विटाळ त्याला
वाटत नाही खेद....||6||
जीवंत माणसालाही माणूस म्हणन्याची
मणसालाच वाटतेय लाज
माणसा रे भोंदु माणसा
तु स्वतःशीच धोकेबाज...||7||


विशाल ढेपे
8007434501
औरंगाबाद

No comments:

Post a Comment