*बा...,*
लोक म्हणायचीत
बा ला दारुडा
सडला लिव्हर अन् मेला
पर त्याच त्यालाच
दुःख माहीत
का पीत होता तो एवढा
बा च
कामच होतं असं
गटारातलं मैल काढायचं
तुम्हीच सांगा
माझ्या बा नं
कसं
न पिता काम करायचं
पोटाच्या त्या
खळगी पाई
दिसरात
कामात जुपायचा
शरीराचं दुःखनं
घालवाया
त्यो कायम
नशेत आसायचा
पण
खरं सांगतो तुम्हाला
माझा बा
लय मोठ्या दिलाचा
कितीबी रोज पिला
तरी
न विसरता
खायला आणायचा
लोक म्हणायचीत
जरी बा दारुडा
तरी कष्टानं घर
त्यानं उभारलं
पर
आमचं सुख बघायला
त्याला आयुष्य कमी पुरलं
पर
आमचं सुख बघायला
त्याला आयुष्य कमी पुरलं.!
*✍रवींद्र कांबळे 9112143360*
लोक म्हणायचीत
बा ला दारुडा
सडला लिव्हर अन् मेला
पर त्याच त्यालाच
दुःख माहीत
का पीत होता तो एवढा
बा च
कामच होतं असं
गटारातलं मैल काढायचं
तुम्हीच सांगा
माझ्या बा नं
कसं
न पिता काम करायचं
पोटाच्या त्या
खळगी पाई
दिसरात
कामात जुपायचा
शरीराचं दुःखनं
घालवाया
त्यो कायम
नशेत आसायचा
पण
खरं सांगतो तुम्हाला
माझा बा
लय मोठ्या दिलाचा
कितीबी रोज पिला
तरी
न विसरता
खायला आणायचा
लोक म्हणायचीत
जरी बा दारुडा
तरी कष्टानं घर
त्यानं उभारलं
पर
आमचं सुख बघायला
त्याला आयुष्य कमी पुरलं
पर
आमचं सुख बघायला
त्याला आयुष्य कमी पुरलं.!
*✍रवींद्र कांबळे 9112143360*
No comments:
Post a Comment