Friday, 13 May 2016

!! उलटा प्रवाह !!

लोक गोळा करता आले
पण लोकांना घडवता आले नाही
विहारात बोलावता आले
पण मंदिराच्या दारी अडवता आले नाही

विहारं बांधता आली
पण माणसं बांधता आली नाही
देणगी मागता आली
पण विचार मांगता आले नाही

त्रिशरण पंचशील पाठ झाली
पण आचरण पाठ झाली नाही
बाबासाहेबांशी गाठ झाली
पण पुस्तकांशी गाठ झाली नाही

बाबांना डोक्यावर घेऊन नाचले
पण डोक्यात मात्र घेता आले नाही
रचले बाबासाहेब हजारो पुस्तकात
पण वाक्यात एकाही घेता आले नाही

भिंतीवरच्या फोटोत लटकुन
आता भीम ही थकला असेल
म्हणे "जळमाटं लागण्या आधी उतरव,
नाहीतर मीच उद्या तुझ्या घरात नसेल"
म्हणे "जळमाटं लागण्या आधी उतरव,
नाहीतर मीच उद्या तुझ्या घरात नसेल"

🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment